Bavra Mann - 1 books and stories free download online pdf in Marathi

बावरा मन.. - 1

( ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे.... कल्पकतेतून उल्लेख केलेल्या घराणे ,ठिकाण , कंपनी , मॉल , हॉटेल्स आणि व्यक्तींचा कोणाशीही संबंध नाही.... ही कथा वास्तव जीवनाशी संबंधित नाही....असे आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा....धन्यवाद..)

1) कथेचे भाग जमेल तसे पोस्ट केले जातील..
2) ही कथा रोमॅंटिक आहे... काही भागानंतर तुम्हाला वाचण्यास छान वाटेल.... त्यामुळे कथेला जास्तीत जास्त रेटिंग कमेंट आणि शेअर करा....

------------- 0×0--------------



कथेतील कुटुंबातील व्यक्तींना संबंधी माहिती

अभिमन्यू पुरोहीत .... वय साधारण २९-३०....उंची साधारण ५'१०"..... ना गोरा ना सावळा , अरुंद चेहरा , ब्लॅक फ्लॉपी हेअर , हलकेच ब्राउनिश डोळे , लांब नाक , गुलाबी ओठ... हॉलिवूडमधील हिरोला लाजवेल अशी toned बॉडी , शर्ट काढल्यावर नक्की सिक्स पॅक असतील त्याची खात्री.... स्मार्ट , कमाल फॅशन सेन्स आणि त्याची किल्लर स्माइल जी कधीतरी दिसायची... PS डायमन्ड चा एकुलता एक वारस... आणि जयपुरचा प्रिन्स....


पुरोहित हे जयपूर येथील राजघराणे आहे.... राजशेखर पुरोहित यांचावडिलोपार्जित हिऱ्यांचा व्यवसाय होता... राजशेखर यांना दोन अपत्य होते.... त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मनीष पुरोहित यांनी हा व्यवसाय सांभाळला ..... मनीष पुरोहित यांनी अर्पिता सरंजामे या मराठी मुली सोबत प्रेम विवाह केला होता... त्यांना २ अपत्य होते.. अभिमन्यू आणि धरा... अभिमन्यू हा घरातील थोरला... शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने त्यांचा बिजनेस जॉइन केला..... त्याने बिजनेस जॉईन केला नंतर मात्र जयपूर बरोबर प्रत्येक शहरात पुरोहित डायमंड ब्रांचेस सुरू झाल्या.... पाच वर्षात पुरोहित डायमंड डायमंड इंडस्ट्री टॉप ला आले.... बिझनेस मुळे अभिमन्यू मुंबईमध्ये होता... त्यानंतर धरा तिथे आली... धरा हिने फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर केले होते... शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्वतःचे बुटीक सुरू केले....




रिद्धी सरनोबत.... वय साधारण २५-२६... उंची ५'५"..... आकर्षक शरीरयष्टी , गोरा वर्ण , गोल चेहरा , खांद्यावरुन खाली रुळणारे सिल्की ब्राउनिश हेअर , निळेशार पाणीदार डोळे , गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी ओठ.... सुंदर , मनमिळाऊ , हसरी , हुशार पण तेवढाच आत्मविश्वास...
टॉप कोरिओग्राफर आणि फॅशन आयकाँन .... स्वबळावर मुंबईमध्ये डानस अकॅडेमी सुरु केली होती.... त्याबरोबर तिची स्वत:ची फॅशन कंपनी देखील होती....


यशवंत निंबाळकर आणि त्यांची पत्नी मंजिरी... मुंबई मधील Top most बिझनेसमन.... 2 वर्षांपुर्वी त्यांनी निवृत्ती घेतली होती आणि आता त्यांचा बिजनेस त्यांचा मोठा मुलगा विराज हॅण्डल करत होता...मंजिरी या गायन्यक होत्या... विराजचे love marriage झाले होते... त्याची पत्नी रुचिका... या सरनोबत यांच्याच हॉस्पिटल मध्ये इंटर्नशिप करत असताना दोघे प्रेमात पडले... आणि १ वर्षांआधी लग्न झाले.... त्यांचा लहान भाऊ समीर हे त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्यासोबत लंडनला राहत होते .... त्यांना दोन अपत्य होते ... अंकित आणि सारा .... अंकित याने बिझनेस जॉईन केला होता .... आणि सारा हि b. com च्या लास्ट इयरला होती ....

----------------- × O × O ------------------


प्रारंभ



निंबाळकर यांच्या " वृंदावन " मध्ये सरंजामे आणि पुरोहित फॅमिली जमली होती .... आता पुरोहित फॅमिली तिथे कशी तर सरंजामे यांची कन्या सिया हिचे लग्न अंकित सोबत ठरलं होते ..... वेडींग सोबतच एंगेजमेंट होणार असते....

