Those three books and stories free download online pdf in Marathi

ते तिघे ..

आज सुरेशजवळ नवीन मोबाईल आला होता ..
तो खूप आनंदी होता , खरे तर आनंद गगनात मावत नव्हता ..
पण आज असे काही होईल याचा अंदाज त्याला नव्हता ..

तो खरे तर रात्रीच र होता , म्हणजे त्याला रात्री फिरण्याचा खूप छंद होता ..
तो आपला रूम मधून निघाला , सोबत लागेल ते साहित्य त्याने घेतले ...
आणि आपल्या मनातल्या मनात गाणे म्हणत तो निघाला होता ...

रात्रीचे बारा वाजले होते , तो मस्त कानात हेडफोन घालुन गाने एकत चालला होता ...

शहराच्या बरोबर मध्यभागी आला , आजूबाजूच्या परिसरात ती रम्य शांतता पसरली होती ...
आज त्याला थोडे अजीब वाटत होते , पण त्याला ती सवय होती ...त्यामुळे काही विशेष वाटले नाही ...

बघता बघता त्याने बरोबर एक किमी रस्ता पार केला होता , वातावरणात अचानक एक भीतीची लहर जाणवत होती ...
त्याच्या मनात भीती घर करू लागली , कारण गेल्या काही वेळापासून त्याच्या मागून तिचे जण जणू त्याचा पाठलाग करत होते ....

त्याला प्रथम त्याचे काही एवढे विशेष वाटले नाही , तो आपल्याच तोऱ्यात चालत होता ...
पण तो ज्या रस्त्याकडे जायचा बरोबर ते तिघेजण त्याचा मागोमाग चालत होते ...

सुरेश आता शहराच्या थोडा बाहेर आला होता , तरीही ते तिघेजण त्याच्या मागेच होते ...

आता मात्र काहीतरी विचित्र प्रकार आहे , असे त्याच्या लक्षात आले होते ...
त्या रम्य शांततेचे आता भयानक शांततेत रूपांतर होऊ पाहत होते ....
वातावरण जणू गोठून गेले होते , पावसाची किंचित रिमझिम चालू होती ....

कोण असावेत बरे ते तिघे ?

सुरेश मागे वळून त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होता , एकदम ते तिघेजण त्याच्याच दिशेने बघत होते ...
म्हणून त्या तिघांना स्पष्ट बघण्याची हिम्मत तो करू शकत नव्हता ...

एवढे मोठे शहर आणि आज त्या रस्त्यावर एक वाहन सुद्धा नाही ,
मध्येच कुठेतरी कुत्र्याचा भूंकण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता , रातकिड्यांची अस्पटशी किरकिर त्याच्या कानावर येत होती ....

हळूहळू तो आवाज सुद्धा कमी झाला ...

खरे तर हेडफोन्स मधे लावलेले गाणे त्याने , ते तिघे मागे दिसले तेव्हाच बंद केले होते ...
कारण संशय त्याचा काळजाला टोचून जात होता ...

आता वातावरणात एवढी शांतता होती की त्याच्या पायातील बुटांचा आवाज त्याच्या कानावर आदळत होता , आणि त्यात भर म्हणजे मागच्या तिघांच्या पावलाचा आवाज त्याला साद घालत होता ....

तो खूप अस्वस्थ झाला होता , आज काहीतरी विचित्र असा प्रकार घडणार असे त्याला वाटत होते ...
पावसाची रिमझिम आता कमी झाली होती ...

पाऊस कसला तो , जणू कुणीतरी सूक्ष्म करंजाचे फवारे उडवले असा तो पाऊस होता ...
सुरेश मात्र आता कावरा बावरा झाला होता ...
त्याला या क्षणी काय करावे हेच सुचत नव्हते ?

त्याने खिशात हात घातला , कदाचित काहीतरी विरंगुळा म्हणून त्याला मोबाईल बाहेर काढायचा असेल ?
पण समोरून एक मोटारसायकल आली ,आणि तिचा लख्ख असा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला ....

त्याचा मुड ऑफ झाला , भरधाव वेगाने ती मोटार सायकल निघून गेली ....
त्याने मागे वळून बघितले ....

