RIMZIM DHUN - 1 books and stories free download online pdf in Marathi

रिमझिम धून - १

'एक प्रख्यात एन्काउंटर स्क्वाड हेड अर्जुन दीक्षित आणि त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीची म्हणजे डॉक्टर जुई यांची प्रेमकथा इथे वाचकांच्या भेटीला येत आहे. त्याबरोबरच क्राइम आणि सस्पेन्स थ्रिल यात आहे.
अर्जून आणि जुई आता त्यांचे मार्ग वेगळे आहेत, त्यांच्या दिशा बदलल्या आहेत. आज अचानक ते आमने सामने येत आहेत. तर ओळखतील का एकमेकांना? काय आहे त्यांची आपबिती?  जाणून घेण्यासाठी  वाचत राहा, माझी नवीन कथा जी एक क्राइम स्टोरी आणि  प्रेमाचा सस्पेन्स थ्रिलर आहे.  

रिमझिम धून...

***************

रात्री १२ ची वेळ नैनिताल रेल्वे स्टेशन अगदी सुन्न होते. रिक्षाला पैसे देऊन ती खाली उतरली. फाटक क्रॉस करून तिने प्लॅटफॉर्मवर विचारपूस केली. ती प्लॅटफॉर्मवर फिरत असताना अनेकांच्या नजरा तिच्याकडे रोखलेल्या होत्या. का ते तिला कळेना. पण लवकरच तिच्या लक्षात आलं कि इथे सगळे पुरुष प्रवासी आहेत. स्त्रिया कोण दिसत नाहीत. आपल्याला बघून जो तो मान उंचवून आपलं निरीक्षण करतोय, हे समजताच तिने बॅगमधील एक स्टोल काढून तो केसावरुन अगदी तोंडापर्यंत गुंडाळला. पण तोपर्यंत तेथील आजूबाजूच्या बऱ्याच पुरुषांनी तिला पाहिलेलं होते. त्यांच्या वखवखलेल्या डोळ्यात तिला बघताच क्षणी चमक आली होती. 

'नैनिताल से दिल्ली जानेवाली ट्रेन २ घंटे लेट हैं... यात्री कृपया ध्यान दे. ये गाडी अब रातको दो बजके दस मिनटं पे आयेगी. आपकी असुविधा केलीये खेद हैं.'

सूचना संपली आणि तिने डोक्याला हात लावला. 'गाडी एवढ्या लेट येणार तर? मी एकटीच इथे कशी थांबू ?'आजूबाजूचे तिच्याकडे चोरट्या नजरेने बघणारे लोक आणि त्यांच्या घाणेरड्या नजरा तिला असह्य होत होत्या. 'कुठे फसलो यार आपण? आता करायचं तरी काय?'या विचाराने तीच डोकं भणभणत होत. काय दुर्बुद्धी सुचली आणि या मूर्ख लोकांच्या बरोबर इकडे आले. असं तिला झालं होता. जवळपास कोणीही नातेवाइक किंवा काही ओळख नाही. त्यामुळे कुठे आजची रात्र काढणे देखील शक्य नाही. त्यामुळे ट्रेनची वाट बघणे हा एकमेव पर्याय तिच्याजवळ होता.

एक अगदीच गुंड असावा असा माणूस तिच्या बाजूने अगदी तिला घासून पुढे गेला. अंगावरचे मळकट कपडे आणि हातातील अर्धवट सिगारेट यामुळे तिला त्याची किळस आली. आजून काही अंतरावर बसलेला चार एक लोकांचा घोळका अर्ध्यातासापासून तिच्यावर नजर ठेवून होता. तिची प्रत्येक कृती ते लोक नोटीस करत होते. हे तिला जाणवलं होत. पण तिला काहीही माहित नसल्याच्या अविर्भावात ती आहे त्या जागी उभी राहून ट्रेनची वाट बघत होती. तीन तास एक जागी, ते ही स्टेशनवर उभ राहून तिचे पाय खूप दुखायला लागले. बसावं म्हंटल तर कोणी ना कोणी पुरुष येऊन तिच्या बाजूला बसत असे, कधी तिचे तर कधी तिच्या पर्सचे निरीक्षण सुरु करत असत. हे सगळं तिला अगदी असह्य झालं होत. एवढ्या स्टेशनवर एकही स्त्री किंवा सुशिक्षित वाटावी अशी व्यक्ती नव्हती. त्यात मध्यरात्र होती. आणि बाहेर चाललेली पावसाची रिपरिप. यामुळे तिला अगदी घाबरल्यासारखं झालं होत. आज खरंच आपल्यासाठी वाईट दिवस आहे, खूपच वाईट दिवस. आणि माहित नाही उद्याच्या दिवस बघायला मिळेल कि नाही. याची तिला शाश्वती राहिली नाही. तिला आता या सगळ्याची किळस येत होती, आणि आपली स्वतःची किव वाटत होती. 

