Ankilesh - 24 books and stories free download online pdf in Marathi

अंकिलेश - एक प्रेमकथा - 24

२४

@ अंकिता

माझे रूटीन सुरूच होते. तीच लेक्चर्स.. तेच वाॅर्डस, राउंड्स, इमर्जन्सिज, क्लिनिक्स.. आणि अभ्यास पण! मान वर करून बघायला वेळ हवा ना! त्यात एक बरं होतं, अख्खि फ्रंट आता सेटल्ड होता. दर रविवारचे सायकलिंग आमचे सुरू होतेच कारण बाकी दिवशी वेळ कुठे मिळणार. त्या एक तासात पूर्ण वीक बद्दल बोलून घ्यायचे. आता 'त्या' प्रपोझल नंतर बोलण्याचे विषयही बदलले आमचे. अर्लियर दे वेअर इन जनरल.. नाऊ दे वेअर स्पेसिफिक! म्हणजे कदाचित म्युच्युअल ॲडमिरेशन सोसायटी म्हणा! बट अख्खि'ज रिअल ॲडमायरर वाॅज.. अँड इज, माय माॅम. ममा आजही म्हणते, देवास ठाऊक तुला दुसऱ्या कुणी कसे सांभाळले असते? मी म्हणाले तिला, मग काय झाले? शोधून तर मीच काढलाय ना त्याला? डझंट गाॅड हॅव टू टेक केअर आॅफ एव्हरीबडी?

पपांच्या त्या अस्थाना भेटीनंतर सगळीकडे शांतता होती बरेच दिवस. केतनच्या फायनल एक्झामला अवकाश होता त्यामुळे पपांचा नाईलाज होता.. मग एक दिवस रात्री पपा आईला सांगताना ऐकले मी,"वुई विल हॅव टू लूक फाॅर अनदर बाॅय फाॅर अंकिता!"

"का?"

"केतनवर अवलंबून राहात नाही येणार."

"का? केतनने कळवले काही? अस्थाना तर म्हणालेले फायनल एक्झामपर्यंत थांबा."

"नाही.. पण सगळे काही कळवायलाच हवे असे थोडीच आहे?'

"म्हणजे?"

"म्हणजे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्डस!"

"म्हणजे? आय हॅड लाइक्ड दॅट बाॅय!"

"काही नाही.. आता नवीन कोणी तरी शोधायला लागेल. अरूणा, मी डाॅ.बेर्डेंकडे जाणार आहे.."

"पण केतन?"

"अगं ही हॅज हिज ओन गर्लफ्रेंड.."

"त्याने सांगितलं?"

"नो! मी पाहिलं. काॅलेज कट्ट्यावर.."

"आणि हे बेरड कोण?"

"बेरड नाही, बेर्डे. डाॅ.बेर्डे. ही रन्स अ मॅट्रिमोनियल एजन्सी. आणि ती ही ओन्ली फाॅर डाॅक्टर्स.."

"म्हणजे तू त्या मॅट्रिमोनियल वाल्यांकडून मुलं शोधणारेस?"

"काय हरकत आहे? बॅकग्राउंड माहिती असायला नको? तुला नाही कळणार. बाप आहे मी अंकिताचा!"

"अस्सं.. मग मी कोण? सावत्र आई?"

खरेतर ममाला चिडताना मी फारसे पाहिले नाही मी कधी. चिडण्याचे काम पपांचे. ममा इज कुल ॲज कुकुंबर.. किंवा आइस्क्रीम! मी सध्या ममाच्या तेव्हाच्या वयाइतकी नाही झाले तरी मधून मधून उगाच भांडावेसे वाटते, काही कारण नसताना. पण ममा जनरली नेव्हर फाइट्स! नाऊ पुअर अखिलेश इज ॲट द रिसिव्हिंग एंड.. तो फक्त एकच बोलतो, देअर इज नो लाॅजिक इन युवर आर्ग्युमेंट्स! जसं काही सगळं जग लाॅजिकप्रमाणेच चालतं! इजन्ट धिस कन्सेप्ट इटसेल्फ इललाॅजिकल? बट टू टेल यू द फॅक्ट,

नाही म्हणायला एक गोष्ट मी लाॅजिकप्रमाणे केलेली.. ती म्हणजे काँटॅक्टिंग केतन! केतन स्वत:च नकार देईल तर माय जाॅब वुड बी इझी! ती देखील एक गंमतच..

