Kaay Nate Aaple? - 3 books and stories free download online pdf in Marathi

काय नाते आपले? - 3

सकाळी उठून फ्रेश झाली...... रुचिका तिला साडी नेसण्यात मदत करत होती..... पण बोलत मात्र काहीच नव्हती...... त्यांना ही काहीच करण्याची इच्छा नव्हती..... पण करावं तर लागणार होतच...... आजी पूजेला येत नव्हत्या...... तिला रडायला येत होत सारखच...... इथे कोणी नीट बोलत नव्हत...... सर्व असून सुद्धा नसल्यासारखं वाटत होत तिला...... तिच्या घरचे कोणीच नव्हत आलं पूजेला...... कशीतरी पूजा पार पडते....... जेवणं वैगेरे करून परत ती रूम मध्ये येते आणि रडत असते....रडता रडता तशीच झोपून जाते....... रात्री तिला अभिजितच्या रूम मध्ये पाठवतात...... तिला खूप भीती वाटत असते..... ती रूम मध्ये पाऊल टाकणाराच की अभिजित तिच्या समोर येऊन उभा राहतो......



" मी तुला माझी बायको मानत नाही...... भलेही लग्न झालं असेल तरीसुध्दा...... त्यामुळे तुला माझ्या रूम मध्ये येणाच्या काहीच अधिकार नाही...... तू कुठेही झोप कुठेही रहा...... I don't care......! " म्हणत तो धाडकन तिच्या तोंडावर दरवाजा आपटतो...... ती दचकून मागे सरकते.......




आता मिताली ला सुद्धा राग येतो... ती तशीच बाहेरून जराशी मोठ्याने बोलते...

" मला सुद्धा हौस नाही आहे तुझी बायको बनायची समजलं ना..?? हा तुझा ऍटीट्यूड तुझ्याच कडे ठेव समजलं ना... " मिताली बाहेरूनच ओरडून बोलत होती....!

खालती हॉल मध्ये बसलेले आई - बाबा हे ऐकून गप्पच बसले....

" बघितल का...?? या वात्रट मुलिची जीभ कशी चालते, मला आधीच हि मुलगी सून म्हणुन नको होती..आपल्या नवऱ्याशी कोणी असं बोलत का..?? " आजी.....

" आई... तिने काय स्वतः हुन लग्न केल नाही आहे, कि लगेच एका दिवसात ती आपल्या अभिजित एक्सेप्ट करेल का?? आपला अभि पण पहा कसा वागतोय तिच्याशी.... " बाबा....

" ह्म्म्म... मला तर यावरं काही बोलायचंच नाही.... तुम्ही तुमचं बघून घ्या...." म्हणत आजी निघाली......

आता तसही रात्र झाली होती...





तशी ही आता बरीच रात्र झाली होती....... अभिजित चे आई बाबा पण झोपायला निघून गेले....... मिताली बेड वर पडून होती...... आजचा पूर्ण दिवस डोळ्या पुढून गेला तिच्या....... मनातच विचार करत होतो ती...... लग्न झालंय आता....... आपल्यावर हे कोणत्या जबाबदाऱ्या लादणार तर नाहीत ना...? आपल्याला कॉलेज ला जाऊ देतील का...? कधी जायचं आपण...? ती मनातच विचार करत होती की मोबाईल वर तिच्या मैत्रिणीचा मेसेज फ्लॅश झाला.....


पुढल्या आठवड्यात त्यांची एक्साम सुरू होणार आहे...... तिला पुन्हा दडपण आलं..... एकतर अभ्यास नव्हता झालं तिचा आणि त्यात आता लग्न ही झालं होत..... अश्या परिस्थितीत कॉलेजला कस जायचं ह्याची भीती वाटत होती तिला.....

पण तस ही हे लोक मला सून मानत नाहीत...... हे लग्न सुद्धा जबरदस्ती झालेलं आहे..... मग मीच का मानू हे लग्न मला पण मान्य नाही.... मी माझ्या मर्जी प्रमाणे जगेन.... मला नाही अडवू शकत हे कोणीच लोक..... मनातच विचार करते ती.... आणि उद्या कॉलेजला जायचं ठरवून विचार करतच झोपी जाते.....

