Indraja - 7 books and stories free download online pdf in Marathi

इंद्रजा - 7

भाग-७


सकाळी सगळे तयार होऊन खाली नाश्ता करायला जमा झाले....


इंद्रजीत- अरे वा सगळे आले तर... गुड मॉर्निंग!!
बर मी ओळख करून देतो...हे आहेत सतीश काका आणि गंगा आमच्या फार्म हाऊस ची काळजी हेच घेतात... आणि आ गंगा ला बोलता येत नाही सो जरा समजून घ्या... ओके आणि काका गंगा हे माझे मित्र आहेत...अभि आणि अनु ला तुम्ही ओळखताच.... ही निलांबरी, अजिंक्य आणि ही जिजा...? अरे जिजा????


अभिजीत- भाऊ ती झोपले अजून...


इंद्रजीत- अरे देवा उठली नाहीच का ती?? निलू तिला उठवली नाहीस?


निलांबरी- अरे इंद्रा मी गेले होते पण ती कुंभकरण उठेल तर ना... उठायला मागत नव्हती....बघा आता दुसरं कुणीतरी ट्राय करा....


अभिजीत- आहे मी...........


इंद्रजीत- हम्म मी आलोच तिला उठवून...काका तुम्ही नाश्ता लावा... ठीके...


अजिंक्य- व्हय व्हय...


अनुसया- हो... चला काका गंगा मी तुमची हेल्प करते...


गंगा- आ आ


सतीश काका - हो बाळा...


अभिजीत- नक्की चाललंय काय भाऊच,जेव्हा पासून यांची ओळख झाले, मैत्री झाले दोघ ही खूप बदललेत..पण यांच्या अशा वागण्याने मला खूप......... 😔 (मनात बोलताना...)


इंद्रजीत- जिजा... जिजा..... मी आत येऊ का???
(नॉक करत)


मॅडम काही उत्तर देत नव्हत्या....मग इंद्रा आत गेला..समोर जिजा मस्त गाढ झोपेत होती...इंद्रा तिला उठवायला आवाज देत होता तिचा हात हालवत होता...पण ती उठायला मागत नव्हती..झोपेतच जिजाने इंद्राचा हात पकडला आणि त्याला जवळ ओढलं....जिजाच्या इतक्या जवळ तो पहिल्यांदा गेला होता...त्यावेळी एक वेगळीच फिलिंग त्याला आली...

त्याच हृदय जस तिला पाहून धडधड करायच तसेच धडधडत होता....तो तिच्या निरागस चेहऱ्याला पाहत होता....


इंद्रजीत- किती सुंदर आहे ही!!😍💘


तो सहज बोलून गेला.....इंद्राला कळत नव्हतं पण तो जिजावर खूप प्रेम करायला लागला होता.....इतका कि जिजा त्याचा जीव बनली होती...तो तिला एकटक पाहत होता.....


Hey Yaa!
I got to tell you how i feel
Hey ya!!
o baby you're the only one for me
तुम्हे कैसे मे बताऊं क्या मे पा गया हू
तुम जो मेरे साथ हो
मुझको दुनिया मिल गयी है
जिंदगी बदल गयी है
तुम जो मेरे साथ हो ओ

I wanna get Closer to you
I need to be closer to you

Heya Yaa!!
Hey yaa!!
Heyyy yaaaaa!!


इंद्राच्या गरम श्वासामुळे जिजाला जाग आली....तिने डोळे उघडले तेव्हा इंद्राला इतक्या जवळ पाहून ती घाबरली आणि पटकन त्याला दूर केला.....


जिजा- ईईईईईई तू? माझ्या इतक्या जवळ काय करत होतंस..?


इंद्रजीत- मी ना.. फुगडी खेळणार होतो पण तू झोपली होतीस ना...तुझ्या उठण्याची वाट पाहत होतो...


