Ankilesh - 29 books and stories free download online pdf in Marathi

अंकिलेश - एक प्रेमकथा - 29

२९

@ अंकिता

थर्ड इयर थर्ड टर्म! सगळ्यात टफ एक्झाम. मी इकडे तिकडे न पाहता अभ्यास एके अभ्यासावर लक्ष काॅन्सन्ट्रेट केलेलं. पण तरी बॅकग्राउंडवर पपांच्या ॲक्टिव्हिटीज लक्षात येत होत्याच. कोणत्या त्या ब्युरोमधून मुलांची माहिती काढत होते, मध्ये मध्ये मम्मी आणि त्यांची डिस्कशन्स चालत होती. लक्षात येत होते ते एक, पपांच्या यातील कोणीच पसंतीस पडत नव्हते. एक्झाम संपली. ममाने अख्खिला घरी बोलावलेले ते ही पपांना सांगून. ममा इज ग्रेट. कारण तिने अखिलेशबद्दल स्वत:च पपांना सारे सांगून टाकलेले. आता पुढे काय? पपांनी मग एक दिवस अखिलेशलाच इंटरव्ह्यूला बोलावले.. मी म्हटले त्याला,"कँडिडेट शुड ॲपिअर फाॅर द इंटरव्ह्यू फाॅर द पोस्ट आॅफ अंकिता गावस्कर्स हजबंड.. प्लीज नोट, जस्ट काॅल फाॅर द इंटरव्ह्यू डझ नाॅट गॅरंटी द जाॅब!"

"टेन्शन! कमितकमी एक्झाम मध्ये विषय माहिती असतो नि पोर्शनही. इथे दोन्ही ठाऊक नाही.."

"तुला सांगू.. इफ ही गेट्स ॲजिटेटेड.. मग काही खरं नाही.."

"तू मला धीर द्यायचा सोडून घाबरवतेस कशाला?"

ॲक्च्युअली मी त्याला घाबरवत नव्हते, खरं तेच सांगत होते. फक्त एकच होप होती, पपा हॅजन्ट रिजेक्टेड हिम आऊट राइट!

अख्खिला म्हणाला मला,"शायद तेरी शादी का खयाल दिलमें आया है.. इसी लिए पपाने तेरे मुझे लंच पे बुलाया है!"ट

कुठून असली गाणी शोधतो अख्खि कोणास ठाऊक.

मग एक दिवस अख्खि आला. त्या दिवशी मी माझ्या हाताने जेवण बनवलेलं. मला कुकिंगची हौस भारी. आजवर मी कधीही अख्खिला भेटायला जाताना हळूच डब्यातून काही ना काही घेऊन जायचे. त्यासाठी मला तो 'खाऊ डबे वाली आली' म्हणून चिडवायचाही नि तो नि त्याचे ते मित्र मिळून डब्याचा फडशा पाडायचे. तशी मी त्यामुळे त्याच्या मित्रांत बऱ्यापैकी पाॅप्युलर होते. शेवटी हृदयाचा मार्ग पोटातून जातो म्हणतात.. कितीही अनसायंटिफिक असलं तरी खरंच आहे की हे! पण आज त्याच्यासाठी स्पेशल जेवण.. माझ्या हातचं. एकच.. पपांनी आधी जेवू द्यावं नि मग घालावा जो काय घालायचा तो गोंधळ! तशी मनाची तयारी मी स्वत:ची तर केलीच होती, पण अख्खिसाठी स्पेशल कोचिंग क्लास चालवला होता! म्हणजे एकदा पपांचे बंबार्डिंग सुरू झाले तरी मानसिक तयारीचे चिलखत घालून अख्खि आलेला बरा! अख्खि मात्र स्वत:च म्हणालेला,"ही इज राईट! एखाद्याला मुलगी देताना असे व्हायचेच. हिज इंटेंशन्स आर राईट. मग थोडंफार आपण ऐकून घेतलं तर काय बिघडलं.." मनात

म्हटलं, थोडंफार? थोडं नाहीच.. फारच!

पण त्या दिवशी पपांनी कोणाचं तोंड आरशात पाहिलं होतं कुणास ठाऊक .. अँटिक्लायमॅक्स म्हणावे असं सारं घडलं. म्हणजे आय कुडन्ट बिलिव्ह इट!

