Bavra Mann - 10 books and stories free download online pdf in Marathi

बावरा मन - 10 - तिलक...

अंकित आणि सियाची पहाटेची फ्लाईट होती... त्यांना सोडवायला विराज जाणार होता... मंजिरी आणि रोहिणीने त्यांना कितीतरी सुचना केल्या होत्या... शेवटी यशवंतने त्यांना निघायला सांगितलं... सगळ्यांना नमस्कार करून दोघे निघाले...


आज पासून धरा ऑफिस जॉईन करणारा होती... ब्रेकफास्ट करून धरा आणि वंश बाहेर आले.... तर समोर Audi Q 7 होती....

" wow भाई... न्यू कार...." धरा एक्साइटेड होऊन बोलली....

" धरा हे राजू.... तुम्हांला जिथे जायच असेल तिथे ह्यांना घेऊन जायच.... आणि हि तुमची नवीन कार...." वंशने तिच्या समोर कारची चावी धरली.... धराने आनंदात त्याला मिठी मारली.... आणि दोघे ऑफिसला निघाले....

💠 💠 💠 💠 💠

रिद्धी सकाळी ऑफिसला आल्यानंतर पुजाने तिला तिचा शेड्युल सांगितला... रिद्धी आज डिझाइन च्या कामात बिझी राहणार होती... त्यानंतर तिला फिल्म डायरेक्टर सोबत मिटिंग होती... त्यामुळे ती कामाला लागली.... धरा तिला भेटायला आली...

" मे आय कम इन..." धरा डोअर नॉक करते...

" येस कम इन..." रिद्धी डिझाइन स्केच करत बोलते...

" दि तु बोलावल.... " धरा

रिद्धी तिला बसायला सांगुन स्केच बाजूला ठेवते... आणि तिच्याकडे वळते...

" बाकी स्टाफला आपल्या इंटरनॅशनल क्लाइंट बद्दल सर्व सांगितल आहे...तुला सांगायचं राहील आहे.... त्यांना इंडो वेस्टर्न डिझाइन हवे आहेत... तर मी तुला ब्रीफ सांगते..." रिद्धी तिला सर्व डिटेल मध्ये सांगते...

" OK di.... मी तुला परवा पर्यंत काही स्केच दाखवते... मग तु त्यातून फायनल कर... " धरा

" OK... काही वाटलच तर मी आहे बाकी स्टाफ आहे..." रिद्धी

" येऊ मी..." धरा तिला सांगून बाहेर जाते... रिद्धी तिच्या कामाला लागते...

💠 💠 💠 💠 💠

वंश ऑफिस मध्ये कामं करत बसला होता... तेव्हा केबिन डोअर नॉक झाला..

" May I come... " XYZ

" come in... " वंश लॅपटॉपवर बोट चालवत बोलतो...
तो आत आल्यावर वंशने त्याला बसायला सांगितल...

" बोला आज मिस्टर विक्रम सबनीस इकडची वाट कशी चुकले..." वंशने त्याच्याकडे पाहून विचारल...

" मी इथे विक्रम सबनीस म्हणून नाही तर विकी म्हणून आलोय..." विकी

" आधी सांग तु काय घेणार.... चहा , कॉफी ,कोल्ड्रिंक.." वंश

" सध्या कॉफी पुरे..." विकी हसत बोलला... वंशने प्युनला दोन कॉफी सांगितल्या...

" बोल..." वंश

" काही नाही इकडे मिटिंग साठी आलो होतो मग तुला भेटू जावं म्हणून आलो...." विकी बोलत असताना प्युन कॉफी घेऊन येतो...

" नक्की हेच कारण आहे ना... नाही तुझ्याकडे बघून वाटत नाही..." वंश त्याच्याकडे बघत बोलतो...

" नो मॅन... अ‍ॅम फाईन... " विकी त्याला समजावत बोलतो...

" कॉफी घे..." वंश समोरच्या कॉफी मग कडे बघून बोलतो...

" मग लग्न कधी करतो आहेस.... वंश राज पुरोहित लग्नाला तयार झाला तर मुलींच्या रांगा लागतील..." विक्रम हसत बोलतो...