ते तिघे अजुनही त्याच्या मागेच होते ....
त्याच्या अंगाचे आता कापरे होते होते ...

ते तिघे त्याच्या आता फक्त दहा फूट अंतरावर होते ....

सुरेश जागीच गोठला होता ,
पण त्याचा मोबाईल वाजला....

त्यांच्या व्हॉटसअप ग्रुप वर एक मॅसेज आला होता ...
त्याची मोबाईल हातात घेण्याची सुद्धा हिम्मत होत नव्हती ....
पण त्याने मोबाईल काढला ...
आणि मैसेज बघितला ...

त्याला धक्काच बसला .....

त्यामध्ये असे लिहिले होते की ...
शहरात आजकाल खूप धोका निर्माण झाला आहे , कारण चोरट्यांचा नव्हे तर दरोडे खोरांचा ...
व्याप खूप वाढला आहे ...
आजपर्यंत शहरात ज्या चोऱ्या झाल्या ....
त्यामागे कुख्यात तीन दरोडे खोर आहेत ...
ज्यांचा पोलिसांना अजुनही थांगपत्ता लागलेला नाही ...
तरी सर्व शहरवासीयांना आवाहन आहे की शक्यतो रात्रीच्या वेळेला बाहेर पडू नका .....
कारण ते तिघे असे दरोडे खोर आहेत की चोरी सोबत , त्यांच्या नावावर कितीतरी मर्डर आहेत ....
हा मॅसेज जास्तीत जास्त फॉर वर्ड करा .....
पो . निरीक्षक ..
बी के अग्निहोत्री ..

सुरेश चे पाय लटपायला लागले होते ,
कारण ते मागचे आणखीनच जवळ आले होते ...

त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटून आली होती , शरीर जणू थंड पडले होते ....

अचानक वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला .....
भीतीने कावरा बावरा चेहरा झालेल्या सुरेश ने मागे वळून त्या तिघांना एक स्मित हास्य दिले ....

आपल्या खिशात हात घातला ...
काहीतरी तो खिशातून बाहेर काढणार इतक्यात ...
एक मोटार सायकल शहराच्या बाहेरच्या दिशेने येत होती ..
दोघे जण त्या मोटार सायकल वर स्वार होते ..

पण त्याचा प्रभाव सुरेशवर पडला नाही , त्याने त्या तिघांमधल्या पहिल्या माणसावर धाडकन गोळी झाडली ....
तो एक वयस्कर माणूस होता ...
गोळी बरोबर दोन डोळ्यांच्या मधे भोकं पाडून गेली ....
तो माणूस आडवा झाला ...

बाकी दोघे नुसते बघत राहिले कारण ही घटना एवढ्या लवकर घडली की त्यांना हलायला सुद्धा वेळ मिळाला नाही ....

सुरेशने दुसरी गोळी सरळ मधल्या व्यक्तीच्या छातीवर झाडली , एका स्त्रीचा आक्रोश त्याच्या कानावर ऐकू आला पण त्याचे हृदय दगडाचे झाले होते .....
आणि तिसरी गोळी त्याने तिसऱ्या व्यक्तीवर झाडली .....
बिचारा तो तिसरा त्यांचा मुलगा असावा .....

सूरेशने हे काम एवढ्या झटपट केले की अर्ध्या मिनिटाचा सुद्धा वेळ लागला नाही ....

मागून मोटार सायकल आली आणि त्यांनी सरळ त्या तिघांच्या जवळ जे काही असेल , ते घेतले आणि सुरेशला सोबत घेऊन शहराच्या बाहेरच्या दिशेने पलायन केले ...

कारण
ते तीन दरोडेखोर सुरेश आणि त्याचे ते दोन दुचाकीस्वार मित्र होते ......
ज्यांनी पूर्ण शहरात आपला खौंफ निर्माण केला होता ....
ज्यांनी एवढ्या शिताफीने हा मर्डर प्लॅन रचला होता ...
ते तिघे सुरेश च्या मागावर नव्हते ,तर सुरेश त्यांच्या समोर राहून त्यांच्या जीवावर होता ....
.....................................समाप्त...................