Sang na re mana - 26 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 26)

निनाद ने संयु ला कॉल लावला आता मितेश ला तीच सांभाळू शकते हे त्याला माहित होते पण संयु चा नंबर चुकीचा आहे असं येत होते. ओह नो म्हणजे संयु ने नंबर चेंज केला. कुठे असेल ती? मितेश सुखात रहावा म्हणून मुद्दाम त्याच्या पासून दूर गेली. असा विचार तो करत राहिला. दुसऱ्या दिवशी तो पल्लू ला भेटायला गेला. पल्लू तुला समजत कसे नाही आता मितेश ला फक्त संयु सांभाळू शकते. त्याला या दुःखातून तीच बाहेर काढू शकते तू प्लिज मला सांग कुठे आहे ती. निनाद खरच मला माहित नाही रे. तुझा मोबाइल बघू निनाद म्हणाला. घे म्हणत तिने आपला फोन दिला. त्याने संयु चा नंबर बघितला तर तो जुनाच होता त्याने तो डायल केला पण उत्तर तेच की हा नंबर चुकीचा आहे. अरे यार तू तर तिची बेस्ट फ्रेंड ना मग तुला पण काही सांगून नाही गेली. हो निनाद नाही सांगितले तिने कदाचित थोडे दिवस तिला एकटीला राहायचे असेल. खूप डिप्रेस होती ती. आय अनडरस्टॅन्ड पल्लू पण अस अचानक काही होईल हे कुठे माहीत होते. मला पण वाटले की आता आरु शुद्धी वर आलीय तर बरी होणार . पण निनाद या सगळ्यात संयु ची काय चूक? काही ही चूक नसताना शिक्षा मात्र तिलाच मिळाली. पल्लू कोणाच बरोबर कोणाच चूक हा विषयच नाही परिस्थिती तशीच होती. निनाद पण सहन तर संयु लाच करावे लागले ना! आता ती पुन्हा मितेश कडे येईल याची खात्री नाही. पल्लू मितेश लव संयु . हो का मग आरु शुद्धीवर आली म्हणून संयु चा विचार सुद्धा न करता तो आरु कडे गेला. हा असा दूर जवळ खेळ करत राहणार आहे का? याच्या या ऑन ऑफ खेळात संयु भरडली जातेय हे तुमच्या लक्षात ही येत नाही. पल्लू सगळं बोलणं पटत ग तुझं पण जरा मितेश च्या जागी स्वहताला ठेवून विचार कर ना. त्याच्या लाईफ ची ती एक फेज होती. त्याला तरी कुठे माहीत होते की पुढे असे होणार आहे. काल पासुन खूप शान्त झाला आहे तो. अति विचार केला ना त्याने तर त्याच डोकं खूप दुखते. निनाद आता तुझं म्हणणं काय आहे? पल्लू आता फक्त संयुच मितेश ला सावरू शकते तू तिच्या घरी जाऊन बघ ना तिचा नंबर मिळतो का? ओके निनाद मी बघते. मग निनाद ऑफिसमध्ये आला. खर तर पल्लू कडे ही संयु चा नवीन नंबर नवहता. इकडे मितेश दोन दिवस झाले आपल्या रूम मध्येच बसून होता.इतके दिवस कोमात का असेना पण आरु त्याच्या नजरे समोर होती. आणि आता अचानक ती त्याला कायमच सोडून गेली ही गोष्ट मितेश ला पचवन अवघड होते. त्याचे आई बाबा त्याच्या काळजीत होते. मितेश रूम मध्येच थोडं फार खाण घेऊन खात होता. पण सिगारेटस मात्र या दोन दिवसात खूप ओढल्या त्याने. आरु च्या आठवणीने रडला ही होता. निनाद आणि सुजय त्याला कॉल करत होते पण तो रिसिव्ह करत नवहता. असाच आठवडा झाला मितेश ला या कंडिशन मधून बाहेर काढणे गरजेचे होते नाहीतर तो डिप्रेशनमध्ये जाईल ही भीती सुजय ला वाटत होती. मग तो आणि निनाद मितेश कडे आले. मितेश च्या आई ने सांगितले की तो रूम मधून बाहेर आलाच नाही. तसे हे दोघे त्याच्या रूम कडे गेले. दार वाजवले तसे मितेश ने दार उघडले.

