Indraza - 8 books and stories free download online pdf in Marathi

इंद्रजा - 8

भाग - ८


इंद्रा आणि बाकीचे सगळे मुंबई ला परत जायला निघाले......जिजा इंद्राच्या च बाईक वर बसली होती....पण पूर्ण रस्त्यात ती शांतच बसली होती.... इंद्राला तिची शांतता खात होती....शेवटी रात्री सगळे आपापल्या घरी पोहोचले....


इंद्रजीत - जिजा.. अग तुझं काय चाललं आहे नक्की.? हे बग काही वेडंवाकडं करण्याच्या विचारात नको पडूस प्लिज...अग माझी बाजू समजून घे मी....


जिजा - तू माझी बाजू समजून घेतोयस का?? कारण काय ते ही सांगेनास? नुसतं बाजू समजून घे इतकंच... अरे पण काय? आणि मी काही वेडंवाकडं नाही करणार....
तुझ्यासाठी करता येईल तितकं करेन....
(निघून जाते....)


इंद्रजीत - जिजा अग... ऐक जिजा...काय करणार आहे ही जिजा....


इंद्रा घरी आला..... पण तो अस्वस्थ होता..... म्हणून माई आणि आबासाहेब यांनी त्याला काहीच विचारलं नाही....
दुसऱ्या दिवशी पासून इंद्रा पुन्हा त्याच्या कामाला लागला.....


इंद्रजीत - विभा!!


विभा - अरे भाऊ...


वामन - मालक या ना...


इंद्रजीत - कशी आहेस विभा...
तुझीच चौकशी करायला आलोय...


विभा - चेहऱ्यावरील घाव ठीक होतील की नाही माहिती नाही पण तुझ्यामुळे मनातला घाव नक्कीच ठीक झालाय थँक्यू भाऊ....


इंद्रजीत - अग असा का बोलयेस...चेहऱ्यावरचे घाव ही ठीक होतीलच... आपण ट्रीटमेंट करतोय ना बाळा... हम्म हिम्मत नको हरूस...


वामन - तुमचे खूप उपकार मालक...तुमच्यामुळे सगळं झालाय....


इंद्रजीत - अहो त्यात उपकार काय काका? विभा माझी बहीणच... तिच्यासाठी हे तर केलाच पाहिजे ना..तू बरी हो यातच मला सगळं मिळालं....


वामन - तुम्ही बसा मी आलोच...


विभा - मग भाऊ..जिजा वहिनी कशी आहे 😂


इंद्रजीत - बयो तुका कोणी सांगलंय हे 🙄


विभा - माका सांगणारे भरपूर माणसा असात. 😂


इंद्रजीत - सांग की ग...


विभा - अर्रर्रर्र मल्हार न सांगितलं....


इंद्रजीत - हम्म...


विभा - भाऊ तिच्यासारखी मुलगी पुन्हा नाही मिळणार.... पुढचा विचार करून तुझा आन गमावू नकोस...


इंद्रजीत - हम्म.. चल मग येतो मी काळजी घे..


विभा - हो बाय...

***************************


इंद्रजीत जिजा च्या काळजीत होता.....आणि इकडे जिजा अन्न पाणी सोडून बसलेली.....तिच्या घरच्यांनी तिला खूप समजवळ...पण ती समजून नव्हती घेत...सगळ्यांना कळत नव्हतं की कारण काय होत?.... जिजा महाहट्टी तिने कोणाला काहीच समजू नाही दिल....


जिजा ने एक आठवडा झालं अन्न पाणी सोडल....तिची पायाची जखम सुद्धा चिघेळलेली.... ती फक्त इंद्राचा विचार करायची....सगळ्यांना जिजा च टेन्शन आलेला.....


अनुसया - इंद्रा..


इंद्रजीत - आ हम्म बोल ना काय झाला...?


अनुसया - अरे तुला मेहता कॉलेजचे प्रिन्सिपल भेटायला आलेत....


इंद्रजीत - ओके पाठव ना मग त्यांना...


