Sang na re mana - 15 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 15)

सर मी कायम तुमच्या सोबतच आहे तुम्हाला जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा हक्काने मला आवाज द्या. आणि तुमच्या बद्दल मला कुठला ही गैरसमज नाही आहे. उलट मी तुमच्या कामी आले तर माझे भाग्यच समजेन. ओह थँक्स संयुक्ता. मग नक्की ना आज पासून आपण एकदम बेस्ट फ्रेंड मितेश म्हणाला. हो सर नक्की संयु बोलली. चल अंधार पडत चालला आहे मी तुला ड्रॉप करतो मितेश म्हणाला. मग संयु ला तिच्या घरा जवळ सोडून मितेश घरी आला. आज झोपताना पहिल्यादा त्याला फक्त संयु आठवत होती ना की आरु.तिचे प्रेम न स्वीकारून तिला आपण हर्ट केले आहे हे त्याला माहित होते म्हणून तिला त्याने बेस्ट फ्रेंड मानले होते. इकडे संयु ही मितेश चा विचार करत होती. मितेश आतून किती दुःखी आहे हे तिला आज समजले होते. आरु तर असून नसल्यात जमा होती. गेली आठ ,नऊ महिने ती कोमात होती आता तिचे शुद्धीवर येण्याचे चान्सेस जवळजवळ संपले होते तरी मितेश आस लावून बसला होता की एक ना एक दिवस आरु शुद्धीवर येईल. संयु ला मितेश बद्दल खूप वाईट वाटत होते. जितके जमेल तितके त्याला आधार द्यायचा असे तिने ठरवले. आरु ला तो विसरणार की नाही हा प्रश्न तिच्या पुरता आता संपला होता. तिचे प्रेम मात्र मितेशवर कायम असणार होते.दुसऱ्या दिवशी मितेश ऑफिसला आला निनाद ला त्याने सांगितले काल संयु ला भेटला . ओके छान काम केलेस मितेश तिला भेटून बोलला ते. हम्मम इतकच मितेश बोलला. निनाद ने मग संयु ला मेसेज केला मला भेट असा. संध्याकाळी संयु त्याला भेटू असे म्हणाली. पल्लवी आणि संयु निनाद ने सांगितलेल्या रेस्टॉरंट ला आल्या.हॅलो संयु पल्लू निनाद म्हणाला. हाय निनाद सर दोघी बोलल्या. मग कॉफी ची त्याने ऑर्डर दिली. संयु मी तुला या साठी इथे बोलवले की मला मितेश बद्दल बोलायचे आहे. बोला ना सर काय सांगायचे संयु म्हणाली. अरे तुम्ही दोघी आधी मला सर म्हणणं बंद करा प्लिज. नुसतं निनाद म्हणा. ओके संयु बोलली. मितेश ने मला सांगितले संयु की काल तुला भेटला आणि आरोही ला तू बघून आली. हो निनाद खूपच वाईट झाले आहे त्यांच्या बाबतीत.हो दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. नेमके मितेश च्या वाढदिवस च्या आदल्या दिवशी आरोहीचा अपघात झाला. आरोही त्यालाच भेटायला येत होती. त्यामुळे मितेश या वर्षी त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही असं मला वाटते. पुढच्या विक मध्ये त्याचा वाढदिवस आहे. आपण करायचा का त्यांचा वाढदिवस साजरा? संयु ने विचारले. हो करूया पण तो कसा रिऍक्ट होईल माहीत नाही. संयु मितेश चा स्वभाव खूप रागीट आहे त्याला राग पटकन येतो पण थोड्या वेळाने शान्त ही होतो. जास्त चिडला की त्याच डोकं दुखायला लागते. तू त्याची मैत्रीण म्हणून सोबत करणार आहेस अस तो बोलला मला. हो निनाद मी प्रेम करते त्यांच्या वर त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा माज्या प्रेमाचा ते स्वीकार करतील पण तोपर्यंत मैत्रीण म्हणून मैत्री निभावेन. कायम त्यांना साथ देईन. हो संयु तू त्याला छान सांभाळून घेशील आय नो.मला फक्त इतकच सांगायचे आहे की त्याच्या कलाने घे. तो कधी कधी रूडली बोलेल पण ते तात्पुरते असते तो खुप चिडतो सुद्धा तेव्हा गैरसमज करून घेऊ नकोस ओके. हो निनाद मी लक्षात ठेवेन. अजून एक मितेश च्या बर्थडे पार्टीचे सगळे प्लॅनिंग मी करेन पण तू अस दाखव की तुज्या कडून त्याला सरप्राईज आहे . निनाद त्या पेक्षा मीच अरेंज करते ना पार्टी. नको संयु मी करेन. प्लिज निनाद मला इतकं तरी करू दे सरां साठी. ओके मग तू पल्लवी मी आणि सुजय आपण करणार पार्टी. चालेल सर.

क्रमश