RIMZIM DHUN - 2 books and stories free download online pdf in Marathi

रिमझिम धून - २

'ती तिथून पाळण्याचा प्रयत्न करू लागली. पण ट्रेनमध्ये चढलेल्या काही गुंडांपैकी एकाने तिचा हात खेचला आणि तिला वरती ओढू लागला. ती हळूहळू चालणाऱ्या ट्रेनबरोबर फरफटू लागली. आता ट्रेन कोणत्याही क्षणी भरधाव वेगाने सुटली असती. तिने आपला हात सोडवण्याचा खूप केला पण त्यातील अजून एकाने तिला पकडले. आता ती ट्रेनला लागून फरपटत होती. संपलं सगळं, असं वाटून तिने आपले डोळे झाकून घेतले. एवढ्यात तिला आतून कोणाचा तरी जोराचा धक्का लागला. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली, पुढे काय झाले हे तिला काहीच समजले नाही. आणि ती धावणाऱ्या ट्रेनमधून खाली प्लॅटफॉर्म वर आदळली होती.'

''आई ग.'' एक भयंकर किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. आणि ती आपल्या पायाच्या गुडघ्याला घट्ट पकडून आक्रोश करू लागली. प्लॅटफॉर्मवर आपटून गुडघ्याला खूप मार लागला होता. तिला त्या वेदना असह्य झाल्या होता. हाताच्या कोपराला खरचटले होते. ते बघताना तिचे लक्ष तिच्या सफेद साडीकडे गेले. त्यावर रक्ताचे डाग लागलेले होते. सफेद साडी अगदी लाल झालेली तिने पहिले. पण आपल्याला एवढा रक्त येण्याइतपत काय लागल? ते तिला कळेना. ती कशीबशी लंगडत उठली तेव्हा तिच्या लक्षात आले कि, आपल्या बाजूला कोणीतरी विव्हळत पडलेले आहे. तोगुंड तर नाही ना? असा विचार तिच्या डोक्यात आला पण दुसऱ्याच क्षणी तीधावत त्या माणसा जवळ गेली. एक तरुण होता. कपड्यांवरून तो चांगल्या घरातील वाटत होता. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या लक्षात आले त्याच्या पोटात काहीतरी तीक्ष्ण वस्तू खुपसून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला असावा. कारण त्याच्या पोटातून रक्ताची धार लागली होती. त्याचा शर्ट आणि पॅन्ट दोन्हीही रक्ताने माखलेले होते. तिने सगळी शक्ती पणाला लावली आणि त्याला उचलून एका पिलरच्या आधाराने बसवले. त्याच्या खांद्याची बॅग काढून तिने चेक केलं. त्यामध्ये रेव्ले तिकीट होते. त्यावरून तिला एवढेचसमजले कि तो ट्रेनचा प्रवासी होता. बाकी विशेष काही सापडेल नाही. त्याची जखम बघून तिला तिच्या पायाचा विसर पडला.

त्याला तसेच ठेवून ती धावत जाऊन आपली बॅग घेऊन आली. बॅग काही अंतरावर पडलेली होती. नशिबाने ती त्या गुंडांच्या हाताला लागण्याआधीच ट्रेन सुरु झाली होती. बॅग उचलून तिने पाण्याची बॉटल काढून त्या तरुणाच्या तोंडावर थोडे पाणी शिंपडले. आणि त्याच्या तोंडाला पाण्याची बॉटल लावली. आज तो तिच्या अंगावर पडलाआणि त्या धक्क्याने तिचा हात त्या दोन गुंडांच्या हातून सुटला होता. नहितर तिच्यावर काय वेळ आली असती, तिला तिचेच माहित नव्हते. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने तिने त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याला खूपच लागलेले होते. कसेबसे डोळे उघडून त्याने तिच्याकडे मोबाइल मागितला. तिने त्याच्या खांद्याच्या सॅकमध्ये चेक केले एक मोबाइल होता. तो तिने त्याच्या हातात दिला. त्यावरून त्याने एक नंबर फिरवला. फक्त 'नैनिताल, प्लॅटफॉर्म ५, इमर्जन्सी.' एवढेच बोलून त्याने तो मोबाइल तिच्याकडे परत दिला.