" मला गरज नाही मुलींच्या रांगेची.... मला माझी बेटर हाल्फ केव्हाच मिळाली आहे..." वंश कॉफी सिप घेत बोलतो...

" व्हॉट... हे कधी झालं... मला कसं माहीत नाही... अ‍ॅम युअर बेस्ट फ्रेंड यार..." विक्रम आश्चर्यने विचारतो...

" तसतर मला तर ती लास्ट इयरला आवडली... पण बोलण आता झालं... आणि लग्न देखील फिक्स झालं आहे..." वंश चील होऊन सांगतो...

" व्वा भाई काय मैत्री आहे आपली... तु प्रेमात पडला... तुझं लग्न ठरलं आणि मला तु ते आत्ता सांगतो आहेस... " विकी त्याच्यावर रागावून बोलतो..

" हे बघ असं काही नाही आहे... मी फक्त तिला पाहिलं होत... आमच एक अक्षर देखील बोलण झालं नव्हतं... आता सियाच्या लग्नाला भेटली... घरच्यांना मी काही सांगणार त्या आधीच त्यांना ती आवडली आणि त्यांनी तिला मागणी घातली... " वंश त्याला समजावून सांगतो

" बाय द वे हू इज द लकी गर्ल..." विकी एक्साईट होत विचारतो...

" रिद्धी निंबाळकर..." वंश

" रिद्धी निंबाळकर... रिद्धी निंबाळकर... " विकी विचार करत बोलतो... त्याला नाव ऐकल्या सारख वाटत...

" रिद्धी निंबाळकर ती कोरिओग्राफर आणि फॅशन आयकॉन..." विकी वंश कडे मान वळवत विचारतो... त्यावर मान होकारार्थी मान हलवतो...

" ओह्ह हो...क्या बात है नॉट बॅड मॅन...काँग्रट्स बडी..." विकी त्याच्यासमोर हात करतो... वंश त्याला हँडशेक करतो...

" तुझा काय प्लॅन..." वंश

" प्लॅन असं नाही यार... पण मला जशी मुलगी हवी आहे ना... तशी मला अजून भेटली नाही... ज्या दिवशी भेटणार आधी तुला सांगणार... " विकी डोळा मारत बोलतो.. काही वेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या...

" अच्छा भाई.. चल निघतो... कामं आहेत खूप... आणि वहिनी साहेबांना भेटायचं आहे काय... " विकी उभा राहत बोलतो...

" लवकरच प्लॅन करू..." वंश देखील उभा राहतो... मग मात्र विकी निघतो... वंशला आऊटडोअर मिटिंग होती म्हणून तो मिटिंगला निघून जातो...

💠💠💠💠💠

स्थळ :- पुरोहित पॅलेस , जयपूर

पॅलेस मध्ये राजमातांनी संजना आणि जयसिंगना बोलावून घेतलं। होत... त्यामुळे सगळे हॉल मध्ये बसले होते... चहा - पाणी झाल्यावर राजमातांनी बोलायला सुरुवात केली...

" माँसा आज अचानक बोलावून घेतलं... काही खास कारण..." संजना

" खास तर आहे... आम्ही सियांच्या लग्नाला गेलो होतो.. तेव्हा आम्हांला वंश साठी मुलगी पसंत पडली आहे... आणि वंशना त्या आधीच आवडल्या आहेत... आणि आम्ही थोडक्यात बोलणी करून आलो आहोत... एखादा चांगला मुहूर्त बघून तिलक विधी करून घेऊ... त्यामुळे तुम्हांला हे माहीत असावं आणि मुली बद्दल सांगण्यासाठी बोलावल आहे..." राजमाता

" पण माँसा असं अचानक... मुलगी कोण आहे... कोणत्या घराण्यातल्या आहेत... आधी माहिती करून घेतली असती..." संजना

" संजना त्यांच नावं रिद्धी निंबाळकर आहे... त्यांच्या वडिलांचा आपल्या सारखा बिझनेस आहे... आता त्यांनी सर्व कामात त्यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या म्हणजे रिद्धींच्या हाती दिला आहे... रिद्धी एक टॉप कोरिओग्राफर आणि फॅशन आयकॉन आहेत..." मनीष

