The Mystery - 2 books and stories free download online pdf in Marathi

द मिस्ट्री - 2

या कथेचा पहिला भाग वाचून घ्या तेव्हाच हि कथा तुम्हाला समजेल .

जेव्हा विजय त्या दुसऱ्या मृत शरीरावरील कापड बाजूला काढतो तेव्हा तो चक्रावुन जातो . कारण हे शरीर एका महिलेच असत या मृत बॉडी ला फार विद्रुप करण्याच काम आरोपी नी केलेल असत . तो त्या महिलेला मारण्याआधी त्या महिलेच्या डोक्यावरिल सर्व केस कापून टाकतो व तिला मारतो . विजय च्या मनात पाल चूकचूकते आणि त्याला वाटू लागत पहिला मर्डर व या मर्डर चा काहीतरी संबंध असावा म्हणून तो लगेच उठतो व जायभाये सोबत तो पोलीस स्टेशन ला त्याचा केबिन मध्ये जातो . केबिन मध्ये खुर्ची वर बसताच

विजय - जायभाये जा एक व्हाईट बोर्ड घेऊन या .

जायभाये - हो सर

आत्ता बोर्ड आलेला असतो विजय पहिला मर्डर आणि या मर्डर मधील फरक बोर्ड वर लिहून पाहत असतो त्यात त्याला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे मर्डर करण्याची पद्धत पहिला मर्डर हा त्या बॉडी ला विद्रुप करण्यासाठी त्या बॉडी च्या तोंडावर असंख्य काचांचे तुकडे खूपसले असतात आणि दुसऱ्या मर्डर मध्ये मृत महिलेचे केस कापलेले असतात . विजय जायभाये ला लगेच म्हणतो जायभाये मला पहिल्या मर्डर स्पॉट वर घेऊन चला असे म्हणून दोघे हि पहिल्या मर्डर स्पॉट वर जातात तिथे जाताच विजय पूरावा शोधू लागतो व
जायभाये त्याला मदत करू लागतात . दोघे हि पुरावे शोधात असताना जायभायेला एक कानातल सापडत तो लगेच सर म्हणून हाक मारतो .

विजय - हो.....आलोच

जायभाये - सर हे बघा काय सापडलं .

विजय - कानातले आत्ता हे काय नवीन प्रकरण. जायभाये याला पुरावा म्हणून जमा करून घ्या

जायभाये - हो सर ...

तेवढ्यात विजय चा फोन वाजतो .. फोन वर SP अजय असतात . ते फोन वर विजय ला चांगलच झापतात . हो आलोच सर म्हणून विजय ऑफिस कडे निघतो वेळ रात्रीची असते विजय शहरापासुन बराच दूर असतो . विजय याची गाडी अचानक बंद पडते . विजय झोपीत असतो

जायभाये - सर गाडी बंद पडली ..

विजय - अरे यार आत्ता काय करायचं

जायभाये - सर आपण एक काम करू कुठे इथे मेक्यानीक आहे का शोधू कुठे गाडी नीट करण्याचं दुकान तरी असेल

विजय - चला शोधू आत्ता पर्याय नाही .

दोघे हि थोड्या दूर वर चालत जातात परंतु कोणी हि भेटत नाही मग थोडस आणखी पुढे गेल्या नंतर एक छोटसं दुकान त्यांना दिसत . दुकानावर जाताच जायभाये म्हणतो

जायभाये - आमची गाडी बंद पडली आहे आम्ही मुंबई पोलीस आहोत .

दुकानदार ( मेक्यानिक ) - जि साहेब कुठे आहे गाडी मग आता

जायभाये - पुढे थोड्या अंतरावर सोडली आहे .

दुकानदार चला म्हणत विजय आणि जायभाये यांच्या सोबत निघतो थोड्या अंतरावर जाताच दुकानदार .

दुकानदार - हे साहेब कोण आहेत काहीच बोलत नाहीयेत .

जायभाये - ते मोठे साहेब आहेत तो इथे खून झाला नाही का त्याच टेन्शन मध्ये आहेत .

विजय - काय रे त्या दिवशी कुठे होतास तु .

दुकानदार - घाबरत म्हणतो साहेब इथेच होतो कि

विजय - तुला कोणी दिसलं का इकडे किंवा तुझ्या दुकानावर कोणी आलं होत का संशयीत असं .

दुकानदार - साहेब तेवढं काय नाही पण एक विचित्र बाई आली होती कार घेऊन जरा विचित्र च होती कि

विजय - विचित्र का ?

दुकानदार - साहेब तिने एकच कानातलं घातलं होत ......

विजय - काय ???? जायभाये ते कानातलं काढा

जायभाये - ते कानातल हातात घेतात व त्यावर मोबाईल चा प्रकाश मारतात..बघ रे हेच होत का ते ....

दुकानदार - हो साहेब हेच ते .....

आत्ता पुढे काय होणार ? कोण आहे हि बाई ? तिचा मर्डर शी संबंध काय ? हे पाहण्यासाठी पुढील भाग पहा