जिजा- अय्या फुगडी इकडे? कस काय? 🙄


इंद्रजीत- अग मूर्ख लगेच विश्वास कसा ठेवतेस ग? तुला उठवायला आलो होतो तूच मला जवळ ओढलंस...


जिजा- ओह्ह सॉरी हू...


इंद्रजित- आवर आता...वाट पाहत आहेत सगळे...


जिजा- अम्म आले जास्त नको बोलूस


इंद्रजीत - काय बोलीस का??? 🤨


जिजा- आ आ नाही कुठे काय? 😄 (थोडी घाबरत )


इंद्रजीत- हम्म
काय होतंय मला...? 😍
(मनात)


काही वेळाने जिजा तयार होऊन खाली आली....सगळे नाश्ता करत होते...इंद्राने तिला पाहिलं आणि त्याला जोरात ठसका लागला...तोंडातला पाणी खाली पडलं...नेहमी साधी सिंपलं राहणारी जिजा आज मॉर्डन बनून आलेली...शॉर्ट वन पीस....त्यावर केस मोकळी सोडलेली...हलकसा मेकअप केला होता.... बस्स्स तिकडेच सगळे खल्लास...!!


इंद्रजीत- आज्या ही सावित्री आज लैला कशी झाली राव?


अजिंक्य- कस हाय ना इंद्रा आज काल च्या पोरींना असच कपडे आवडत्यात...मॉर्डन जमाना you know...आणि निलू,तुमची अनु ते पण तसेच कापडं घालून आलेत कि...


इंद्रजीत- अरे हो अनुला मी आधीपासून असं पाहतोय पण जिजाला आज पाहिलं 😍


अजिंक्य- हम्म तसेच आम्ही बी तिला रोज तस पाहतोय..तुम्ही आज पाहिलं.... 😬


इंद्रजीत- हम्म मला वाटायचं जिजाला नॉर्मली ड्रेस आणि फक्त जीन्सच आवडते पण असे कपडे आवडतात हे नव्हतं माहिती...


अजिंक्य- अरे इंद्रा या पोरी का नाय लई शातीर असत्यात गोड बोलून काटा काढत्यात मुला.. बचके रेहना तू


इंद्रजीत- काय बोलतो...


अभिजीत- भाऊ... आज मी ड्राइव्ह करतो कार....


इंद्रजीत- ओके...
अनु चल...



अनुसया- हो चल...


इंद्रजीत- छान दिसतेस ग अनु..


अनुसया- काय पण हा...


इंद्रजीत - अरे हो तर...


जिजा- मला नाही विचारलं... 🙄


निलांबरी- काय ग??


जिजा- काय नाय...


जिजा मागे बसली तिला वाटलं कि इंद्रा मागे येऊन बसेल....पण अनुशी बोलण्याच्या नादात तो विसरलाच आणि तिच्यासोबत पूजे बसला....जिजा आता मात्र खूप जेलीस झालेली....ती रागातच त्यांना पाहत होती....


अलिबाग मधील प्रत्येक जागा ते पाहत होते....मग सगळे कुलाबा किल्ल्यावर गेले.....इंद्राला माहित असलेली माहिती तो सगळ्यांना सांगत होता...जिजा किल्ल्यावर हात फिरवत होती अगदी निरखून पाहत होती....आणि फोटोज काढत होती....

किल्ला खूप मोठा आणि सुंदर होता....अगदी डोळ्यात मावणार नाही असा....वातावरण ही खूप प्रसन्न होते...महाराजांच अस्तित्व जाणवेल असा....


इंद्रजीत- गाईज..ही आहे गडावरील पद्मावती देवी...असं म्हणतात त्याकाळी देवीला खूप पुजल जायचं...मंदिर जस होते तसेच आहे अजूनही....


निलांबरी- खूप छान आहे... 😍


जिजा- हो ना...


इंद्रजीत- आणि ही दगड पाहिलीत त्यावेळी लढाई मध्ये फुटलेली तशीच्या तशी आहेत अगदी मजबूत...


