one a game - 6 books and stories free download online pdf in Marathi

एक खेळ असाही - भाग 6

“आई मला माहितीय तू हे मुद्दामून मी जायच्या आधी पोळे करतेस कारण मला ते खाता यावे त्याचबरोबर त्याव्ही चव जिभेवर रेंगाळत राहावी म्हणून “ सारा बोलते

आई मागून अंग झटकते ,”तुम्हाला काही कदर आहे ह्याची मला किती त्रास होतो तूला नाही माहिती “
“ अग अशी काय करतेस आता मला नाही तुझ दुख कळणार मग कोणाला?” सारा थोडी केविलवाणी होऊन बोलत होती.
“ तू अजून घे कि पोळी माझ काय मनाला लाऊन नको घेउस मी काय बोलतच राहणार “ डोळ्याच्या कडेपर्यंत पाणी आल तरी साराची आई सरला दाखवत नव्हती .
“अरे बापरे हे काय ?” सारा थोड्या मोठ्या आवाजात बोलिली .
“काय ग काय ?... काय झाल आवडली नाही काय पोळी “ साराची आई सगळ ठेऊन सारापाशी आली.
सारा आईच्या खांद्यावर हात ठेऊन ,” आई हे गंगाजमुना का तुझ्या डोळ्यात यावे माझ्यामुळे ?“.
आई ,” सारा माझा जीव च गेला ना तू इतक्या मोठ्याने बोलीलीस ते , आणि मला त्रास होणार ना तू खूप लांब जातेयस ग माझ काळीज आहेस तू “
आई हुंदके देत राड्याला लागली होती.
सारा कपाळाला आठ्या येऊन विचारत होती अग पण एवढी कलगी का आई, मी आहे नीट आता मला काही नाही होणार तुझ्या सारखी गोड गोड आणि मुळूमुळू रडन्री आई असताना .
“अग तुझ्या जन्माच्या वेळेपासूनच मी खूप तुझी काळजी घेतेय आताच नाही, तुला माहिती नसेल तुझा जन्म खूप क्रिटीकल मध्ये झालाय अगदी तू लहान होतीस सारा तू “
आई रडून हसून हे सांगत होती आणि सारा फक्त आईच्या चेहऱ्याकडे बघत होती.
“तुझा जन्म खूप लवकर झाला. सातव्या महिन्यात मला अचानक त्रास होयला लागला आम्ही लगेच हॉस्पिटला गेलो आणि तेव्हा तुझा जन्म झाला . डॉक्टरांनी तेव्हा तुझ्याकडे बघूनच सांगितलं होत कि खूप काळजी घ्यावी लागणार आहे. तुला आम्ही पाहिलं पाहिलं तेव्हा तू पेटीत नुसती शांत झोपली होतीस.”
तुला घ्यायचा मोह होता कारण , तू एकटीच तिकडे होतीस. रडत होतीस , हाता पायाचे हालचाली करत असत होतीस पण तुला आम्ही घेऊ शकत नव्हतो कारण तुला त्रास नको म्हणून.
जेव्हा तू बरी आहेस अस वाटायला लागल तेव्हा डॉक्टरांनी तुला आमच्याकडे दिल. तुला काही त्रास नको म्हणून की काळजी घ्याची हे सुध्धा त्यांनी सांगितलं ,
जेव्हा तुला माझ्याकडे दिल तेव्हा माझा जीव नुसता धडधडत होता, त्याच बरोबर मला खूप रडायला पण येत होत कारण तू खूप दोन महिन्यापासून माझ्यापासून दूर होतीस आणि मला राहवत नव्हत तुझ्या शिवाय. तुला नाही माहिती आम्ही तुला किती फुलासारखं सांभाळल आहे.
साराची आई साराचा हात हातात घेते आणि बोलते म्हणून तुला नाही पाठवता येत ग कुठे भीती वाटते काही झाल तर.
सारा तिच्या रडण्यावर कंट्रोल ठेवते . “हुम्मम म्हणून तू मला कुठे पाठवत नाहीस तर काय ह्याच कारण मला आज कळाल ते कस काय ?”
