Intrusion ... in Marathi Short Stories by suhas v kolekar सुविकोळेकर books and stories PDF | घुसमट...

घुसमट...


घुसमट. .

होय प्रश्न एकच कामावर जावं की न जावं?
गेले तर त्या हिडीस नजरा शरिरावरुन फिरताना नकोसा होनारा जीव.तो धडधडता जीव घेऊन दिवसभर करावं लागतं काम पोटासाठी.पुरत नाही नवर्‍याचा अपुरा पगार भागत नाही घरखर्च.होत नाही मुलांच शिक्षण ,अशाच अन अशाच अनेक कारणापायी सहन करावं लागतं सगळं.अन घुसमटणारं मन सांभाळत कराव्या लागतात नकोशा गोष्टी.
जरी असलो कामाच्या ठिकाणी तरी जाणवते एक अस्वस्थता अन् असुरक्षितता . कारण फिरत असतात श्वापदं माणसाच्या रुपात.जाणवत असतं भय कधी पडेल झडप अन घेतील घास माझ्या इज्जतीचा,तोडतील लचका एखाद्या जंगली कुत्र्यांप्रमाणे.अन चघळतील हाडे आमच्या अब्रुची आणि हसतील विकट महाभारतातील दु:शासना प्रमाणे आणि मिरवतील शौर्य एका अबलेवर हात टाकल्याचे वांझ समाधान मानून.
कधी कधी ही श्वापदं करतात पुसटसा स्पर्श नकळतंच !
आणि आव अाणुन निघुन जातात पुढच्या संधीची वाट बघत मग यांच धाडस बरंच वाढतं आणि यांच्या आगंतुक स्पर्शाने शिरशिरी येउन जाते अंगावर. . . पण. . . पण बोलणार तरी कुणाला? सहकारी मैत्रिणींना? त्याही बिचार्‍या क्रुत्रिम हसत दिवस काढणार्‍या .
अन त्याच्याबाबतीत असं घडुनही दाबुन ठेवतात मनात.
आणि मी तक्रारीचा सुर आळवलाच तर त्या काढतात जगरहाटीची समजुत.सांगतात बाईपणाच्या गोष्टी , काहीजणी तर वेड्यात काढतात " अगं खाशील काय नोकरी सोडावी लागेल तुलाच , आगीतुन फुफ़ाट्यात पडण्यापेक्षा हेच बरं म्हणुन दिवस काढ नाहीतर रस्त्यावर येशील.तसही तुझ्या जाण्याने तुझंच नुकसान होइल यांच्यावर काडीमात्र फरक पडणार नाही."
मग मात्र माझ मन मलाच खातं "अशा कशा ह्या बायका मला पाठिंबा देण्याऐवजी भलत्याच गोष्टी करत आहेत.
कधीकधी वाटत या माझ्यापेक्षा सोशिक आहेत किंवा निर्ढावल्या आहेत . . . . . .की सामील आहेत ह्या सिस्टीमला ज्यांना फक्त पैशाचीच पडलेली असते.