सकाळी सगळे जण नाश्ता करत असतात..... तिला कोणीच बोलवत नाही नाश्ता साठी...... ती आली नाही आली कोणालाच काहीच फरक पडत नाही..... सगळे जण असतात फक्त ती नसते..... ती तयार होऊन खाली येते..... तिने जीन्स पँट घातली होती...... आजी लगेच तिला बघून बोलायला सुरुवात करतात.....


" बघितलंस लग्नाला दोन दिवस सुद्धा नाही झाले आणि ही जीन्स पँट घालून आली सासू सासऱ्या पुढे.... हिने लगेच तिचे रंग दाखवायला सुरुवात केली..... म्हणून मला ही मुलगी माझी नातसून म्हणून अजिबात नको होती..... " त्या मिताली कडे तुच्छ नजरेने बघून तिला बरच काही बोलत होत्या...... ती शांत उभी होती डोळ्यात पाणी आली आले होते.....


" आई शांत हो.... तू नाश्ता कर..... मी बघतो..... " अभिजित चे बाबा त्यांचा आईला शांत करतात..... आजी सुद्धा तोंड मुरडत नाश्ता करायला लागते.....



" मिताली बाळा, तू कुठे चालाली आहेस सकाळी सकाळी....? " बाबा शांत पने म्हणतात


" बाबा माझं कॉलेज आहे. आणि ह्या लग्ना मुळे मी माझं कॉलेज नाही थांबवू शकत..... आणि मी ह्या लग्नाला ही मनात नाही त्यामुळे मी रोज कॉलेजला जाणार आहे आणि तुम्हाला काय विचारायचं सुद्धा काहीच संबंध येत नाही कारण तुम्हाला सुध्दा हे लग्न मान्य नाही...... " ते शांतपने स्पष्टीकरण देते..... तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नव्हत..... हे बरोबर अभिजितच्या आईने हेरल होत.....


" तुझ मंगळसूत्र कुठे आहे मिताली...... " अभिजित ची आई तिच्या कडे बघत म्हणाली.....


" माझ्या त्या मंगळसूत्रावर काहीच अधिकार नाही. कोणीच हे लग्न मान्य करत नाही, मग मी का ते मंगळसूत्र घालू..... आणि तुम्ही ही अपेक्षा ठेऊ नका की मी घालावं.... मुळात मला ह्या लग्नात काहीच इंटरेस्ट नाही.... " अस बोलत ती घरा बाहेर पडते......


सर्वांचं राग येत होता तिच्या बोलण्याचा..... पण कोणी काही बोललं नाही, काहीच करू शकत नव्हते ते..... तिने तरी का मान्य करावं हे लग्न अस ही वाटत होत.... त्यामुळे सगळे शांत असतात...... नाश्ता करून सगळे आपल्या आपल्या कामाला जातात......


मिताली डायरेक्ट संध्याकाळी घरी येते.... सकाळी काहीच खाऊन नव्हती गेली ती... कॅन्टीन मध्ये काही खायचं तर ते पैसे घरी यायला लागणार होते म्हणून तिने काहीच खाल्ल नव्हत..... आणि आता तर तिला जेवायची सुद्धा अजिबातच इच्छा नव्हती...... म्हणून ती खाली सुद्धा जेवायला जात नाही...... पुर्ण दिवस ती उपाशी होती..... कोणी तिला विचारलं सुध्दा नव्हत...... निदान माणुसकी म्हणून सुद्धा!!

तिला जायचं नव्हतच जेवायला पण मनात कुठेतरी वाटत होत की त्यांनी विचाराव...... मला कोणीच विचारल नाही.... विचारल असत तरी मी गेलीच नसती..... पण तरी त्यांनी माणुसकी म्हणून तरी विचारायला हवं होत असं वाटतं होत तिला...... ती खूपच भावनिक झाली होती..... तिने उठून डोळे पुसले फ्रेश झाली थोडी...... तोंडात गार पाणी मारलं तर बर वाटलं तिला...... झोप येत नव्हती म्हणून मग ती अभ्यास करतं बसली...... परीक्षा जवळ होत्या म्हणून ती एक्साम ची तयारी करू लागली......

दुसऱ्या दिवशी हि अगदी तसेच झाले , मिताली आई- बाबांचे, तनुजा चे कोणाचेच कॉल उचलत न्हवती..... तिला सर्वात जास्त राग येत होता त्यांचा.... आणी मी काय म्हणुन त्यांचे कॉल का उचलू !!