“तू खूप लांब जातेयस ना म्हणून (साराची आई हुंदके देत सांगत असते )
“आई अग मला काही नाही होणार ग तू नको काळजी घेउस आता पर्यंत मी कधी हार मानली आहे काय “ सारा एकदम बिंदास होऊन बोलत असते .
साराची आई साराकडे एकटक बघत असते.
“सारा तू हार आणि जीत ह्यामध्ये नको पडूस खूप त्रास होईल मग तुला तू फक्त तुझ्या खेळावर नियंत्रित कर म्हणजे कस तुला हर जीत चा तुला त्रास नाही होणार हां “
सारा आई कडे बघते आणि हसते ,”हो अग आई नाही मी जास्त विचार नाही करणार “
“काय चालू आहे तुमच निघायचं नाही काय तुम्हाला हां “ मागून मोठ्याने घोगर्या आवाजात साराचे बाबा बोलतात
“बाबा (त्यांच्या चेहऱ्याकडे सारा बघून बोलते ) सारा डोळ्याने इशारे करते कि आई कडे बघा जरा “
“अरे बापरे इथे काय महापूर आला होता काय ग सारा “ साराचे बाबा आणि सारा जोर जोरात हसायला लागतात.
आई रागाने बाबा कडे बघत असते आणि किचन मध्ये जाते .
आई बाबा साठी केलेल्या पोळ्या गरमा गरम त्यांच्या समोर ठेवते.
“एवढा चांगला बेत आहे आणि तुझी आई का ग रडत होती सारा ?” बाबा पोळीचा घास घेता घेता बोलत होते .
“काय ओ बाबा आई थोडी इमोशनल झाली होती आता मी लांब जाणार ना म्हणून ओ “ (खट्याळ पणे बोलत सारा) “ मी गेल्यानंतर तिला काही चिडवायच नाही आ”
साराचे बाबा डोळे मोठे करत “बापरे होय काय नाही आ सतवणार “
“आ आता कस बाबा बघ आई बाबा माझ ऐकतात तुला नाही कोणी बोलणार “ सारा हसत हसत बोलत असते .
“हां चालेल नाही सतवणार (बाबा आई कडे बघतात आणि हसत बोलतात ) सारा तू आली कि मग आई ला सतवू”
सारा थोड्या शोकने बोलते ,”बाबा “ आणि बाबा ,सारा जोर जोरात हसायला लागतात.
साराचे बाबा उठतात, साराच्या आई कडे जातात. तिच्या खांद्यावर हात ठेवतात , म्हणजे तिला कळत कि ,” आपल्या माणसाला आपली खूप काळजी आहे”.
खरच हे जे फिलिंग आहे नवरा बायको मध्ये ते किती दिलासा देण्यासारख गोष्ट असते.
साराचे बाबा साराच्या आईला ,”काळजी नको करूस सगळ ठीक होईल आणि आपले आशीर्वाद तर आहे ना तिच्या सोबत. आपण किती सहन केलय ते आपल्या देवाला माहिती आहे त्यामुळे नको टेन्सन घेउस “.
“आता तुझे डोळे पूस तिला आंनदाने तिच्या कामगिरीवर पाठव म्हणजे तिला धीर येईल “
साराचे बाबा साराच्या आईचे डोळे पुसतात.
आणि तेवढ्यात सारा येते,” (सारा घसा खोकवत) तरीच म्हटलं पोळीला इतकी मस्त चव कशी काय आली “
साराची आई लाजून बाजूला होते आणि साराचे बाबांचा डबा भरायला घेते. आणि साराचे बाबा बाहेर हॉल मध्ये जातात.
साराची आई ,” अहो ऐकलात काय डबा सगळा संपून या अजून काय हवाय काय लोणच नि ?”
साराच्या आईच वाक्य मध्येच तोडत ,” अग आई थोड प्रेम दे तुझ म्हणजे बघ त्याचं पोट भरेल “
सारा हे बोलिली तेव्हा खूप हसत असते.
“सारा काहीतरीच काय ग तुझ” जा चल साराची आई लाजून बोलते
