Janu - 1 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 1हि कथा आहे .. अभय ची ..आणि त्याच्या ..वेड्या प्रेमाची...अभय ...तसा दिसायला .. फिल्मी हिरो सारखा ..अजिबात नव्हता. साधा सरळ..काळा सावळा.. उंच,केस मात्र इतरानि हेवा करावेत इतके सुंदर.
दिसायला जरी हिरो नसला तरी...मनाचा राजा होता..सुख असो वा दुःख अभय नेहमी इतरांच्या मदतीला धावायचा... शेजारी पाजारी कोणाचं काही हि काम असो .. सर्वांच्या तोंडी एकच नाव...आपला अभय...आई वडीलांचा लाडका .. एकुलता एक मुलगा..पण लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झालेले संस्कार म्हणजे ...हे विश्वची माझे घर.. त्यामुळे तो प्रत्येकाला आपलं मानायचा आणि आपल्या स्वभावाने सर्वांना आपलसं करायचा..
अभय अभ्यासात हुशार होता..एकदम शांत स्वभावाचा...आई वडीलांची काम तो कधीच टाळत नसे.. कधी कोणिशी भांडण नाही.. प्रेमाची उधळण करणारा असा हा अभय
आई वडीलांची जान होता...पण अभय चि जान मात्र ..कोणात तरी अडकली होती... कोण होतं ..अभय ची कमजोरी..
आई बाबा ची जान असणारा अभय.. पण त्याची जान होती .. जान्हवी..त्याची जानू..
कोण होती जानू?
जानू म्हणजेच जान्हवी प्रधान .. श्रींरंग प्रधाना ची छोटी मुलगी ..त्यांना दोन मुली होत्या..स्नेहा आणि जान्हवी..स्नेहा मोठी..पण ती तिच्या काकान कडे राहत होती ..कारण काकांना मुलीची हौस पण त्यांना मुलगी नव्हती..त्यामुळे स्नेहाला काकान कडे ठेवण्यात आले होते..प्रधान एका बँक मध्ये कामाला होते ..दोनी मुलीचं ..मुलगा नाही याची त्यांना खूप खंत होती..पण तरी ही त्यांनी मुलींना मुलांपेक्षा कमी लेखले नाही ..प्रधान एकदम कडक स्वभावाचे ..शिस्तीचे..मुलींनी ..मोठ्यांच्या पुढे पुढे करू नये ..मुलांशी जास्त हसत खेळत बोलू नये ..मुलींनी आपल्या मर्यादा ओलांडू नयेत...थोडक्यात अशी त्यांची विचासरणी...ते दाखवत नसले तरी त्यांना जातीचा अभिमान होता ..आपण प्रधान .. जानू न आपल्या पेक्षा कमी जातीच्या मुलान मुलीनं मध्ये जास्त मिसळू नये ..या साठी ते सतत तिला समजावत..ते बँकेत कामाला होते ..त्यांची बदली ..आपल्या अभय च्या च शहरात झालेली ... व ते अभय च्या शेजारी राहायला आलेले..जानू ची आई एकदम छान स्वभावाची ..पण त्या ही जानू च्या बाबांच्या शब्दा बाहेर जात नव्हत्या...त्यांच्या साठी त्यांचं घरचं त्यांचं जग ..त्यांचा संसार..
हे तर झालं आई बाबन विषयी ...आता पाहू अभय ची जानू कशी होती ? जानू ..गोरी पान ..घाऱ्या डोळ्यांची .. बॉब कट केस तेही कुरळे ..लांब नाक ...फुलासारखे ओठ..जानू ची विशेषतः म्हणजे ती नेहमी हसत मुख असायची ...तिच्या चेहऱ्यावर च हास्य पाहिलं की मन एकदम प्रसन्न होऊन जायचं..जानू आपल्या फक्त एका हस्यांन सर्वांना आपलंसं करायची ..म्हणून तर कधी मुलींचा विचार ही न करणारा आपला अभय जानू ला पाहून हरवून गेला होता..
बरेच दिवस बंद असलेलं घर अचानक आज त्याचा दरवाजा उघडा दिसला म्हणून अभय लक्ष देऊन पाहू लागला..त्यानं पहिल्यांदा जानू ला पाहिलं आणि बस ..तिथेच पुतळ्या सारखा उभा राहून पाहू लागला..जानू ने निळ्या रंगाचा चुडीदार घातला होता..तिचे केस सारखे चेहऱ्यावर येत होते ..ती धुतलेले कपडे वाळत घालण्याच्या कामात मग्न होती ..आणि अभय तिला पाहण्यात ..अभय च्या डोक्यात एकच गाणं वाजत होते ....
वो हसीना वो नीलम परी
कर गई कैसि जादू गरी
निद इन आखोसे छिन.ली
दिल में बेचैनी या है भरी..
अभय बराच वेळ तिथेच उभा राहुन जानू ला पाहत होता...जानू आपलं काम आवरुन केव्हाच घरात गेली होती.. अभय ही तिथून निघून घरी आला ...पण जानुचा चेहरा त्याच्या नजरे समोर सारखा येत होता..कोण आहे ती ?पाहिलं तर आपण इथे तिला कधीच पाहिलं नाही ...असे बरेच प्रश्न त्याला पडले होते ...
अभयच घर एका चाळीत होत..तिथे वेगवेगळ्या जातीचे लोक होते ..पण ..जेव्हा ही कोणता सण असे सर्व मिळून ..खूप प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करत..प्रत्येक जण भाग घेत असे ..नवरात्री चे नऊ दिवस तर ..सर्वात स्पेशल ..दुर्गा मातेची मोठी शी मूर्ती चाळिच्या मधोमध असलेल्या कटट्यावर बसवली जायची ..पूर्ण चाळीत मंडप घातलेला असायचा लाईटच्या माळा लावल्या जायच्या... दररोज नव नवे कार्यक्रम आयोजित केले जायचे.....
असेच प्रत्येक सण आनंदात व मिळून मिसळून केले जायचे..
चाळीत राहणारे खूप सारे अभय चे जिगरी दोस्त....अमर ,संजू,बिट्टू ,अजू असे बरेच ..ते नेहमी कटट्यावर बसून गप्पा मारायचे ..सुट्टी दिवशी क्रिकेट खेळायचे ..नेहमी सोबत असायचे ....हो आणि एक छोटा मेंबर ही होता त्यात मिहिर आळते..सर्व जण लाडाने त्याला मिहू म्हणत..८.९वर्षाचा ...गोरा ..थोडासा ढोलू तो कधीच आपल्या वयांच्या मुलांसोबत खेळत नसे ..पहावं तेव्हा अभय च्या मागे असायचा ..अभय दादा ..अभय दादा ..त्याचं सारखं चालूच असायचं ...
संध्याकाळ झाली आणि सर्व कट्ट्यावर जमले ..एव्हाना सर्वांना आपल्या चाळीत नवीन मेंबर आलेलं माहीत झालं होत .. सर्वांनी जानू ला पाहिलं होत ...आणि सर्वांना ती आवडली होती ....पण कोण होती ते कोणालाच माहित नव्हते.....अभय ला जाणून घ्यायच होतं की ती कोण आहे ..?तिच नाव काय आहे..?म्हणून त्यानेच विषय काढला ..