आल्या आल्या पहिल्यांदा म्हणाले,"वेलकम यंग बाॅय.."

अखिलेश थोडा गोंधळलेला..

मग इकड तिकडच्या गप्पा झाल्या. अखिलेशची फॅमिली हिस्टरी घेऊन झाली.. मूळ मुद्दा अजून बाकी आहे याची आठवण करून देत असल्यासारखे पपा म्हणाले,

"आधी जेवून घेऊ. भरल्यापोटी नीट बोलता येईल.."

जेवणाच्या टेबलावर बसल्यावर डॅडींना एकेकाची टांग खेचायला आवडते. कितीही सिरियस असले तरी पपा जेवताना कधीच कोणाला ओरडत नाहीत. आज तर प्रत्यक्ष सन इन लाॅ समोर बसलेला..

"घे अखिलेश.. काही झालं तर मी आहे.. अ कार्डिआॅलाॅजिस्ट कॅन ट्रिट स्टमक एलमेंट्स.. नाही म्हणजे अंकिताने बनवलेय जेवण म्हणून ही.."

"स्टॅट्युटरी वाॅर्निंग!"

हे वाक्य चक्क अख्खिने पूर्ण केले. अख्खिची ही सवयच आहे. नको तिथे कमेंट करायची. पण डॅड वाॅज इंप्रेस्ड!

"ग्रेट. मी नुसतेच वाॅर्निंग म्हणणार होतो. युवर वर्डस आर मोअर ॲप्ट.. अरूणा म्हणाली मला, यु आर अ गुड रायटर.. खरंच दिसतंय ते! तशी अरूणा कोणाला चांगलं म्हणत नाही.. तुला म्हणून सांगतो, थर्टी इयर्स अगो ती मला चांगला आहे मी म्हणालेली. देन वुई गाॅट मॅरीड! मग तो प्रश्नच मिटला.."

"तुम्ही काहीही बोलू नका पोरांसमोर.." मम्मी खोट्या रागात म्हणाली.

"तू पण विचार कर. आज अंकिता चांगलाय म्हणतेय खरी बट दॅट वोन्ट लास्ट फाॅर लाॅंग.."

"सुरेन्द्र पण ते पोस्ट मॅरेज.."

मम्मीचा प्रयत्न होता हे दाखवण्याचा की पपा इजन्ट ॲव्हर्स टू अवर मॅरेज!

 

जेवणानंतर पपांनी एकदम रंग पालटला..

"यंग मॅन! यू मे नाॅट नो ॲक्च्युअल आटे दाल का भाव.."

"माहितीय सर, म्हणजे अगदी सहा महिने आधीपर्यंत मी ते आणायचो. आईला मदत म्हणून.. आता अभ्यासच जास्त तेव्हा आईच म्हणाली परिक्षेत कोणी डाळ तांदळाचे भाव विचारणार नाहीत.."

"ओह यंग मॅन. शी वाॅज राईट पण त्यांना ह्या वरपरीक्षेबद्दल माहिती नसणार.. पण आय डिडन्ट लिटरली मीन दॅट.."

वर म्हणजे ग्रुम हे मला नंतर अख्खिनेच नंतर भेटल्यावर सांगितले!

"साॅरी सर..!"

"तर तुला आयडिया आहे हाऊ मच पाॅकेटमनी डझ अंकिता गेट?"

"नाही सर.."

मी झटकन उठून आत गेले. माझ्याकडे एक चांगला डबा होता त्यात साठवलेले माझे पैसे.. पपा पाॅकेटमनी खूप देत हे खरेच. मी ही ते खर्च करायचे अखिलेश भेटेपर्यंत. मग मी स्वत:च खर्च कमी केलेला.. जस्ट टू गेट ॲडजस्टेड..

"अरे, तुझा महिनाभरचा खर्च तो हिचा दिवसाचा.."

"एक मिनिट पपा.. सी धिस. गेल्या दीड वर्षात मी वाचवलेले पैसे. आय हॅव मॅनेज्ड टू कीप एक्स्पेन्सेस टू द मिनिमम.." पपा यावर चिडतील असे वाटलेले, पण नाही, ही वाॅज कुल अबाऊट इट..