ती आल्यापासून कित्तीतरी ट्रेन्स येऊन गेल्या होत्या. पण हे आजूबाजूचे लोक आपल्या जागेवरून अजिबात उठलेले नव्हते. त्यावरून तिने ओळखले कि, हे लोक प्रवसी नसून, ते सध्या प्रवाश्याना लुटणारे गुंड आणि मवाली आहेत. नाहीतर एवढ्या रात्री स्टेशनवर असे घेळक्याने कोण बसणार? तिची भीती आता प्रचंड वाढू लागली. वेळ पुढे सरकत होती तश्या बाजूच्या त्या मवाली लोकांच्या हालचाली वाढू लागल्या. ती उभी त्या ठिकाणापासून तिच्या उजवीकडे चार-पाच लोक थांबले होते आणि डावीकडे जाऊन काही आपापसात वादावादी करत होते. ती त्याच्या मधोमध सापडली होती. मध्ये अंतर असले तरीही ते लोक आपल्याला पकडण्यासाठी काहीतरी प्लॅन करत आहेत हे तिने ओळखले.


'यात्री कृपया ध्यान दे, थोडी देर मी पाटणा जानेवाली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर ५ पे आनेवाले हैं.' अशी अनाउन्समेंट झाली आणि ती अजून घाबरली. म्हणजे याच प्लॅटफॉर्मवर आता बिहारला जाणारी एक ट्रेन येणार होती. त्यांनतर तिची ट्रेन तिथे येणार होती. पाच मिनिटात पाटणाला जाणाऱ्या ट्रेनचा आवाज आला. आजूबाजूला असणारे ते चार-चार गुंड जेव्हा तिच्या जवळ येऊ लागले तेव्हा तिला कळून चिकले कि हे बिहारी असणार आणि ते येणाऱ्या ट्रेनमध्ये आपल्याला भरून आपले अपहरण करणार आहेत. तिला काय करावे सुचेना. ती थोडं-थोडं करत मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागली. आणि तिने आपल्या मनात काहीतरी विचार पक्का केला. 

पाटणा ट्रेन येऊन पुढ्यात थांबली होती. ते आठ गुंड लोक तिला अगदी चिकटून उभे होते. आता ट्रेनमध्ये चढताना ते नक्कीच आपल्याला उचलणार हे तिला माहित होते. त्यातील दोघे-तिघे वरती ट्रेनमध्ये चढले आणि उरलेल्यांपैकी दोन तिच्या मागे उभे होते, तर एक तिच्या डावीकडे एक उजवीकडे असे तिला मध्ये अडकवून ते उभे होते. शेवटी त्यांच्यामध्ये ठरल्याप्रमाणे तिच्या हाताला धरून एकाने तिला उचलण्याच्या प्रयत्न केला. आणि मघापासून मनाशी ठरवल्या प्रमाणे तिने संधी साधली. विद्युत वेगाने आपली पर्स उघडून त्यातून बाहेर काढून ठेवलेले स्प्रे त्या गुंडांच्या समोर धरला. एका हातात एक स्प्रे आणि दुसऱ्या हाताने आपल्या तोंडावर रुमाल ठेवून तिने तो स्प्रे सरळ आजूबाजूला फवारला. ट्रेन सुरु झाली होती. तिने स्प्रे फवारल्या बरोबर तिच्या बाजूचे ते गुंड जागच्या जागी बेशुद्ध होऊन पडले होते.


*****


क्रमशः

आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. आजपासून दररोज एक भाग.