Of a simple heart books and stories free download online pdf in Marathi

साद हृदयाची



सुमित्राताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या. घरातील कामातदेखील त्यांचे लक्ष लागत नव्हते. नेहमी अगदी प्रेमाने सर्वकाही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून श्यामरावदेखील काळजीत पडले. खरतरं गेले चार महिने या उभयंतांनी घरात काही गोडधोड केले नव्हते की कुणा नातेवाईकांकडे गेले नव्हते.


सुमित्राताई आणि श्यामराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे. लग्नाला १० वर्षें होऊनही घरात पाळणा हलेना. अपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकांनी थोरामोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी मनोभावे पूर्तता केली. शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले. आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉ. पाटील यांच्याकडे उपचार करण्याचे ठरविले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली. त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मोठ्या कौतुकाने बाळाचे सर्वकाही केले. स्वराध्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांचे सर्वस्व होते. दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात स्वराध्य वाढत होता. शालेय व महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता. पुढे स्वराध्यने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो गट अ अधिकारी झाला. सुमित्राताई आणि श्यामरावांना स्वराध्यचा फार फार अभिमान वाटत होता. त्याच्याच ऑफिसमधल्या एक सुंदर आणि गुणी मुलीशी त्याचे आधी प्रेम आणि मग लग्न ठरले होते. रेवती स्वराध्यची होणारी पत्नी ही देखील बुद्धिमान होती. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सुमित्राताई आणि श्यामराव बारीकसारीक गोष्टींची काळजी घेत होते. सगळे काही सुरळीत चालू होते आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजण घातले. रेवतीचे एका अपघातात निधन आले. स्वराध्यला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की गेले चार महिने तो अबोल, निर्विकार झाला होता. मानसोपचार तज्ज्ञही त्याच्या या अवस्थेपुढे हतबल झाले. सुमित्राताई आणि श्यामराव पार खचून गेले होते.


आज अचानक एक फोन आला. पलीकडून एक मुलगी बोलत होती. तिने स्वराध्यला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. फोनवरील त्या संभाषणाने सुमित्राताई अस्वस्थ होत्या. कोण असेल ही मुलगी? हिला स्वराध्यला का भेटायचे आहे? या विचाराने सुमित्राताई बेचैन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या. फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली. येताच तिने सुमित्राताई आणि श्यामरावांना वाकून नमस्कार केला. सुमित्राताईंनी चहा केला. चहा घेत ती सांगू लागली,"मी प्रिया कुलकर्णी. गेली दोन वर्षे हृदयविकाराने आजारी होते. हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता. हृदयदाता न मिळल्याने माझी जगण्याची उमेदच संपली होती. पण चार महिन्यांपूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला. रेवती जोशी नावाची एक तरुणी आपले हृदय मला देणार होती. ती अखेरचे श्वास घेत होती. तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलावले. तेव्हा शेवटच्या क्षणी रेवतीने मला स्वराध्यविषयी सर्व सांगितले आणि या जगाचा निरोप घेतला. माझ्यावर यशस्वी शस्रक्रिया झाली आणि रेवतीने मला नवीन जीवनदान दिले.

खरं सांगू, त्या दिवसापासून माझे मन स्वराध्यला भेटण्यासाठी आतूर झाले आहे. कृपया मला त्याला भेटू द्या".


सुमित्राताई आणि श्यामरावांना हे काय चालले आहे काही कळेना. त्यांनी प्रियाला स्वराध्यची खोली दाखवली.

पाठमोऱ्या स्वराध्यला हाक मारण्यासाठी नकळतच प्रियाच्या मुखातून शब्द निघाले, "स्वरू" आणि काय आश्चर्य निर्विकार स्वराध्य पटकन मागे वळला.

दोघे एकमेकांकडे पाहू लागले. प्रियाने धावत जाऊन स्वराध्यला मिठी मारली. स्वराध्यच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते.

एका हृदयाची साद दुसऱ्या हृदयाने ऐकली होती

स्वराज्याला त्याची रेवती पुन्हा भेटली होती

तुम्हाला कथा कशी वाटली हे नक्की कळवा जास्तीतजास्त लाईक , कमेंट & शेअर करा.. मी आता पर्यंत ५ कथा प्रकाशित केल्या आहेत लाइकस & डाउनलोड बरेच करतात.पण तुम्ही कमेंट केल्या नाही तर मला कस समजेल तुम्हाला कथा आवडत आहेत कि नाही म्हूणन तर प्लीज कमेंट करून कळवा & keep renting .......काही चुकल असेल तर माफी असावी......म्🙏🙏🙏