one a game - 4 books and stories free download online pdf in Marathi

एक खेळ असाही - भाग 4

सारा ला काही कळत नसत आपलयाला इथे का बोलावलय आणि का ?
सगळीकडे अंधार असल्यासारखं तिला वाटत असत .
आणि तेवढ्यात त्या माणसाचा हसण्याचा आवाज साराला येतो. ती बघते तर तो मोबईल वर काही तरी वाचून हसत असतो.
संतापाच्या नजरेने सारा त्याला पाहते आणि विचारते ,” Hey you ... what happening here ?”, “तुम्ही मला का बोलावलं आहे? आणि मला जायचं हे सगळ मला विचित्र वाटत आहे please.”
(सारा अगदी डोळ्यात पाणी घालून त्याच्या सोबत बोलत होती आणि तिला लवकरात लवकर ह्यातून सुटका हवी होती. आणि प्रश्नाची उत्तर )
आणि त्यात ती मोबाईल पण लावायचा प्रयत्न केला पण तो काही केल्या लागत नव्हता कारण , तिच्या मोबाईल च नेटवर्क गेलेले होत आणि हां अनुभव तिच्यासाठी खूप भयानक होता. तरी पण ती धीटपणा ने त्याच्यासमोर बसते .

आता तर तिचा पारा चढला होता. आणि ती त्याच्या समोर बसली होती.
टेबलावर आपल सामान ठेऊन त्यावर आपला हात आपटला जेणेकरून त्या माणसाला समजेल कि,” आपल्याला भडकावण म्हणजे काय असत, त्याच्या नजरेला नजर मिळवून “ हे काय सुरु आहे मला कळेल काय आणि मला का इथे आणल आहे आणि तुम्ही आहात तरी कोण ?“
त्या खोलीमध्ये इतकी शांतात असते कि,” त्या माणसाला हि खाऊ कि गिळू अशी अवस्था ती करते कारण सारा च्या डोळ्यात खूप संतापची भावना दिसत असते “.

तो माणूस तिला बसायला विनंती करतो ,” सारा मी सगळ सांगेन मी तुला इथे का बोलावलं ,कशासाठी, मी कोण आहे आणि तू इथे काय करतेस ते त्यामुळे तू जरा संयम ठेव अस मला वाटत “
सारा त्याच्या समोर आपला हात दाखवते आणि बोलते ,”ते मला आता काही ऐकायच नाही आहे तुम्ही मला सांगा इथे मला का बोलावलं आहे आणि कशासाठी “
तो माणूस तिच्या समोर बसतो ,” मी एक डॉक्टर आहे. डॉक्टर जॉय, अहाहा तसा नाही डॉक्टर.
मी माणसाचा एका विषयामध्ये डॉक्टरी पदवी मिळवली आहे तुला माहिती असले कि phd बद्दल आणि मला कोडींगमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यातच मी हां एक प्रोग्राम बनवला आहे आणि तुला ते आवडेल”.
“डॉक्टर जॉय तुम्ही कोणत्या प्रोग्राम बद्दल बोलत आहात मला कळेल काय “ सारा
हां सांगेन ना जरा धीर धरायची पद्धत असते आणि ती तू धर वाईनचा ग्लास आपल्या हातात घेत dr.जॉय तिच्यासोबत बोलत होते .
“मी एक प्रोग्राम डिजाईनर आहे आणि मी त्यात एक गेम केलाय तो गेम साधा ,सरळ लोकांसाठी नाही केलाय. त्यासाठी खूप चालाख माणस लागतात आणि त्यात आम्ही तुला निवडलंय आणि हां गेम काय आहे आणि का केलाय हे तुला नेमक कळेल.
तुला माहिती असेल कि तू स्वतः’ एक मार्शल आर्ट मध्ये प्राविण्य मिळवलंयस आणि आम्ही तुमच काम पण पाहिलंय , तू एक जिद्दी , हुशार आणि मेहनती मुलगी आहॆस त्याच प्रमाणे तुझ्या पुनर्जन्मामुळे जे तू काही चुकीच कृत्य केलंयस अस तुला आठवत असेल तर त्यावर पण तू चुका दुरुस्त करून घेऊ शकतेस आणि तुझ्या अश्या हुशारीने आम्ही तुमची निवड केली आहे “.

