Dheyvedya Mulanchi - 2 books and stories free download online pdf in Marathi

ध्येयवेड्या मुलांची - भाग - 2

ज्ञानदा कॉलेज...
सगळे आपापसात बोलत असतात एकच गोंधळ उडालेला असतो. तेवढ्यात आनंद देशमुख सर स्टेजवर येतात आणि सगळीकडे शांतता पसरते. देशमुख सर सूत्र संचालनाची जबाबदारी स्वीकारून बोलायला सुरुवात करतात.
देशमुख सर(माईक समोर येऊन): "माननीय अतिथी आणि विद्यार्थीगण व इथे जमलेले सर्व पालकवृंद आज मला या सोहळ्याचे संचालन करण्याची संधी मिळत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो."
देशमुख सरांच्या दमदार आवाजाने कार्यक्रमाची सुरुवात होते. आणि एका क्षणात सगळे शांत बसतात. मग दीप प्रज्वलन करून प्रिन्सिपल सरांना मनोगत व्यक्त करायला बोलावण्यात येत.
काही मिनीटा नंतर...
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्याचा सोहळा सुरू होतो. एक एक विद्यार्थी मंचावर येऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपले पदवी प्रमाणपत्र स्वीकारत मनोगत व्यक्त करतात.
काही वेळा नंतर...
समीरची पाळी येते तो राज्यात पहिला आलेला असतो. याचा त्याला आनंद तर होत असतोच पण आज त्याच मन देखील खूप भारी झालेलं असत.
आज इतक्या वर्षांच्या सगळ्या आठवणी एकदम साठून आलेल्या असतात. तो डोळ्यात पाणी घेऊन आणि जड पावलांनी तसाच मंचावर येतो प्रमुख पाहुण्यांच्या पाया पडतो आणि आपले पदवी प्रमाणपत्र घेऊन माईक समोर उभा राहतो. काही क्षण त्याला आपण काय बोलाव तेच सुचत नाही पण तसच तो सुरवात करतो.
समीर(माईक समोर येऊन): "(थोड्या वेळ शांत उभा राहुन बोलायला सुरुवात करतो) आज मी काय बोलू तेच सुचत नाहीये खर तर खूप कठीण प्रसंग आहे हा या कॉलेजनी मला खूप काही दिलय जीवापाड प्रेम करणारे वेळ प्रसंगी ओरडणारे सर मॅम कॅन्टीनचे काका त्यांना किती ही उशीर होऊ दे पण आम्हाला नेहमी सांगणार "बसा बाळांनो तुम्ही मी आहे अजून इथे." कधीही आमच्या वर चिडले नाहीत. आणि जीवाला जीव देतील असे मित्र मैत्रिणी.
आज या सगळ्यांना सोडून जाण खरच खूप कठीण जातय मला आणि वाईट ही वाटत आहे पण मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे याचा अभिमान सुद्धा आहे.
आज मी इथून रिकाम्या हातानी बाहेर पडत नाहीये तर एक सुंदर नवीन जग उभं करण्याचं स्वप्न घेऊन बाहेर पडत आहे ज्याला भरारी घेण्यासाठी बळ आणि मजबूत पंख या कॉलेजनी दिले आहेत.
मला माहित नाही आज इथून बाहेर पडल्यानंतर आम्ही सगळे कुठे असुत पण इतकं नक्की आमची सगळ्यांची ओळख मात्र एकच असेल ज्ञानदा कॉलेजचे विद्यार्थी. अजून काय बोलू बस... सर मॅम असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या थॅंक्यु"
आपल बोलणं संपवून समीर जड पावलांनी खाली येतो. आणि देशमुख सर परत आपली जागा सांभाळतात.
देशमुख सर: "खूप छान बोललास बेटा आणि विद्यार्थ्यांना कधी ही हे सांगायची गरज नसते एका शिक्षकाचा आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आशिर्वाद असतोच एवढं बोलून मी आजचा कार्यक्रम संपला अस जाहीर करतो."
कार्यक्रम संपताच सगळे आपापल्या खुर्च्यांवरून उठतात आणि घरी जातात. इकडे...
प्रासादिक निवास...
आज विशाखाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि आपला मुलगा आपल्या पासून दूर जाणार याच दुःख असे दोन्ही भाव होते. त्यामुळे आपण आपल्या मुलाशी काय बोलाव हेच तिला समजत नाही.
बर थांबवायचा प्रयत्न केला तर तो ऐकेल हे त्याच्या स्वभावातच नाही त्यामुळे विशाखा त्याला काहीच बोलत नाही.
समीरला सगळ समजत असत पण ही ट्रिप त्याच्या साठी खूप महत्त्वाची असते त्यामुळे तो मनावर दगड ठेऊन आवरा आवर करण्यात मग्न असतो. त्याला काही वेळातच बस पकडायची असते. एक रोमांचित असा त्याचा प्रवास होणार असतो त्यासाठी त्यानी खूपशी तयारी केलेली असते. मॅप कॅमेरा नोंदवही अस सगळं काही जवळ ठेवलेलं होत.
आणि मग ती वेळ येते. समीर आई बाबांचा निरोप घेऊन बाहेर पडतो. ती वेळ तिघांसाठी खूप अस्वस्थ करणारी होती. तरी समीर जड पावलांनी घरच्यांचा निरोप घेऊन एक सुंदर स्वप्न साकार करायला बाहेर पडतो.
