Such a game - 2 books and stories free download online pdf in Marathi

एक खेळ असाही - भाग 2

फक्त बिकनी वर झोपलेली असते , तेवढ्यात राहुल तिला अस बघतो आणि बोलतो,” आता काय असा प्लन आहे काय..?” “अरे तू जरा बाजूला होशील काय उन मला हवाय आणि म्हणून मी बसलेय तर जा स्वताच काम कर “ अर्चंना बोलते . राहुल तिच्याकडे बघून कपडे काढायला सुरुवात करतो आणि सगळ्यांना आवज देतो ,” हे मित्रांनो तुम्ही सगळे पोहायला येणार का माझ्यासोबत ,मला अस वाटतंय कि आहे त्या वेळेचा आपण आनंद घेऊ काय बोलत्यात तुम्ही “ त्याच हे बोलण इकून सगळे खुश होतात आणि सगळे मग त्याला जॉईन होतात आणि सगळे जन पोहायला जातात फक्त अमिता सोडून , आपण सगळे वेगळे आहोत ह्याची कोणाला जाणीव होत नाही आणि सगळे जण पाण्यात मस्त मज्जा करत असतात. तेवढ्यात तिथे शार्क येतात आणि सगळ्यांना जेव्हा त्याची जाणीव होते तेव्हा सगळे जण किनार्यावर यायला धावत असतात, आणि राहुल बघतो कि आपल्या जवळ एक शार्क येतोय तेवड्यात तो अस्मिता त्या शार्क समोर पाठवतो आणि तो स्वतचा जीव वाचून पाळतो पण तेवढ्यात त्याच्याच दिशेने येणारा त्याला शार्क दिसत नाही आणि तो शार्क च्या तावडीत सापडतो , तो एका शार्कच्या तावडीत सापडतो तेव्हा अस्मिताच्या समोर येणारा शार्क आपला मार्ग बदलतो आणि राहुलच्या शार्कच्या दिशेने जातो , अस्मिताला घेण्यासाठी प्रसाद आणि ओंकार तिला वाचवतात , सगळे बाहेर येऊन बघतात तेव्हा पाणी खूप लाल झालेलं असत, इथे अर्चना,अक्षया सगळे जण ओरडत असतात आणि तो मेला हे गृहीत धरून ते शांत बसतात
साराला खूप दुख होत कि हे आपण काय करून बसलो , आपल्याला एक आकर्षण वाटल बस आता झालेल्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा आता आपण ह्या गावातून कस बाहेर पडायचं बघूया. बस आता एकच ध्येय ठेवायच. तिकडे प्रवीण बाकींच्या सोबत बसतो तेव्हा अमिता विचारते ,” सारा कुठे आहे तिला एकटीला का सोडून आलास ?” प्रवीण ,” नाही सहज मी आलो बाकीच्या वस्तू ती घेऊन येतेय. इथे अशी भयाण का शांतता आहे काही झालाय काय ..??”
त्याच्या अश्या प्रश्नावर कोणी काही बोलत नाही, तेवढ्यात सारा नारळ आणि केळी घेऊन येते , प्रवीणच्या समोर ते ठेवते आणि नारळ घेते त्याच्या डोक्यात मारते,” साला , हरामखोर तुला मी सोडणार नाही “ तिचा असा अवतार पाहिल्यावर प्रेमेय आणि ओंकार तिला मारण्यापासून अडवतात. तिच्या अश्या अवतारावरून तिला अस वाटत कि ह्याचा तिने आता जीव घ्यावा ,
अमिता ,” का काय झाल तुमच्यात ..??”
प्रवीण ,” अरे हि लट्टू झालेली माझ्यावर साली आणि आमच्यात एक कीस तर झाली तर त्यावर हि अशी react झालीय.
अमिता मिश्कील्ने हसते
सारा त्याला मारण्यासाठी त्यच्या कानाखाली देते , साला हरमजादा माझ्यावर रेप करायचा ह्याने प्रयत्न केला.
आता तर त्या दोघांमध्ये भांडण होयला तयार होते आणि तेवढ्यात प्रेमेय आणि ओंकार तिला अडवतात आणि तिला सांगतात ,” तुम्ही नका भांडू आधीच एक माणूस मेलाय आता शार्कच्या तावडीत सापडलाय झालेल्या गोष्टी विसरून जावा “ आता आपल्यला एकमेकांची गरज आहे आणि “प्रवीण हिच्यापासून लांब राहा कळाल”, प्रेमेय धमकीच्या स्वरुपात बोलतो
दीर्घ श्वास घेऊन आणि चेहऱ्यावर राग धरून, हातात असलेला शंख घेऊन सारा बाजूला एका ठिकाणी बसायला जाते, तेव्हा अक्षया आणि अस्मिता तिला समजवायला आणि सहानभूती द्यायला जातात आणि “ कृपया करून मला एकटीला सोडा मला शांतता हवीय “ त्या हे ऐकून मागे जातात आणि तिला एकटीला सोडतात. असाच दिवस मावळला जातो आणि सगळे शांत झोपतात. सकाळी जाग येते तेव्हा सारा सगळ्यांना झोपलेले बघते आणि थोड्या अंतरावर जाते तेव्हा बघते तर राहुलची बोडी पडलेली असते , ती लगेच तिकडे जाते आणि बघते तर त्याला खूप लागलेलं असत, तिला एकटीला उठवण कठीण असत म्हणून ती सगळ्यांना आवज देते तेव्हा त्याला घ्यायला सगळे येतात आणि त्याला जिथे राहतात तिकडे त्याला घ्रेऊन येतात. मग सगळे त्याच्यावर उपचार करायला लागतात पण त्यामध्ये प्रवीण बोलतो कि ,” ह्याला वाचून काय करायचं नाही तर तो जगण्याच्या परीस्थितीत तर नाही आहे”
त्याच हे बोलण ऐकून ,” का तुझ्या सारखी रेपिस्ट माणसच जगायची लायकीची आहेत काय .....?” सारा बोलते .
“मी तुझ्यावर रेप केला नाही आहे सारा फक्त मी वाहवत गेलो होतो,” तो तिच्या जवळ जायचं प्रयत्न करतो आणि तेवढ्यात ती स्वतच्या जवळची चाकू काढते आणि त्याला रोखून धरते ,” एक ना एकदिवस मी तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही “ सारा बोलते.
आणि मी पण बघत बसणार आहे काय मी पण बांगड्या नाही घातलेत “, प्रवीण तिच्या डोळ्यात डोळे घालून तिकडून बाजूला होतो.

