Ankilesh - 4 books and stories free download online pdf in Marathi

अंकिलेश - एक प्रेमकथा - 4

@ डाॅ. सुरेंद्र गावस्कर

अंकिता माझी एकुलती एक. लाडकी. हुशार ही. मेडिकलला ॲडमिशन घेताना सगळे टाॅपर्स केईएम मध्ये पळतात. मी म्हटले, स्टीक टू अवर ओन इन्स्टिट्यूट. नथिंग डुईंग. त्यात तिच्यावर लक्ष राहिल हा ॲडिशनल विचार होता. अंकिता तशी बोल्ड आणि बिनधास्त आहे. कुठे उगाच गडबड करून ठेवायला नको. आणि शी हॅज बीन ब्राॅट अप ॲज अ प्रिन्सेस.

मी हे का सांगतोय? वेल, बापाचे काळीज आहे. हार्ट आॅफ द डॅड. ॲक्च्युअली अ रीच डॅड. अँड आय वाॅज वरीड. आपली सर्वोत्तम गोष्टच कुणी पळवून नेली तर? हॅव टू बी आॅन द गार्ड. म्हणजे त्या दिवशी अंकिताला त्या मुलाबरोबर काॅफीहाऊस मधून बाहेर येताना पाहिलेले नि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी स्वत: कार्डिआॅलाॅजिस्ट. इमॅजिन एक्स्पिरियन्सिंग अरिदमिया! अँड व्हाॅट मेक्स हर नाॅट टू गो इन अवर ओन कँटीन? व्हाॅट्स सो स्पेशल? तो मुलगा? दॅट सिंपल गाय? नंतर बस मध्ये लोंबकळत गेला. आय वेंट आॅल द वे बिहांइड दॅट बस. सारे पाहिले मी. तो केईममध्ये शिरला.

म्हणजे बहुतेक मेडिकल स्टुडंटच असावा. त्यातल्या त्यात बरेय हे. पण तरीही हे कार्डिआॅलाॅजिस्ट बापाचे धडधडणारे हृदय कळवळलेच.

सिनेमात अशा वेळी पोरीला खोलीत बंद करून ठेवतात म्हणे. पण माझ्याकडे तसा कसलाच एव्हिडन्स नाही. नाहीतर अरूणा, म्हणजे तिची ममा, काॅलेजात असले धंदे करायला जाते का म्हणून ओरडायची.. आधी तिला नि नंतर माझ्यावर डाफरायची.. अजिबात लक्ष नाही पोरीकडे.. अजून बसवा डोक्यावर म्हणत मला डोस पाजणार ती. नाहीतरी फार्म्याकाॅलाॅजिस्टच आहे ती. डोसच पाजणार! तरी बरं.. आमच्या वेळी आमची जोडी अशीच जमलेली.. ती मिस ज्युनियर नि मी एक बॅच सीनियर. जाऊ देत. गेले ते दिवस. आमच्या वेळी वुई वेअर रिस्पाॅन्सिबल पीपल. तर आजकालच्या सिनेमात काय होतंय याचा मात्र मला पत्ता नाही, गेल्या दहा पंधरा वर्षात थिएटरात गेलोच नाही मी. व्हेअर इज द टाईम? बिझी प्रॅक्टिस मधून टू स्पेअर थ्री अवर्स? इंपाॅसिबल. अँड मी कसा तसा वागणार? बेटर टू कीप हर एंगेज्ड! लिटरली! म्हणजे मी डाॅ.अस्थानांचा मुलगा हेरून ठेवला होता. व्हाय नाॅट ट्राय अँड गेट देम टुगेदर? समथिंग नीड्स टू बी डन.. आणि दॅट टू आॅन अ वाॅर फुटिंग!