अनुसया - हो...


प्रिन्सिपल - हॅलो सर..


इंद्रजीत - हॅलो प्रिन्सिपल सर.. बसा ना..


प्रिन्सिपल - आ जरा कामच आणल आहे तुमच्याकडे...


इंद्रजीत - बोला ना...


सर - आमच्या कॉलेज मध्ये फ्रेशर्स पार्टी आहे आणि सगळ्या मुलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही गेस्ट म्हणून यावं... म्हणजे ते अजून जोमाने पार्टी एन्जॉय करतील...


इंद्रजीत - पण मी?


सर - नाही म्हणू नका प्लिज...


इंद्रजीत - मी कस येऊ सर..ज्या जिजाला मी अजून भेटलोय नाही... तिचा सामना कसा करू... पण सरांना नाराज नाही करू शकत........ (मनात )
अम्म ठीके चालेल...


सर - थँक्यू सर..उद्या भेटूया...


इंद्रजीत - हो..


पार्टीचा दिवस आला.......इंद्राची एंट्री झाली तस सगळे ओरडू लागले.....मुली तर त्याच्या हॉटनेस ला बघूनच विरघलाळ्य.... पण त्याची नजर मात्र तिलाच शोधत होती....पण ती कुठेच दिसली नाही.....
तेवढ्यात निलू तिकडे आली आणि इंद्राच्या हातात चिट्ठी देऊन निघून गेली....

💌

हाय, इंद्रा....
कसा आहेस असं नाही विचारणार... कारण मला माहित आहे तू पण ठीक नाहीस...तू ही दुःखी असणार..अस्वस्थ असणार....तुला का कळत नाही की तू ही माझ्यावर प्रेम करतोस... मी वेडी झाले तुझ्यासाठी... तू दिलेला दुरावा मी स्वीकार केला आणि गप्प राहिले ना...अजून काय करू मी...? तूच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस समजलं... तू नाहीस तर मी ही नाही.....
आजचा परफॉर्म्स फक्त तुझ्यासाठीच माझ्या प्रेमासाठी असेल...

~तुझीच हाहाकारी!!
💌

चिट्ठी वाचून त्याच्या डोळ्यात पाणी साचले....तेवढ्यात आणउंसमेंत झाली..... इंद्राचं सगळं लक्ष समोर गेलं....
गाणं सुरु झालं, जिजा स्टेजवर आली.....तिला पाहताच इंद्रा समजला तिने स्वतःला किती त्रास करून घेतला आहे.....चेहऱ्यावरच तेज ही नाहीस झालेला....लाल रंगाच्या घागरा घातलेला तिने...त्यात ही गोड दिसत होती...इंद्राला पाहून ती बेभान होऊन नाचू लागली....


प्रेम मेरी आंखो मे है....
प्रेम मेरी सांसो मे है....
प्रेम मेरी होठो पे है....
प्रेम मेरी बातो मे है....
बनी बनी बनी रे बनी....
प्रेम दिवाणी बनी....
लगी लगी लगी रे प्रेम की धून ये लगी...
अब क्या करे दिल दिवाना....

कहना है कहना है आज तुझसे तुझसे.....
ले जा ना ले जा ना मुझको मुझसे मुझसे....
बैठी हुई हू मै तेरे लिये हाये कब से कब से....
तुझसे कहा है तो कह दूंगी मै जा के सब से...
प्रेम मेरी धडकन मै है....
प्रेम मेरी तडपण मै है....
प्रेम मेरे मन मे है....
प्रेम मेरे तन मे है...

चली चली चली रे चली प्रेम से मिलने चली....
अब क्या करे दिल दिवाना...


जिजाच्या डान्स मुळे तिच्या पायातून रक्त येऊ लागलं.......ती गोल गोल फिरू लागली.....इंद्राला तिच्या पायातून रक्त येताना दिसलं तस तो काही विचार न करता पळत स्टेजवर गेला......तेवढ्यात जिजा त्याच्या अंगावर चक्कर येऊन पडली.....इंद्राला काहीच कळेना.... सगळ्यांनी तिला उठवायचा खूप प्रयत्न केला.....