" म्हणजे त्या काम करतात... पण दादासाहेब आपल्या घराण्यात सुनबाई कामं नाही करत..." संजना

" आम्हांला सर्व माहीत आहे... पण आमची आणि वंशची पसंत म्हणजे काही तरी खास असेल ना... आणि काळानुसार आपणही बदलायला हवं संजना... म्हणूनच आम्ही त्यांना लग्नानंतरही कामं करायची परवाणगी दिली आहे..." राजमाता

" आई साहेब अहो पण अजून पर्यंत आपल्या घराण्यात असं कधीच नाही झालं आहे... अहो तुम्हांला तरी पटत आहे का...? " संजना जयसिंग कडे बघत बोलतात...

" संजना आई साहेबांची पसंत आहे म्हणजे त्यात बोट दाखवण्यासारखे असेल असं आम्हांला तरी वाटत... त्यामुळे तुम्ही कशाला काळजी करतात... आणि महत्वाचं म्हणजे वंश राजेंना मुलगी पसंत आहे मग तर विषयच संपला..." जयसिंग संजनाला समजावतात...

" सगळ्यांना पटत आहे तर ठीक आहे... मुलगी कोणाच्या नात्यात आहे..." संजना

" त्या सियांच्या नणंद आहे... त्याआधी सिया सोबत शिकत होत्या... दादा - वाहिनींना सर्व माहिती विचारूनच पुढच ठरवलं..." अर्पिता

" बर ठीक आहे... मग आता पंडितजींना विचारून एखादा चांगला मुहूर्त बघून सर्व ठरवून घेऊ... म्हणजे त्या नंतर त्यांना इथे येता येईल..." संजना बोलत असताना त्यांचा गार्ड आत आला...

" राजमाता पंडितजी आले आहेत..." गार्ड नमस्कार करून बोलला...

" पाठवा त्यांना आत..." राजमातांचा निरोप घेऊन गार्ड नमस्कार करून निघून जातो... काही वेळात पंडितजी आत येतात... सर्वांना नमस्कार करून राजमाता त्यांना बसायला सांगतात... लगेच शांती ( सेवक ) त्यांच्यासाठी पाणी आणि दूध घेऊन येते...

" आज संध्याकाळी बोलावलं... सर्व कुशल मंगल ना..." पंडितजी

" हो सर्व कुशल मंगल... आपल्या युवराजांसाठी कन्या बघितली आहे... तर पत्रिका बघून तिलक साठी छानसा मुहूर्त बघा..." राजमातांच बोलण झाल्यावर अर्पिता पंडितजींना रिद्धीची पत्रिका देतात... त्यांच्याजवळ ऑलरेडी वंशची पत्रिका असते...

पंडितजी दोघांची पत्रिका जुळवून बघतात... आणि पंचांग बघतात...

" राजमाता पत्रिका अगदी उत्तम आहे... ३६ पैकी ३६ गुण जुळत आहेत... कन्या शुभ पावलांनी घरात येणार आहे..." पंडितजींच्या बोलण्याने सगळे आनंदित झाले...

" तिलक साठी पंधरा दिवसांनंतर शुभ मुहूर्त आहे... आणि तेव्हाच तर सुनबाईंचे शुभ पाऊल घरात पडले तर उत्तम आहे..." पंडितजी पंचांग बघून बोलतात...

" पंडितजी त्यानंतर सुनबाईंच्या येण्यासाठी शुभ दिवस असेल ना..." अर्पिताचा प्रश्न ऐकून पंडितजींनी पुन्हा पंचांग बघतात...

" राणी साहेब पुढच्या महिन्यात शुभ दिवस आहे..." पंडितजी अर्पितांना सांगतात...

" पण वाहिनी साहेब तिलक नंतर यायला काय अडचण आहे..." संजना न कळून बोलतात...

" ताई साहेब अडचण अस नाही... आई साहेबांनी निंबाळकरांना रिद्धींना पुढच्या महिन्यात पाठवायला सांगितल आहे..." अर्पिता राजमातांकडे बघून बोलतात...

" ठीक आहे पंडितजी पंधरा दिवसांनंतर तिलक करून घेऊ... आम्ही मुलीकडे कळवतो..." राजमाता अर्पितांना पंडितजींना दक्षिणा द्यायला खुणावतात... अर्पिता त्यांना दक्षिणा देऊन नमस्कार करतात...

