Wakadewad - A thriller - 4 books and stories free download online pdf in Marathi

वाकडेवड - एक रोमांच - 4

वाकडेवड - एक रोमांच

भाग ४

बघतो तर काय! विहिरीत एका नग्न मुलगीचा मृतदेह पडला होता. अक्षरशः अंगावर एक सुद्धा कपडा न्हवता. केस सगळे सोडलेले होते. तो मृतदेह विहीरीच्या कडेला पायरीवर पडला होता. पानी हालेल तसं तिचे केस सुद्धा हालत होते. ते दृश्य फार भयावह होते. तो नग्न देह पहायला कसंतरी वाटत होतं. इतक्यात कोणीतरी आपल्या खांद्यावरचा टॉवेल काढला आणि पायऱ्या उतरून तिच्या अंगावर टाकला. तरीदेखील तिचा पूर्ण देह झाकला गेला न्हवता. गुडघ्यापासून खाली आणि पूर्ण हात तसेच उघडे होते. पाय आणि हात मी निरखून पाहिले. हातात पायात कोणताही दागिना दिसला नाही. शिवाय, अंगाला एखादा खोंबारा लागल्यावर जसे हलके ओरबडे उठतात तसं काहीसं मला दिसलं.

सगळीकडे नुसता एकच गोंगाला चालू होता. प्रत्येकाच्या नजरा भय, आश्चर्य, दुख, वेदाना ओतत होत्या. जमलेल्या बायकांमद्धे तर भीतीचं वातावरण पसरलं होतं. सगळीकडे फक्त एवढेच शब्द ऐकायला येत होते, "काय झालं? कधी झालं? कुणाची पोर ती?" जो तो एकमेकाला प्रश्न विचारत होता. तेवढ्यात त्या मुलीची ओळख पटली. कोणीतरी म्हणाला, "माळावरच्या बाबसू दाची पोरगी हाय ती." लगेच त्याला कोणीतरी फोन लावला. १० मिनिटांत तो बायकोला घेऊन तिथं आला. ते सर्व दृश्य बघून नुसता आक्रोश चालू झाला तिथे. बघता बघता ५००-६०० माणसांचा जमाव झाला. त्या मुलीची आई आणि वडील डोकं धरून रडू लागले. कोणी धाडशी गडी खाली जाऊन तिच्या अंगावर चादर गुंडाळून वरती उचलून घेऊन आला. सगळ्यांच्या डोक्यात आता एकच प्रश्न चिन्ह घिरट्या घालू लागलं होतं. "नेमकं काय झालं?"

तेवढ्यात अरविंद माझ्या बाजूला येऊन उभारला. आम्ही एकमेकांकडे पहिलं. घडलेल्या प्रकाराबद्दल आमचे डोळेच सगळं बोलू पाहत होते. "लागीर, शेवंती, पारिजातक, पांढरा कुत्रा, शिरपा तात्याची विहीर, कुंपणापलीकडचं जंगल" या गोष्टींच काही देणंघेणं असेल का? की, आत्महत्या असेल? की, हत्या असेल? छे रे! आत्महत्या तर नाही वाटत मला. मी काही बोलू पाहणार तेवढ्यात अरविंदणे हाताचा इशारा करून मला न बोलण्यास सांगितलं.