इंद्रजीत - जिजाssssss जिजा काय झालाय....? जिजा उठ ना काय झाला... तरी मै म्हणत होतो की स्वतः ची काळजी घे पण नाही... जिजा अग उठ ना...


निलांबरी - अरे इंद्रा कशी उठेल ही? सात आठ दिवस झालं काहीच खाल्लं नाही आहे तिने..सगळी ताकद संपली रे तिची...


इंद्रजीत - अग तू तू हे आता का सांगतेस? आधी का नाही बोलीस?


अभिजीत - जिजा...
जिजा काय झाला तुला...? अग निलू तुला सगळं माहिती होता तरी नाही सांगितलंस आम्हाला....


निलांबरी - कस सांगू तिने मरायचं ठरवलं होता..मै आणि सगळ्यांनी खूप समजवळ तिला..पण ती ऐकत नव्हती... मला पण शपथ घातलीस खूप काही केला कस बोलू मै 😔😭


मनाली - जिजा.. अरे आज्या काय झाला हिला?


अजिंक्य - मला समजलं की सांगतो तुला... गप्प आता...


मनाली - अर्रर्रर्र तू गप मंद... हू बाजूला..🤨
जिजा.. अग काय झाला...? अरे बावळट मुलांनो बघताय का डॉकटर कडे घेऊन चला ना..किती वेळ गप्पा मारत बसणार आहात...


इंद्रजीत - हो हो... तू तू बरोबर बोलते...


जिजाला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतात.....दिव्या आणि शिवराज पण तिकडे येतात....इंद्रा पुरता घाबरला होता त्याला काहीच समजतं नव्हतं.... सगळं इतक्या पटकन झालं....


इंद्रजीत - शिवराज काका... मला... मला माफ करा 😔😭........ (हात जोडून )


शिवराज - अरे अरे बाळा तू नको माफी मागूस..तुझी काय चूक यात...? तीच तिने करून घेतलंय....


इंद्रजीत - पण...


दिव्या - बाळा पण तू नकार का देतोस....
हे बघ आम्हाला सगळं माहिती आहे....


इंद्रजीत - (त्यांना सगळं सांगतो...)


अभिजीत - कायssssss😨 भाऊ आणि जिजा? प्रेम? कस? म्हणजे मला वाटणारा डाउट खरा होता..जिजा ही मला बोली नाही....


अजिंक्य - अर्रर्रर्र जिजा आणि इंद्रा एकमेकांना लाईक करत्यात... आपल्याला कस नाय समजलं...


मनाली - अक्कल शून्य माणसांना कस समजणार... त्यासाठी प्रेम. करावं लागत... 😏


अजिंक्य - व्हय ग..तुला कस माहित तू कुणावर करती प्रेम...?


मनाली - मी...? आ मी का करू... सांगितलं फक्त...


अजिंक्य - अन तू मला अक्कल शून्य का म्हणली.. तुला लई माहित जस काय...


मनाली - मलाच काय पूर्ण कॉलेज ला माहिती होता...तुलाच काही कळत नाही..


अजिंक्य - अय्य जास्त बोलू नग्स आधीच सांगतोय..


मनाली - हम्म नाहीतर काय करणार तू 😏


अजिंक्य - मी... आ मी... हम्म तस काय करणार म्हणा मी 🙄


निलांबरी - गाईज... स्टॉप हा हॉस्पिटल आहे... आपली जिजा ऍडमिट आहे यार....


अजिंक्य - हम्म सॉरी...