dr .जॉय तिला घेऊन बाहेर एका कॅबीन मध्ये जातात. तिला एका प्रोग्राम रूम मध्ये नेतात. तर तिला दिसत कि तिला तिच्याच स्वप्नात दिसलेले माणस तिथे झोपलेले दिसतात , त्यांच्या डोक्याला एलेक्ट्रोसिन्सिफालोग्राम लावलेलं असत ते वयाने पण खूप मोठी असतात. त्याचबरोबर ते शांतपणे झोपलेले असतात.
“पण हि तर सगळी मोठी माणस आहेत आणि मी लहान हे तुम्ही काय दाखवत आहात मला नाही समजत आहे मला काय ते निट समजाऊन सांगा “ सारा थोडी रागाने dr जॉय सोबत बोलत असते“.
“dear सारा आम्ही तुला बोलोलो होतो कि ,” तुमचा पुनर्जन्म झालाय ,त्यामुळे तुम्हाला हे सगळे दिसत आहेत. तुमच्या पुर्न्जन्मामध्ये हि माणस होती त्यात तुम्ही पण होत्या आणि अश्याच एका ठिकाणी तुम्ही सगळे सापडले होते त्यात तुम्ही काय चूक केलीत आणि ती पुन्हा करायची नाही अस तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हाच तुम्हाला ती चूक सुधारायची संधी मिळणार “ dr जॉय

“पण dr जॉय ह्या लोकांमध्ये मला प्रवीण हा माणूस दिसत नाही आहे ? कुठे आहे तो ?” सारा
“प्रवीण (dr. जॉय हसतात ) तो तर आपल्या कर्माने मेला कायमचा तुझ्या सोबत त्याने जे कृत्य केल त्याने ते नको करायला हव होत त्याचबरोबर त्याने काय तुया सोबत पण नाही केल काय अमिता सोबत पण केल आणि त्याने ते पुनर्जन्म मध्ये केल तेच त्याने ह्या मध्ये पण केल आणि म्हणूनच तो आता तुला दिसत नाही “

dr जॉय थोड्या गंभीरतेने बोलतात ,” सारा तुला म्हणून सांगतो मी ते ऐक ह्या गेम मध्ये कोणी मेल तर तो असल्या खर्या आयुष्यातून पण तो जातो कारण हां गेम आहेच असा ह्यात तुम्हाला चुका सुधारण्याच्या संधी मिळते आणि ते तुम्ही चुका नाही सुधारलात तर तुम्हाला तुमच्या जीवाला पण मुकाव लागत आणि म्हणून हां रिस्की गेम आहे “
सारा ला हे खर वाटत नसत , ती गोंधळून dr जॉय ला अडवते आणि विचारते ,”पण तुम्हाला कस माहिती आम्ही मागच्या जन्मी काय केल होत आणि आमच्या सोबत काय झाल होत हां?”
“dear सारा तुला किती समजाऊ साहजिकच आहे तुला खूप प्रश्न पडतील पण ऐक त्यांच्या डोक्याला जे लावलाय ते दिसतंय तुला त्याने मोनीटोर मध्ये त्यांच्या विचारांची frequency आणि त्यांच्याच विचारांची आम्ही इथे टेस्ट करतो आणि त्यांच्या मनात जे काय आहे ते आम्हाला कळत.”
पुढे dr जॉय तिच्या कडे बघून बोलतात ,” अजूनही तू कॉन्फुझ आहेस कि काय ? अग खरच तुला नाही विश्वास तर तुला एक डेमो देतो आम्ही . आहेस काय तयार तू ? एका प्रस्नार्थक नजरेने तिच्याकडे बघतात आणि पुढे बोलतात , असेल तर तस सांग म्हणजे आम्ही तुला दाखवतो.”
सारा खूप गोंधळात येऊन ,” नाही... नाही... नाही... हे नाही शक्य तुम्ही काय पण बोलत आहात” (तिने हातवारे करायला सुरुवात केले) सारला घाम आला होता, तिचा गळा पण सुकला होता .
dr जॉय ने पाहिलं आणि तिच्यासाठी पाणी ची व्यवस्था केली.
साराने पाणी पिल आणि शांत झाली.
तिला काही तरी वेगळच हे वाटत होत आणि तिला हे खर काय ते जणू घ्यायचं होत म्हणून तिने आता आपल्यावर प्रयोग करायचं ठरवते.
“dr जॉय मी तयार आहे आणि हे जर मला काही वेगळ जाणवलं तर तुम्हाला माहितीय मी काय करू शकते”
तिच्या डोळ्यात dr जॉय ला एक वेगळी च चमक दिसते.
तिच्या ह्या प्रयोगासाठी dr जॉय तयारी करायला सांगतात.
ते एका खुर्चीवर बसतात त्यांच्या समोर सारा बसवतात तिच्या डोक्याला एलेक्ट्रोसिन्सिफालोग्राम लावतात. सारा डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेते आणि डोळे मिटते.
ती खूप मोठी रिस्क घेत असते का तर तिला वाटत असत कि काही तरी चुकीच मिळाव म्हणून.
तिच्या डोक्याला लावलेलं एलेक्ट्रोसिन्सिफालोग्राम त्यातून रेज येतात आणि एक धक्का बसतो. त्यात तिचे ती डोळे मिटते. तिचे डोळे मिटलेले असले तरी तिला आवाज ऐकायला येत असतो.