memorial day in Marathi Short Stories by Pradeep Dhayalkar books and stories PDF | स्मृतीदिन

स्मृतीदिन

आज मी एका गडबडीत आहे, कारण माझा आज वाढदिवस आहे, मी कामावरून आज थोडं लवकरच आलोय. रोज ती मला CST वर भेटते ना आणि मग आम्ही तेथुन मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो.
ती एक अकांउटंट असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी मॅकेनिकल इंजिनियर असल्याने मी ही याच वेळेत रीकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो….

तेव्हापासुन आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी CST वर पोहोचलोय, रेल्वे अशी समोर येऊन थांबली, आज तिला प्रपोज करायचं हे आधीच ठरवलं होतं मी, रेल्वेतुन उतरताना मी तिला पाहीलं आज तिला पाहताच जीव खालवर होत होता भीतीने, तिने माझ्यासाठी एक फुलांचा गुच्छा आणला होता, ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छा देत म्हणाली..!
मी तिला म्हणालो, थँक्स ती म्हणाली अरे थँक्स कसलं आलं त्यात, आपण कॉलेज फ्रेंडस आहोत ना, मग असं थँक्स म्हणायचं नाही हं..
मी : हो. मला तुला काही विचाराचंय.

ती : हो मग विचार ना…
मी : पण मला पहिले तु वचन दे की काही झालं तरी तु माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तु जशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील.
ती : अरे आज तु असं का बोलतोयस…. मी ते कळेल तुला पण पहिले मला वचन दे…..
ती : बरं दिलं वचन.. मी काही झालं तरी भेटत राहीन तुला मी : ठीक आहे, हा गुच्छा तुझ्या हातात घर, मी गुच्छा तिच्या हातात दिला आणि मी तिच्यासाठी आणलेला एक गुलाब बाहेर काढला आणि तो दोन्ही हातात धरून मी पुढे केला आणि म्हणालो, तु मला कॉलेजमध्ये असल्यापासुनच आवडायचीस, पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगु शकलो पण आता सांगतोय, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, तु माझं प्रेम स्वीकारशील का ?

त्यानंतर एक अलगद हात माझ्या खांद्यावर येऊन पडला, आणि सचिन हे फुल घेऊन तु इथे काय करतोयस…? माझा 3rd year मधला एक क्लासमेट समीर तिथे आला होता, कदाचित तो खुप वेळ आमच्याकडे बघत असावा, अरे मी तर इथे हिला…. ( मी जिकडे बघत होतो तिथे कोणीही नव्हतं) अरे इथेच होती ती कुठे गेली. माहित नाही रे.. तो म्हणाला OK ठीक आहे. शांत हो बस इथे…
मी: का..?तो: सांगितलं ना एकदा मी बस म्हणुन आलोच मी,, (तो थोडा वेळ कुठेतरी गेला, माझी नजर तिलाच शोधत होती, ती कुठे दिसत नव्हती तो नंतर तिथे आला आणि मला चल म्हणाला मी काहीही न विचारता त्याच्या मागे गेलो, त्याने मला CST च्या एका कोपऱ्याला नेलं…
तो म्हणाला हे समोर जे लिहीलंय ते एकदा वाच, तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरीकांची लिस्ट होती, आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं ते वाचुन माझे डोळे पाणावले, मी आत्ताच जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं, यावर माझा विश्वासच बसत नव्हता, मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवुन रडु लागलो त्याने मला सावरलं आणि तो बोलु लागला. मी एक सायक्याट्रिक आहे सचिन, आणि मघाशी तुझे ते एकटेच असे हातवारे करणं बघुन मला तु मनोरोगी असल्याचा संशय आला. म्हणुनच तर तुला मी तिथे बसवुन, इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली, त्यांनी मला सांगितलं कि तो वेडा आहे, आणि रोज इथे येत असतो..
त्या बाजुच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं कि तीन वर्षापूर्वी तु जेव्हा त्या मुलीला फुल देत होतास, तेव्हा अचानक एका मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटुन, भिंतीत घुसली, त्यातुन रक्ताच्या एका थेंबाचा ओघळ येत होता त्या भिंतीवरुन कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटुन न जाता त्या मुलीच्या हृदयातुन आरपार गेली होती, तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता, दहशतवाद्यांनी CST वर केलेल्या हल्यात तुझ्या समोर, तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले.. याचा तुला मोठा धक्का बसला, आणि तेव्हापासुनच तुला वाटतंय की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असंच तुला वाटतंय…..

समीरने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो. जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो, समीर तिथे आला आणि त्याने मला बेड टी देऊन morning विष केलं आणि तो म्हणाला आजपासुन तु वर्षभर इथेच राहुन माझी ट्रिटमेंट घेशील, पुर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथुन जाऊ देणार नाही मित्रा.. मी होकारार्थी मान हलवली, कारण मला त्यानं सांगितलं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातुन बरं करू शकतो….
आज एका वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे. तेच गुलाबाचं फुल घेऊन. नाही तसं काही नाहीये मी पुर्ण बरा झालोय.. मला माहिती आहे ती आज येणार नाही. आज तिचा स्मृतीदिन आहे, हे फुल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणलंय एक आठवण म्हणुन...!

- प्रदीप धयाळकर✍️✍️


Share