Touch of rain? - 7 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श पावसाचा? - 7

तशी वर्षा ही खूप छान होती . मन मोकळ्या स्वभावाची सर्वाशी हसून बोलणारी आणि सुंदर तिला कोणी पसंद करू ने तशी ती न्हवतीच पण पाहिले प्रेम ते पाहिले प्रेम असते.पावसाच्या पहिला स्पर्श हा खूप भारी असतो. आपल्या अंगावर पडणारे ते पावसाचे नाजूक असे थेंब शरीर सोबत मनाला ही ओला चिंब करून जाणारा तो त्या पावसाचा स्पर्श भिजलेल्या त्या मातीतून तो येणारा सुगंध त्याला कोणत्याच इत्तर किंवा कोणत्या फुलाच्या सुगंधाची सर नाही.
तसेच माझे तेजी बध्दल प्रेम होता. पण तिला ते माहीत नव्हते याचेेच मला खूप वाईट वाटत होते सांगु तरी कसे मला कळत नव्हते त्या मध्ये या वर्षाची एन्ट्री
दुसऱ्या दिवशी एक माणूस आमच्या दुकान व
आला मला माहिती न्हवते कोण आहेत माझे आपले काम चालू होते त्यांनी आल्या आल्या विचारले " आकाश कोण आहे.?" मी थोडा घाबरलो. पण सांगावं तर लागणारच होते मी थोडा हळू अवाजामधे बोलो " मीच आहे बोला " मला वाटले कोणतातरी बोर्ड चुकीचा झाला आहे त्या मुळे हे इथे आले आहेेत.
त्यांनी मला thank you बोले. मला तर पहिला काही समजले नाही मग त्यांनी माजा चेहरा बघून अंदाज लावला आणि बोले "रे मी वर्षाचा वडील आहे" तेव्हा कुठे माजी tube पेटली आणि मी लगेच बोलो " यांना sir बसा " त्यांना पाणी दिले तसे ते बोले " वर्षांनी सागितले तसाच तू आहेस चांगल्या स्वभाव आणि हुशार मुलगा" मी थोडा लाजून हसलो नी बोलो "thank you sir "
"वर्षांनी सागितले तू काल तिची मदत केलेली .ते ही तू कामात असताना"
"त्यात काय sir येवढं"
"वर्षाने तुझा काम आणि शिक्षणा बद्दल ही सागितले कसे काम करून शिक्षण शिकत आहे"
"तसे काय नाही sir हे काम मला आवडते आणि थोडे फार पैसे पण भेटतात "
"आमच्या इथे काम करशील का? तुझा सारख्या ईमानदार आणि हुशार मुलाची गरज आहे आमाला"
वर्षाने चांगलेच काय काय बोलून पाठवले होते वाटे त्यांना. माजा चेहरा बघून मला बोले " विचार कर हवा तर. तुला करू वाटले तर कर नाही तर नको करू वर्षांनी तुझे खूप कौतुक केले आणि तिची आई पण बोली की मुलगा चांगला आहे मानून त्या मुळे मी तुला personally भेटून कामाचे आणि thank you बोलायला आलो आहे"
"ठीक आहे sir तुम्हाला विचार करून सांगेल"
त्यांनी स्माईल केली आणि बोले "हा सांग" असे बोलू मला त्यांनी त्याचे कार्ड दिले वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि निघाले अचानक मागे वळून बोले "रे आकाश तुला सागायचे राहूनच गेले .11 तारखेला वर्षाचा वाढदिवस आहे तू नक्की ये . वर्षाने तुला आवर्जून सांगा असे बोली मला नक्की ये हा." त्यांच्या गाडी मध्ये बसून ते गेले तिथून
मला समजत न्हवते काय करायला पाहिजे .घरी एकदा विचारून बघू काय बोलतात मग निर्णय घेऊ असे पण मी एकले होते की टुर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये खूप फिरायला भेट मंजे पुणे ला पण जायला भेटणार मानून खुश झालो मंजे तेजीला भेटा येईल पण पुणे मध्ये कुठे असेल असेल की नसेल ते पण नाही माहिती जाऊदे बोलो मनातल्या मानत आणि लागलो कामाला
घरी गेल्यावर निवांत फ्रश होऊ विचार करावा असा विचार होता.
पण घरी पोहोचलो तेव्हा तेजीची आई आज्जी बसले होते. चहा पीत होते पण येवढ्या वर्षांनी का आले असेल ? ते पण आमचा घरी ? पाहतो तर त्यांच्या हातात लग्नाची पत्रिका होतो.
Share

NEW REALESED