Swash Aseparyat - 19 books and stories free download online pdf in Marathi

श्वास असेपर्यंत - भाग १९

एके दिवशी मी आणि आनंद कॉलेज मधून घरी जायला निघालो. सायंकाळ झाली होती. जवळपास पाच साडेपाच वाजले असावे. वसतिगृहाच्या पाच मिनिटे अंतरावर असतांना मला आणि आनंद ला लक्ष्मी आणि एक बाई सोबत बाहेर रस्त्याने जातांना दिसली. लक्ष्मी सोबत एक स्त्री असल्याने तिला आवाज कसा द्यायचा हा ही प्रश्न होता. लक्ष्मी च्या चेहऱ्यावर असणारे हास्य दिसत नव्हते. चेहरा पडलेला होता. पण आमची दोघांची लक्ष्मीला आवाज देऊन बोलण्याची हिंमत होत नव्हती. पण प्रेमाचा विषय असल्याने, आणि महिना झाला लक्ष्मीच्या आठवणीत सारखा झुरत असल्याने आज ही हिंमत करावीचं लागेल???? महिना भरापासून मनात उठणाऱ्या वादळाला लक्ष्मी कडून जाब घेऊन त्याला थांबवावे लागेल, अन्यथा ते वादळ तसच घिरक्या घेत राहील. मनाचा गुंता वाढेल पण प्रश्नाचे उत्तर काही सापडणार नाही.

शेवटी मी हिंमतीने लक्ष्मीला आवाज दिला. तिने दिसताच नाराजीतंच हाय केला. काही खरेदी करण्यासाठी बाहेर पडली आहे असं लक्ष्मी ने आम्हांस सांगितलं. लक्ष्मी सोबत असणारी बाई म्हणजे लक्ष्मी ची आत्या. तशी लक्ष्मीची आत्या स्वभावाने चांगली होती आणि समजूतदार होती. लक्ष्मीने माझी आणि आनंदाची ओळख आत्याला करून दिली. आत्याला सर्व समजून गेल्याने, काही वेळ आम्हांला बोलण्यासाठी मोकळीक दिली. आनंद आत्या बाई सोबत बोलत होता आणि लक्ष्मी आणि मी एका बाजूला बसलो होतो. लक्ष्मीने घरी घडलेला प्रकार सांगितला . ती सांगता-सांगता डोळ्यांत अश्रू आणून रडत होती, डोळ्यांत आसवं आणून बोलत होती.
परत एकदा मला या जातीने शिवी घालून, तुझी मर्यादा तेवढीच आहे!!! अशी लक्ष्मण रेषा ओढून दिली होती. मी नीच जातीचा व ती उच्च जातीची, म्हणजे चामडी सोलणार्या च्या मुलाने शेवटपर्यंत तेच काम करावे, शिक्षणाचा आणि त्याचा काही एक गंध नसावा, असंच लक्ष्मीच्या बाबांचे विचार ऐकून वाटलं...

लक्ष्मी रडत रडत सांगत होती. तिच्या डोळ्यांत सतत अश्रू येत होते.
ती म्हणत होती अमर,
" मला तुझ्याशिवाय कुणाशीही लग्न करायचं नाही रे... मी दुसऱ्यांविषयी विचारही करू शकत नाही . मला कुठेतरी पळून घेऊन चल. अमर, मला त्या खोलीत राहायचं नाही . माझा तिथे जिव घुटमळतो असतो. तू काहीही कर , पण त्या घराच्या तावडीतून सोडव !!!" लक्ष्मी सारखी विनवणी करत होती .