अजिंक्य- मायला आपल्याच्यांनी हलायची नाहीत ही...


इंद्रजीत- हो नाहीच हलनार..अरे छेड पण नको काढूस यांची पायावर पडली तर कायमचा लंगडा होशील 😂


अजिंक्य - आयो 🙄


इंद्रजीत- आणि तोफ तुम्हाला माहित आहेच...त्यावेळी लढाई मध्ये वापरला जायचा...


जिजा- वाव...


अनुसया- that's nice❤️


इंद्रजीत- हो


अनुसया- ही दीपमाळ खूप जुनी आहे,असं म्हणतात ही पेटवली कि जास्तीत जास्त दुरवर प्रकाश पडतो..शिवजयंती, राज्याभिषेक अशा विशेष दिनी ही माळ पेटवली जाते...


अजिंक्य- लई भारी हाय राव असं आता बघाय मिळणार नाही गड्या....


निलांबरी- हो ते आहेच


गडावरून मग सगळे अलिबागच्या मोठ्या बाजारात गेले....खूप खरेदी केली आणि मग संध्याकाळच्या रम्य वातावरण असताना सगळे वरसोली बीच वर गेले....

अहाहा!! काय रम्य वातावरण होता...संसेट ही बघण्यासारखा होता....
सगळे मज्जा करत होते पण मॅडम बाजूला बसून विचार करत होत्या....इंद्रा हळूच तिच्या बाजूला जाऊन बसला....


इंद्रजीत - काय मॅडम...काय बघताय संसेट....


जिजा- हो..


इंद्रजीत - अग पण असं एकटी बसून का आहेस? सगळे मज्जा करतायत...


जिजा- कधी कधी एकट्यात बसावं माणसाने,बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळतात...


इंद्रजीत-ओह्ह मग भेटली का उत्तरं 😂


जिजा- हो भेटली आहेत पण समोरच्याला कस समजावू कळत नाही आहे...


इंद्रजीत - म्हणजे??


जिजा -काही नाही...


इंद्रजीत - अरे सगळ्यांना हॅप्पी ठेवणारी..जिच्यामुळे माझ्यात बदल झाला अशी जिजा आज चक्क असं बोलतेय...?


जिजा- नाही समजणार तुला..पण तुला माझ्यासाठी कसा टाइम भेटला जा तुझ्या अनुकडे


इंद्रजीत - अरे जिजा तु का सारखं अनु अनु करतेस? तुला ती काही बोली का?


जिजा - नाही...


इंद्रजीत - मग का? अग जिजा खरच आमचं काही नाही ग असं..आम्ही चांगले मित्र मैत्रीण आहोत बस्स..का तिच्यावरून सारखं बोलतेस?


जिजा- मी बोलते कारण........


इंद्रजीत - कारण??


जिजा - नथिंग...
(ती उठून जाते )


इंद्रजीत - जिजा.. जिजा.... अग... काय झालं हिला काय माहिती.....
हेय गाईज चला आता वेळ झालाय.... Come on lets go....


जिजा जाऊन गाडीत बसली....इंद्रजीत मुद्दामच ड्राइविंग सीट वर बसतो...तर जिजा लगेच उठून मागे जाते आणि अभिच्या शेजारी त्याला चिपकूनच बसते....मग अनु येऊन पुढे बसते.....आरशातून इंद्रा सगळं पाहत होता...जिजा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती....हाथात घातला होता...ते पाहून का माहिती पण इंद्राला खूप जेलीस फील झालं....काळीज आतल्या आत जळत होता....शांतता होती म्हणून अनु ने रेडिओ ऑन केला......

कैसे कहे क्या है सीतम?
सोचते है अब ये हम
कोई कैसे कहे वो है या नही हमारे?