" आई साहेब आम्ही निघतो आता हॉस्पिटल मध्ये जावं लागेल... तुमचा कॉल आला म्हणून सरळ इकडे आलोय..." जयसिंग राजमातांना नमस्कार करतात... संजना देखील त्यांना नमस्कार करतात आणि दोघे निघतात...

" मनिष यशवंतना कॉल करून तिलकच्या तारखे बद्दल कळवा... अर्पिता तुम्ही देखील वंश आणि धरांना कळवा... आम्ही आराम करतो थोड्यावेळ... " राजमाता रूममध्ये निघून जातात...

💠 💠 💠 💠 💠

स्थळ :- वृंदावन , मुंबई



निंबाळकर कुटुंबीय लॉनवर चहाचा आस्वाद घेत बसले होते... गप्पा सुरु असताना यशवंतला कॉल येतो...

" नमस्कार मनिषजी..." यशवंत

" नमस्कार यशवंतजी... कसे आहात..." मनिष त्यांची विचारपूस करतात...

" आम्ही सर्व छान आहोत.. तुम्ही सर्व कसे आहात..." यशवंत खुशाली कळवतात...

" आम्ही देखील छान आहोत... बर तुम्हांला फोन या साठी केला कि आज राजमातांनी पंडितजींना पत्रिका दाखवली तर त्यांनी पंधरा दिवसांनंतर तिलक साठी मुहूर्त सांगितला आहे..." मनिष

" ठीक आहे मनिषजी... आम्ही तयारी करतो... फक्त तुमचे रीती रिवाज एवढे काही माहित नाही तर वहिनी साहेबांसोबत बोलून घेतील मंजिरी..." यशवंत

" हो हो... अर्पिता करतील कॉल तेव्हा सर्व सांगतील वहिनींना..." मनिष

" हो चालेल... मी सर्वांना कल्पना देतो तशी..." यशवंत

" ठीक आहे...भेटूया मग... ठेवतो... " मनिष

" हो... भेटू या..." यशवंत कॉल कट करतात... सर्वजण त्यांनाच बघत होते...

" पुरोहितांचा फोन होता.. त्यांच्या पंडितजींनी पंधरा दिवसांनंतर तिलक साठी मुहूर्त काढला आहे... तर आपल्याला जावं लागेल..." यशवंत सर्वांना सांगतात...

" अहो पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही..." मंजिरी काळजीत बोलतात...

" वहिनी अहो संध्या ताई ( सियाची आई ) आहेत ना... त्यांना विचारु आपण त्यांना सर्व माहीत असेल..." रोहिणी

" आणि अर्पिता वहिनी तुला कॉल करतीलच... काय आणि कसं करायच आहे सांगायला..." यशवंत त्यांना समजावून सांगतात...

💠 💠 💠 💠 💠

संध्याकाळी वंश घरी येण्याआधी धरा घरी आली होती... फ्रेश होऊन ती हॉल मध्ये डिझाइन बनवत होती...

" तु आज लवकर कशी आलिस घरी... आज नाही गेली अकॅडेमी मध्ये..." वंश समोरच्या सोफ्यावर बसतो...

" नाही... वहिनी नव्हती जाणार मग मी पण नाही गेले..." धरा त्याला पाणी आणून देते...

" का... ? तब्येत ठीक आहे ना...?" वंश काळजीत पडतो...

" ती ठीक आहे... तिची बाहेर डायरेक्ट सोबत मिटिंग होती म्हणून ती अकॅडेमीला जाणार नव्हती... इनफॅक्ट आतापर्यंत संपली असेल मिटिंग..." धरा त्याला पाणी देऊन समोर बसते...

" बर... चल मी फ्रेश होतो..." वंश बॅग घेऊन उठतो...

" मी सीमा काकुंना कॉफी बनवायला सांगते..." धरा स्केच पॅड घेऊन बसते...