मनाली - मी टू... 😔


शिवराज - अरे हो पण धोका सर्वांना असतो त्यांच्या कामात.... म्हणून कुणी प्रेम करणं, लग्न करणं, स्वतः च आयुष्य जगणं विसरत का? थांबवत का? माझे ही असंख्य दुष्मन आहेत.... तरीही मी लग्न केला..मला दोन मुली आहेत आणि मी सेफ आणि खुश आहे....पुढचा विचार करत राहशील तर भूतकाळ च आठवेल आणि आज मध्ये जगणं विसरशील...म्हणून सांगतोय मन म्हणतेय ते कर... बाकी तुला स्वतः वर विश्वास हवाच ना..मी माझ्या मुलींना नेहमी बिन्दास्त फिरा असं शिकवलं... अरे या माझ्या शिवकन्या आहेत..अशा लहानश्या गोष्टींना घाबरत नाहीत.... 😊
जितकं मी तुला ओळखतो त्यावरून टू एक उत्तम मुलगा आहेस.... तुझं तुझ्या परिवराच किती नाव आहे मला ठाऊक नाही का...? पद्धत वेगळीच असली तरी तुमच्यासारखं काम आम्ही सरकार ही नाही करत... अरे असं खूपदा काम मी सरकार विरोधात केलाय आजवर... मी कधी घाबरलो नाही..आणि आपल्या पार्टनर च रक्षण आपण नाही तर कोण करणार ना? जर टू यापासून घाबरला आहेस तर मग नको करुस कुणावर ही टू प्रेम...बाकी टू ठरव आता....


इंद्रजीत - हो मला फक्त थोडा वेळ द्या... मी मी आलोच घरी जाऊन....


दिव्या - हो ये तू..


*************************


राजाराम - काय झाला इंद्रा अस्वस्थ आहेस?


ममता - काय झालं बाळा?


इंद्रजीत - ते....


राजाराम - अरे बोल ना...


इंद्रजीत - माई.... आबासाहेब 😭
( तो सगळं त्यांना सांगतो )


ममता - इंद्रा... बाळा अरे काही नाही होणार जिजाला... पण हो तू तिला आता सगळं खरं सांग...


राजाराम - मला तुझा इंटेंशन कळला आहे.. तुला तिला त्रास नाही होऊ द्यायचा...पण अरे..आपण असताना तू असताना का होणार तिला त्रास.... तुला स्वतः वर विश्वास हवा ना...


इंद्रजीत - आहे पण.. आबासाहेब माई आधी ही मी माझं पहिलं प्रेम गमवून बसलोय आता पुन्हा... नाही 😭ती अजूनही माझ्या मनात आहे... जिजा मध्ये तीच रूप मला दिसत आलं म्हणून कधी जिजा मध्ये अडकलो समजलं नाही....


ममता - अरे मग हो ना व्यक्त...


इंद्रजीत - हो पण...


राजाराम - अरे बाळा जिजाला माहिती आहे की इंद्रा असताना कसला ही खतरा तिला नाही म्हणूनच तर तिने तीच प्रेम कबूल केला ना... मग तिला इतका आंधळा विश्वास आहे तुझ्यावर मग तू का??


इंद्रजीत - हो आबासाहेब...


ममता - तुला माहित आहे इंद्रा..तुझे आबासाहेब आणि मी चोवीस वर्षा आधी पळून आलो होतो घरातून...खूप संकट आणि स्ट्रगल नंतर आम्ही आज इथे पोहोचलोय....या दरम्यान खूप संकट आले....पण मला यांनी कधीच कोणत्या अडचणीत नाही पडू दिला..आणि तू ही तसेच करशील आम्हाला आणि जिजाला ही खात्री आहे...हम्म..ऐक आता हीच वेळ तिला बोल आणि हलक हो..तीच ती सेफ राहीलच आपण आहोतच ना..बाप्पा पण आहे आपल्यासाठी... बघ इंद्रा पहिलं प्रेम हे नशिबाने गमावलं आहेस, पण जिजाला tu तुझ्या चुकी मुळे गमावशील...



इंद्रजीत - हो


ममता - हम्म आता रडू नकोस..


राजाराम - जा फ्रेश हो आणि अराम कर..


इंद्रजीत - हम्म..