मग काही दिवसातच 'जस्ट लाइक दॅट' म्हणत डाॅ. अस्थाना अँड हिज सन व्हिजिटेड अस. असे तसे नाही. अस्थाना'ज सन केतन वाॅज ड्रायव्हिंग देअर ओन मर्क. ही मर्क कुठे नि ती लाल बस कुठे? अर्थात तेव्हा आय वाॅजन्ट शुअर दॅट अंकिता हॅज एनिथिंग टू डू विथ दॅट बसवाला बाॅय. सो व्हाॅट? कशाला चान्स घ्यायचा? आणि तो केतन अस्थाना नि अंकिता.. दोघे जेल्ड सो वेल! केतन तिला थर्ड इयरच्या गोष्टी सांगत होता. दे टाॅक्ड फाॅर क्वाईट अ लाँग टाइम. दोघांची जोडी किती छान दिसेल याचा मी विचार करत होतो. केतनला युएसएमएलई देऊन अमेरिकेत जायचेय. अंकिता पण तितकीच हुशार आहे. दे विल हॅव अ ब्राइट फ्युचर.. बट फाॅर दॅट दीड दमडी बाॅय. जनरली मी असे शब्द वापरत नाही. पण जी फॅक्ट आहे ती बदलता येते थोडीच. आज ही माझे मत मी बदलले नाहीये, डाॅ.गावस्कर इज आॅलवेज राईट. मी स्टुडंटस् ना पण हेच शिकवतो. समजा कुणी पेशंट आला, सम अदर डाॅक्टर हॅज सीन हिम.. पहिली गोष्ट टू ॲझ्यूम.. द अदर डाॅक्टर इज आॅलवेज राँग. हीज डायग्नोसिस इज राँग. आता अंकिता इज विथ दॅट बाॅय.. अखिलेश साळवी. द मिल वर्कर'स सन. पण गोष्टीच अशा घडल्या. कुडन्ट हेल्प.. तसा अखिलेश चांगलाय. वेल बिहेव्ड अँड आॅल. अंकिता इज आॅल्सो हॅपी. पण.. आपला क्लास तो आपला क्लास.. गाॅड्स विशेस..

*****

@ अंकिता

अख्खि गेला नि मला काही सुचेनासे झाले. नाऊ व्हाॅट? परत परत त्याच्या काॅलेजात जायला काहीतरी कारण हवे ना? ॲट लिस्ट फाॅर सेक आॅफ इट. बघते, काहीतरी करावे लागेल. आणि पपा? सध्या फक्त म्हणावे, पापा डोन्ट प्रीच! पण इफ ही रियली डिसाइड्स समथिंग? तर त्यांच्या मनात काय?

उगाच गाणं म्हणत बसले,

पापा, आय नो यू आर गोइंग टू बी अपसेट

काॅज आय वाॅज आॅलवेज युवर लिटल गर्ल

बट यू शुड नो बाय नाऊ

आयॅम नाॅट अ बेबी.

पण त्यांच्या मनात काय ह्या प्रश्नाचे उत्तर मला थोड्याच दिवसांत मिळालं. शनिवार होता. ममा सकाळीच म्हणाली, आज लवकर ये घरी. पपांचे फ्रेंड येताहेत. आय सेड, मग मी कशाला? ममा म्हणाली, डू ॲज इट इज टोल्ड! आणि मग आले ते कोण? डाॅ. अस्थाना आणि केतन! माझी ट्यूबलाईट लगेच पेटली. मोस्टली पपा हॅज सीन मी विथ अख्खि. आता लवकरात लवकर मला कोणात तरी गुंतवून टाकायला हवीय. दॅट टू आॅफ हिज स्टँडर्ड! लोक क्लास काॅन्शस असतात ना? पपांसाठी दोनच क्लास सोसायटीत.. रीच अँड पुअर! मग अस्थानासर वगैरेंची कम्युनिटी, लँग्वेज वगैरे हार्डली मॅटर्स. माय अख्खि इज अ जेम. पुढे जे काही झालं त्यात ही प्रूव्हड दॅट. पण पपांनी अजून त्यांचं मत नाही बदललं. अर्थात आय हॅव चेंज्ड मायसेल्फ अ लाॅट. मनी कान्ट गेट यू सो मेनी थिंग्स. एनी वे. धिस इज मच मच लेटर. मध्ये लाॅट आॅफ रामायण हॅड टू हॅपन. की महाभारत?

हे सगळं इन रिट्रोस्पेक्ट सांगताना किती छान वाटतं ना? म्हणजे आपल्याला त्याचा एन्ड हॅपी होणार हे तेव्हा ठाऊक नसतं. व्हेन यू आर ॲक्च्युअली गोइंग थ्रू इट, इट्स टफ. पण आज वाटतंय, इट्स ओके. आॅल इज वेल दॅट एंड्स वेल! मुव्हीज अँड आॅल आर मच बेटर. मोस्ट आॅफ देम हॅव अ हॅपी एंड. रियल लाईफ पण तसंच असतं तर?

