Swachchhata Mahakirtan - 1 books and stories free download online pdf in Marathi

स्वच्छता महाकिर्तन - 1

स्वच्छता स्वंयम स्वच्छतेची रक्षक l अस्वच्छता स्वच्छता भक्षक स्वयंशिस्त आवश्यक स्वच्छतेसाठी l अस्वच्छता नष्ट लहान-मोठी

निसर्ग महास्वच्छता रक्षण l वसुंधरा कार्यक्षमता संवर्धन देशासाठी स्वच्छता योगदान l स्वच्छता उपकरणे नियंत्रण

स्वच्छता हे असे एक मनभावन प्रमाणपत्र सादर आहे की या जगात लोक म्हणतात स्वच्छता सारखे स्वयंपूर्ण तत्त्व दुसरं नाही कोणीच. . स्वच्छतेसाठी दिलेली वचने एकत्रितपणे पारंपरिक शिक्षणासाठी पूर्ण व्हायला हवीत.तो एक महाविचार आहे.ती एकच एक गोष्ट नक्की नाही .तर ती एक प्रेरणा आहे...ते एक अप्रतिम महाकार्य आहे.सर्व जग त्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या उत्साहाने तयार असते. स्वच्छता स्वतः स्वच्छतेची रक्षक आहे. ती स्वतः स्वतः मध्ये म्हणजेच आपल्या
आपल्या मध्येच एक महान शक्ती आहे.. रणांगणात जसे युद्धे असतात तसे रस्त्यावर परिसरामध्ये स्वच्छता करणारे स्वच्छता योध्दे दिसतात. हो स्वच्छतेशी पुकारलेले युद्ध स्वच्छता शांततेच्या मार्गाने जिंकते.. मात्र त्यासाठी स्वच्छता सेवकांचे हात अस्वच्छता दूर करण्यासाठी कार्यरत असावे लागतात. त्यामध्ये थोडा जरी खंड पडला तर मात्र जागोजागी अस्वच्छतेचे ढिगारे आपल्याला दिसून येतात. अस्वच्छता एक महारोग आहे. त्या महारोगातून बाहेर पडणं हे माणसाला सहज शक्य आहे. परंतु मनुष्य स्वतः कचरा निर्माण करतो आणि मग त्या कचऱ्याचे निर्मूलन करता करता त्याच्या नाकी नऊ येतात. म्हणून घरामध्ये परिसरामध्ये जो काही कचरा निर्माण होईल तो कचराकुंडीत नेऊन टाकायला हवा म्हणजे घर आणि परिसर स्वच्छ दिसेल.

गावात ,शहरात ,राष्ट्रराज्यात, जगात जर स्वच्छता हवी असेल तर त्यासाठी एक स्वयंशिस्त असावी लागते आणि तशी स्वयंशिस्त स्वच्छता कार्यामध्ये आहे. अस्वच्छता आहे म्हणून स्वच्छतेला महत्त्व आहे असं नाही तर स्वच्छता आहे म्हणून अस्वच्छतेचे अस्तिव आहे. या जगातून अस्वच्छता हद्दपार होऊ शकत नाही. कारण अस्वच्छता ही सजीवांशी संबंधित गोष्ट आहे. त्यामुळे स्वच्छता आणि अस्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

याउलट स्वच्छता ही प्रत्येकाला आवडते. अगदी निसर्गाला सुद्धा आवडते. मग पक्षी असतील, प्राणी असतील, जलचर असतील, आकाशचर असतील, जमीनचर असतील अथवा भूचर असतील. इतकेच नव्हे तर स्थिर सजीव म्हणजे झाडे पाणी डोंगर हवा प्रकाश दगड धोंडे यांना सुद्धा स्वच्छता आवडते.. त्यामुळे मनुष्याचा तर प्रश्नच नाही. कारण एक मनुष्य आहे तोच हा स्वच्छतेचा भोक्ता आणि उपभोक्ता दोन्ही आहे... स्वच्छता ही पृथ्वीवरची मोठी देणगी आहे. जी माणसाला वारसा हक्काने लाभलेली आहे. तो वारसा हक्क मनुष्याने निरंतरपणे जपायला पाहिजे.
अनेक लहान-मोठी अस्वच्छता या जगातून नष्ट होत रहाते. त्या जागी स्वच्छता दिसून येते. परंतु म्हणून रोज सकाळी उठून स्वच्छतेची कामे करावी लागतात असे नाही. कारण स्वच्छता ही एक सवय आहे. स्वच्छता हे एक व्यसन आहे. आणि तसं पाहायला गेलं तर अस्वच्छता एक दुर्व्यसन आहे..
मनुष्य हा जरी स्वच्छता प्रिय असला तरी अस्वच्छता त्याचा पाठलाग करते. त्याचा पिच्छा पुरवते. त्याला हैराण करते. त्याला अगदी मेटाकुटीला आणते आणि यातून मनुष्य सुटण्याचा प्रयत्न करत राहतो. अस्वच्छते वरती विजय मिळवण्याचा मनुष्य त्याच्या आयुष्यात अखंड प्रयत्न करीत राहतो आणि तो प्रयत्न चालतच राहतो .
उदाहरण द्यायचे झाले तर मनुष्य जेवणा आधी हात पाय तोंड धुतो. हात तर धुतोच. हात धुणे ही एक सवय आहे. ती सवय चांगली आहे. अथवा टिशू पेपरने हात पुसतो. यासाठी पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. मग जे पदार्थ ज्या डिशमध्ये खाल्ले गेले आहेत ती डिश सुद्धा पाण्याने धुतली जाते तिला साबण लावला जातो.
एखाद्या जागी बसायचे असल्यास तो ती जागा साफ करतो किंवा त्या जागी वर्तमानपत्र किंवा रुमाल ठेवून तो त्या जागी बसतो. कारण जे कपडे आपण घातले आहेत ते खराब होऊ नये ही काळजी तो घेतो. याचाच अर्थ मनुष्य स्वच्छतेला प्राधान्य देतो.