राजाराम - ममता तू बोलतेस ना नेहमी की इंद्रा खूप खंबीर,रागीट,स्ट्रॉंग आहे पण तितकाच काही वेळेला तो स्वतः च खचतो... आज पाहिलं मी... याच्या याच कमजोरी मुळे त्याच आयुष्य नेहमी बिघडत आलंय..दोनदा सावरलंय आपण आता आणखी पुढे काय नको म्हणजे मिळवलं..


ममता - नका काळजी करू, बाप्पा आहे ना...


राजाराम - हम्म


इंद्रा त्याच्या खोलीत गेला....त्याच्या डोक्यात सारखं असच येत होता की जिजाची अवस्था त्याच्यामुळे झाले...विचार करतच तो बसून राहिला...

ठरवले असे कितीदा.......
तुझ्यापासून दूर जाणे.......
तरी माझे तुझ्या,......
भोवतीच तळमळत राहणे......

(~सागर विठ्ठल सुर्वे )


इंद्राला आता कळत होता की कितीही प्रयत्न केला तरी तो तिच्यापासून आता लांब राहू शकत नाही......
तो ही तिच्यावर प्रेम करत होता.....
तो तिच्यात अडकला होता......



सकाळी इंद्रा लवकर उठला....स्वतःच आवरून तो हॉस्पिटल मध्ये जायला निघाला...आज तो जुन्या इंद्रसारखा खुश आणि कॉन्फिडन्स ने जात होता... जाताना त्याने माई ने दिलेली खीर आणि तिचे आवडते गुलाब सोबत घेतले...तो तिच्या वोर्ड जवळ पोहोचला तर त्याला ओरडायचा आवाज आला...


शिवराज - जिजा जिजा अग खा ना हे.. अग हट्टीपणा नको करुस ना..का असं वागतेस....


जिजा - नाही बाबा... आई मी इंद्रा आला की खाणार...


दिव्या - अग किती त्याच नाव जपशील...गप ना...


जिजा - आई माझं प्रेम आहे त्याच्यावर ग..प्रेमात नाही कळत ग 😭वेड? की शहाणपण.?


मनाली - अग पण तू खाशील तर त्याला मनवू शकशील ना..


निलांबरी - खा ना ग जिजा... 😭


अजिंक्य - अय्य बाय खा ग.. असा का करालीस??


अभिजीत - आपल्या दोस्तीची शपथ आहे तुला...


जिजा - नाही फ़्रेंड्स मी त्याच्यासाठी मरायला ही तयार आहे


इंद्रजीत - जिजा..... 😭



इंद्रा आता स्वतःला सावरू शकत नव्हता.....तो पळतच जिजाच्या मिठीत आला.....त्या मिठीतील सुख फक्त जिजाच समजू शकत होती....अश्रू नी वाट मोकळी केली.... आता उरलं होता फक्त प्रेम!!


इंद्रजीत - हाहाकारी असं का केलास तू? इतकी matured मुलगी तू असा करावंसं?


जिजा - प्यार मे सब पागल हो जाते है जनाब तो हम किस खेत की मुली है...


अजिंक्य - आयला... हिंदी बोली ही 🙄😨🤣


मनाली - अय्य गप्प जरा सिटूएशन काय? बोलतोयस काय?


इंद्रजीत - गप्प बस...



जिजा - गब्बर तू माझ्यासाठी रडतोयस?


इंद्रजीत - जिजा....मला माफ कर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत.... मला कळून चुकलंय.... 😭आपला जीव आहे तू 😭आज तुला सगळ्यांसमोर बोलतो......I love uhh❤️will uhh marry me? Be my partner for lifetime?


जिजा - Yesss!!!!❤️
या क्षणाची किती वाट पहिली मी....अरे तू माझ्यासोबत आहेस तर मला काहीच भीती नाही....सुरवातीला मला तुझा राग यायचा लन तुझं मन किती साफ आहे...स्वा्भाव किती स्वच्छ आहे हे समजल्या मला म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते आणि आता तू मला भेटलास मला काही नको..


इंद्रजीत - हो...


