Sang na re mana - 16 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 16)

प्लिज निनाद मला इतकं तरी करू दे सरां साठी. ओके मग तू पल्लवी मी आणि सुजय आपण करणार पार्टी. चालेल सर. बाय द वे निनाद तुम्ही तिघे बेस्ट फ्रेंड्स आहात. हो स्कुल फ्रेंड आहोत मग कॉलेज मात्र वेगवेगळ्या फिल्ड मध्ये केले पण आमची मैत्री कायम आहे आणि राहणार.सो नाईस निनाद पल्लवी बोलली. तसा निनाद तिच्या कडे बघून गोड हसला. त्याचा निरोप घेऊन त्या दोघी घरी आल्या. संयु मितेश चा वाढदिवस कसा करता येईल याचा विचार करत झोपण्याचा प्रयत्न करत होती. मितेश ला संयु ची आठवण येत होती. किती ही त्याने नाही म्हंटले तरी ही त्याच्या नकळत त्याच मन तिच्या कडे ओढ घेत होत. त्याने तिला मेसेज केला हॅलो संयु. ती ही त्याचाच विचार करत होती मेसेज बघून खुश झाली. हॅलो सर बोला. मितेश - जेवण झाले का ?संयु -- हो सर तुम्ही जेवलात का? मितेश-- हो जस्ट. संयु-- सर नवीन काही लिहिले आहे? मितेश-- तुला पाहायचे आहे का? संयु -- हो मितेश-- वेट अ मिनिट आय विल सेंड . तुला पाहताना......डोळे मिटून पाहताना ,

नजरे समोर तुला पाहते.
हासू तुझे भुलवते मला,
अन पुनः पुन्हा मी तुझया प्रेमात पडते
अथांग गहिऱ्या डोळ्यात का,
उगा मी हरवून जाते.
श्वास तू भास तू,
माझी मी तर कुठे उरते.
सार काही वजा होत,
तुला कवेत घेताना.
काय शिल्लक काय बाकी,
का विचार करू इतकं तुझं प्रेम मिळताना.
तू आणि तूच हवास,हर एक जन्म जगताना.
----मीत. त्याने ही कविता सेंड केली. सर किती छान लिहिले आहे तुम्ही खुपच मस्त. मितेश-- तुला आवडली ना? संयु-- म्हणजे काय अर्थातच कोणालाही आवडेल. मितेश--- हम्मम . चल बाय गुड नाईट. संयु-- गुड नाईट सर आय मिस यु आनंदाच्या भरात ती बोलून गेली. तिला चूक समजली तसे म्हणाली सो सॉरी सर ते चुकून. मिस संयु काय बोलली तू . काही नाही सर सॉरी. मी माफ तेव्हाच करेन जेव्हा तुला शिक्षा मिळेल मितेश बोलला. शिक्षा ओके सर दया ती म्हणाली. मिस संयु तुझी ही शिक्षा आहे की आता जे मला बोललीस ते परत म्हण पण ऑडीओ मेसेज हवा मला. हे बघून संयु च्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या. सर ऑडिओ मेसेज ? हो लवकर मितेश म्हणाला. ओके म्हणत संयु ने ऑडीओ मेसेज त्याला दिला आय मिस यु सर . तो मेसेज ऐकुन मितेश इकडे एकटाच हसत होता. त्याचा रिप्लाय नाही आला सो संयु बोलली सर आला ना मेसेज मी जावू आता. हो हो जा बाय म्हणत मितेश ऑफलाइन गेला. कोणीतरी आपलं कौतुक करावं आपल्याला मिस करावं ही माणसाची भावनिक गरज असते. हा प्रेमाचा ओलावाच तर माणूस नात्यां मध्ये शोधत असतो. मितेश ला ही भावनिक गरज होती. चार पाच वेळा तिचा तो मेसेज ऐकून तो झोपी गेला.आता रोजच संयु आणि मितेश बोलत असायचे. मीतेश ची मनस्तिथि संयु ला माहित झाली होती आरोही मुळे तो डिप्रेस होता.

