Kaay Nate Aaple? - 4 books and stories free download online pdf in Marathi

काय नाते आपले? - 4

Students should pay college fees as soon as possible Otherwise, he will not be allowed to sit for the exam....."





आता मिताली ला टेन्शन आलं.... फीज आता कुठून भरू मी....??? आई -बाबा कडे तर मागूच नाही शकत आणी इथे तर शक्यच नाही......



मिताली आता विचारात पडली , फीज पे केल्या शिवाय एक्साम ला बसू नाही शकत , यार असं कुठे असत का?? मिताली थोडं चिडून म्हणाली.......



तिला आता खूप जास्त टेन्शन आलं होत , खरंच लाईफ किती डिफिकल्ट आहे...... लाईफ नाही...... हे लग्न च पणवती आहे , हे लग्न झाल्यापासून काही ना काही होतंच आहे , माझं लग्न झालंय हे तर आता अक्ख्या कॉलेज ला समजलं असेल...... होती तेवढी इज्जत पण गेली माझी..... लग्न केल ते पण माझ्याहून 7-8 वर्षाने मोठ्या असलेल्या माणसाशी......!!




आता मिताली ला टेंशन आलेले की आपण फीस आणायची कोठून..... ती तशीच विचार करत टेन्शन मधे झोपून जाते...... सकाळी उठून विचार करते आपण टीचर ला विचारून काहीतरी करू....... काही ना काहीतरी होऊन जाईल....... कारण आई-बाबा कडे तर ती जाणार च नव्हती...... आणि अभिजीत कडे पैसे मागण्याचा तर प्रश्नच येत नाही....... ते साधं एकमेकांच तोंड सुद्धा बघायचे नाही.......




ती तशीच दुसऱ्या दिवशी उठून कॉलेजला जाते...... पण यावेळी जाताना मात्र ती नाष्टा चहा करून जाते कारण तिच्यासाठी वेगळा काढून ठेवलेला असतो......! हे तिला समजून जाते तसंही तिला भूक खूप लागलेली असते त्यामुळे ती करूनच जाते........




आज तिने वनपीस घातला होता...... तिला पाहून आजी ने नेहमीप्रमाणे टोमणे मारायचा पट्टा चालू केला..... मिताली जास्त त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती..... ती तिचं सगळं आवरून कॉलेजला येते........ कॉलेजमध्ये येताच तिला तिचा बेस्ट फ्रेंड दिसतो त्याचं नाव राहुल असत.....!! मिताली त्याला आवाज देत असतेच कि तो तिला इग्नोर करून निघून जातो......




सगळ्यांसमोर इशारा करून त्याने पाहून सुद्धा इग्नोर केल....... याच तिला खुप वाईट वाटलं, तिला पाहून राहुल तिकडून निघाला...... तशी मिताली पण त्याच्या पाठोपाठ आवाज देत निघाली......


राहुल.... राहुल....


शेवटी मिताली ने त्याचा रस्ता च अडवला.....


" राहुल काय झालंय तुला तू का सारखा सारखा मला इग्नोर करतो.....?? "


तस राहुल तिला बोलतो " काहीच नाही मला काम आहेत सध्या... मी जातो आपण नंतर बोलू...... "


" नंतर ला खूप अंतर असत राहुल......... " यावेळेस बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होत....! त्याने एक मोठा श्वास घेतला आणी पुढे निघाला..... तो जातच होता कि तोपर्यंत ती त्याचा हात पकडते आणि थांबवते....



" मी तुला इतकी परकी झाली का की तू मला इग्नोर करून जात आहेस , की तुला लाज वाटते का लग्न झालेल्या मुलीचा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून....?? " मिताली....


राहुल ला तीच बोलणं टोचत...... नकळत त्याला वाईट वाटत, कि आपण कस इग्नोर करतोय...!! तो मिताली कडे वळला आणी म्हणाला.......
" तस काही नाही मित पण..... "


" तस काही नाही म्हणजे काय राहुल.....अजून पण " पण येतच आहे का......?? बरोबर आहे सगळ्यांना मीच वाईट वाटतेय..... माझी काही चूकि नसून....... " मिताली रडत म्हणाली......



" कोणी नाही पण तु मला समजून घेशील असं वाटल होत बट नो...... मीच चुकीची होती कि तुझ्यासारख्या मुलावर मी, विश्वास ठेऊन आपलं मन मोकळ करायला तुझ्याजवळ आली....... " मिताली आपले डोळे पुसत म्हणाली आणी तिथून जायला निघाली.....