बाहेरून साराच्या बाबांचा आवाज येतो,” सारा अग तुझ आता एक फोरम भरलास त्यावर सही नाही केलीयस ती ?”
“अरे हो बाबा मला सही करायचीय तेव्हढच फक्त राहिलंय “
सारा बाहेर जाते तेव्हा कोणीतरी कुरिअर वाला येतो एक पार्सल घेऊन.
सारा थोडी संशयाच्या नजरेने बघते कि ,”आता तर आम्ही पार्सल नाही मागवलं मग हे कुठून आल ?”
सारा जोर जोरात आई ला हाक मारते.
“आई ए आई तु काही मागवलं होतास काय ग. एक पार्सल आलाय “
आई आतूनच बोलते ,”नाही ग मी नाही मागवलं आहे तू बघ काय आहे ते “
कुरिअर वाला ,” मडम हे आमच्य कडून तुम्हाला complimentory आहे “
सारा प्रस्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघते नि विचारते ,” म्हणजे काय ?”
कुरिअर वाला ,” मडम तुम्ही खेळायला जात आहे. अस आमच्या स्पोर्ट्स टीमला कळाल म्हणून आम्ही तुम्हाला हे complimentory देतोय तुमच्या प्रवासासाठी आणि यशासाठी .”
सारा थोडी आनंदी होऊन ,” धन्यवाद सर पण मी हे नाही घेऊ शकत अस गिफ्ट नाही “
कुरिअर वाला ,” मडम तुम्हाला हे घ्यावा लागेल, आमच्या टीम ला कळाल तर ते नाराज होतील “
सारा ,” सर पण तुमची टीम कोणती आहे “
कुरिअर वाला ,” मडम हे बघा कि (पार्सल वर मोठ्या कंपनीचा लोगो असतो तो दाखवतो )
सारा ,”ओह बापरे हि तर मोठी कंपनी आहे “.
कुरिअर वाला ,” हो मडम म्हणून तुम्ही नाही नका म्हणू हे घ्या आणि इथे सही करा म्हणजे तुम्हाला आमच पार्सल मिळाल आहे “
साराचे बाबा घाई घाईने बाहेर येतात ,”सारा बेटा चल गाडी आली पण आणि तू सही केलीस काय ?”
सारा गोंधळून ,”नाही बाबा मी करते “
साराचे बाबा ,” अग मग लवकर कर जास्त वेळ नको घालवूस”
सारा ,”हां बाबा “
सारा आत जाते आतला फोरम घेऊन बाहेर येते कुरिअर वाल्याच्या समोर .
“हां सांगा कुठे सही करायचीय तुमची पण “
कुरिअर वाला खुश होऊन ,” मडम इथे करायचीय दोन सही “
सारा पटकन सगळी कडे सही करते.
कुरिअर वाला ,”धन्यवाद मडम तुमचा प्रवास सुखाचा होओ”
सारा हसून त्याला बाय करते. तो जातो .
आईला हाक मारते.
आपली बग घेते आईला घट्ट मिठी मारते आणि निघते.

dr जॉय ,”तुला काही आठवल काय ग ?”
साराला खूप वाईट वाटत असत आपण न बघता काय करून बसलो हे. तिला तिच्या आई बाबांची खूप आठवण येत असते.
तिच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असत तिला काहीच सुचत नसत. तेव्हड्यात एक डॉक्टर येतात तिला इंजेक्शन देतात.
सारा हे नाकारू शकत नव्हती कारण तिला माहिती होत आता आपल डील झाल आहे मग आता काहीच करू शकत नाही आपण .
फक्त तिला जाताना dr जॉय इतकेच म्हटलेलं आठवत कि ,” सारा मी दिलेल्या वस्तू बद्दल तुझ्या गेममध्ये असलेल्या सहकाऱ्यांना सांग ऑल दि बेस्ट “
सारा हळू हळू डोळे मिटते आणि ती पुन्हा गेममध्ये शिरते .
जिथे तिला मारत असतात तिथेच ती पोचते.

(आता बघू पुढे सारला कळेल काय कि प्रवीणचा खुण कोणी केला होता ते पाहूया पुढच्या भागात )