Dev jaga aahe - 3 - last part books and stories free download online pdf in Marathi

देव जागा आहे... - 3 - अंतिम भाग

भाग ३

सुजल च लक्ष श्रेया कडे गेलं तस्स तो तिच्या जवळ गेला व प्रेमाने तिला शांत करत त्याने तो बॉल तिच्या हातातून घेतला.

" श्रेया हा बॉल विकणारा मुलगा मला काय म्हणाला होता माहित आहे का ?" सुजल ने थोड हसत श्रेया ला विचारल.

" सुजल आणला तू आहेस तुला माहित असणार मला कस माहित असेल ?" श्रेया गाल फुगवत म्हणाली.

" मी त्याला म्हणालो अरे माझ्या घरी कोणी छोट नाही या बॉल सोबत खेळणार तर तो म्हणाला नसेल कोणी छोट तर येईल ना.. खरचं श्रेया त्याचं बोलणं खर ठरलं..आता आपल्या ही घरी छोटा पाहुणा येणार " सुजल खुश होऊन विचारात हरवत बोलला.

" खरचं त्या छोट्या मुला ला तू मदत केली आणि त्याच्या ओठावरचे शब्द खरे ठरले सुजल..आपल्या चांगल्या कर्माच फळ आपल्याला देव नक्की देतो.." श्रेया ही देवाला हात जोडत बोलली.

दोघे ही खुशीत बॉल घेऊन हॉल मध्ये येऊन आई बाबा न ची वाट पाहत होते.

" काय आता बॉल बॉल खेळणार आहे का दोघे मिळून ?"सुजल च्य बाबा नी आत येत हसत विचारलं.

आई मात्र गप्प च येत होती.बहुदा थोडी थकली होती.

" खेळणार तर आहे पणं आम्ही दोघे नाही...त्या साठी कोणी तरी खास येणार आहे बाबा " सुजल आई कडे पाहून डोळे मिचकावत पुन्हा बाबा न कडे पाहत बोलला.

" म्हणजे ?" बाबा नी गोंधळून विचारल.

" म्हणजे बाबा..तुम्ही आजी आजोबा होणार आहात.. श्रेया प्रेग्नेंट आहे..." सुजल खुशीत ओरडला.

" काय खरचं? म्हणजे डॉक्टर बोलले का ?" आई ने डोळे मोठे करत खुश होऊन विचारल.आई चा थकवा तर कुठल्या कुठे पळून गेला होता.

" हो...हो आई..आम्ही डॉक्टर कडे जाऊन चेक अप करून कन्फर्म ही केलं " सुजल आई जवळ येत आई चे हात हातात घेत बोलला.

" अग बाई ! इतकी मोठी आनंदाची बातमी अशी सांगतो आहेस? अरे मिठाई वगेरे तर घेऊन यायची ना ?" आई खुश होऊन हसत बोलली.

" आई आणली आहे थांबा मी घेऊन येते.." श्रेया हसत किचन मध्ये जात बोलली.

श्रेया ने पेढे आणून आईना दिला तस्स त्यांनी तो श्रेया ला च खाऊ घातला.

" श्रेया बेटा मला माफ कर..खूप बोलले ना मी तुला ? नातवंडं पाहायची खूप घाई झाली होती ना म्हणून बोलून गेले " आई हात जोडत श्रेया ला म्हणाल्या.

" आई माफी मागू नका...माझं ही चुकत होत मी ही वाद घातले च ना कधी कधी ?आता झालं गेलं विसरून पुढचा विचार करू " श्रेया अर्धा पेढा आईना भरवत बोलली.

दोघींनी एक मेकिं ना घट्ट मिठी मारली आणि सुजल ने मात्र मोकळा श्वास घेतला चला आता तरी या दोघी भांडणार नाहीत.

एक आठवड्यानंतर परत सिग्नल ला गाडी थांबल्या नंतर सुजल ला त्या मुला ची आठवण झाली.त्याने गाडी थोडी बाजूला थांबवली व त्या दिवशी रस्त्याच्या कडेला जिथे ती छोटी मुलगी बसली होती त्या दिशेने चालत गेला. रस्त्याच्या पलीकडे थोड चालून गेल्या नंतर बऱ्याच छोट्या छोट्या तुटक्या फुटक्या झोपड्या दिसत होत्या.त्याच्या बाहेर बरीच छोटी मुलं अर्ध नग्न अवस्थेत बसली होती.

सुजल ने थोड फार लक्ष देऊन पाहिलं तर बरीच मुल अशी होती ज्यांना आई वडील दोन्ही नव्हते.थोडा वेळ पाहून सुजल तिथून पुन्हा गाडी कडे आला.ते सर्व दृश्य पाहून सुजल मात्र अस्वस्थ झाला होता.

घरी येऊ पर्यंत तो त्या मुलान बद्दल विचार करत होता.त्याने घरी आल्या आल्या आपल्या लॅपटॉप वर काही एन जी ओ ची माहीत घेतली व त्या एन जी ओ शी संपर्क करून त्यांना त्या मुलांन बद्दल कळवले.त्या एन जी ओ नी ही त्या मुलांची चौकशी करून त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसात च एन जी ओ मधील काही लोकांनी त्या झोपड पट्टी ला भेट दिली व तिथल्या अनाथ व गरजू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या भावी आयुष्याची जबाबदारी उचलली.

सुजल ची एक छोटी शी मदत बऱ्याच जणांचे आयुष्य बदलून गेली.

 

समाप्त