She __ and __ he .. - 44 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो.. - 44

भाग:४४


सगळे रात्री घरी येतात......आणि आपापल्या खोलीत झोपायला जातात......राधा खोलीत येते,कपड़े घेऊन फ्रेश व्हायला जाते.......रणजीत दरवाजाला कड़ी लावून बाथरूममध्ये जातो......राधा शॉवर घेत होती,तो जाऊन तिच्या मानेवर किस करतो......तस राधा मागे वळते.....



रणजीत: अरे लाजतेस काय..मीच तर आहे


राधा: काय हे रणजीत अस डायरेक्ट बाथरूम मध्ये येन बरोबर नाही बाहेर जा ना..


रणजीत: नवरयाला कसली ग लाजतेस..मी तर तुला without कपडयांच कितीदा पाहिलय..


राधा: रणजीत गप्प बस हु...
(ती लाजत म्हणाली.....)


रणजीत: मगाशी खुप छेड़त होतीस ना मला..आता बग तुला रात्रभर कसा त्रास देतो ते😚


रणजीत राधाला जवळ ओढतो,लगेचच तिच्या ओठांचा ताबा घेतो....त्याचे हाथ तिच्या सर्वांगावर फिरत होते....राधा ही त्याच्या स्पर्शात ओढली गेली,ती एका हाताने त्याच शर्ट काढू लागली.....शॉवर खाली दोघे ही एक होत होते.....


************************


राधा रुपाला तिची औषध द्यायला तिच्या खोलीत गेली.....तर रुपा काही फोटोज पाहत होती....


राधा: काय ग रुपा काय पाहत आहेस..?


रुपा: काही नाही ताई ही ना माझ्या दोहाळ जेवणाची दूसरी अल्बम आहे विनय दादानी आणून दिली तीच पाहत आहे...


राधा: अरे वा मस्त की..खरच विनय ना प्रत्येक हालचालीचे फोटोज काढत होता सगळ्यांच्या...तुझे पण फोटो किती सुंदर निघालेत...


रूपा: हो न..खरच तुम्हा सर्वांमुळे मी हे सुख अनुभवत आहे,मला अस वाटल नाही की मी ह्या घरातील नाही..


राधा: हो आम्ही तुला याच घरची मुलगी मानतो..अग रणजीतची आई तर तुला खूपच जीव लावते..त्यान नेहमी वाटायच की रणजीतला ही छोटी बहिन असावी..ती कमी तू पूर्ण केलिस..


रूपा: हम्म😢


राधा: तुझ्यासोबत इतके छान आठवणी जमा झाल्यात ना कि काय सांगू तुला..बर सोड चल गोळ्या घ्या आनी झोपा..


रूपा: हु


राधा रूपाच्या पोटाला कान लावते......आणि बाळाला अनुभवते.....बाळ लाथ मारत होत,तिला काही क्षण अस वाटत की बाळ तिच्याच पोटात आहे..


रूपा: काय झाल ताई


राधा: काही नाही ग बाळ माझ्या पोटात असल्या सारख वाटल...😢


रूपा: मग ताई तुम्ही माझी इतकी काळजी घेता..हे बाळ तुमचच आहे..मी देवकी आणि तुम्ही यशोदा आहात आपल्या बाळाच्या...


राधा: खरच..


रूपा: हो ताई,तुम्ही याच वाइट नका वाटून घेऊ की तुम्हाला बाळ नाही.माझ्या बाळासोबत तुम्हाला काहीच कनेक्शन नही वाटत का..


राधा: वाटत ग..


रूपा: हम्म झाल तर मग,हसा आता😀


राधा: हम्म वेडी..झोपा आता..गुड़ नाइट..


रुपा: गुड़ नाइट😉


**************************


सकाळी राधा आणि रणजीत उशिरा उठनार होते.....अचानक रेवा दार वाजवू लागली.....त्या आवाजाने राधा उठली आणि दार उघड़ला......


राधा: अरे रेवू काय झाल,घाबरलीस का इतकी?


रेवा: ववव वाहिनी लवकर चल ररर रुपा ताई च्या पोटात दुखत आहे...


रणजीत: काय अग पण अजून तिच्या डिलेवरीला २० दिवस आहेत...