माझ्या मनाचा विचार केला का त्यांनी...... कि माझा या लग्नाला होकार आहे कि नाही...??? या गोष्टी साठी मी तर त्याना मुळीच माफ करणार नाही....

आणी ताई..... तिने तर धोकाच दिला आहे मला , बहीणच्या नावावर कलंक आहे ती......!! अजिबात माफ करणार नाही मी त्यांना......

मित आपले डोळे पुसत म्हणाली..... गेले 2 दिवस तिने काहीच खाल्लं न्हवत , कॉलेज ला जायची पण कोणाशीच बोलायची नाही... राग नाकावर होता , भूक जिला सहन होत न्हवती आज तीच 2 दिवस उपाशी आहे.....

बरीच रात्र झाली होती.... मिताली ने घड्याळात पाहिले रात्रीचे 1 वाजला होता......

आणी आता प्रमाण्याच्या बाहेर तिला भूक लागली होती , डोळे भरून पण आले होते.... पोट आतमध्ये गेलं होत , ती तशीच उठली आणी रूम च्या बाहेर आली... अंधार होता , तिने बाजूच्या रूम कडे पाहिलं ती अभि ची होती....!! झोपला असेल तो.....

आफ्टर ऑल सगळेच झोपले असतील.... मिताली किचन मध्ये आली..... तिने लाईट बोर्ड शोधून छोटी लाईट लावली... किचन बरंच मोठं होत , जरी फ्लॅट मध्ये राहत असले तरी सगळं एकदम हाय फाय होत..

ती पहिल्यांदाच किचन मध्ये आली होती त्यांच्या..म्हणुन तिला माहीत न्हवत काय कुठे आहे ते.....!! तिने फ्रिज ओपन केला तर त्यात.. काही अंडी होती , आता सिम्पल बनवण्या सारखं हेच आहे....

तिने अंड हातात घेतलं आणी बनवायला जाणार कि... तिला तिच्या पाठी कोणीतरी असल्याची चाहूल लागली..... मिताली थोडी मागे सरकली... आणी कोणाच्या तरी छातीवर आदळली....!! तिची पाठमोरी होती आणी ती व्यक्ती खूप जवळ होती.....





मिताली पटकन पाठी वळली... तर समोर अभिजित होता , ति त्याला पाहून घाबरलीच थोडी....!! तो थोडा रागातच वाटत होता , तो तिच्याकडे लक्ष नं देता पुढे झाला आणी फ्रिज मधून त्याने दोन तीन बाउल काढले.... आणी ओट्यावर ठेवले ,

जाताना फक्त इतकच म्हणाला कि... " भूक लागली असेल तर गरम करून खा.... "



अभिजित रूम मध्ये आला....... आणी त्याने बेडवर अंग झोकून दिल....... " आणी पुन्हा त्याला तीच आठवली... "



कौन ख्वाब मे
धुँधला सा चेहरा
तू थि य कोइ फरिश्ता था

कौन ख्वाब मे
धुँधला सा चेहरा
तू थि य कोइ फरिश्ता था

tujhse milne se pehale bhi
तेरा मेरा कोई

रिश्तो को ।।
रिश्तो को ।।
रिष्ट ता ।। ओ ।।
रिश्तो को ।।
रिश्तो को ।।
रिष्ट ता ।। ओ ।।.....




अभिजित...... जागाच होता , साध्या त्याचा कामाचा लोड होता म्हणुन तो लॅपटॉप वर काम करत होता....,या दिन दिवसात त्याने पाहिले होती कि.... ती जेवत न्हवती...आणी रात्री तो किचन मध्ये आला आणी तिला पाहिलं...... तिला काहीच भेटणार नाही हे माहीत होत म्हणुन शेवटी त्यानेच फ्रिज मधून काढून दिल........!! बाकी त्याला तिच्याशी काय घेणं देण न्हवत............!!

पोटभर जेवून मिताली रूम मध्ये आली...... तोच तिच्या मेसेज ची tune वाजली..... रीने मेसेज ओपन केला , त्यांच्या miss ने मेसेज send केला होता कॉलेज ग्रुप वर.....



" Students should pay college fees as soon as possible, Otherwise, he will not be allowed to sit for the exam..."

आता मिताली ला टेन्शन आलं.... फीज आता कुठून भरू मी....??? आई -बाबा कडे तर मागूच नाही शकत आणी इथे तर शक्यच नाही......


क्रमशः....