राहुल ला अजूनच गिल्टी फील झाल...... तो लगेच तिच्या पाठी गेला.....


" मितु यार खरंच sorry यार......... प्लिझ अशी रागवून नको जाऊस ग....... " राहुल



" राग नाही आला रे... बस थोडं वाईट वाटतंय.. " मिताली बाजूला असलेल्या बेंच वर बसत म्हणाली....




" अगं तसं काही नाही पण तु अस अचानक लग्न केलस
ते पण असं कोणाला न सांगता आणि त्यादिवशी तू मला इग्नोर करत होतीस आणि म्हणून मला राग आला आणि वाईट पण वाटलं........ " राहुल.



त्यावर ती त्याला म्हणते
" खरंच सॉरी माझी मनस्थितीच नव्हती कोणाला फेस करायची आणि हे सगळ अचानक झाल की....... आणि हा हे लग्न वगैरे काही बोलू नको मी या लग्नाला मानतच नाही त्यामुळे प्लीज.....आपण बेस्ट फ्रेंड आहोत आणि राहणार आहोत....... "



त्यानंतर ते दोघे सगळ विसरून बोलायला लागतात.....
त्यानंतर तिचा फीज चा प्रॉब्लेम राहुल ला सांगते फीज कशी भरणार कारण बोलले तर ती कोणाशीच नसते मग ती सगळ राहुलला शेअर करते.........




राहुल हा तिचा खूप आधीपासूनच बेस्ट फ्रेंड होता..... आणि श्रीमंत घरातला सुद्धा.....!! त्याचं एक तर्फी प्रेम सुद्धा असतं मिताली वर....... म्हणून त्याला खूप वाईट वाटतं की तिचं लग्न झालं, म्हणून तो तिला इग्नोर करत असतो.......


तो मिताली ला म्हणती......
" बस का इतकच आहे ना, मी तुझी फीज भरतो हव तर...... तू मला नंतर किंवा तुला जमेल तेव्हा रिटर्न कर......"



" अरे नाही खरंच त्याची काही गरज नाही...... मी बघेन काहीतरी..... "



" अरे असं काय ग मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना....!! एवढं तर मी तुझ्यासाठी करू शकतो....... हवं तर तू मला तुला जॉब लागला किंवा पार्ट टाइम जॉब लागला तर रिटर्न कर....... मी थोडी म्हणतोय की तुझ्याकडेच ठेव....... "

मिताली पण जात आढेवढे न घेता होकार देते.......
तिचा तो फीज चा प्रॉब्लेम प्रॉब्लेम तिथेच सॉल्व होतो......
कारण दोघेही फ्री माइंडेड असतात, आणि तिलाही गरज असतेच मग तीही जास्त आढेवेढे न घेता तयार होते........ मग तिची सगळी फीज तोच भरून टाकतो....... आता हळूहळू तिची एक्झाम जवळ येऊ लागली...... ती जोमाने अभ्यासाला लागते...... ती आता फक्त कॉलेज अभ्यास एवढेच करत असते...... कधीकधी लेट नाईट अभ्यासाला बसायची, मग तिला भूक लागली की ती किचन मध्ये जाऊन खाऊन घ्यायची........ या सगळ्यात तिच अभिजित कडे लक्ष नव्हते...... त्यामुळे त्यांच्यात काही संवादच व्हायचा नाही तर बघायलाही वेळ नसायचा,

सगळे आपापल्या कामाशी काम ठेवायचे...... अजून तरी घरी कोण तिच्याशी बोलत नव्हते आणि आजीचे टोमणे तर चालूच असायचे तिच्या बाबतीत.....!!

उद्या पासून एक्साम स्टार्ट होत होते.... त्यामुळे शक्यतो मिताली कॉलेज ला जान टाळायचीच , घरीच अभ्यासाला बसायची........ दिवसातून एकदाच ती त्या रूम मधून बाहेर निघत असेल....सगळे झोपायला गेले कि मग ती जेवत असेल , तिला त्यांच्या बरोबर जमायचंच नाही , अर्थात ती स्वतः जुळवून घेत न्हवती....

एकदा का एक्साम्स झाले कि मग मी जॉब शोधायला तयार , मग हळू हळू करत राहुल चे पण पैसे देऊन टाकू , मग मी पण फ्री.......