शनिवार दुपार होती ती. मी केतनला शोधत कँपसमध्ये फिरत होते.. शेवटी तो कँटिनमध्ये एकटाच बसलेला सापडला.

"हाय! आय ॲम अंकिता!"

"आॅफ कोर्स आय नो. वुई मेट दॅट डे.. लाँग बॅक.."

"अँड माय पेरेंट्स रिसेंटली व्हिजिटेड युवर होम.."

"आय नो.. हर्ड दॅट.."

"तुला माहिती आहे ते का आले होते?"

"नाही. माय फादर अँड युवर्स आर व्हेरी गुड फ्रेंडस्.."

"ऐक, दे वाँट अस टू बी टुगेदर!"

केतनचा चेहरा अचानक पडला.. पण सावरत म्हणाला,

"इज इट?"

मग पुढे तोच म्हणाला,"तुझं काय मत आहे त्याबद्दल.."

"मी त्यासाठीच तुला भेटायला आलेय.. इफ यू कुड.."

इतक्यात एक मुलगी जवळ आली.. श्रावणी बॅनर्जी. माझी सिनियर..

"यू आर हियर केतन, आय सार्चड् एब्हरीव्हेअर..'

"श्राबणी कम.. सीट हियर.."

श्रावणी बसली.

"हू इज शी?" माझ्याकडे पाहात ती म्हणाली.

"अंकिता, डाॅ.गावस्कर्स डाॅटर.. अँड प्रेझेंटली युवर काँपिटीटर!"

"म्हणजे?" मी एकाएकी ओरडलेच..

"ऐक अंकिता, ही श्रावणी. माय व्हेरी गुड फ्रेंड.."

"गुड फ्रेंड? की गर्ल फ्रेंड?"

"बघ, तिला मला माझ्या गर्लफ्रेंडची पोस्ट द्यायची आहे.. पण ही श्राबणी.. शी इज टेकिंग अ लाॅट आॅफ टाइम.. सी, श्राबणी, तू नाही बोललीस तर आॅप्शन बी समोरच आहे!"

त्याला बुक्क्यांनी मारत श्रावणी म्हणाली,"यू.. शैतान.. माॅर खाबे.."

"ग्रेट! कमिंग बॅक सून.."

केतनला एकाएकी काय झाले की तो "जस्ट अ सेकंद म्हणून उठून गेला.. मार खाबे म्हणाली ती तर तो मार खायला गेला की काय? ती जेमतेम पाच मिनिटं आम्ही दोघीच तिथे होतो, पण श्रावणीच्या चेहऱ्यावर कुणी तरी मोठा शत्रू समोर असल्याचा भाव होता. देअर वाॅज ॲन अनईझी सायलेन्स! इतक्यात केतन आलाच परत. त्याच्या हातात ती डबी.. ती उघडून त्याने रिंग काढली.. श्रावणीच्या बोटात घालत म्हणाला,

"थ्यांक्स टू यू अंकिता.. नाहीतर शी इज द मोस्ट डिफिकल्ट कॅट टू बेल!"

"आमि कॅट?" बोलता बोलता ती अंगठी निरखत होती. त्यात बहुधा पुढे रागवायची विसरली.

"भीषोण भालो.. डायमाॅन्ड!"

ती हिऱ्याची अंगठी बघत श्रावणी म्हणाली.. तोवर तिचा माझ्यावरचा राग निवळला असावा..

"मग केतन, यू हॅव टू पे फाॅर इट!" मी म्हणाले.

"एनी थिंग.. धिस श्राबणी गेव्ह मी सच टफ टाइम्स!"

"बट नाऊ, जस्ट हेल्प मी विथ माय टफ टाइम्स!"