करते तो है साथ सफर
फासले है फिर भी मगर
जेसे मिलते नही किसी दरिया के दो किनारे

पास है फिर भी पास नहीं
हमको ये गम रास नहीं
शिषे कि एक दिवार है जेसे दरमिया


सारे सेहमे नजारे है
सोये सोये वक्त के धारे है
और दिल मे कोई खोयी सी बाते है!🥀


जिजा तेव्हापासून थोडं कमीच बोलायची इंद्राशी..इंद्राला ही वाईट वाटायचं..जिजा रोज नवीन पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालायची...एकदा असच सगळे शॉपिंग ला गेले होते...पण जिजा घरात बसून होती...


इंद्रजीत- हाय... काय करतेस?


जिजा - लंडन ला फिरून आले आताच.... 😏


इंद्रजीत - ओह्ह ग्रेट... तर मी काय म्हणतोय... मी जातोय माझ्या एका फ्रेड कडे पार्टीला सो मी नाही घरात आणि काका गंगा पण नाहीत तर तू एकटी राहशील का? नाहीतर चल माझ्यासोबत...


जिजा - हा हा राहीन मी जा तू


इंद्रजीत - अच्छा बग हा बाबा म्हणजे इकडे एकटं राहणं बर नाही...भूत फिरतात म्हणे... एकट्याला झपाटतात... बर मी चालो....


जिजा - आ आ थांब म्हणजे तू इतका फोर्स करतोयस म्हणून हा मी येते....


इंद्रजीत - ओके रेडी हो मग...


जिजा - हम...


पार्टी मध्ये मॅडम गेली खरं....पण कुणी ओळखीचं नव्हतं त्यात तिची गँग पण नाही....तिला कंटाळा आला....तेवढ्यात जिजाच लक्ष इंद्राकडे गेलं....तर तो चक्क दारू पीत होता.... ती तर शॉकच झाली....


जिजा- ओय गब्बर तू दारू पितोस...


इंद्रजीत - हो मी पितो पण occasionally आणि हो मी फक्त बियर पितो आणि ही तीच आहे.... Not दारू.


जिजा - हो पण चढतेच ना ती पण...


इंद्रजीत - हो पण तरी...


जिजा - हम्म मला आजच समजलं हे...


इंद्रजीत - सॉरी हू मी असं तुझ्यासमोर??


जिजा - हम्म इट्स ओके...
पण हे पिऊन काय मिळत रे?


इंद्रजीत - पिऊन ना अहाहा जन्नत मिळते मॅडम आणि काही काळ सगळे टेन्शन लांब जातात...दुःखात सुखात आधार मिळतो... आणि हिम्मत पण येते याने...


जिजा - काय सांगतोस... काही बोलायच असेल तर बोलता येत....


इंद्रजित -हो..माझ्यासोबत असं खूपदा झालंय...


जिजा - अच्छा 🙄
हम्म बर ते मला....


इंद्रजीत - हा... हे एक मिनिट...
हाय!! शलाका....


शलाका - आई शपथ इंद्रा तू इकडे?? कसा आहेस?
(मिठी मारून )


इंद्रजीत - मी मस्त तू?


शलाका - ठणठणीत... इकडे कसा?


इंद्रजीत - अग तुझा मित्र आता फक्त इंद्रजीत नाही इंद्रा भाऊ आहे या शहराचा.... आणि बिजिनेस मॅन पण सो अशा पार्टीज मध्ये मी नसणार... बाकी?


शलाका - हो हो इकडे आले तेव्हाच तुझ्या दरारा कसा आहे काय आहे हे समजलं....बाकी भारी दिसतोयस हा.... कॉलेज मध्ये पण छानच होतास पण आता तर जास्त हॉट दिसतोस..... 😂


इंद्रजीत - झालं सुरु.... 😂बाकी तुझं कस चालू आहे??


शलाका - माझं मस्त...अरे मी इकडे माझ्या नवऱ्यासोबत आलेय...
ते काय? तिकडे आहेत....