आनंद ही तिला धीर देत होता .
होईल एकदाचे बरोबर , " तुला आंम्ही नक्कीच सोडवून आणि तुझं लग्न अमर सोबत लावून देऊ. फक्त तू हिंमत हरू नकोस . "

शेवटी लक्ष्मीची आत्या असल्याने आणि लक्ष्मी आपल्या घरी गेली. मी मात्र तिच्या पाठमोर्‍या शरीराकडे शेवटपर्यंत बघत राहिलो. ती नजरेसमोरून दूर होतांना असं वाटतं होतं, की शरीरातील महत्वाचा अंग आपला अधू होत आहे अथवा, गळून पडते आहे, अशीच भावना होती. सगळ्यांनी भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला. आत्या बाईच्या सुद्धा डोळ्यांत आज अश्रू आले होते. आत्या बाई जवान पणातचं विधवा झाली असल्याने तिला संपुर्ण आयुष्य तिचे मुलं आणि भावांची पोरं यातचं सांभाळण्यात घालवले. पण आत्या चा लक्ष्मी वर विशेष जीव होता. आत्या बाईने आमच्या लक्ष्मी ला घेऊन जा ,म्हणून परवानगी सुद्धा दिली होती. पण मी काही तरी करेल , हे खोटे अश्वासन देऊन, सर्वांचा निरोप घेतला.

इकडे घडलेल्या प्रकाराची चर्चा गावांत वाऱ्यांसारखी पसरली. आई घरी एकटीचं राहत असल्याने पाटलाच्या गाव गुंडांनी , आईला धमक्या देणे सुरू केले. तिला यांविषयी काहीएक माहिती नव्हतं . आईच्या समोर जाऊन हे गाव गुंड मनात येईल ते बोलत असायचे. म्हणायचे,

" महारांच्या पोरांना लय माज आला वाटतंय???? तरी नवरा कष्ट न करता, कर्ज न फेडताचं मेला!!! आणि हे दोन - चार वर्ग जास्त शाळा शिकलेलं पोट्टं , त्याला पाटलांची पोरगी प्रेमासाठी भेटली का????"

हे काय बोलत आहे, यांविषयी आईला याची काहीचं माहिती नव्हती. हे पाटलाने पोसलेले गावठी सांड आईला दिसताचं दिवसा ढवळ्या धमक्या देत असायचे. कधी कधी तर बलात्काराच्या सुद्धा धमक्या देत असायचे.

म्हणत असायचे , " तू तुया पोट्ट्यांला समजाऊन सांग सावित्रे,
नाहीतर गावातून तुयी हकालपट्टी केल्या बिगर पाटील मानायचा नाही!!! लय बेकार माणूस हाये तो. नाही तर तो आमच्या कडून खून करवून घेईल तुमचा न पोलिसांना पत्ता भी लागू देणार नाही, असाचं पाटील आहे!!!"
आईला याविषयी काही माहीत नसल्याने, ती फक्त रडण्याचं काम करत असे.

" माया लेकरासाने काही गुन्हा केला असेल तर , मला त्याची सजा करा, शिक्षा द्या !!! पण माझ्या पोराला काही करू नका.. मी तुमची माफी मागते!!!! आई रडत रडत त्या गावगुंडांची माफी मागायची. पण गावठी गुंडांची कितीही माफी मागितली तरी मात्र ते शिवागीळ करत असायचे. तिच्या फाटलेल्या झापंराच्या आतून डोळे टुकार करून , तिच्याकडे वासनेच्या नजरेने पाहत असायचे.

लक्ष्मीला , मी आणि आनंदने पळवून नेण्याचा बेत आखला होता. या सर्व कामांत लक्ष्मी ची आत्याबाई यांचा साथ होता. कारण आत्याबाई ला सुद्धा आपल्या भावाची करामत माहिती असल्याने ,लक्ष्मीला तसाचं त्रास व्हायला नको ,म्हणून आत्या सुद्धा आम्हांला मदत करण्यास तयार झाली होती. पळून कुठे तरी बाहेर जायचा, असा आमचा बेत ठरला होता. इकडे आईला सुद्धा झालेल्या प्रकाराची माहिती दिली होती, तिने या कामांसाठी होकार दिला होता, ती पण गाव सोडण्यास तयार झाली होती. सर्व नियोजन झालं होतं,
पण याची खबर लक्ष्मीच्या वडिलांना लागली आणि आमचा प्लॅन पूर्णपणे फसला.