" अरे आपल्या चाळीत कोणी तरी नवीन राहायला आल आहे ..?"
तसा संजू मध्येच बोलला ..," हो मी ही पाहिलं ..काय भारी दिसते रे ती ?"

अभय ला का माहित पण संजू चा राग आला ....थोडा वेळ सर्व शांत बसले ..मग न राहवून अभय च पुढे बोलला .., " कोण आहेत ते ..? कोणाला माहित आहे का ? "

सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या..तितक्यात .. मिहु तिथे आला ..त्याने अभय च बोलणं येता येता ऐकलं होतं .
" मी सांगू अभय दादा.. ?"

सर्वांनी एकसाथ मीहू कडे पाहिलं...अभय ला तर खूप आनंद झाला..," अरे सांग ना ..?" अभय गडबडीत बोलला ..," ते ना प्रधान काका आहेत ..आणि प्रधान काकी .."
अभय मधेच बोलला ," आणि ती मुलगी..?"
मीहु ..," ती होय ती .. जन्हिवी दीदी ..म्हणजेच जानू दीदी ..तिला घरात ..जानू म्हणतात ना... ".

" तुला रे कसं माहित ..?"सर्वजण एकदम म्हणाले ..
" मी गेलो होतो ना सकाळी त्यांच्या घरी ..माझ्या बाबांच्या ओळखीचे आहेत ना प्रधान काका ..सकाळी आई बोलली ..ही भाजी ..प्रधान काकाच्या घरी नेऊन दे ..तेव्हा मी गेलो होतो त्यांच्या घरी ..तिथं गेल्यावर ओळख झाली ..आणि तेव्हा त्या काकिने जानू अशी हाक मारली होती ना त्या दिदीला ....खूपच छान आहे ती दीदी ...मी गेलो होतो तर तिने मला .. ॲपल खायला दिलं होत आणि ..काय रे तुझं नाव? म्हणून माझे गाल ओढले होते ..मी सांगितलं मिहू ."

...थोडा वेळ अशाच गप्पा मारल्या सर्वांनी व सर्व जण घरी गेले .. अभय ही घरी जाऊन जेवला .. व ....बेड वर जाऊन ..जानू चा विचार करू लागला .. ह्म्म ..तर जानू नाव आहे तिचं ..जानू ..बरेच वेळा त्याने जानू ..जानू..अस नाव घेतलं ..आणि हलकस स्मित हास्य केलं....जानू ..माझी जानू
क्रमशः