इंद्रजीत - ओह्ह अग हे आशिष सरपोतदार ना....


शलाका - हो


इंद्रजीत - ओके छान... अग पण लग्न झालं म्हणतेस मंगळसूत्र कुठेय?? 😂


शालका - आज काल कुणी नाही घालत 😂आशिष ही काही बोलत नाही मला अगदी फ्री माईण्डेड आहे


इंद्रजीत - अच्छा मग तुझे बंटी बबली काही?


शलाका - गप हा इंद्रा 😂आताच झालंय माझं लग्न इतक्यात नाही....


इंद्रजीत - ओके 😂


जिजा त्यांना एकटक पाहत होती....तिला खूप जेलीस होत होता पण ती शांत होती कारण तिला अधिकार नव्हता त्याला काही बोलण्याचा.....


आशिष - शलू...


शलाका - हा आशु..come...meet my college friend इंद्रजीत भोसले.... इंद्रा हा माझा नवरा..


इंद्रजीत - हॅलो...


आशिष - मी पण ओळखतो तुम्हाला... असं कोणी नाही तुम्हाला न ओळखणारा....


इंद्रजीत - थँक्यू...


शालका - हेय इंद्रा आपला आवडता सोंग... चल डान्स करूया का?


इंद्रजीत - पण????


आशिष - हेय नो प्रॉबमल मॅन... यू गाईज कॅरीओन...


इंद्रजीत - ओके चला शलू..


इंद्रा शलाका च्या कमरेवर हात ठेवतो...जिजाचा ह बघून अजून पारा चढतो....


ओढ तुझी छळते मला....
भास असा का तुझा सारखा...
आस तुझी लागे जिवा...
भास तुझा का असा सारखा...
झूलते का असे?
भवती तुझ्या मन



शलाका - हे गाणं तुझं आणि तीच आवडत होता ना??


इंद्रजीत - हो खूप...


शलाका - सॉरी पण तू मुव् ऑन केल आहेस आनंदी आहेस हे पाहून खूप हॅप्पी आहे... असच आनंदी राहा.... आणि लवकर लग्न कर....


इंद्रजीत - हम्म.. बघू अजून तिच्यासारखी नाही मिळाली... मला माहिती आहे तिच्यासारखी मिलन कठीण आहे पण तिला मी तेव्हाच विसरेन ना जेव्हा मला तिचा सहवास असलेली मुलगी मिळेल... तेव्हा मला असं वाटेल ती ही माझ्यासोबत आहे.... आणि मी तिला कधीच विसरणार नाही... कधीच नाही...


शलाका - हो तुला नक्की तशी मिळेल...


जिजा तिकडे पेटली होती....तिने वाईनचे पाच सहा ग्लास घेतले..... तिला कळत नव्हतं ती काय करतेय... तिला जरा गरगरलं..... हलत डुळत तिला इंद्रजवळ गेली आणि त्याला डान्स साठी विचारलं.... ते पाहून शलाका आशिष सोबत डान्स करू लागली.....जिजाने इंद्राला एकदम जवळ ओढलं.... आणि त्याचा हात तिच्या कमरेवर ठेवला....त्याला जरा धडधडल.... पण तो ही तिच्यात हरवून गेला....


दूर दूर का अशी तू राहते...
ये ना ये तू जरा रात सांगते...
धुंद या क्षणात मोहुनी तू लाजते...
पाहता मी तुला वेळ थांबते...
झूलते का असे....
भवती तुझ्या मन बावरे....
ओढ तुझी छळते मला...
भास तुझा का असा सारखा....!!💘



जिजाच्या डोळयांतली मादकता त्याला नेहमीच वेड लावायची.....
जिजाने तीच डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं.....
इंद्राने सुद्धा तिला हळूच मिठीत घेतला....
त्या क्षणी इंद्राला असं वाटलं कि हा स्पर्श आणि ही ओळखीची आहेत.....
त्याला ती जिजामध्ये दिसत होती.....