जिजा - हस आता... 😂


इंद्रजीत - हम्म पागल 😂


दिल केह रहा है तुझसे यू रिश्ता जोडलू......
'तेरी धडकनो को छुलू.....
तेरा जिस्म ओढलू.....


आंखो मे 'तेरी है मेरा ही चेहरा....
चाहे तू ये माने या ना माने....
'तेरी मोहब्बत पे है मेरा पेहरा....
चाहे तू ये जाने या ना जाने.....
तेरे लिये मे जाते हुए लम्हो को मोडलू....
तेरे धडकनो को छुलू.....
तेरा जिस्म ओढलू.....


मनाली - उहू उहू....
हम भी यहाँ है.... 🤣


निलांबरी - इंद्रा.... जिजाला उपाशी ठेवायचं का?


अजिंक्य - तोच प्लन हाय वाटतं त्याचा...


इंद्रजीत - नाही.. 😂जिजा हे घे माई ने दिले तुझ्यासाठी खीर...


जिजा - तुझ्या हाथानी भरव...


इंद्रजीत - आजरी आहेस पण मस्ती करायची नाही सोडलीस....


जिजा - मग सोडते की काय?


दिव्या - बाप्पा पावलास बाबा..माझ्या मुलींसाठी केलास तिच्या मनासारखा... शेवटी ती खुश झाली...


शिवराज - हो ना...


इंद्रा आणि जिजा हसत खेळत खात होते....अभि हे सगळ पाहतो त्याला सहन नाही होत तस तो निघून जातो....दोघं आनंदात खीर खात असतात...


इंद्रजीत - जिजा अग नीट खा खाली का सांडवतेस...


जिजा - तू नीट नाही भरवत आहेस... 😏जास्त पण बोलू नकोस....


इंद्रजीत - हा आता माझ्यावर ये..माझ्याच चुका असतात ना....


जिजा - हो 😏


इंद्रजीत - तुझ्या नसतातच ना...


जिजा - कोई शक...?😏


इंद्रजीत - हा आहे शक...मी बोलत नाही म्हणून... तू तर माझ्यापेक्षा जास्त चुका करतेस...


जिजा - तू आता माझ्यावर खापर नको फोडूस... माझ्याकडून नाही होत चुका... 😡😏


इंद्रजीत - तुम समझती कौन हो अपने आप को??


जिजा - जिजा.... The queen...!!!👰


इंद्रजीत - तोंड बघ आरशात.... राणी म्हणे.... 😏


जिजा - तू जास्त बोलतोयस आता इंद्रा... 😡


इंद्रजीत - तू बोलतेस तेव्हा 😡


जिजा - माकड छाप.....


इंद्रजीत - असुदे ग माझं निदान माकड तरी...तुझा बग तोंड चिपकली.... 😏


जिजा - तू मला चिपकली बोला...


इंद्रजीत - तू मला माकड बोली ते....


जिजा - तू आहेसच..


इंद्रजीत - तू पण आहेस मग..आणि ज्यादा मत बोल अभी....


जिजा - माई बोलेगी तुम. क्यू बोला फिर मेरे को...


इंद्रजीत - तू हिंदी बोलू नकोस बाई..खूप विक आहे तुझी हिंदी...


जिजा - तुझी जस काय चांगली आहे...


इंद्रजीत - कोई शक 😊🤩


जिजा - हा मेरे को है शक खोटं बोलता होयगा तुम...


इंद्रजीत - गप्प बस ग वाटलावी... 😏😂


जिजा - इंद्रा.... 😨😨😨🤧🤧😊😡


इंद्रजीत - जिजा..... 😨😡


सगळे - यांचा नॉर्मल मोड ऑन झाला...... 😨🤣😨
(ऐका सुरात )



शेवटी.....प्यार की कबुली दिलीच..... दोघं पण नुसते भांडतात..... मधी सुधरतील काय माहिती.....यांची लव्ह लाईंफ झाली चालू आता बघूया काय होतय पुढे..... तुमचा स्पोर्ट असच राहूदे..... कमेंट करा... विसरू नका.....


क्रमश:
~Pratiksha Wagoskar