आज पर्यंत त्याने जी मेहनत घेतली होती. ते जग आज तो प्रत्यक्ष बघणार होता. समीर तस नेहमी आपल्या मामाच्या गावाला जायचा पण यावेळी तो फक्त राहायला जाणार न्हवता तर गाव समजून घ्यायला जाणार होता. त्याच गाव 'पैठण'
समीरचे मामा पैठणला रहात होते. लहानपणी सुट्टी लागली की तो गावा कडे पाळायचा. तस त्याला गावाची ओढ लहानपणापासूनच होती. पण यावेळी तो आपल्या गावाला नव्याने भेटणार होता गाव अनुभवणार होता.
रिक्षात बसल्या बसल्या त्याच विचारचक्र सुरू झाल घरच्या आठवणी भविष्याची ओढ यात समीर इतका हरवून गेला होता की बसस्टँड कधी आलं तेच त्याला कळल नाही.
जेव्हा त्याला रिक्षावाल्याने आवाज दिला तेव्हा तो भानावर आला त्याने त्याला पैसे दिले आणि बसस्टँड वर उतरला.
काही वेळा नंतर...
समीर बसची वाट पहात असतो तेवढ्यात बस येते आणि समीर बसमध्ये चढतो आणि बस सुरू होते.
काही अंतर पार केल्या नंतर समीर आपल्या डायरीमध्ये नोंदी करायला सुरुवात करतो.
समीर(डायरीमध्ये नोंद करत): "दि. 20/7/2021.
आज मी माझंच गाव परत नव्याने अनुभवायला निघालोय. आज माझ्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या मी राज्यात पहिला आलो आणि आता मला माझच गाव नव्याने समजणार आहे. जो इतिहास मी पुस्तकातून वाचला होता त्याला पुन्हा एकदा नव्याने उजाळा देणार आहे. आज मी नव्याने जगणार आहे."
बस पैठणच्या वाटेवरून भरदाव जात होती. कुठे ही न थांबता आणि समीर डायरी लिहिण्यात मग्न होता.
तेवढ्यात एक टपरी जवळ चहा साठी बस थांबली. तस सगळे चहा प्यायला उतरले.
काही वेळा नंतर पुन्हा बस पैठणकडे निघाली समीर निसर्गाचा आनंद घेत घेत नोंदी ठेवत होता तर कधी निसर्गाचा आनंद घेत होता.
या आगळ्या वेगळ्या प्रवासाचे काही नियम होते. तो प्रत्येक ठिकाणी बस आणि पायीच प्रवास करणार होता. प्रवासात कुणी भेटलं तर त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्या बद्दल जाणून घेत प्रवास करणार होता.
असच त्याच्या बसमध्ये त्याला एकजण भेटत आणि अजूनच त्याचा प्रवास सुखकर होतो.
समीर: "नमस्कार, मी समीर. मी किती वेळच तुम्हाला बघतोय तुम्हाला वाचनाची खूप आवड दिसतीये."
प्रकाश(स्मितहास्य करत): "लिहिता लिहिता ही तुझं इकडेच लक्ष होत वाटत वा छान!"
समीर(हसून): "अरे हे!... मला डायरी लिहायची सवय आहे. मनात आलं की लगेच लिहून ठेवतो. नंतर पुढे आपलेच पॉईंट्स आपल्या कामी येतात आणि एक आठवण सुद्धा रहाते. आपण कोण?"
प्रकाश: "मी प्रकाश सरनाईक इतिहास तज्ञ. फिरण्याची प्रचंड आवड म्हणून पडलोय घरा बाहेर. तु काय करतोस?"
समीर: "आजच पदवी हातात आलीये पण पुढे काय करायचं हे अजून नाही ठरवल. खर तर मलाही आपला देश इथली संस्कृती लोकजीवन याचा इतिहास समजून घेण्याची प्रचंड आवड आहे कॉलेजमध्ये असताना याचा खूप अभ्यास देखील केला पण ते पुस्तकी ज्ञान झालं न. खरा अनुभव कुठे घेतला म्हणून म्हणलं आधी स्वतःला वेळ देऊ थोडं फिरून घेऊ मग ठरवू."
प्रकाश समीर पेक्षा वयाने मोठा असतो आणि इतिहास तज्ञ देखील असतो त्याला जुनी मंदीरे त्यांचा इतिहास याची बरीच माहिती असते.
म्हणून त्याला समीरची कल्पना आवडते तो समीरला विचारतो.
प्रकाश: "समीर मला तुझी कल्पना खूप छान वाटली मी तुला जॉईन होऊ शकतो का? बघ मला फिरण्याची आवड आहे आणि बरीच माहिती सुद्धा आहे त्यामुळे तुला झालाच तर माझा फायदाच होईल तुला आवड आहे आणि मी त्यातला तज्ञ आहे चालेल तुला?"
समीर आनंदाने म्हणतो.
समीर: "अहो सर, याहून अधिक चांगली गोष्ट अजून काय असेल. तुम्ही बरोबर असाल न तर मला मदतच होईल तुमची. या तुम्ही माझ्या बरोबर."
असच दोघांच्या गप्पा रंगायला लागतात प्रकाश समीरला त्याचे बरेच किस्से सांगतो आणि ते ऐकता ऐकता त्यांच्यात कधी पक्की मैत्री होते हे त्यांनाही कळत नाही.
काही वेळा नंतर...
समीर आणि प्रकाशला जराशी डुलकी लागते व ते गाव येई पर्यंत झोप घेतात. गाडी मात्र तशीच भरदाव रस्त्याने जात असते.
काही अंतर गेल्यावर एक जण त्याच गाव येत म्हणून उतरतो आणि गाडी परत तिच्या वेगाने निघते. मध्ये मध्ये समीरच नोंदी ठेवण सुरूच असत.
काही वेळा नंतर...
समीर आणि प्रकाश त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचतात. म्हणजेच पैठणला पोहोचतात.
क्रमशः...