जिजा - गब्बर ओय गब्बर


इंद्रजीत - हम्म बोल ना


जिजा - गाणं संपला ना मग सोड मला...


इंद्रजीत - हा स सॉरी लक्षात नाही आलं...


जिजा - इट्स ओके जानु


इंद्रजीत - हा... काय 😨जानू??
आणि ए अग बाई तू प्यायलीस?? का? कस? कधी? 😱


जिजा - हो मी पायायले 😂जास्त नाही फक्त सहा ग्लास... वाईन.... 🤩😬


इंद्रजीत - काय.... 😱बापरे...आता हिला घरी न्यावं लागेल....
आ ब जिजा चला आता डान्स झाला ना पार्टी संपली चला आता घरी....


जिजा - शर्ट अप... पार्टी अभि बाकी है मेरे दोस्त...
बर तुमरे साथ डान्स करत होती वो किधर गयी...


इंद्रजीत - ती तिकडे? का ग?


जिजा - आ हाय मिस शकालाका...


शलाका - आ आ हाय! तू??


जिजा - मी पिजा... आ सॉरी सॉरी जिजा.. जिजा प्रधान इंद्राची फ्रेंड....


शलाका - ओह्ह ओके...बोल न...


जिजा - तुला काय हाय का ग... देव अक्कल वाटनो का था तब तुम क्या मेकअप करने को गायले थे क्या...पाहले इंद्रा के साथ नाची.... बाद मे इसके साथ... क्या है तुमरे को?


शलाका - अग बाई, हा माझा नवरा आहे आणि इंद्रा माझा कॉलेजचा मित्र....


जिजा - अच्छा अच्छा...तरी बी मै तेरे नवरे को बोलेगी हट तू... बाजू...


शालका - अरे इंद्रा आहे कोण ही???


इंद्रजीत - अग माझ्या भावाची आणि माझी फ्रेंड आहे...ती जरा ड्रिंक केले सो जरा समजून घे.....


शलाका - ओके...


आशिष - आ बोला...


जिजा - भाऊजी जी नमस्ते! तुम तुमच्या बायको को इंद्रा के साथ नाचणे कि परवानगी कैसे दिले... अरे जरा समझा करो इधर और भी लोग लाईन मे है....


आशिष - ओके हा ओके 😂


इंद्रजीत - जिजा समजले हा भाऊजी जी... चल आता...
बाय बाय.... सॉरी आशिष....


आशिष - इट्स ओके...


शालका - नीट जा... हम्म


इंद्रजीत - हो...


जिजा - बाय शाकलाका.... बाय बाय...


इंद्रजीत - हा हा चल....


शालका - काही पण असो क्युट आहे हा मुलगी... सुंदर!!


आशिष - हो खूपच सुंदर आहे.... 🤩


शालका - हम्म बस बस...


आशिष - अरे 😂

*************************

जिजाला तो कस बस गाडीत बसवतो पण ती खूप धुमाकूळ घालते...... कसब्स तो तिला घेऊन जात असतो.....घर आल्यावर तो तिला उचलून घेतो..... आणि तिच्या खोलीत घेऊन जातो.....


इंद्रजीत - जिजा आता इकडे बस हू शांत....
अरे देवा माझी चावी? कुठे गेली....


जिजा - आहा आहा... ही बग...


इंद्रजीत - चावी तुझ्याकडे आहे का...बर दे इकदे...


जिजा - नाही... 😂नाही देणार....


जिजा चावी तिच्या ड्रेसच्या आत टाकते.... हे बघून इंद्राचे डोळे चकरावतात.....


इंद्रजीत - हे देवा..अग बाई दे चावी मला...