मी केतनला रिक्वेस्ट करणार होते, की मला नकार दे. पण ते तर आॅलरेडी करून झालेय. अख्खिचा गुण लागला म्हणून की काय, क्विक थिंकिंग लेड मी टू द नेक्स्ट स्टेप!

"जास्त काही नाही.. माय पपा वोन्ट लिव्ह यू सो इझिली. आणि तुझी सुटका नाही म्हणून माझी सुटका नाही!"

"सो व्हाॅट मोअर डू आय डू नाऊ?"

"यू नो, माय पपा इज व्हेरी पंक्च्युअल. नऊ वाजता ही विल पार्क हिज कार.. इन हाॅस्पिटल कँपस.."

"सो?"

"तिथे एक कट्टा आहे.. काॅल्ड लव्हर्स कट्टा.."

"देन?"

"कॅन यू बोथ गिव्ह युवर जस्ट टेन मिनिट्स फाॅर फ्यू डेज?"

"म्हणजे?"

ही सस्पेन्स वाली स्टाईल पण अख्खिची! इतक्या लवकर मला हा गुण लागला?

"डेली फाइव्ह टू नाईन टू नाईन फाईव्ह.."

"व्हाॅट?"

"जस्ट टेन मिनिट्स फाॅर अ गुड काॅज.. इट्स अ विन विन सिच्युएशन.."

"कॅन यू इल्याबोरेट? कट शाॅर्ट द प्रीॲंबल अँड कम टू द पाॅईंट!"

"ओके. सो द प्लॅन इज.. बोथ आॅफ यू सीट आॅन दॅट कट्टा.. लव्हर्स कट्टा! आणि सीट ॲज इफ यू आर आॅब्लिव्हियस आॅफ द रेस्ट आॅफ द वर्ल्ड!"

"ओ के.. लव्हर्स! व्हाय नाॅट!"

केतनच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता..

"टेन मिनिटस ओन्ली फाॅर मी! रेस्ट हाऊ मच टाईम यू कॅन डिसाईड!"

"ग्रेट!"

'अँड वन्स डॅडी सीज यू विथ हर.. फ्यू टाईम्स.."

"मग?"

"मग काय? ही विल लिव्ह अस अलोन!"

"वाॅव, व्हाॅट अ प्लॅनिंग.. उद्याच सुरू करतो.." केतन आताच उतावीळ झालेला!

"बट डाॅर्लिंग.. टुमाॅरो इज साॅन्डे.."

"सो व्हाॅट! वुई विल प्रॅक्टिस.. रिहर्सल! अँड दे से प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट!"

श्रावणी ते ऐकून चक्क लाजली..

"श्राबणी, माय डॅडी कम्स वाॅकिंग टू हाॅस्पिटल. सो इट्स सेफ.. पण अंकिता हे सारे कोणासाठी?"

"आहे एक.. नाॅट फ्राॅम अवर काॅलेज.."

"ओह! आय थिंक आय नो हिम! लेट मी गेस.."

"गेस?"

"यस, दॅट अखिलेश समथिंग?"

"यस! हाऊ डू यू नो?"

"कम आॅन.. दॅट क्रिकेट मॅच वुई वन लास्ट इयर.. बाकी सारे आमच्या टीम बरोबर होते.. अँड यू वेअर बिहाईंड हिम! डोन्ट थिंक नो वन नोटिसेस.."

"सो डन! नाऊ लेट्स गो डाॅर्लिंग.." श्रावणी म्हणाली..

"व्हेअर? नाऊ इमिडियेटली टू लव्हर्स कट्टा?"

"यू.. शैतान बाॅय..!"

थोडक्यात ती केतन स्टोरी इथे संपायला हवी! नाही, संपलीच! पण पपांचे हे नवीन काय? मॅरेज ब्युरो? केतनला मी पर्सनली सांगू शकत होते .. पण ते मॅट्रिमोनियल मधून आले कुणी बाॅईज तर? हाऊ डू आय मॅनेज? लेट मी सी.. विल क्राॅस द रिव्हर व्हेन आय कम अक्राॅस इट! टिल देन धिस वाॅज इनफ!