आता आपली परत कधी सुटका होणार नाही, आणि नाशिक वाल्या मुलांसोबत आपलं लग्न होईल, या भीतीत लक्ष्मी जगू लागली होती. वेळेवर जेवण करत नसायची ,वा कुणाशी बोलत नसायची. फक्त सतत रडून मोकळी होत असायची. बिचारी आत्या , तिला खूप वाईट वाटायचं. तिने आपल्या भावाला समजावण्याचा आणि लग्न अमर शी लावून देण्यासाठी आग्रह सुद्धा केला, पण तिलाचं बोल पडल्यामुळे आत्या काही या विषयांवर बोलत नसायची. इकडे माझी ही कंडिशन सारखीचं होती. फक्त मला प्रत्येक वेळेस साथ होती ती आनंद ची. त्यामुळे मला यांतून बाहेर काढण्यास बरीचं मदत ही आनंद ची असायची. पण लक्ष्मी आठवली की पूर्ण दिवस कुठेचं लक्ष लागत नसायचं. आज महिना लोटला होता मात्र लक्ष्मी सोबत बोलणं, किंव्हा भेट, यांतील काही एक होत नव्हतं. ती कशी असेल???कोणत्या स्थितीत असेल याचीचं चिंता सदा लागलेली असायची.

एके दिवशी एक मुलगा आनंद आणि मला शोधत वसतिगृहात आला. लक्ष्मीच्या आत्याचा मुलगा विनय आहे अशी त्याने आपली ओळख दिली. ईथेच राहत असल्याने, आणि आत्याचा स्वभाव चांगला असल्याने तेच संस्कार विनय च्या बोलण्यात दिसतं होते. पण चेहरा त्याचा पडलेला होता. बोलतांना तो अडखळत बोलत होता .कदाचित आम्हीं नवीन असल्याने आणि वसतिगृहातील पोरं आमच्याकडे पाहत असल्याने अडखळत बोलत असावा म्हणून आनंद ने आपण इथून बाहेर जाऊन बोलूया, म्हणून आम्हीं तिघे ही रस्त्याच्या बाजूला ,जिथे फिरायला लोकं येतात, अश्याच जागी एका बेंचवर जाऊन बसलो. विनय ने बोलायला सुरुवात केली.......

" लक्ष्मी आपल्याला सोडून गेली रे अमर???? सोडून गेली म्हणजे तिचं लग्न झालं असेल, आणि तोचं निरोप घेऊन विनय आला असावा. एक तर लक्ष्मी ने आपल्या विषयी सांगितलं असावं किंव्हा आत्याने निरोप द्यायला सांगितले असावे. पण त्याच्या डोळ्यांत अश्रू आल्याने मी थोडा घाबरलो, आणि तुझ्या बोलण्याचा अर्थ मला नीट कळला नाही, म्हणून मला बरोबर सांग, असं त्याला म्हणालो. तो बोलू लागला. घरात सारखं कोंडून ठेवण्यात आल्याने, आणि नाशिकच्या मुलाशी लग्न ठरल्याने , तिला काय करावे सुचत नव्हते. ती सतत तिच्या बाबांना विनवणी करत असायची की, मला अमर शी लग्न करायचं आहे!!! मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही!!!
तेंव्हा तिचे बाबा तिला उत्तर देत असायचे,

" तू मेली तरी चालेल!!! पण त्या भिकारड्या सोबत तुझं लग्न होऊ देणार नाही!!! आणि पळून जाऊन त्याच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःला फाशी लावून घेईल!!!

