Sang na re mana - 28 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 28)

मितेश कुठे नाही तो नक्की मुंबई कडे निघाला असेल सो तू लवकरात लवकर संयु च्या घरून तिचा फोन नंबर घे प्लिज फास्ट अस त्याने सांगितले. पल्लू मग संयु च्या घरी गेली तिच्या आई ला मितेश बद्दल सगळं सांगितले आणि तिचा नवीन नंबर मिळवला. पल्लू ने मग हा नंबर निनाद ला सेंड केला. संयु मुंबईत कुठे आहे तो पत्ता ही दिला. मग निनाद मितेश ला कॉल करत होता पण रेंज नसल्याने त्याचा फोन लागत नवहता. निनाद सतत मितेश चा फोन ट्राय करत होता. इकडे मितेश संयु च्या आठवणीने आणि आपण तिच्याशी खूप चुकी चे वागलो या विचारानेच गिल्टी फील करत होता. कधी संयु ला समोर बघतो अस त्याला झालं होतं. त्याला संयु सोबत घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवत होते. तो खूप जास्त विचार करत राहिला तशी ही त्याची तब्येत थोडी डाऊन होती. सकाळ पासून त्याने काही खाल्ले नवहते. आता ही काही खाण्याचे भान त्याला नवहते. सिगरेट मात्र ओढत तो कार ड्राइव करत होता. आता त्याच डोकं दुखायला सुरुवात झाली होती. हाय वे वर गाड्या स्पीडनेच चालवाव्या लागत असत नाहीतर मागून गाड्या फास्ट येत असत. मितेश आता डोकेदुखी ने त्रस्त झाला होता . त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. अचानक एका क्षणाला त्याची कार रोड च्या मधोमध असलेल्या डीवायडर ला जाऊन जोरात आपटली. आणि मागून येणाऱ्या एका स्कार्पिओ ने मितेश च्या कार ला धडक दिली. मितेश ला काहीच समजले नाही तो तात्काळ बेशुध्द झाला. लोक जमले हाय वे वर गर्दी झाली. पूर्ण हाय वे आता जाम झाला. पोलीस आणि अँम्ब्युलन्स येईल पर्यंत वेळ लागला. सुजय आणि निनाद ही हाय वे वर होते. ट्रॅफिक जाम आहे का? का गाड्या थांबल्या आहेत हे काहीच त्यांना समजत नवहते. तसे ही मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर नेहमी अपघात होत असतात त्यामुळे ट्रॅफिक जाम असते. अस निनाद च्या मनात येऊन गेले. जवळजवळ अर्धा तासांनी रस्ता रिकामा झाला . गाड्या एका मागोमाग एक जाऊ लागल्या. एके ठिकाणी अपघात झाल्याने कार च्या काचांचे तुकडे रस्त्यात पडले होते. पोलीस अजून ही रोड वर होते. निनाद चे लक्ष गेले तिथे तर सुजय ती बघ मित्या ची कार ओह नो मित्या चा ऍकसिडेंट ! निनाद ओरडला तसा सुजय थांबला. दोघे कार मधून बाहेर आले आणि तिथे उभ्या असणाऱ्या पोलिसां कडे गेले सर ही कार आमच्या मित्राची आहे सुजय बोलला आणि मितेश बद्दल सगळी माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी मग मितेश ला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले आहे असे सांगितले.सुजय आणि निनाद पटकन तिकडे गेले. हाय वे जवळील एका हॉस्पिटलमध्ये मितेश ला नेले होते. त्याला ओटी मध्ये नेले होते . त्याच्या डोक्याला मार लागला होता रक्त खूप गेले होते. निनाद आणि सुजय च्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्यांच्या जिवलग मित्राची अशी अवस्था ते बघू शकणार नवहते. दोघे ही गप्प होते. पल्लू चा फोन निनाद ला येत होता. त्याने फोन घेतला आणि मितेश च्या अपघाता बद्दल सांगितले . पल्लू ही शॉक झाली निनाद तू ठीक आहेस ना तू मितेश कडे लक्ष दे मी संयु ला कॉल करते.