त्या मुलीचं प्रेत तिच्या घरी नेलं. गावच्या पुढाऱ्याने पोलिसाला ही गोष्ट कळवली होती. पोलिस रुग्णवाहिका घेऊन हजर झाले. घटनेची सर्व जात पडताळ केली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यास नेला. लोकांचा जमाव तोवर बाबासू दा च्या घरा भोवती जमला होता. चार तासाने पोलीस प्रेत घेऊन आले व अंत्यविधिस परवानगी दिली. अंत्यविधी झाला, सगळे आपापल्या घरी परतले. दोन पोलीस चार जणांसोबत चर्चा करत उभा होते. कदाचित मिळालेल्या रिपोर्ट बद्दल बोलत असावेत. सगळीकडे चर्चाना उधान आलं.
"हे झालं असेल, ते झालं असेल. बावीस वर्षाची पोर. कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. तिच्या वडलाचं पण कोणाशी वैर नाही. तोपण सरळ मार्गी माणूस. एकूणच गुणी कुटुंबातली मुलगी." त्या मुलीला काही घराचा त्रास असेल म्हणून तिने आत्महत्या केली. हे तरी नाही पटायचं मला. जरी आत्महत्या समजली तरी ती नग्न अवस्थेत का आत्महत्या करेल? जरी नग्न अवस्थेत आत्महत्या केलीच समजा. तिचे कपडे तर आजूबाजूला सापडायला हवेत. बिनकपड्याची तिथं गेलीच कशी? आणि तिची हत्यातर कोण करेल कशाला? तिचे कपडे घरीच होते. रात्री घराला आतून आडना लावला होता. हत्या करणारा हत्यारा घरात न आवाज करता, तिचे कपडे काढून तिला नेईलच कसा? टीव्ही मध्ये असलं काही बघून बरेच तर्क वितर्क करायला माझं मन धावत होतं. प्रत्येकाच्या घरात आणि घुळप्यात एकच चर्चा चालू होती. जाता जाता माझ्या कानी शब्द पडले. शवविच्छेदनाचे रिपोर्ट आलेत "ती आत्महत्या न्हवती. खून होता! नुसता खून न्हवता! तिच्यावर जबरदस्ती करून खून केला होता. मृत्यू पाण्यात बुडून झाला होता. ही घटना रात्री एक ते दोन सुमारास झाली आहे."

माझ्या सर्व चंचल विचारांना थोडासा पूर्ण विराम मिळाला. पण दुसरे बरेच प्रश्न निर्माण झाले. तिच्यावर जबरदस्ती कोण करेल? तिचे कपडे तर घरात आहेत. दाराला तर आतून आडना लावला होता. मग ती विहिरीकडे नग्न आली कशी? बलात्काराच्या यातना सहन न झाल्याने तिने विहिरीत उडीतर टाकली नसेल? त्या नराधमानं कोणाला कळू नये असं कृत्य केलंच कसं? त्या कुत्र्यांनं तर पंजा मारून विहिरीत पाडलं नसेल? पण तिच्या शरीरावर कोणत्याच प्राण्याने केलेल्या खुणेचे व्रण न्हवते. हे कसलं आहे गूढ!

पोलीस तपासाला लागले. सगळ्या संबंधीत लोकांची चौकशी झाली. पण निकाल काही केल्यास लागेना. ज्या रात्री हे घडलं त्यावेळेस त्या पारिजातकाचा सडा भरगच्च पडलाय की नाही हे मी लांबूनच बघून आलो. खरोखरच सडा खूप पडलेला होता. ते लागीर व्हायचेपण बंद झालेलं. या ७०-८० वर्षात होत असलेलं लागीर का बंद झालं असावं? या सगळ्याचा उलगडा कसा होणार हे माहिती नाही. कोणतंही गूढ जास्त काळ लपून रहात नाही म्हणतात. केंव्हातरी उलगडा हा व्हायचाच आहे.

अजून एक आठवडा निघून गेला. झालेल्या प्रकारामुळे जट्टूबाईच्या दर्शनाला येणारे लोक कमी झाले होते. त्या मुलीच्या हत्तेचा निष्कर्ष काही हाती लागत न्हवता. आठवडा भर त्या विहिरीकडे कोणीच फिरकलं नाही. अचानक एक दिवस सकाळच्याच वेळेला पुन्हा गावात गोंधळ चालू होता. काही लोकं अजून तशीच अंथरुणात निपचिप पडली असणार. प्रत्येकाचे सकाळ सकाळचे ठरलेलं रुटीन चालू होतं. मीपण दात घासत खोलीच्या समोरच्या कट्ट्यावर बसलो होतो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे बघत. तसा मी ६ च्या दरम्यान उठत होतो. माझ्या खोलीसमोर एक महादेव मंदीर होतं. छोटंच पण दगडाचं, अति प्राचीन वाटत होतं. पुजारी त्या शिवलिंगाची पूजा करत असलेला दिसला मला. त्या मंदिरासमोर जमाव जमायला लागला. एवढ्या सकाळी एवढी का लोकं जमत आहेत बरं! पहावं म्हणून लगबघीने चुळ भरून गेलो. जाता जाता अरविंद ला हाक मारली. " अरविंद उठ बाहेर कायतर चाललंय, लोकं फार जमा झाली आहेत. महादेव मंदीरसमोर!"