ती त्याला जमेल तितके आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. दोघ बाहेर फिरायला जेवायला जात होती.मीतेश चा वाढदिवस होता संयु ने त्याला सरप्राइज पार्टी द्यायची ठरवले होते. पल्लू ला आणि निनाद ला सोबत घेवून सगळी तयारी केली. मीतेश साठी तिने ख़ुप छान असे रिस्ट वॉच घेतले. वाढदिवसा दिवशी संयू ने त्याला सकाळीच विश केले . संध्याकाळी निनाद ने त्याला काम आहे सांगून बाहेर आणले आणि संयु ने सांगितलेल्या स्पॉट वर त्याला घेवून आला. निनाद आपण कुठे आलो आहोत सांगशील का मला. मितेश ने विचारले. समजेल तुला वेट मग निनाद त्याला एका हॉटेल च्या छोट्या पार्टी हॉल मध्ये घेवून आला. तो हॉल ख़ुप मस्त सजवला होता. मीतेश चा मोठा फोटो समोरच्या वॉल वर होता.त्याच्या बाजूला त्याचे नॉवेल चे फोटोज होते. त्याला मिळालेल फर्स्ट प्राइज,त्याचा पहिला इंटरव्यू चा फोटो असे भरपूर फ़ोटो होते. सगळी कड़े रेड बलून आणि त्याच्या खाली मीतेश चे पिक अस छान डेकोरेशन केले होते. तो हॉल मध्ये जावू लागला तस बर्थडे चे सॉन्ग चालू झाले. हे सगळ बघुन तो नाराज झाला. निनाद मला असल काही आवडत नाही तुला माहित नाही का? हैप्पी बर्थ डे सर म्हणत संयु समोर आली पल्लवी ही होती. सॉरी संयु मला अजिबात हे आवडले नाही. मी इथे नाही थांबु शकत म्हणत तो झटकन तिथुन निघुन गेला. मितेश ऐक ना प्लीज निनाद त्याला आवाज देत होता पण नाही मितेश थांबला नाही. त्याची ही रिएक्शन बघुन संयु च्या डोळ्यात पाणी आले. तो खुश व्हावा या उद्देशा ने तिने हे सगळ केल होत पण मितेश ने तिच्या आनंदा वर पाणी फेरले. संयु आय एम सॉरी मला माहित नव्हते तो असा वागेल. निनाद तू का सॉरी म्हणतोस . माझं च चुकले मी सरांना विचारायला हवे होते. संयु मला कल्पना पण नवहती ग की तो असा वागेल. का अस स्वहताच आयुष्य बरबाद करायला निघाला आहे हा काही समजत नाही. इट्स ओके निनाद मी पण निघते चल पल्लू म्हणत संयु निघाली तिच्या डोळ्यात दिसत होतं की ती किती दुखावली गेली आहे. पण निनाद काही करू शकत नवहता. मितेश एकटाच टेकडीवर आला होता. सूर्य अस्ताला निघाला होता. पक्षी सुद्धा आपल्याला घरट्याकडे परत चालले होते. मितेश एकटक त्या केशरी गोळ्या कडे बघत होता त्याच्या डोळ्यातुन अविरत अश्रू वाहत होते. आरोही च्या आठवणीत मग्न झाला होता. तिच्या शिवाय कसलंच सेलिब्रेशन त्याला नको होतं. संयु अस काही करेल अस त्याला नाही वाटले आरु बद्दल सगळं माहीत असून ही ती अशी वागली याचा त्याला जास्त राग आला होता. सिगरेट पेटवून तो ओढत राहिला त्या सिगरेटच्या धुरात त्याला स्वहताला ही आता विसरायचे होते. अंधार पडू लागला होता. आरु ने त्याचा दोन वर्षा पूर्वी असाच सरप्राईज देऊन त्याचा वाढदिवस साजरा केला होता . त्याला मस्त ब्लू कलरचा शर्ट गिफ्ट दिला होता. मितेश खूप खुश झाला होता. दोघांनी एकत्र बर्थडे साजरा केला होता. पूर्ण दिवस ते एकत्र होते.आता त्या सगळ्या आठवणी त्याला त्रास देत होत्या.


क्रमश