वंश रूमकडे निघून जातो... वर जाताना तो रिद्धीला मेसेज करतो... आज दोघांना बोलायला वेळा भेटला नव्हता... क्लोजेट मधून टॉवेल घेऊन तो बाथरूम मध्ये जातो... थंड पाण्याचा शॉवर घेऊन त्याला फ्रेश वाटत... टॉवेल रॅक वर टाकून तो मोबाईल हातात घेतो तर अर्पितांचा कॉल येवुन गेला होता... म्हणून तो कॉल बॅक करतो...

" कामात आहात का...?" अर्पिता

" नाही जस्ट घरी आलोय... फ्रेश होत होतो म्हणून कॉल रेसिइव्ह नाही केला..." वंश

" बर वंश पंडितजींनी पंधरा दिवसांनंतर तिलक मुहूर्त काढला आहे तर तुम्हांला यावं लागेल तर तुमचे कामं संपवून घ्या..." अर्पिता

" ठीक आहे मॉम... मी करतो हँडेल... " वंश

" बाकी कसे आहात तुम्ही आणि धरा कशा आहेत..." अर्पिता

" आम्ही दोघे छान आहे... आणि धरा तर रिद्धी सोबत कामं करतेय तर खूपच आनंदात आहे... काल रिद्धी सोबत जाऊन शॉपिंग करून आली..." वंश

"आम्ही काल कॉल केला होता तेव्हा सांगत होत्या... त्यांना देखील घेऊन या..." अर्पिता

" ठीक आहे... तिलाही सोबत आणतो ..." वंश

" बर.. चला ठेवतो आम्ही...बाय..." अर्पिता

" बाय..." वंश कॉल कट करून कामं करत बसतो...

💠 💠 💠 💠 💠

रिद्धी घरी आल्यानंतर फ्रेश होऊन सिया आणि अंकितला कॉल करते... थोड्या वेळ त्यांच्यासोबत बोलून ती खाली निघून येते... तेव्हा यशवंत तिला पुरोहितांकडून आलेल्या कॉल बद्दल सांगतात... फायनली लग्न फिक्स होणार म्हणून तिला आनंद होतो... जेवण करून ती वॉक साठी लॉन मध्ये निघून जाते आणि वंशला व्हिडिओ कॉल करते... दोन रिंग मध्येच वंश कॉल उचलतो...

" बोला प्रिन्सेस... आज खूपच खुश दिसताय..." वंश स्माईल करत बोलतो...

" का तुम्ही खुश नाहीत का..." रिद्धी चेहरा बारीक करत बोलते...

" म्हणजे..." वंश न कळून बोलतो...

" आपल्या तिलकची डेट ठरली तर तुम्हांला आनंद नाही झाला..." रिद्धीचा चेहरा अजून तसाच होता...

" वेडी आहेस का... मला का नाही आनंद होणार... मला तर असं झाल आहे कधी तुला आपल्या घरी आणतो... रिद्ध मी तर म्हणतो आपण तिलक , एंगेजमेंट , आणि लग्न एकाच दिवशी करून घेऊ..." वंश तिला चिडवत बोलतो... त्यावर रिद्धी लाजून मान खाली घालते... आणि तिच्या खळीने वंशच्या हार्ट बीट वाढतात...

" हाय... तु अशी लाजलीस की माझा तर स्वतःवर ताबाच राहत नाही... मी राजमातांना लवकरचा मुहूर्त बघायला सांगतो... चालेल ना..." वंश तिला अजून चिडवत असतो... रिद्धिचे गाल लाजेने लाल झाले होते...☺️☺️

" वंश मला मुद्दाम त्रास देताय ना... जाऊदे मला बोलायचच नाही तुमच्यासोबत...😒" रिद्धी नाटकी चिडत बोलली...

" अरे मी तर अजून तुला काही त्रास दिलाच नाही आहे... खरां त्रास तर तुला लग्नानंतर कळेल...😉" वंश तिला हलकेच डोळा मारतो...

" जाऊ देत... आम्हांला तुमच्यासोबत बोलायच नाही... ठेवतो आम्ही फोन...😏" रिद्धी तोंड वाकड करते...

" अरे व्वा... आज तर आपण स्वतःला रिस्पेक्ट मध्ये बोलताय..." वंश

" हो... आतापासूनच सुरुवात केली तर पुढे सवय होईल ना... तुम्ही जयपुरला गेल्यानंतर असेच राहतात.."रिद्धी उत्सुकतेने विचारते...

