Sang na re mana - 27 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 27)

ती प्रेम करते म्हणून तुझे मूड स्विंगज तिने सांभाळायचे, तुला नेहमी समजून घ्यायचे. आणि तू फक्त तिला गृहीत धर. निनाद नॉनस्टॉप बोलत होता. मित्या नको लिहू तू काही नको ते नवीन नोवेल पूर्ण करू तू असाच रहा एकटा तुझ्या दुःखा सोबत आम्ही कोण रे तुझे ? प्लिज निनाद ट्राय टू अनडर स्टॅन्ड मि. संयु कुठे आहे सांग आय बेग यु. मितेश चे डोळे भरून आलेले. सुजय ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. निनाद त्याच्या जवळ आला मित्या एकदाच शेवटच रडून घे मात्र पुन्हा कधी या डोळयात पाणी नाही आले पाहिजे. खूप मोठा रायटर बनायचे आहे तुला. आरुच स्वप्न पूर्ण करायचे आहे ना? तिला आवडत होते ना खूप तुझे हे ब्राऊनिश डोळे मग या डोळ्यात पाणी आलेले तिला कधी तरी आवडेल का सांग. स्वहताला सावर आता . निनाद संयु कुठे गेली सांग. मित्या मला पण माहीत नाही ती कुठे गेली ना पल्लवी ला माहिती आहे. पण आपण तिला शोधून काढू ओके डोन्ट वरि. मग निनाद आणि सुजय ने मितेश ची सगळी रूम आवरली त्याला ही नीट आवरायला सांगितले. तिघांनी एकत्र मीतेश च्या घरी जेवण केले. मितेश आता ठीक वाटत होता. पूर्ण एक आठवड्यानी तो खाली हॉल मध्ये आला होता. निनाद संयु च्या घरी चौकशी कर मितेश म्हणाला. हो मितेश पल्लू जाणार आहे संयु च्या घरी काहीतरी समजेल नक्की. तू आराम कर आता. उद्या ऑफिस ला ये. मित्या जास्त स्ट्रेस तुझ्या साठी चांगला नाही अजिबात आता कसला ही विचार करू नकोस आणि नो सिगरेट सुजय बोलला. मग मितेश ने दोघांना मिठी मारली. ते दोघे तिथून निघाले. मितेश ने संयु चा नंबर डायल करून बघितला पण नाही लागला. खरच आपले चुकले अस त्याला वाटत राहिले. आपण आपल्याच दुःखात हरवून बसलो आणि संयु ला पूर्णपणे विसरून गेलो. आरु बद्दल तिला सांगितले तेव्हा एका शब्दाने सुद्धा काही बोलली नाही. तू आनंदात आहेस ना मग ठीक आहे. मी असेनच ना कायम तुझ्या साठी इतकं मोठं मन तीच मी का नाही समजू शकलो तिला? वेड्या सारखी प्रेम करते आपल्या वर आणि मी काय दिले तिला फक्त अश्रू! संयु कुठे आहेस तू आय मिस यु लॉट मितेश एकटाच बोलत राहिला. दुसऱ्या दिवशी मितेश ने पुन्हा संयुला कॉल लावला पण नाही तो नंबर बंद दाखवत होता. मग मितेश पल्लवी कडे आला. पल्लवी मला खर खर सांग संयु कुठे आहे? तुला माहीत आहे ती कुठे आहे. मितेश खूप हळवा झाला होता त्याला अस बघूनच पल्लू ला वाईट वाटले.

मितेश संयु बोलली होती की ती मुंबई ला जाणार असे. तेव्हा तिकडे गेली असेल पण माझ्या कडे पण तिचा जुनाच नंबर आहे. ओके पल्लवी मी काढेन तिला शोधून कुठून पण आता मी संयु ला नाही गमवणार नेव्हर. अस बोलून मितेश तिथून निघून गेला. पल्लू ने लगेचच निनाद ला ही गोष्ट सांगितली. निनाद ला समजले की मितेश आता काही ही करून संयु ला शोधायला बाहेर पडणार. त्याला थांबवणं गरजेचे होते कारण मितेश च्या डोक्यात एखादी गोष्ट आली की तो कोणालाच ऐकत नसे. आणि सध्या त्याची तब्येत ही म्हणावी तितकी ठीक नवहती. मानसिक दृष्ट्या तो कमकुवत झाला होता आणि त्याचा शॉर्ट टेम्पर्ड स्वभाव ही निनाद जाणून होता. निनाद ने मितेश ला फोन लावला पण त्याने उचलला नाही. मग त्याच्या घरी त्याने फोन केला तर तो घरी आला नाही असे समजले. निनाद ला काय करावे ते समजेना त्याने पटकन सुजय ला कॉल करून भेटायला बोलवले. सुजय 10 मिनिटात आला. सुजय मला मित्या ची खूप काळजी वाटते रे कुठे गेला असेल तो? निनाद हे बघ आता तो नॉर्मल आहे त्यामुळे उगाच टेन्शन नको घेऊ कुठेतरी गेला असेल मे बी त्याची आवडती जागा टेकडी वर . चल सुजय आपण जाऊन बघू म्हणत निनाद आणि सुजय लगेच निघाले. निनाद ला मितेश जी कादंबरी लिहणार होता त्या प्रकाशकाचा फोन आला. बरेच दिवस झाले मितेश ने त्यांना काही कॉन्टॅक्ट केला नवहता तो ही कादंबरी पूर्ण करणार आहे की नाही असे विचारत होते. निनाद बोलला त्याची तब्येत ठीक नाही पण तो कादंबरी नक्की पूर्ण करेल मी शब्द देतो तुम्हाला असे बोलून फोन ठेवला. अलीकडे मितेश ज्या परिस्थिती तुन जात होता त्यामुळे त्याने अजिबात लिखाण केले नवहते. मितेश पल्लवी ला भेटून लगेचच संयु ला शोधायला बाहेर पडला होता. आता तो पुणे मुंबई हाय वे वर होता. संयु मुंबईत कुठे असेल याची काही ही कल्पना नसताना तो निघाला होता. निनाद ने पुन्हा एकदा पल्लू ला फोन केला आणि मितेश कुठे नाही तो नक्की मुंबई कडे निघाला असेल सो तू लवकरात लवकर संयु च्या घरून तिचा फोन नंबर घे प्लिज फास्ट अस त्याने सांगितले.

क्रमश