"हिचे कपडे, चपला नि सॅंडल्स.. गाडी नि घोडा.. हाऊ विल यू हँडल यंग बाॅय?"

"तू काहीही विचारतोयस सुरेंद्र. व्हाय विल ही मॅनेज. इजन्ट युवर डाॅटर क्वालिफाइड हरसेल्फ? शी इज! आणि आय ॲम प्राऊड आॅफ हर!" ममा'ज आर्ग्युमेंट्स काॅट पापा आॅन द राँग फूट!माझ्याबद्दल ते, नाही.. शी इजन्ट क्वालिफाइड कसे म्हणणार?

"हाऊ बिग आॅर स्माॅल इज युवर हाऊस?"

"वन रूम किचन.."

"अंकिता'स रूम इज बिगर दॅन युवर एंटायर हाऊस! अरूणा मॅडम, नाऊ हाऊ इज धिस टू बी हँडल्ड? बोल!" डॅड वाॅज रेझिंग द इश्यू फाॅर विच नो वन हॅड द आन्सर. माझा डिसिजन त्यामुळे बदलणार नसला तरी ही रियालिटी तर ही होतीच आणि मुंबईसारख्या ठिकाणी अख्खि मोठी जागा घेण्याचा विचार तरी कसा करणार होता.. तो गप्पच होता. खाली मान घालून.. त्या एका क्षणी मला पपा नेहमी काय म्हणतात ते कळले. बिइंग पुअर इज नाॅट समथिंग राँग.. बट इट मेक्स यू फेस सच सिच्युएशन्स फाॅर व्हिच देअर आर नो आन्सर्स. पुअर अखिलेश हॅज टू फेस धिस.. त्यानंतरच्या पपांच्या वाक्याने मात्र क्षणार्धात सगळा सीन बदलला..

"सो यंग मॅन.. एक गोष्ट लक्षात घे.. आफ्टर सो मेनी इयर्स आॅफ स्ट्रगल आय हॅव रियलाईज्ड धिस.. साइझ आॅफ द हाऊस डझन्ट मॅटर.. बट साइझ आॅफ युवर हार्ट डझ! आणि जर तुमचे मन मोठे असेल तर तुम्ही हवे त्यांना तिथे सामावून घेऊ शकता. सो चिअर अप.. आय वाँट यू टू डू वेल.. बाकी मनी अँड आॅल फाॅलोज. आजकालची पोरं मेडिसिनसाठी तितकी पॅशनेट आहेत का ठाऊक नाही.. बट यू सीम टू बी .. म्हणजे या अंकिताचे बायस्ड ओपिनियन मान्य करायचे तर!"

अखिलेश या वाक्यांनंतर खरंच भारावला. नजर वर करून तो बहुधा नजरेनेच पपांना थ्यँक्स म्हणाला. तो गेल्यावर पपा म्हणाले,"द बाॅय इज ओके. मराठीत म्हणतात ना, पदरी पडले पवित्र झाले. आता तुला तोच हवा म्हणशील तर मी तरी काय करणार.. एकच.. मॅरेज ओन्ली आफ्टर युवर पोस्ट ग्रॅज्युएशन. तेवढी तीन वर्षे तरी तू राहशील माझ्याबरोबर. अँड वन मोअर थिंग.. बाय नो मीन्स आय लाइक धिस बाॅय!"

मम्मा नंतर म्हणाली मला,"सुरेंद्रला आवडला काय न आवडला काय.. तुला आवडला मग झालं. आणि त्याला पटलं नसतं तर त्याने इतक्या पटकन मानलंच नसतं.. सो इग्नोअर हिज कमेंट्स. फक्त पाॅझिटिव्ह मेसेज घे.. दॅट ही हॅज गिव्हन द परमिशन!" मला याहून जास्त काय हवे होते? अजून थोडे दिवस इन्टर्नशिपचे बाकी होते.. त्यात मी स्वप्न पाहात गात होते..

सच अ फिलिंग कमिंग ओव्हर मी..

देअर इज अ वंडर इन मोस्ट एव्हरी थिंग आय सी..

नाॅट अ क्लाउड इन द स्काय गाॅट द सन इन माय आइज..

अँड आय वोन्ट बी सर्प्राईज्ड इफ इट्स अ ड्रीम..