आज सर्वजण त्यांच्या संगीतच्या थीम आणि वेडींग कॉच्युम बघायला जमले होते....

" ब्रो रिद्धी अजून आली नाही.. तु तर केव्हाचा आलाय ......" अंकित विराजच्या रूम मध्ये येतो

" अरे तिला मिटिंग होती... कॉल आला होता ऑन द वे आहे येईल इतक्यात... चल बाहेर सगळे बसलेत ... " विराज शर्टच्या स्लीव्ह फोल्ड करत बोलतो .....

दोघे हॉल मध्ये येऊन बसतात... बाकी सर्व मोठे लग्नाच्या तयारी बद्दल बोलत असतात...

" विराज रिद्धीला किती वेळ लागेल अजून... " यशवंत
" डॅड मी कॉल केला होता.. पोहचते आहे बोलली... विराज
" हे बघा आली ... " सिया डोअर कडे बघत बोलते..
" Hi सिया .... कशी आहेस ... ? " रिद्धी जाऊन तिला हग करते .
" मी मस्त आहे ... पण काय गं मी इथे आले आणि तुझा पत्ताच नाही ... " सिया तिला तक्रारीच्या सुरात बोलते .
" सॉरी यार , नेमकी मिटिंग आली .... " रिद्धि
" रिद्धि जा आधी फ्रेश होऊन ये मग गप्पा मारत बसा... " मंजिरी
" यशवंत जी तुमची मुलगी देखील लग्नाच्या वयाची झाली मग काही विचार केलाय कि नाही अजून ... " अर्पिता
" ते तर आहेच .... एकदा का अंकित आणि सिया यांच लग्न झालं कि बघु .... " यशवंत
" आच्छा ... पण मुलगी मात्र खूप छान आहे तुमची.. " अर्पिता

रिद्धी फ्रेश होऊन आल्यावर आधी सर्वांनी जेवण करून घेतले आणि मग लॉन मध्ये जाउन बसले... वडीलधाऱ्यंना फक्त ऐकायच कामं करत होते ...

" सो संगीत थीम काय आहे... डिसाइड केलं का .. ? " रिद्धी
" तेच ठरवायच आहे अजून ... लग्न 8 दिवसांवर आलंय पण यांच काहीच ठरलेल नाही " सारा
" री मी काय बोलतो तु आधी त्यांचे कॉच्युम डिझाइन दाखव .... आरव ( सियाचा भाऊ )
" हे बघ हे आहेत डिझाइन.. " रिद्धी त्यांना फोल्डर देते.. सगळे जण डिझाइन बघतात..


" सुपर यार ... रिधु आय जस्ट लव्ह इट ... " सिया
" रिद्धी अंकित चे डिझाइन... " विजय ( सियाचे डॅड )
" त्याचे डिझाईन्स उद्या येतील ...." रिद्धी
" रीद्धि ताई रिसेप्शन चे कॉच्युम .... " रुचिका
" रेडी झाले आहेत पीक दाखवते... " रिद्धी टॅब ओपन करून त्यांना ड्रेस दाखवते
" रिधु हे तेच डिझाइन आहे ना जे मी संजूच्या वेडींग मध्ये बनवल होत... " सिया
" हम्म .. आणि तुला ते आवडलं होत... " रिद्धी
" Ok then कॉच्युम्स झाले आता राहिल्या थीम्स... तर संगीत थीम हि मराठी सॉंग्स आहे ... मेहेंदीला थीम नाही आहे ... हळदीला येल्लो थीम आहे... अँड लास्ट वेडिंग थीम इज महाराष्ट्रीयन ..... फुल्ल ऑन मराठी लुक लेडीज पासून जेन्टस पर्यँत आणि यात काही बदल होणार नाही आहे... " रिद्धी सर्वांना इन्स्ट्रक्शन वजा धमकी देते....