रेवा: माहित नाही भाई..😢


राधा: डोन्ट वरि मी आले...


सुमन: राधा बग ग हिला काय झाल...


राधा: शु शु रूपा शांत हो..


रुपा: ताई माझ बाळ वाचेल न..


राधा: हो रूपा शांत हो..
रणजीत एम्बुलेंस बोल्व..लवकर..


रणजीत: ओके..


सगळे रुपाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात.....


माधवी: राधा अग आम्ही रूपाच्या डोहाळ जेवणाची अल्बम बघत होतो,तेवढ्यात ती कीचनमध्ये जायला म्हणून उठली,नंतर कीचनमधून अचानक तिचा ओरडायचा आवाज आला ग..😢


राधा: हा काकू शांत वहां तुम्ही..


राधा रुपाला घेऊन आत जाते.......डॉक्टर शामा तिचा ऑपरेशन करत होत्या......आज का कुणास ठाऊक राधा डिलीवरी नव्हती करत ती आज फक्त शांत उभी होती आणि मनोमन प्रार्थना करत होती.....तिच्या डोळ्यातुन अश्रूच्या धारा वाहत होत्या.....तेवढ्यात बाळाच्या रडन्याचा आवाज आला....तेव्हा राधाच्या जीवात जीव आला...


शामा: राधा अभिनंदन मुलगी झाली...


राधा: काय..ये😃डॉक्टर मी आले सगळ्यांना सांगून
(राधा नाचत म्हणाली...)


शामा: राधा..बाळ निरोगी आहे पन रूपा....सॉरी..


राधा: काय..काय झाल..


शामा: तू आणि घरचे जाऊन तिला आणि बाळाला भेटा जा...


एवढं बोलून डॉक्टर निघुन गेल्या.....राधाला काही समझल नाही....ती आणि सगळ् परिवार वॉर्डमध्ये गेला,बाळ शांत झोपल होत.....गोर,गोर,नाजुक,गुबगुबित अस बाळ होता.....राधाने बाळाला हातात घेतला तेव्हा तिला जे वाटल ते शब्दात मांडता न येण्यासारख होत....तिला खुप भारी वाटल....त्या बाळाच्या स्पर्शाने तिला नवा जन्म झाल्या सारख वाटल....नंतर सगळे बाळाला बघू लागले....रुपा हे सगळ डोळ्यात साठवत होती......


राधा: रुपा कस वाटतंय तुला आता...


रूपा: समाधानी वाटतंय...


राधा: मुलगी झाले तुला...ही बग,
(बाळाला तिच्या कुशीत ठेवत बोलते..)


रूपा: खुप गोड़ आहे आपल पिल्लू..
(ती बाळाला किस करत बोलते..)


राधा: आता तू लवकर बरी हो आपण बाळाच बारस करू,मस्त नाव ठेवू बेबीच...खुप काम आहेत आपल्याला..


रूपा: पण माझ्याकडे तेवढा वेळ नही


राधा: काय


सुमन: अग काय बोलतेस हे रूपा...


रूपा: ताई माझ्या बाळाची यशोदा बनशील ना..बाळाला खुप प्रेम करशील ना...


राधा: हो पन तू अस का बोलते..


रूपा: वचन दे..


राधा: हो वचन देते...😢


रूपा: 😊


रूपा राधाकडे बघून हसते त्यांच्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवते.....आणि अचानक शांत होते......


राधा: रूपा,रूपा...काय झाल..


राधा रूपाची नस पाहते.......आणि तिला धक्काच बसतो.....


राधा: रूsssssपाssssssss😦😩😭


राधाची किंकाळी हॉस्पिटलमध्ये फिरते........सगळ्यांना खुप मोठा धक्का बसला होता,आनंदाचे अश्रु दुखांत रूपांतरित झाले होते......सुमन तर धकक्यमुळे बेशुद्ध झाल्या होत्या,राधा ही तिची शुद्ध हरपुन बसली होती.....


क्रमशः
(होत्याच नव्हतं झाल......आनंदाचे क्षण दुखांत बदलले......आता राधा आणि रणजीत काय करणार?? रूपाच्या बाळाच काय होईल??? जर राधा त्या बाळाला स्विकारणार तर कस असेल राधाचा नव रूप??? पुन्हा भेटू पुढच्या भागात..)