अशी सतत धमकी लक्ष्मी ला सतत देत असायचे. त्यामुळे तिला मानसिक तणाव निर्माण झाला. ज्याच्या सोबत आयुष्य घालविण्याचे स्वप्न पाहिले तोच अमर आपला होत नसेल तर जगून काय उपयोग????? पळून जाऊन लग्न केलं तर बाबा फासावर लटकण्याची धमकी देतात, आणि झालं ही लग्न तरी अमर आणि मला सुखाने जगू देणार नाही, किंव्हा सुखाने संसार करू देणार नाही, या भीतीने खोलीत कुणी नाही, अशी दक्षता घेऊन, खोलीचे दार आतून बंद करून लक्ष्मीने विष प्राशन करून स्वतःला संपवून घेतलं . पण शेवटपर्यंत तिने अमरचा लळा कधी सोडलं नाही. एवढे बोलून विनय ढसाढसा आमच्यासमोर रडू लागला .

मी या बातमीने पूर्णत: हादरून गेलो. परत परत त्याला विचारू लागलो. हे सर्व खोटं आहे, म्हणून त्याला विणवू लागलो. माझ्या कानांवर माझा विश्वास उडाला होता. डोळ्यांसमोर काळोखाचे ढग निर्माण झाले आणि त्या काळोखाच्या ढगात लक्ष्मीचा हसविणारा चेहरा मला दिसत होता. तिच्या प्रेमाच्या आठवणी डोळ्यांसमोर भराभर येऊ लागल्या. जसे एखादा चक्र गतिमान होतं , तशा त्या आठवणी चा भूतकाळ माझ्यासोबत कितीतरी वेळ नाचत होता. आनंद ही या बातमी ने तुटला होता. एकाएक लक्ष्मी ने हा निर्णय घेतला कसा ,याचा उलगडा काही होत नव्हता.

दोन प्रेमी युगलांतील एका राणीचा या माणसाने निर्माण केल्या जातीने, लक्ष्मी चा जीव घेतला होता . पैसा नसल्याने किंवा घर नसल्याने एका उच्च जातीच्या मुलीशी मी लग्न करू शकत नाही आणि त्याचाच विरोध म्हणून त्या प्रेमी युगुलां पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.. काय मोठा गुन्हा केला होता लक्ष्मी ने ????

एवढंच की, एकाचं कॉलेजमध्ये सोबत शिक्षण घेत असतांना आणि परिस्थितीने गरीब असणाऱ्या , तिच्याचं घरी काम करणाऱ्या गरीब माणसाच्या मुलाशी प्रेम केलं होतं हा गुन्हा होता लक्ष्मीचा???? कि तीने मानवता हा एकचं धर्म आहे, जात बंधने याच्यात न पडता , तिने प्रेम केलं हा गुन्हा केला होता का लक्ष्मीने ?????

प्रत्येकचं वेळेस नियतीने माझ्याशी हा घाणेरडा खेळ का करावा!!! लहानपणी चित्रा गेली,
मग परिस्थितीने व कर्जाच्या ओझ्याखाली दबून बाबा गेले आणि आता जिच्यांवर प्रेम केलं , जी सारखी हवीहवीशी वाटली, तिला सोबत घेऊन आयुष्याची स्वप्न रंगविले, या जन्मात तिचाचं होऊन राहील अशी वचने एकमेकांना दिली, आज तिचं लक्ष्मी एकट्याला सोडून आयुष्यातून कायमची निघून गेली!!!! तिची आठवण जरी आली तरी तिच्या आठवणी नजरेसमोरून कितीतरी वेळ जात नसतात त्या लक्ष्मीने स्वतःला संपवावं ???? हा कसला नियतीचा खेळ???? आणि हा कसला समाज??? जिथे जात पाहून लग्न करण्यास मज्जाव केला जातो??? जिथे प्रेम करणाऱ्यांना डांबून ठेवल्या जाते रुढीच्या बंधनात!!! जातीच्या दोरखंडात!!! नीच मानसिकतेच्या पाखंडात!!!! अमानवी समाजात!!!!

प्रेमाच्या आठवणी देऊन,
तू एकटीचं निघून गेली,
कसा जगेल तुझ्यावाचून हा अमर,
या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित ठेवून गेली ,
घेतली होती वचने तू अन् मी
शेवटपर्यंत साथ राहण्याची!!!
मग मध्येच का ती वचने विसरून!!!
तू सोडून गेलीस.......


क्रमशः.....