Janu - 5 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 5

जानू प्रोजेक्ट घेऊन घरी आली .बाबा अजून आले नव्हते..जानू ला बर वाटल..आई ने विचारलं मिळाला का प्रोजेक्ट ?..जानू नी हो म्हणून सांगितलं..आणि ती आपल्या खोलीत गेली.तिने प्रोजेक्ट पेपर काढले ..अभय चा प्रोजेक्ट तिने उघडून पहिला...," अरे वा..."

सहज तिच्या तोंडातून निघाल," ..किती छान..? "

अभय च अक्षर खूपच सुंदर होत ..त्यात त्याने प्रोजेक्ट ची मांडणी ही एकदम उत्तम केली होती ...पेपर वरती पहिलं.. फळाच नाव त्यानंतर त्या खाली चौकट आकुन त्यात त्या फळाच् चित्र त्या खाली त्याची माहिती ..त्याचे प्रकार..ते फळं कुठे प्रसिद्ध आहे ते ठिकाण..जानू ला प्रोजेक्ट खूप छान वाटला..हा अभय तर फारच हुशार आहे ..अस ती मनाशीच म्हणाली..दोघांचे प्रोजेक्ट एक सारखे नकोत म्हणून तिने फळांची चित्र न चिटकवता..स्वतः हातानी चित्रे काढली ..जानू ची चित्रकला छान होती..त्यामुळे तिला तेच बर वाटल..बराच वेळ झाला पण .. तिचा प्रोजेक्ट काही पूर्ण झाला नाही..ती झोपी गेली .

शाळेत गेल्यावर सखी तिला दिसली ..सखी ने जानू ला पाहिल्या बरोबरच ओळखलं की हिला प्रोजेक्ट भेटला...

सखी:मिळाला ना प्रोजेक्ट?

जानू: तुला कस माहीत ?

सखी: तुझी खास मैत्रीण आहे इतकं तर तुला ओळखते मी ..आणि तुझा चेहरा सांगतो ना.?

जानू : हो .

सखी: तो काही बोलला का ?

जानू: काल गेले त्याच्या घरी ..पाहिलं तर वाटलं तो देणारच नाही..पण दिला त्याने ..

सखी: मग झाला का पूर्ण ?

जानू : नाही ग ..आज करेन पूर्ण..अर्धाच झाला ..रात्री किती वेळ लिहीत बसले होते ..त्यात त्याला सांगितलं होत ..उद्या लगेच देते.

सखी: बर ..झाला की देऊन टाक .. त स..ही माने सरांनी ..सोमवारी जमा करायला सांगितलं आहे ..म्हणजे अजून २ दिवस आहेत ..

जानू: बर .झालं..मी आजच करते पूर्ण.

पुन्हा दिवस भर शाळेत गेला ..प्रोजेक्ट लिहायला वेळच मिळाला नाही तिला..शाळा सुटली आणि ती मैत्रीनी बरोबर घरी येऊ लागली..घर जवळ आल..ती वळून जाणार तेवढयात तिच्या लक्षात आलं की अभय आपल्या मागेच आहे ..तसा तो रोजच असे ..पण तिने आज पहिल्यांदाच पाहिलं..तो दिसला ..तिने..मागे वळून त्याला पाहिलं..तो एकदम गोधळला ..जानू..थांबलेलं..पाहून..आपण हिच्या मागे आहोत म्हणून..हिला राग तर नाही ना आला ..त्याला अस वाटून गेलं..तो ही तिथेच थांबला.

जानू : अभय,प्रोजेक्ट उद्या दिला तर चालेल का ?

अभय:हो ...सोमवारी जमा करायचा आहे .तुझा पूर्ण झाला की दे.

जानू:काल नाही पूर्ण झाला माझा ..आज करेन आणि उद्या देईन.

अभय: बर ..चालेल.

जानू ने अभय कडे पाहून स्माईल केलं व ती घरात..निघून गेली.
इथे अभय ला झालेला आनंद त्याला लपवता येईना..आज जानू नी आपल्याला नावाने हाक मारली ..याच विचारात तो ..मग्न होता..आणि खूप खुश होता.
आणि का खुश असणार नाही?त्याची जानू बोलली होती त्याच्या सोबत .
दुसऱ्या दिवशी जानू ने प्रोजेक्ट अभय च्या घरी नेऊन दिला ..पण तो घरात नव्हता..त्याचं वेळी तो मित्रां कडे गेला होता...पण घरी आल्यावर आईनी जेव्हा सांगितलं की जानू येऊन गेली ..त्याला स्वतःवरच राग आला.का आपण बाहेर गेलो याचा.
हळू हळू जानू आणि अभय एकमेका सोबत बोलू लागले होते .
कधी कधी जानू नळावर पाणी आणायला जायची..तिला पाहिलं की अभय ची स्वारी चालली नळावर पाणी आणायला..असलेलं पाणी तो झाडाला ओतून ..कळशी रिकामी करायचा..एकडे आई ओरडत असायची ..अरे कशाला ओतलास पाणी ..सकाळी तर भरल होत..आहे पाणी घरात..आणि कशाला आणत आहेस..पण हे ऐकायला तो तिथे असायचा कुठे ...जानू नळाकडे येताना दिसली की झालं..हा तिच्या आधी पोहचलाच ..नळावर ..मग आधी तो तिला पाणी भारी देयचा ..तो पर्यंत तिच्या शी गप्पा मारायच्या..त्याला तर फक्त निम्मित लागायचं..तिच्या शी बोलण्यासाठी..तिला ही प्रश्न पडायचा..जेव्हा मी येते .. नेमक तेव्हाच बर याला पाणी भरायला येऊ वाटत..पण ..अभय चार स्वभाव तिला माहीत होता..मुलींच्या मागे पाळणारा ..हा तर नाही..अस ती स्वतः ला समजावत असे..शाळेत ही तिने अभय ला बऱ्याच वेळा पाहिलं होत ..पण तो कधी मुलीनं कडे ढुंकून ही पाहत नसे..हे तिच्या लक्षात आलं होत .
अभय दुसऱ्या मुलीनं कडे पाहिलं तर कसा ..त्याच्या मनोमनी तर केव्हाच जानू..बसली होती..जानू शिवाय दुसऱ्या कोणाचा विचार ही त्याच्या मनात येत नसे.
जानू आणि अभय आता चांगले मित्र झाले होते ..दिवसातून एकदा का होईना ..जानू शी बोलल्या शिवाय त्याला चैन पडत नसे... शाळेत जाता येता तो नेहमी तिला पाहत असे पण सुट्टी दिवशी ती बाहेर दिसली नाही की ..अभय बेचैन होई..तेव्हा मात्र .तो ..मिहिर ला ..बोलावी ..जानू दीदी काय करत आहे ..पाहून ये जा ..म्हणून सांगे..मिहिर ही पळतच तिच्या कडे जाई..काय करते म्हणून तिच्या जवळ बसे ..तिच्या शी गप्पा मारी ..कधी कधी..तिला अंगणात ओढतच घेऊन येई..अभय तिला पाहून खुश होत असे.
क्रमशः