रूम मध्ये बेडवर आरु आणि मितेश चे फ़ोटोज होते. आरु ने दिलेली गिफ्ट्स सगळी एकत्र पडली होती. टेबलवर अँश ट्रे सिगरेटस च्या राखेने तुडुंब भरला होता. मितेश चा चेहरा मलुल झाला होता डोळे खोल गेले होते. ज्या बियर्ड वर आरु फिदा होती ती त्याची फ्रेंच कट बियर्ड आता अस्ताव्यस्त वाढली होती. मित्या अरे काय हाल करून घेतला आहेस स्वहताचा. जरा बघ स्वहताकडे सुजय बोलला. अरे हे जग नाही तुझं यार असा कसा तू ? हो सुजय हे जग नाही माझं ,माझं जग माझी आरु होती तीच मला सोडून गेली. मित्या अरे अस कोणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नसते रे. आरु तुला बोलली ना मूव्ह ऑन कर म्हणून. आय कान्ट सुजय. ठीक आहे तू असाच बस रूम मध्ये स्वहताला कोंडून घे. तुझं काम तुझं नाव सगळं सगळं माती मोल होऊ दे. नको बनू तू द बेस्ट सेलर ऑथर . आरु च स्वप्न नको पूर्ण करुस आणि आता संयु ला ही सांग की ती तुझी कोणी लागत नवहती निघून जा कायमचे तुझ्या आयुष्यातुन. ती पण असच एकटी ने आयुष्य संपवून टाकेलं मग तुला फार आनंद होईल. निनाद अस बोलला तसे मितेश ला झटकन संयु ची आठवण आली . कुठे आहे संयु निनाद ? का तुला कशाला पाहिजे संयु यु डोन्ट लव हर. निनाद मी संयु ला विसरूनच गेलो रे कशी आहे ती? तुला काय करायचे मित्या संयु कशी आहे जिवंत आहे की नाही तुला काय त्याच? तू बस ना तुझंच दुःख कुरवाळत स्वहताच्या जगात रहा तू तिथे कशाला तुला संयु हवी. निनाद आता रागात बोलत होता कारण अस नाही बोललो आता तर मितेश ला समजणार नाही म्हणून तो रूड बोलत होता. प्लिज निनाद आय एम सॉरी थांब मी संयु ला कॉल लावतो म्हणत मितेश ने फोन हातात घेतला तसा निनाद ने त्याचा फोन आपल्या कडे घेतला मित्या काही ही उपयोग नाही संयु हे शहर सोडून गेली आहे आणि तिने नंबर ही चेंज केला आहे. व्हाट? नाही संयु अस करूच शकत नाही ती खूप प्रेम करते माझ्यावर . बास मित्या अरे किती गृहीत धरले आहेस तिला. ती प्रेम करते तुज्यावर म्हणून तू तिला कस ही तुज्या मना सारख ट्रीट कर. तुला ती जवळ हवी असेल तेव्हा तिने तुझ्या जवळ यायचं. तू असा मनात येईल तेव्हा ऑन ऑफ मोड वर राहायचं कधी कधी तर एकदम सायलेंट मोडवर, नो कॉन्टॅक्ट ऍट ऑल. ती प्रेम करते म्हणून तुझे मूड स्विंगज तिने सांभाळायचे, तुला नेहमी समजून घ्यायचे. आणि तू फक्त तिला गृहीत धर.

क्रमश. कथा कशी आहे प्लिज कमेंट.