. हो पल्लू आय एम ओके. तू सांग संयु ला. मितेश ला ओटी मधून बाहेर आणल्यावर मी सांगेन तुला अस बोलून त्याने फोन ठेवला. एक तासा नंतर मितेश ला रूम मध्ये हलवले त्याला डोक्याला स्टीचेस पडले होते. तो आता आऊट ऑफ डेंजर होता. निनाद ने मनोमन देवाचे आभार मानले. सुजय तिथल्या डॉक्टरांशी बोलला तो स्वहता डॉक्टर असल्याने मितेश ची पूर्ण काळजी घेईन अस म्हणाला. त्यामुळे डॉकटरांनी मितेश शुद्धी वर आला की त्याला तुमच्या सोबत घेऊन जा असे सांगितले. मितेश ची आई काळजीत असेल म्हणून निनाद ने घरी फोन केला त्याची तब्येत ठीक नाही पण आम्ही त्याच्या सोबत आहोत लवकर च पुण्यात येतो काळजी नका करू अस सांगितले. इकडे पल्लू ने संयु ला मितेश च्या अपघाता बद्दल सांगितले तसे संयु रडू लागली मितेश आता कुठे आहे सांग मी तिकडे जाते . माझ्या मुळे मितेश चा अपघात झाला मीच जबाबदार आहे या सगळ्याला अस बोलून ती रडत राहिली. पल्लू ने तिला शान्त केले म्हणाली,संयु नको काळजी करू निनाद आणि सुजय आहेत त्याच्या सोबत . मग संयु ने फोन ठेवला आणि निनाद ला कॉल लावला निनाद ने सांगितले की मितेश अजून शुद्धीवर आला नाही कधी शुद्धीवर येईल ते माहीत नाही . संयु बोलली तुम्ही कुठे आहात मी येते तिकडे मला मितेश ला बघायचे आहे प्लिज. संयु हे हॉस्पिटल हाय वे च्या बाजूला आहे तुला यायला जमणार नाही . पण आम्ही लवकरच मितेश ला पुण्याला घेऊन येणार आहोत तू नको काळजी करुस अस निनाद ने तिला सांगितले.मग संयु ही पुण्याला यायला निघाली. ती आल्या आल्या पल्लू लक भेटली आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागली. पल्लू माझं खूप प्रेम आहे मितेश वर मी नाही राहू शकत त्याच्या शिवाय. त्याला काही झाले तर मी पण नाही जगू शकणार. संयु तू रडू नकोस आणि मितेश ला काही ही होणार नाही तुझं प्रेम त्याच्या सोबत असताना तो सेफच असणार आहे. आणि बघ तुझं खर प्रेम आहे ना म्हणून मितेश तुला पुन्हा मिळाला. म्हणजे मला नाही समजले काही संयु पल्लवी पासून बाजूला होत म्हणाली. संयु आरु मितेश ला कायमचे सोडून गेली. व्हॉट ?हे कधी झाले ? संयु ने आश्चर्याने विचारले. होईल आता आठवडा संयु पण तेव्हा पासून मितेश खूप दुःखी झाला आहे. दोन दिवस त्याने स्वहताला रूम मध्ये कोंडून घेतले होते. निनाद बोलला त्याच्या कडे बघवत नवहते इतका डिप्रेस तो झाला होता त्यात तू ही त्याला सोडून गेलीस हा धक्का त्याला पचवता नाही आला .याच डिप्रेशनमध्ये तो तुला शोधायला निघाला होता आणि हे असे झाले. पल्लू इतके सगळे झाले मग मला कळवायचे तरी. कसे सांगणार मी संयु तू तुझा नंबर चेंज केलास तुझ्या घरी येऊन मी मितेश ची अवस्था काकूंना सांगितली तेव्हा त्यांनी तुझा नवीन नंबर दिला.पल्लू मला मितेश ला भेटायचे आहे ग . हो निनाद म्हणाला आहे की पुण्यात आला की सांगतो मग आपण जाऊ आणि मितेश ठीक असेल नको काळजी करू संयु. आता संयु ला खूप गिल्टी फील होत होते माझ्या मूळे मितेश चा अपघात झाला असच तिला वाटत होते.कधी मितेश ला बघते अस तिला वाटत होते.दुसऱ्या दिवशी निनाद आणि सुजय मितेश ला घेऊन पुण्यात सुजय च्या हॉस्पिटलमध्ये आले. सकाळीच संयु पल्लू सोबत हॉस्पिटलमध्ये आली. मितेश शान्त झोपला होता. त्याच्या डोक्याला मोठे बँडेज होते. खूप अशक्त दिसत होता तो. संयु त्याच्या जवळ बसली. तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहतच चालले होते. ती एकटक मितेश कडे बघत होती. मितेश ला जाग आली त्याने संयु ला पाहिले त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की संयु समोर आहे.

क्रमश..