जिजा - तू घे ना इकडून... 😍


इंद्रजीत - आई शपथ किती प्रेमानी बोलेय ही का ही मला भुरळ पडते.... का??
जिजा राणी बाळा अग दे ना चावी प्लिज...


जिजा - नो नो... नो....


इंद्रजीत - थांब तुला ना आता....


इंद्रा तिला उचलून घेतो आणि बाथरूम मध्ये घेऊन जातो....तिला शॉवर खाली उभा करतो.....ती विव्हलते....पण तो तिला सोडत नाही तिचे हात भिंतीला धरून ठेवतो.....
काही वेळात तिची थोडी नशा उतरते....तेव्हा ती त्याच्या डोळल्यात पाहते.....


जिजा - इंद्रा..
(गोड स्वरात )


इंद्रजीत - आ हम्म बोल ना...


जिजा- तुला काहीतरी बोलायचंय मला...


इंद्रजीत - बोल ना


जिजा - आधी आपण एकमेकांचे शत्रू होतो...नंतर मित्र झालो... सगळं खूप पटापट घडतं गेला माझ्या आयुष्यात कळलंच नाही हे कधी घडलं... तुझ्यासोबत मला वेळ घालवताना खूप छान वाटतं... असं वाटतं वेळ आता इकडेच थाबावी... हा क्षण डोळ्यात साठवून घ्यावा... तू कोणत्याही मुलीशी बोलास कि माझ्या अंगात आग लागते... खूप जेलीस फील होता... आजकाल तर तुला भेटायचं बहाणाचं हवा असतो मला.... कारण???


इंद्रजित - कारण???


जिजा - इंद्रा आय लव्ह यू 🌈 माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे....मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे...❤️
आज फस्ट टाइम दारू प्यायले फक्त तुला हे बोलण्यासाठी...


इंद्रजीत हे एकूण शॉकच झाला....त्याला कळत नव्हतं आनंदी व्हावं कि दुःखी....जिजा त्याच नाव घेत झोपी गेली....
इंद्रा तिला नीट झोपवतो आणि त्याच्या खोलीत येऊन सिगारेट पीत विचार करत बसतो.....


इंद्रजीत - जिजा आणि माझ्यावर प्रेम करते?मला कधीच नव्हतं वाटलं कि तिला माझ्यासारखा मुलगा आवडेल..उलट मला वाटायचं कि तिला सभ्य मुलं आवडत असतील..पण मी तिच्यासाठी योग्य नाही... हे तिला सांगून नाही समजणार मला तिच्यापासून लांब राहावंच लागणार आता... तिच्या सुखाचा प्रश्न आहे... आणि मी नाही करत तिच्यावर.. प्रेम
पण हे सांगताना माझ्या डोळ्यातून अश्रू का येतात?
(डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला )


डोळ्यात पाणी साचल होता....तो तसाच त्याच्या बेडवर पडून होता...तेवढ्यात त्याला किचनमधून आवाज आला...तो पळत खाली आला पाहतो तर समोर जिजा लहान मुलांसारखी बसून आईस्क्रीम खात होती.... अगदी तोंडाला लावून..... तो तिला पाहुम हसायला लागला....


इंद्रजीत - अग काय करतेस हे?? असं कोण खात अग?


जिजा - मी खाते 😬


इंद्रजित- तुला ना खरच खायची पद्धत नाही...


जिजा - ऐ गब्बर शांत बस हू दिमाग कि वटा मत...


इंद्रजीत - अग तू ही भाषा कुठून शिकलीस...


जिजा - हमारे का तुमरे का जेसे नहीं अलग है...अपने को सब आता है...


इंद्रजीत - आता खा लवकर आणि जरा जपून ते पडलं तर लागेल काचेचा बाउल आहे तो..


जिजा - हा तू मला नको शिकवूस...


इंद्रजीत - बर...