दुसऱ्या दिवशी अमिता उठते आणि तिला खूप भूक लागलेली असते म्हणून ती काही आहे का बघते आणि तेवढ्यात सारा येते (ह्या आधी साराने अमिताकडून चाकू हिसकून घेतला असतो कारण तिला तो निट पकडता येत नाही आणि म्हणूनच सारा तो तिच्या भल्यासाठी चाकू घेतला असतो त्याचाच राग अमिता सराविषयी ठेवते पण साराच्या मनात अमिता बद्दल अस काही नसत ) “काही तरी खायला नाही आहे मग आता शोधाव लागेल” तेवढ्यात प्रवीण येतो आणि बोलतो,” मी आणतो काही तरी खायला सगळे उठण्याआधी “. “मी पण येते तुझ्यासोबत “ अमिता बोलते
“बघ ग सावकाश जा नाही तर जंगलातले प्राणी पेक्षा आपल्या जवळचे प्राणी खूप भयानक आहे”, सारा बोलते
सारा किनार्यापाशी जाते आणि अमिता आणि प्रवीण आत जंगलात जातात , अमिताला प्रवीण आवडत असतो आणि म्हणून ती त्याच्यासोबत जाते. ते खूप वेळ एकत्र भटकत असतात , तेव्हा तिला काय वाटत ती अचानक प्रवीणचा हात पकडते आणि त्याला जवळ करते ,
इथे सगळे जण आपल्या खाण्याची योजना करतात आणि लाकड्ची म्हणजे कोणी जनावर येणार नाही त्यासाठी, सगळे रात्रीच जेवण करून शांत झोपतात, दुसरा दिवस उजाडतो तेव्हा प्रसाद आपल्या बोलण्यात सगळ्यांना गुंतवतो आणि आपल्याकडे चांगले प्लन आहेत अस सांगतो . पण सारा फक्त इतकच बोलते कि ,” ह्याच्या बोलण्यात कोणी येऊ नका कारण आम्ही एक स्वच्छ पाणी आणि राहण्यास्ठी चांगली जागा पहिली होती तेव्हा तुम्हाला ह्याने काही सांगितलं नाही मग ह्या माणसावर विश्वास ठेऊ नका “ तीच बोलण कोणी ऐकत नाही कारण सारा सगळ्यांना घमेंडी , स्वताचा विचार करणारी आणि स्वतचा हुकुम चालवणारी वाटते म्हणूनच तीच कोणी ऐकत नाही. आणि तो पण मग त्याचा फायद घेऊन तुम्ही जावा अस सांगतो आणि तो तिच्याकडचा चाकू घेतो तिच्यावर रोघून धरतो आणि मी म्हणेल असाच होयला हव मग त्याच सगळे जण बोलण ऐकतात आणि तो चाकू फेकून देतो आणि तिकडून निघून जातो, तेव्हा पडलेला चाकू अमिता उचलते आणि साराला देते.
आपल कोणी इकत नाही हे बघून ती मग ती तिकडून निघून जाते आणि जाताना बघते कि अमिता आल्यापासून खूप शांत होती , आता काही तरी झालाय पण अमिता नाही बोलणार म्हणून ती पण तिला न विचारता जाते पण ह्यात सगळीकडे अक्षयाच लक्ष सगळीकडे असत. दुपार होते तेव्हा अक्षया अमिताकडे जाते...................