पण माझे कपडे आणी अर्ध अभ्यासाचं सामान घरीच आहे..... ते कस आणू??? आणी आता तर 8 वाजता आलेत घरी जाइ पर्यंत च 9 वाजतील.......!!


पण मला माझं सगळं सामान आणणं सुद्धा इम्पॉर्टन्ट आहे यार..... आधी का नाही मला हे सगळं सुचलं , जाऊदे मिच जावून घेऊन येते...!!

मिताली ने स्कार्प घेतला आणी गळ्यात अडकवला आणी छोटी पर्स आणी मोबाईल घेऊन निघाली...मिताली खालती आणी तर सगळेच हॉल मध्ये बसले होते , ' यांना पण आताच बाहेर येऊन बसायचं होत का...??? ' नको ते प्रश्न विचारत बसतील...

मिताली ने पाहिलं तर आजी न्हवत्या..... " नशीब यार ती म्हातारी नाही..... " पण तीच लक्ष थोडं बाजूला गेलं तर अभि सुद्धा होता....!!

हा तर नेहमी लेट येतो आणी आज चक्क 10 च्या आत घरी...... वाह , मनात बोलतच मिताली खालती आली आणी तशीच त्यांच्याकडे न बघता ती दरवाज्या पाशी गेली..... तोच बाबांनी तिला अडवल.....

" मिताली.... आता तु इतक्या रात्री ची कुठे जातं आहेस??? " मिताली पाठी वळत त्यांना म्हणणार होती कि...

तोच अभिजित त्यांना टोकत म्हणाला..." बाबा.... तिला कुठे जायचं आहे काय करायचं आहे ती तिझ तिझ पाहून घेईल कि.....तस हि ती स्वतः च म्हणाली आहे " अभिजित मोबाईल मध्ये पाहतच म्हणाला....

यावर मिताली ला राग आला....... पण तो शांत ठेवत ती म्हणाली... " माझं काही सामान घरी राहील आहे आणी पुस्तकं सुद्धा... सो तेच आणायला जातं आहे..."


" अग मग एकटी का जातं आहेस??? आणी तुझं घर हि बरंच लांब आहे..यायला गाडी भेटेल कि नाही माहित नाही , तर तु अभिजित ला घेऊन जा.... " आई म्हणाली तशी अभिजित जागुन उठत म्हणाला.....

" मला खूप काम आहे सध्या म्हणुन मी... घरी लवकर आलो आहे..... लहान नाही ती , जाऊच शकेल ती एकटी.... " असं बोलत तो पटापट पावलं चढत वरती निघून गेला......

मिताली ला थोडं वाईट वाटल च कारण तिला नाही ऐकायची सवय न्हवती.....!!

" इट्स ओके , मी जाईन एकटी मी खूप वेळा ट्रॅव्हल केला आहे..... आणी बस मिळून च जाईल कि.... " मिताली असं बोलत बाहेर निघून गेली.........


आई तश्याच निराश झाल्या...... ती जाताच बाबांनी प्रश्न केला..." तुला माहीत आहे ना.... दोघ एकमेकांशी बोलत हि नाहीत आणी तु त्यांना एकत्र पाठवत होतीस...?? "

" ते दोघे असं किती दिवस एकमेकांना टाळणार , 1 महिना......1 वर्ष कि... आयुष्यभर , भलेही दोघांना त्यांचं नातं मान्य नाही पण निदान आपण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना...??? "

" ह्म्म्म... तुझं म्हणणं पटत आहे मला , आपण मिताली शी सुद्धा मिसळून बोललं पाहिजे , तरच ती आपल्यात मिक्स होईल... अजून किती दिवस त्या एकच रूम ला आपलं घर बनवणार आहे..... आणी ती लहान आहे तिला समजून घ्यायला सुद्धा कोणी नाही... त्यामुळे यावेळेस तुच पुढाकारं घे..... "

रुचिता आणी सुनील बराच वेळ बोलत होते...!!


इथे मिताली अजून बस ची वाट पाहत स्टॉप वर उभी होती..... एकटीला भीती हि वाटत होती....!! पण आपलं च काम आहे कराव तर लागेलच......

अभिजित खालती आला आणी आपल्या कार ची चावी घेत " मी आलोच " असं म्हणत निघाला.........





क्रमशः....