तिला असं खाताना पाहून तो आतल्या आत खुश झाला.....नंतर फोन आला म्हणून तो बाहेर गेला.....जिजाच्या हातून बाउल खाली पडला..... नशेत असल्याने तिला काही कळत नाही ती उठताना तिचा पाय कचेवर पडतो तस ती जोरात ओरडते......तिचा आवाज एकूण इंद्रा पळत येतो..... आणि तिला उचलून रूममध्ये नेतो.....


इंद्रजीत - अग मूर्ख आहेस का तू जरा जपून नाही चालता आला... तरी सांगत होतो कि लागेल काच पायाला.....पण नाही.....हुशारी इतकी कि गाढवं पन लाजेल तुझ्यासमोर.... 😔😕🤨🤨


जिजा - तू तू का इतका हायपर होतोयस...


इंद्रजीत - because i care for uhhh


जिजा - why???


इंद्रजीत - कारण i....?
काही नाही जा झोप तू


जिजा - इंद्रा अरे.....

******************************

सकाळी जिजा उशिराच खाली आली....पण कोणाला माहिती नव्हतं काल काय झालेला...... सगळे आपला आपला काम करत होते.....ती येऊन इंद्राला पाहत बसली....


इंद्रजीत - हम्म बोल काय झालं असं का पाहतेस....


जिजा - आ काही नाही...इंद्रा ते मी...जरा बाहेर चल मला बोलायचंय....


इंद्रजीत - हम्म...
बोल आता काय झाला


जिजा - काल साठी सॉरी....


इंद्रजीत - इट्स ओके ग नशेत होता असं..आणि मला माहिती होता तू नशेत बोलीस ते सो ठीके.... 😂


जिजा - नाही... मी सॉरी बोलतेय दारू प्यायले म्हणून आणि तुला त्रास दिला म्हणून....पण काल बोली ते खरं होता.....माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय...


इंद्रजीत - नाही जिजा... हे शक्य नाही....
आपण नाही एक होऊ शकत....
(पाठ फिरवून )


जिजा - माझ्या नजरेला नजर देऊन बोल ना मग बोल बोल बोल ना....


इंद्रजीत - हो हो आपण एक होना शक्य नाहीsssssssss


जिजा - का नाही....? कारण काय?


इंद्रजीत - कारण काही नाही... मी. म्हंटल ना... माझ्या मनात नाहीस तू तर का हो बोलू सांग....


जिजा - नाही हे खोटं आहे तुझ्या डोळ्यात मी पहिल्या...


इंद्रजीत - कधी कधी डोळे जे दाखवतात ते खरं नसतं....


जिजा - नाही डोळ्यांची भाषा कधीच नाही चुकत....


इंद्रजीत - ठीके तुला वाटतं तस... आहेत कारण पण मला नाही सांगायची तुला.... जा....


जिजा - ठीके तुझं प्रेम आहे कि नाही हे तूच कबूल करशील..... तुझ्यासाठी मी काहीही करेन..... हद्द पार करेल.... सीमा ओलांडेन सगळ्या.....
(निघून जात )


इंद्रजीत - जिजा जिजा.... ऐक जिजा......
जिजा असं काय करणार आहे.....? का समजून घेत नाही आहे मला ही.....सॉरी जिजा.... 😨😔 मला लांब राहवंच लागेल तू काहीही केल तरी.....नाही तर मीच स्वतःला नाही थांबवू शकणार तुझ्या जवळ येण्यापासून....आता काय करणार असेल ही 😔
.
.

क्रमश :
माफ करा पोस्ट करायला खूपच उशीर झाला माहिती आहे मला........
तर आता जिजा काय पाऊल उचलेल पुढे?
नक्की काय करणार ती?
इंद्रजीत आणि जिजा एक होतील का?
पाहूया पुढच्या भागात...... असच प्रेम राहूद्या आणि कमेंट्स नक्की करा स्टार्स नक्की द्या...... Thankuhhhh🌈




३०/९/२२
Pratiksha Wagoskar