" रिधु बाळा आम्ही एकावेळी ते धोतर आणि कुर्ती घालु गं , पण या मुलांना झेपेल का .... " समीर हसत बोलतात .
" तेच तर सगळी कडे नुसती पळापळ असते त्यात तर ती धोती सुटली तर इज्जत जाईल सगळी... " आरवच्या बोलण्यावर सगळे हसतात....
" कोण बोललं धोती घालायची आहे .... कुर्ती पायजामा हे देखील महाराष्ट्रीयन आऊटफिट आहे ... त्यात काय प्रॉब्लेम आहे .... " रिद्धी
" बर बर ऐका मी काय सांगते पण प्लिज चिडू नका.. " रिद्धी
" काय झालं बोल..." अंकित
" मी उद्या संध्याकाळी बेंगलोरला जाते आहे एक्झिबिशन साठी... सो मी तुम्हाला डायरेक्ट गोव्याला भेटेल.." रिद्धी
" तू बोलली नाहीस काही... " मंजिरी
"आई मिटींगला गेले होते ना तेव्हा ठरलं.... पण मी मेहेंदी पर्यंत येणार आहे... " रिद्धी
" अरे यार रिधु डान्स कोरिओग्राफ करायचा आहे अजून.." सिया
" don't worry सीयु मी सायली आणि विकीला सांगेल तर तुम्हाला प्रॉपर ट्रेन करतील ok.. " रिद्धी
" रिधु जाण गरजेच आहे का... " अंकित
" हो दादु अरे फक्त 5 दिवसांचा तर प्रश्न आहे... मी लवकर येईल मेहेंदि सुरु होण्याआधी... " रिद्धी
" Ok जा.. " सिया चेहरा पाडून बोलते..
" सियु U know ना तु असा चेहरा केला तर मला जाता नाही येणार ... plz " रिद्धी तिला मिठी मारत बोलते..
" ह्म्म.. पण लवकर ये... मी वाट पाहते आहे... " सिया
" yes .. हि अशी गेले आणि अशी आले.. " रिध्दी

थोड्या वेळ गप्पा मारून सरंजामे कुटुंबीयांनी निरोप घेतला.... रिद्धी रूम मध्ये येऊन चेंज करून बेड वर लॅपटॉप घेऊन बसली... मेल चेक करत असताना तिला नेकलेस डिझाइन दिसलं.... तिने पटकन मोबाईल ऑन करून अंकितला मेसेज केला...

"Send me Mr. Abhimanyu's number now..( मला Mr. अभिमन्यूचा नंबर पाठव)" रिद्धी

अंकित तिला नंबर देतो ती लगेंच त्याला कॉल करते.. शेवटच्या रिंगला तो कॉल

" Hello mr.Abhimanyu Purohit here...." रिद्धिच्या आवाजाने अभिमन्यू सायलेंट होतो.. त्याचा काहिच reply येत नाही म्हणून ती कॉल चेक करते कट झाला का म्हणून ..

" कॉल तर चालू आहे मग बोलत का नाही.. "रिद्धी स्वतःसोबत बोलते.
" Hello can you hear me ( तुम्ही मला ऐकू शकता.) रिद्धी पुन्हा बोलते तेव्हा तो भानावर येतो..

" yaa... I can hear you.. "( हो... मला ऐकू येतंय.) अभिमन्यू

" Ok ... I'm Riddhi Nimbalkar... Ankit Nimbalkar cousin..( ठीक आहे.. मी रिद्धी निंबाळकर अंकित निंबाळकरची चुलत बहीण) " रिद्धी
" Ok " अभिमन्यू
"ऑकच्युली मला तुमच्या कडे थोडं काम होत तुम्ही बोलू शकता का... " रिद्धी
" हो बोला... " अभिमन्यू
" oh.. thank you.. तर तुम्ही सियाची ज्वेलरी डिझाइन करत आहात तर मला तिच्या साठी वेडींग गिफ्ट म्हणून एक नेकलेस डिझाइन करुन हवा होता... जर तुम्हाला जमणार असेल तर प्लीज नेकलेस बनवून द्याल का.... " रिद्धी
" OK. तुम्ही उद्या ऑफिसमधे या आणि डिझाइन सिलेक्ट करा ... ज्वेलरी रेडी होते आहे त्यात हि देखील ऍड होईल... " अभिमन्यू
" डिझाइन मी रेडी केलं आहे फक्त बनवून द्या आणि बाकी ज्वेलरी सोबत नका देऊ नाही तर तिला समजलं तर ती नाही बोलेल.. " रिद्धी
" Fine... मग नेकपिस रेडी झाला कि मी कॉल करतो मग या तुम्ही घ्यायला.. " अभिमन्यू
" Ok Fine... मी तुम्हाला डिझाइन सेंड करते.. मी बंगलोर जाते आहे मी कोणाला तरी कॉलेक्ट करायला सांगेल... "
" OK... " अभिमन्यु
" Thanks ...OK then Bye.. Good Night..." रिद्धी
" most welcome... Bye.. Good Night " अभिमन्यू

रिद्धी अभिमन्यूला डिझाइन सेंड करते आणि झोपून जाते... अभिमन्यु तिने सेंड केलेलं डिझाइन बघतो आणी नकळत तोंडुन ब्युटीफुल निघते... तो डिझाइन पुढे रेडी होण्या करता पाठवतो... आणि झोपी जातो...