Sang na re mana - 25 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 25)

मग संयु ने मीतेश पासून कायमचे दूर जाण्याचा निर्णय घेतला . इथे राहिले तर मी मीतेश ला कधीच विसरु शकणार नाही.असा निर्णय तिने घेतला.दुसऱ्या दिवशी संयु पल्लवी कडे आली.तिचे सुजलेले डोळे बघुनच पल्लू काय ते समजली. संयु तू ठीक आहेस ना? हो पल्लू मी काल मीतेश ला भेटले. मला माहित आहे संयु. म्हणजे तुला आरोही शुद्धिवर आली आहे हे माहित होत? हो काल निनाद ने मला सांगितले पन तुझ्याशी मितेशच बोलू दे म्हणून मी गप्प राहिले. ओके पल्लू मी एक निर्णय घेतला आहे. कोणता? मी पुणे सोडून जाणार आहे कुठे जाणार हे अजुन नाही ठरवले. संयु वेडी आहेस का तू? तू मीतेश पासून दूर जावून त्याला विसरनार आहेस? प्रयत्न करेन ग पण इथे त्याच्या नजरे समोर राहुन मी जगु नाही शकणार. संयु निट विचार कर मग निर्णय घे. माझा निर्णय झाला आहे पल्लू मी उद्याच पुणे सोड़ेन. मीतेश ने विचारले तर सांग कुठे गेली नाही सांगितले. संयु म्हणत पल्लू ने तिला मीठी मारली. दोघी ख़ुप रडत होत्या. बेस्ट फ्रेंड होत्या ना. पल्लू माझ प्रेम मीतेश वर आहे तो कुठे ही असु दे आनंदात आणि सूखात राहु दे एवढी च माझी इच्छा आहे. आणि संयु तुझा आनंद तुझ सुख त्याच काय? पल्लू माझ प्रेम कायम असेल ग मीतेश वर तो आनंदी असेल तर मी ही खुश असेन. आपल प्रेम आपल्या जवळ असने म्हणजेच सुख नसते ग. आपल्या प्रेमाला आनंदात सुखात बघन हे ही प्रेमच ना? त्याचे बुक्स वाचत राहीन. त्याची प्रसिद्धि बघत राहीन. मी कुठे ही असले तरी त्याची ख़बर ठेवेन. ख़ुप मोठा रायटर होणार मीतेश. वन ऑफ द बेस्ट सेलर ऑथर मीतेश . आता आहेच पन अजुन भरपूर यश त्याला मिळणार. पल्लू प्रेम म्हणजे घेण नाही देण असते. आपल्या मुळे आपल्या सख्या च्या चेहऱ्यावर हासु येणार असेल तर त्यासाठी कीती ही दुख सोसणयाची तयारी ठेवणे म्हणजेच प्रेम. अँड हिज स्माइल सो मच प्रेशियस फ़ॉर मि. (And his smile so much precious for me) मीतेश हसत राहणार असेल ना तर मी आयुष्यभर दुख सोसायला तयार आहे. संयु माझ्या कॉन्टैक्ट मध्ये राहशील ना? हो चल मी जाते तयारी करायची आहे मला. आणि एक रिक्वेस्ट आहे पल्लू आताच तू निनाद किंवा मीतेश ला माझ्या बद्दल काही ही सांगणार नाही आहेस. ओके म्हणत पल्लू ने संयु चा निरोप घेतला. मितेश ने संयु ला मेसेज केला गुड़ मॉर्निंग असा पण संयू ने तो बघून सुद्धा इग्नोर केला. आता तिला मीतेश पासून दूर जायचे होते. तिने मुंबई ला तिच्या आत्या कड़े जायचे ठरवले होते. इकडे अचानक आरोही ची तब्येत बिघडली होती. सुजय ने मीतेश ला कॉल केला. मीतेश हॉस्पिटल ला आला. आरु जवळ गेला तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आरु चा हात आपल्या हातात त्याने घेतला. आरु काही ही होणार नाही तुला मी आहे ना नको काळजी करू.मीत मला माहित आहे आरु बोलत होती पण बोलताना ही तिला त्रास होत होता. तू नको काही बोलूस आरु तुला त्रास होतोय. मीत माझ्या कड़े आता जास्त वेळ नाही तू तुझ्या लाइफ मध्ये मुव्ह ऑन कर इतके बोलून आरु ने डोळे मिटले आणि त्याच्या हातातला तिचा हात ख़ाली पडला. आरु अस जोराने मीतेश ओरडला. त्याचा आवाज ऐकून सुजय तिथे आला. त्याने आरु चे मनगट हातात घेवून चेक केले. आरु हे जग सोडून गेली होती. मितेश तसे ही आरु ची कंडीशन क्रिटीकल होती. फ़क्त तुझ्याशी शेवटच बोलन्यासाठी जणु ती थोड़ा वेळ शुद्धिवर आली होती.सुजय मितेश ला समजवत होता. मीतेश शान्त बसून होता. थोड्याच वेळात निनाद ही आला. मीतेश जवळ गेला त्याच्या डोळ्यातुन अश्रु वाहत होते. निनाद ला त्याला अस बघण ख़ुप अवघड जात होत. शेवटचे एकदा आरु ला बघून मितेश घरी आला. निनाद त्याला सोडून गेला. निनाद ने पल्लू ला कॉल करुन ही बातमी दिली. आणि संयु ची चौकशी केली. संयु हे शहर सोडून गेली इतकेच पल्लू ने सांगितले. कुठे गेली हे संयु सांगू नको म्हणाली होती. निनाद ने संयु ला कॉल लावला आता मितेश ला तीच सांभाळू शकते हे त्याला माहित होते पण संयु चा नंबर चुकीचा आहे असं येत होते. ओह नो म्हणजे संयु ने नंबर चेंज केला. कुठे असेल ती? मितेश सुखात रहावा म्हणून मुद्दाम त्याच्या पासून दूर गेली. असा विचार तो करत राहिला. दुसऱ्या दिवशी तो पल्लू ला भेटायला गेला. पल्लू तुला समजत कसे नाही आता मितेश ला फक्त संयु सांभाळू शकते. त्याला या दुःखातून तीच बाहेर काढू शकते तू प्लिज मला सांग कुठे आहे ती. निनाद खरच मला माहित नाही रे. तुझा मोबाइल बघू निनाद म्हणाला. घे म्हणत तिने आपला फोन दिला. त्याने संयु चा नंबर बघितला तर तो जुनाच होता त्याने तो डायल केला पण उत्तर तेच की हा नंबर चुकीचा आहे.