Veshantar A Mysterious Tale - Part 2 books and stories free download online pdf in Marathi

वेशांतर एक रहस्यमय कथा - भाग 2

....त्याच्या पायातून रक्त येत होते.तरीही तो त्याच रक्तानी भरलेल्या पायांनी चालतच होता चालता चालता घर कधी येत हे त्याला देखील कळत नाही.आणि दोघेही घरातल्या अंगणात येतात दादा अंगणात त्यांची वाट बघत उभा असतो.इतक्यात दादा नकळत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतो. त्या दोघांनाही इतकी धाप लागलेली असते की दादाची प्रश्नांची सरबत्ती ऐकून ते एखाद्या वासरा सारखे बिथरथात.शेवटी अमेय दादाला म्हणतो. अरे दादा हो जरा थांब किती प्रश्न विचारशील. आम्हाला श्वास तरी घेऊ दे तुम्ही दोघे आधी सांगा इतका वेळ होते कुठे? आम्ही केव्हाची तुमची वाट पाहतो आहे तुमच्या काळजी ने आमच्या हृदयाचे ठोके चुकले होते आता रात्रीचे एक वाजून गेले आहेत. तुम्हाला काही कळत की नाही कोणी तरी घरी तुमची वाट बघत आहेत व तिथे आप्पा तुमच्या चिंतेत देवघरात एकटेच बसलेले आहेत सारखा त्यांचा देवाचा धावा सुरू होता.पोरांना काही झालं तर नाही ना? आणि तुम्ही दोघं सांगा मला अस कोण वागत का? दादा तू आम्हाला काही बोलु देणार आहेस का? तूच एकटा बोलत आहेस बोला काय बोलायचं मी ऐकतो तुमच दादा'आम्ही दोघे जंगलातून येत असताना आमच्या बरोबर अस काही भयानक घडलं आहे ना त्याचा भीतीने अजूनही अंगाची लाहीलाही होते आहे.म्हणूनच उशीर झाला आम्हाला.त्यावर लगेच दादा म्हणतो'असे झालं तरी काय? आणि मी' म्हणतो तुम्ही दोघे जंगलात गेलातच कशाला?काही गरज होती का जायची.चला आता घरात आप्पा वाट पाहतात (पण दादा) आता काहीही एक शब्द बोलू नका गुपचूप आत चला अस खुणेने सांगतात आणि सर्व निःशब्द शांतता का मी आप्पाना बाहेर बोलावू नको नको येतो आम्ही आत जसे अमेय आणि शमा घरात येण्यासाठी पाहूल टाकतात तीतक्यातच दादाच लक्ष अमेयच्या पायाकडे जाते आणि दादा म्हणतो एक मिनिटं अमेय इथे थांब जरा तुझ्या पायातून रक्त का येते बरं काही झालं आहे का तुझ्या बरोबर अमेय म्हणतो नाही रे दादा काही नाही झालं माझ्या बरोबर मग तुझ्या पायातून रक्त का येत? खर सांग अमेय काही दुखापत तर झाली नाही ना ?आणि मुळात खोटं तर बोलूच नको.तू आणि शमा तुम्ही दोघेही खुपच घाबरलेले दिसतात नेमकं तुमच्या सोबत घडलं तरी काय? शमा म्हणते दादा आम्ही दोघे जेव्हा जंगलातून चालत येत होतो त्यावेळी अमेयला झाडांवर काही वटवाघूळ उलटे लटकलेले होते व त्यांचे दिसणारे लालबुंद डोळे व त्यांचा चित्र विचित्र आवाजाने अमेय आणखीनच घाबरला होता.आणि त्याच अवस्थेत तो झटपट चालण्याचा ही प्रयत्न देखील करत होता.आणि याच लगबगीत असतानाच त्याचा पायात काही काटे रुततात शेवाळ पसरलेली जमीन व काटेरी झुडपा मधून चालत असताना त्याला कसलेच भान उरले नव्हते. काटे लागत असताना ही अमेयच लक्ष नव्हतं तो कुठल्या तरी विचारात होता.पण त्याच्या चेहऱ्यावर वर साफ कोणती तरी भीती स्पष्ट दिसत होती.ती भीती लपवण्याचा प्रयत्न करत होता.मी अमेयला खूप विचारणाचा प्रयत्न केला पण अमेय काही सांगत नव्हता शमा म्हणाली.दादा म्हणतो असो.तुम्ही दोघं ठीक आहत ना ? त्यावर अमेय म्हणतो हो दादा आम्ही दोघेही ठीक आहोत.घरात चला आता स्वच्छ हात पाय धुऊन घ्या आणि थोडंसं काही तरी खाऊन घ्या उपाशी पोटी झोपू नका.आणि हो'अमेय जरा खोलीत ये माझे तुझ्याजवळ जरूरी काम आहे.दादा म्हणाला. दादांचे संपूर्ण ऐकून शमा अमेय दोघेही घरात प्रवेश करतात स्वच्छ हात पाय धुत असताना अमेय जोरात ओरडतो त्याच्या अचानक ओरडण्याने शमा दचकते. शमा म्हणते अमेय काय झाले तू असा अचानक मध्येच का ओरडलास.माझ्या पायातून येणाऱ्या असह्य वेदनेमुळे मी ओरडलो. त्यावर लगेच शमा म्हणते........