'नैनिताल से दिल्ली जानेवाली ट्रेन आ रही हहा, यात्री कृपया ध्यान दे.'

अशी सूचना मिळताच ती गोंधळली. आता तिची ट्रेन येणार होती. आणि हा माणूस इथे मरणावस्थेत पडलेला होता. काय करावे तिला सुचेना.
''आप ठीक है ना? मेरी ट्रेन आ रही है, मुझे जाना होगा.'' म्हणत उठून तिने आपली बॉटल बॅगमध्ये भरली आणि पर्स खांद्याला लावून ती गाडीसाठी सज्ज झाली.

पॉssssssss,पॉssssssss

असा आवाज आला, ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली होती. ती दुविध मनःस्तिथीत होती. इथे हा माणूस असा जखमी अवस्थेत पडला होता, आणि ती ज्या ट्रेनची वाट बघत होती ती अखेर तिच्यासमोर आली होती. आज ती ट्रेन चुकवणे तिच्यासाठी शक्य नव्हते, कारण उद्या पुन्हा त्याच ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी तेवढे पैसे सुद्धा नव्हते तिच्याकडे. ''सॉरी. बट मुझे जाना पडेगा.'' म्हणत ती ट्रेनकडे निघाली. आणि त्याने मागून तिचा हात घट्ट पकडला होता.
''डोन्ट गो. यु आर नॉट सेफ.'' तो जखमी माणूस तिच्या हाताला धरून तिला थांबवत म्हणाला. ती नखशिखांत घाबरली. मघाचा प्रसंग आठवून तिच्या अंगावर शहारा आला. तिने आजूबाजूला पहिले, समोर ट्रेन थांबली असतानाही त्या सुमसान प्लॅटफॉर्म वर कोण चिटपाखरू किंवा काही प्रवासी नव्हता. होते ते फक्त ते दोघे आणि मागे काही अंतरावर ते गुंड अजूनही बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. रात्रीच्या अडीचच्या प्रहर होता. तिने पुन्हा मागे पहिले. तो जखमी तरुण तिच्याकडे बघत होता.

''व्हॉट डू यू मिन?''तिने त्याच्याकडे बघत विचारले. पण तो काही बोलणार एवढ्यात प्लॅटफॉर्म वरून चालत सफेद कपड्यातील दोन व्यक्ती येऊन त्यांच्या समोर उभ्या राहिल्या. एकाने त्या खाली पडलेल्या जखमी तरुणाला उचलले. दुसर्याने त्याची खांद्याची सॅक काढून घेतली होती.
''सर आपका खुन बहुत बेह गया हैं! आरामसे चलीये, और कुछ सामान हैं, तो दिजीय. हम लेते हैं!'' त्यापैकी एका व्यक्तीने त्या जखमी व्यक्तीला विचारले.

''ये मॅडम हमारे साथ मैं ही हैं, उनका बॅग ले लो.'' त्या जखमी व्यक्तीने त्या मुलीकडे बोट दाखवत सांगितले. तेव्हा तिच्या लक्षात आले की, या सगळ्या गडबडीत तिची ट्रेन निघून गेली आहे. सुटलेली ट्रेन बघून ती मटकन तीथेच श खाली बसली होती. ट्रेन तर निघून गेली होती. मागे काही अंतरावर बेशुद्ध होवून पडलेले ते चार गुंड केव्हाही शुद्धीवर आले असते. या विचाराने तिला अजून धडकी भरली. तिला मागे बघण्याचेही धाडस होईना. ती उठून त्या जखमी तरुणाच्या मागे चालू लागली.

******

आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या.