जाऊदे जास्त विचार नको करायला एव्हाना सायंकाळ झालेली असते.चहा येतो.तो चहावालाही माझ्याच डेस्कजवळ जास्त रेंगाळतो.अक्षरशः मस्तकाची शीर
उठते त्याला झापण्याची तीव्र ईच्छा होते पण सावरते कारण थोड्यांचं वेळात घरी जायचे असते.जाताना किरकिर नको म्हणुन शांत राहते.
एकदांच काम संपवुन बॉसला बाय करायला जावे तर त्याच्या केबिनमधे आधीचं रेलचेल असते ते बाहेर येइपर्यंत थांबावेच लागणार.एकदाचे सगळे बाहेर येतात अन बॉस माझ्याकडे भस्म्या झाल्यासारखा पहात असतो.त्याच्या
दिवसभराच्या कामाचा तपशील मला देत राहतो विनाकारण ज्याचा माझ्याशी काहीच संबंध नसतो.
त्याचा फक्त एकच उद्देश असतो मला ताटकळत ठेवुन न्याहाळण्याचा .तरीही मी विषय संपवत बाहेर पडणारच असते तोवर तो विचारतो उद्या नवरात्रीचा पाचवा दिवस मग उद्या साडीचा रंग कोणता?मला त्या प्रश्नाने शिसारी आली.
पण त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन मी तशीच बाय करुन बाहेर पडते.कारण मुलं घरी वाट पाहत असतील त्यांनी काही खाल्लं असेल की नाही या विवंचनेत असते तोवर अॉफिस बाहेर येऊन उभी बसची वाट पाहत राहते तर तिथंसुद्धा गर्दी असतेच.माझ्यासारख्यांच अनेक असतात.पण मीच तोंड बांधुनच जास्त कावरी बावरी असते.कुणीतरी पाहतय या भितीनेच आकुंचन पावत असते.इतक्यातच बस येते सगळेजण एकदम बसमधे शिरण्याचा प्रयत्न करतात मीपण त्यांच प्रयत्नात असते.अचानक मी वर चढत असताना कुणीतरी कमरेला जोराचा चिमटा काढला.मी विजेच्या वेगाने मागे पाहते तर ती व्यक्ती राहत्या घरासमोरचीच असते.त्यांनी मला स्कार्फमुळेओळखले किंवा नाही माहित नव्हतं पण त्यांचा हेतु मला कळाला .तळपायाची आग मस्तकात गेली पण आरडाओरडा करुन उपयोग नव्हता.तिकीट काढलं बसायला जागाच नव्हती.गरम डोक्यानेच घरात शिरले मला पाहताच पिल्लं बिलगली.त्यांच्यातुन सोडवणुक कशीबशी करुन फ्रेश झाले.मनात विचारांनी थैमान घातले होते.नवरा आला त्याला काय सांगणार.तो बिचारा चहा पिताच मुलांच्यात रमला.
पुढचे दोन दिवस कुढतच गेले.घरी जाताना ती व्यक्ति अचानकच समोर आली अन् सॉरी म्हणुन डोळा मिचकावुन निघुन गेली.आता मात्र हद्दच झाली म्हणजे हे जाणुन बुजुन होतं तर.काहीच प्रतिक्रिया न देता निघुन गेले.
रविवारी सुट्टिच्या दिवशी नवरा घरात असताना व मुले बाहेर असताना त्याला चहाला बोलावले.नवर्‍याकडे पाहताच तो नरमला पण तसे न दाखवताच तो गप्पा मारु लागला.मी चहा दिला तर लोचट स्पर्श केलाच.चहाचा कप पिल्यानंतर न्यायला आले तर कप पुढ करणार तोच एक दांडक्याचा दणका हातावर पडतो..नवर्‍यास समजेनासं होतं. . . दणके तर पडतच असतात तो लोचट ओरडत होता का मारताय वगैरे. . . .दरवाजा बंद असतो . . बाहेर गर्दी जमते.शेवटी नवराच हातातील दांडके काढुन घेतो.तरी ती लाथा घालतच असते.घडलेला प्रकार सांगते.झाली ती शिक्षा पुरे म्हणुन नवरा थांब म्हणतो.कसाबसा तो दरवाजा उघडुन बाहेर पळत सुटतो.
विषय कर्णोपकर्णी होतो.
ती विचार करुन निश्चिंत होते .कुठुन आलं बळ हे.कसं शक्य झालं हे.संकट आपल्यावर आल्याशिवाय त्याची तीव्रता कळत नाही हेच खरं.दुसर्‍याच दिवशी ती न स्कार्फ बांधता अॉफिसला जाते. तिच्या वावरण्यात असते एक वेगळीच चमक .. . .

सुविकोळेकर

Rate & Review

शारदा जाधव
Ram Rode

Ram Rode 11 months ago

Vaishali C Thakur

Vaishali C Thakur 11 months ago

Varsha Daphal

Varsha Daphal 11 months ago

वास्तववादी

suhas v kolekar सुविकोळेकर
Share