" नाही... तिकडे गेल्यानंतर माझी संपूर्ण लाईफस्टाईल आणि स्पिकिंग स्टाईल बदलते... तिथे मला स्वतः बरोबर समोरच्या व्यक्तीला देखील मान द्यावा लागतो..." वंश त्याच्या लाईफ स्टाईल बद्दल तिला थोडक्यात सांगतो...

" म्हणजे लग्नानंतर तिकडे गेल्यावर माझा देखील कायापालट होईल... भारी साडी , डोक्यावर पदर , जड दागिने... बाप रे 😧... कसं जमेल मला..." रिद्धी काळजीत पडते...

" डोन्ट वरी... आपण तिकडे थोडीच राहणार आहोत..." वंश तिला समजावून बोलतो...

" पण मला आवडेल तिकडे रहायला... " रिद्धी हसू आणत बोलते...

" मला देखील आवडत... पण तिकडचा बिझनेस बाबा बघतात... जयपुर मेन ब्रांच नंतर आपली सब ब्रांच मुंबई मध्ये आहे... त्यामुळे मी dad ना तिकडे बघायला सांगतो... आणि सपोज मी तिकडे गेलो तर मॅक्स इथे सांभाळतो..." वंश

" तुम्ही मॅक्स वर खुप ट्रस्ट करतात ना...?" रिद्धी

" हो... मी स्टडी साठी लंडन गेलो होतो तेव्हा आम्ही भेटलो होतो... तिथे माझा जास्त कोणाशी कॉन्टॅक्ट नाही आला... मॅक्स ची मॉम इंडियन आहे... त्यामुळे त्याला माझ्यासोबत आपलेपणा वाटायचा... त्यानंतर त्याने मला पुढे बिझनेस मध्ये हेल्प करायच ठरवलं... आणी मग मुंबई ब्रांच ओपन झाली.... त्यानंतर बाकी ब्रान्चेस ओपन झाल्या... या सर्वात मॅक्स चा देखील मोलाचा वाटा आहे..." वंश त्याच्या विषयी भरभरुन बोलत होता... रिद्धी त्याला न्याहाळत होती...

" वंश तुम्हांला माहीत आहे... मला तुमच्यामध्ये सर्वात जास्त आवडते ती म्हणजे तुमची स्माईल... एकदम किल्लर... 🙂" रिद्धी त्याला स्माईल करत बोलते...

" अच्छा... अजून काय आवडत तुला..." वंश तिच्या डोळयांत बघत बोलतो... त्याच्या बघण्याने रिद्धी मान खाली घालते...

" रिद्ध सांगते आहेस ना..." वंश तिला आवाज देतो...

" अजून बरचं काही आवडत पण ते असं फोन वर कसं ना सांगणार..." रिद्धी त्याला नजर देत बोलते... तिच्या बोलण्यावर वंशला हसू येत...

"अच्छा... मग कस आणि कधी सांगणार..." वंश

" जेव्हा तुम्ही मला संपूर्ण जयपुर फिरवणार..." रिद्धीच्या बोलण्यावर वंश गालात हसतो...

" ओके... आपण जेव्हा जाणार आहोत... तेव्हा तुम्हांला जयपुर फिरवतो... तु कधी जयपुर आली नाहीस..." वंश

" आले आहे...पण मला तुमच्या सोबत बघायच आहे..." रिद्धी

" जाऊ या... आमच्या राणी सरकारांची इच्छा नक्की पूर्ण होणार..." वंश तिला आश्वस्त करत बोलतो...

" बर... ठेवते मी आता कॉल... उशीर झालाय तुम्ही पण झोपा..." रिद्धी

" बाय... गुड नाईट... I Love You... " वंश तिला फ्लाइंग किस देतो...

"बाय... गुड नाईट... I Love You 2..." रिद्धी देखील त्याला फ्लाइंग किस देते... कॉल कट करून आत येते... सगळे रूम मध्ये गेले होते... रिद्धी डोअर व्यवस्थित बंद करून सर्व चेक करते आणि रूममध्ये जाऊन झोपते...


क्रमशः