तिथं गेल्यावर अजून एक अचंबित करणारी गोष्ट माझ्या कानी पडली.

"त्या व्हिरीत अजून एक बाई मरून पडल्या!"

पुजारीपण पूजा अर्धवट सोडून काय चाललंय बघायला आला. पंचवीसभर माणसं विहिरीकडे बघण्यासाठी चालली. मीपण त्यांच्यासोबत गेलो. मागोमाग अरविंदपण आला. काय गौडबंगाल आहे हे आमच्या थोडंफार लक्षात येऊ लागलं होतं. बातमी वाऱ्यासरशी आधीच प्रत्येक घरात पोहचली होती. बाबासू दाच्या मुलगी सापडली तेंव्हा कसं दृश्य झालं होतं. तशीच परत जत्रा फुटलेली.

त्या मृतदेहाकडे बघून लक्षात आलं की हा अगदी पहिल्यासारखाच प्रकार घडला आहे. पूर्ण नग्न स्त्री पाण्यात मरून पडलेली. अंगात एक कपडा, दागिणा काहीच नाही. केस विस्कटलेले, डोळे उघडेच. पस्तीशीतली बाई होती. तिची ओळख पटलेली. तिचं लग्न झालेलं होतं. दिसायला एकदम देखणी स्त्री. तिचा नवरा रात्रपाळीला कामावर गेला होता त्याला कोणी फोन लावून कळवलं न्हवतं कारण त्याची यायची वेळ झालीच होती. बायको गेल्याच्या दुःखाने वाटेत येताना त्याचा आणि अपघात व्हायला नको म्हणून त्याला फोन केला न्हवता.

थोड्या वेळाने पोलीस आले. त्यांच्या पद्धतीने त्यांनी सर्व पहाणी केली. मागच्या प्रकाराप्रमाणेच या पण घटनेची तार अगदी तशीच जुळली. हीपण हत्त्या होती. त्या स्त्रीवर जबरदस्ती करून केलेली हत्त्या. आता मात्र लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं. एक सारखी हत्त्या, खुणी इथंच कुठंतर असणार! आपल्यातच असला तर. सगळ्या बायका भिऊन गेल्या. शेतात जाणाऱ्या बायका बंदच झाल्या. काही गावातल्या पोरांनी समूह तयार केले. रात्री विहिरी शेजारी घस्त घालण्यास सुरुवात केली. परत १०-१२ दिवस निघून गेले. पण कसलाच प्रकार घडला नाही. लागीरपण नाही!

अशाच एका रात्री देसाई मामा शेताला पाणी पाजून घरी परतत होते. रात्री १२ ते ३ लाईट होती. एक वाजता लाईट गेली. अर्धा तास लाईटीची वाट बघून, सरीचा पाट लावून मामा परत येत होते. शेत सोडून जरा पुढं आल्यावर. अंधुक-अंधुक पारिजातक दिसायला लागलं. पावणे दोन वाजले होते. वयाने जरा त्यांची नजर कमी झाली होती. त्या झाडावर पाहिल्यावर त्यांना झाडावर कसली तरी हालचाल जाणवत होती. त्यांचे पाय पुढं सरकतील तसं ती हालचाल कमी कमी होऊ लागली. झाडापासून तीस चाळीस मीटर वर आल्यावर त्यांना काय प्रकार चाललाय लक्षात आलं. मग ते पळत त्या झाडाकडे धावले. त्या झाडावर एक मनुष्याकृती आकृती लटकत होती!

क्रमश:

(नेमकी काय असेल ती आकृती? जाणून घ्या पुढच्या भागात )

[©®भूषण पाटील. All rights reserved.]