तसा केतन चांगला होता, आणि आहे ही. अजूनही कधी कधी काॅन्टॅक्ट असतो आमचा. आम्ही त्या दिवशी खूप गप्पा मारल्या. आय लाइक्ड हिज ॲप्रोच टू मेडिसिन. तसा तो ही मला आवडला. अख्खि भेटण्याआधी भेटला असता तर.. कदाचित.. टुडे आय वुड हॅव बीन इन यु एस! पण वुई हॅव ओन्ली वन चान्स. आणि आय हॅड चोझन माय प्रिन्स. इट्स डिफिकल्ट.. पण कठीण गोष्टी मिळवण्यातच तर खरी गंमत आहे. अर्थात ते इतके कठीण असेल असे नव्हते वाटले. पण ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.. खरेतर आता फक्त काही दिवस उलटून गेलेले अख्खि भेटून. त्या दिवसानंतर भेट नाही. मुद्दाम एफर्ट्स केले नाहीत तर वुई वोन्ट मीट इझिली. त्याच्या बाॅडी लँग्वेजवरून तर त्याला मी आवडले असणार. या थोड्याच दिवसात इतका फरक पडावा? मला त्याच्याशिवाय काही सुचू नये? एकदा वाटले, सरळ उठून त्याला भेटावे. उगाच त्यासाठी कारणं कशाला शोधायची? सरळ सांगून टाकायचे, अखिलेश.. आय लव्ह यू. उगाच बिटिंग अराउंड बुश कशाला? जो है सो है. एक दोनदा मी जायला उठले ही. नायर टू केईएम तसं फार दूर नाही. पण थोडे पुढे जाताच परत फिरले. मला जे वाटले तेच अख्खिला ही वाटत असेल? वाटत असेलच ना? गाॅड नोज! कदाचित मी मोठ्या डाॅक्टरची मुलगी.. श्रीमंताघरची म्हणून तो विचार सोडून तर देणार नाही? आणि असे असेल तर अनलेस आय टेल हिम.. ही वुडंट मेक एनी मुव्हज.. व्हाय इज द वर्ल्ड सो डिफिकल्ट प्लेस टू लिव्ह? अँड व्हाय इज देअर सो मच डिस्पॅरिटी?

उगाच मी रस्त्यावरून पायी निघाले. म्हटले, गाडीतून इतकी वर्षे फिरले, लेट मी सी हाऊ इज इट टू लिव्ह लाइक अ काॅमनर.. रस्त्यात एका मोठ्या पाण्याच्या पायपात एक फॅमिली रहात होती. ती बाई स्टोव्हवर जेवण बनवत होती. कडेवर एक पोर आणि बाजूला एक पोर धावत होतं. त्याच्या पुढे टेंटसारख्या झोपडीत राहणारे कोणी.. मग ॲक्च्युअल झोपडीतले.. विचार केला.. धिस इज अ हायरार्की.. पाईपवाल्याहून तंबूवाला नि तंबूवाल्याहून झोपडीवाला रीचर.. मग त्यापेक्षा वन रूम वाले, वन रूम किचन वाले वगैरे श्रीमंतच.. मोठमोठ्या घरातून राहणाऱ्यांपेक्षा बंगलेवाले श्रीमंत. अँड फनी थिंग इज एव्हरीवन काॅल्स व्हाॅट एव्हर दे हॅव ॲज देअर ओन हाऊस.. किंवा खरेतर होम! व्हाय लुक डाऊन अपाॅन एनीवन जस्ट बाय व्हाॅट दे हॅव? कुणी मोठ्या बंगल्यातल्यांसाठी डाॅ.गावस्कर कॅन बी ॲन ॲव्हरेज पर्सन! कदाचित हे मला आधीपासूनच वाटत होतं. आज उगाच फिरताना त्याबद्दल एक सिस्टमॅटिक थाॅट प्रोसेस तयार झाली असावी. एक गोष्ट पक्की होती. अख्खि इज समवन आय लाईक. मग तो कुठेही राहात असो. ॲंड व्हाॅट एव्हर हीज सोशल स्टॅटस. आय लाइक हिम.. आय कान्ट ॲफोर्ड टू मिस हिम.. काहीतरी करायला हवे.

काय करावे विचार करता करता जाणवले.. यस.. आय विल गो टू केईएम हाॅस्पिटल टू मीट हिम. ते ही त्याच लाल बस मधून..