Bhetli tu Punha - 1 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | भेटली तू पुन्हा... - भाग 1

भेटली तू पुन्हा... - भाग 1





थंडीचे दिवस होते अन तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता.... धुकं खूप होत, सकाळचे सात वाजून गेले होते पण अजून ही धुकं कमी झाले नव्हते....त्या धुक्यातूनच वाट काढत तो निघाला होता... थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने turn घेतला...अन कोणाच्या तरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला...

आता थोडं धुकं कमी होत होतं....उन्हाची पिवळसर कोवळी किरणे चोहिकडे पडत होती...

आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला....तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली....

तो चिडला होता ... अन रागानेच तिच्याकडे जात होता...ती ही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती...की त्याचा मागून आवाज आला...

"Excuse me miss..."तो थोडा रागातच बोलत होता...

कारण ती चुकीच्या side ने आली होती अस त्याला वाटत होतं...

अन त्याच्याकडे पाठ करून उभी असणारी ती....मागे वळली...अन तिला पाहून हा थबकला... कारण ती मुलगी
तीच होती जिला तो आठ महिन्यांपासून शोधत होता...

Sky blue कलरचा long टॉप, white लेजिन्स... गळ्यात छोटा स्टोल, काळेभोर डोळे...अन त्यावर पापण्यांची काळभोर झालर , कोरीव चंद्रकोरा सारख्या भुवया, लांबसडक काळे केस, चाफेकळी नाक,नाजूक अन लाल चुटुक ओठ... एक हातात wrist watch तर दुसऱ्या हातात ब्रेसलेट...

तीच हे सौंदर्य पाहून तो तिच्यातच हरवला...
"Sorry हा ... actully माझी सायकल स्लिप झाली त्यामुळे माझा तुम्हाला धक्का लागला..." ती आपली कपडे साफ करतच बोलली...

" its ok, but थोडं संभाळून चालवत जा सायकल, त्यात हे धुकं..."तो तिलाच पाहत होता...

" अहो हे महाबळेश्वर आहे...इथे हे नेहमीच आहे...by the way तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना..." ती थोडं हसत,अन त्याला पाहत बोलली...

पण तो मात्र अजून ही तिच्यातच हरवला होता...हे पाहून ती त्याला पुन्हा आवाज देते...

" अहो सर ,तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना..."

तस तो भानावर येत म्हणाला...

" अ....न...न...नाही , मला नाही लागलं पण तुम्हाला तर लागलं नाही ना कुठे...."

" नाही ओ...मला सवयच आहे..." अन हसली.

" तुम्ही इथे नवीन आला आहात का..."ती आता सायकल उचलत बोलली...

" हो, म्हणजे मी CA आहे..."तो बोलला...

" कोणत्या बँकेमध्ये...."

" युनिक बँक... आताच दोन तीन दिवसांपूर्वी पोस्टिंग झाली आहे इथे...."

" अच्छा... ओके मला late होत आहे मी निघते...."ती सायकल वर बसत म्हणाली...

त्याला ही तिला विचारायचं होत , पण तिने चान्स च दिला नाही...अन bye म्हणून निघून ही गेली....

अन हा मात्र तिच्या जाणाऱ्या आकृती कडे पाहत भूतकाळात हरवला...





10 वाजले होते, अन आदित्य गडबडीत बँकेकडे निघाला होता...थोडयावेळाने तो बँकेत पोहचला अन आपल्या केबिन मध्ये गेला...अन काम करू लागला...

काम करता करताच त्याच्या डोळ्यासमोर ती आली....
सकाळचा तिचा निरागस चेहरा सारखा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता...

अन त्याचे काम करणारे हात तिथेच थांबले...अन तो विचारात गुंतला...

"कधी स्वप्नात ही वाटलं नव्हतं की ती पुन्हा भेटेल,पण आज अनपेक्षितपणे ती भेटली...ती ही अशी सकाळी...
पण आपण तिला विचारायला हवं होतं, ती कुठे राहते?...
पण मॅडमांनी बोलू कुठे दिल काही मला..."

तेव्हाच peon आत आल.

"सर कॉफी......"Peon च्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला...

"हो, ठेवा इथे" टेबलकडे इशारा करत बोलला...

Peon कॉफी ठेवून निघून गेला...अन कॉफी पिवून तो पुन्हा कामाला लागला...

असेच दिवस जात होते...काम अन रूम यातच आठवडा गेला...पण अजून ही ती डोळ्यासमोर येतच होती, कुठे राहत असेल ती?, तिला कस शोधू ?? एक ना अनेक प्रश्न यायचे त्याच्या डोक्यात...

कंपनी कडून जी रूम मिळाली होती तिथे आधीच एक कलीग राहत होता...तो होता साहिल.तो ही आठवड्यापूर्वीच जॉईन झाल्याने, त्यालाही तिथल्या गोष्टी अजून जास्त काही माहीत नव्हत्या...

आठवड्याभरातच दोघंची चांगलीच मैत्री झाली होती... दोघेही बोलक्या स्वभावाचे असल्याने अन एकाच तालुक्यातील असल्याने त्यांची गट्टी जमली होती...

साहिलच लग्न ठरलं असल्याने, रूम मध्ये आल्यावर निम्मा वेळ त्याचा फोनवरच जायचा...Love marriage करत होते साहेब,मे महिन्याची तारीख ठरवली होती घरच्यांनी...

उद्या sunday म्हणून त्याने बाहेर जाण्याचा plan केला.

आल्यापासून तो कुठेच गेला नव्हता... तस साहिल ला सांगितल्यावर तो ही लगेच तयार झाला...

अन जवळच असणाऱ्या मंदिरात आधी जाऊ मग पुढे बघू कुठे जायचे ते अस म्हणून ते दोघे ही निघाले...

साहिलची बाईक होती, मग ते आवरून सकाळीच भटकायला निघाले...

काही वेळातच ते पंचगंगा मंदिराजवळ आले, बाईक पार्क करून दोघे गप्पा मारत निघाले होते की, आदी च्या कानावर तिचा आवाज पडला...अन तो आतुरतेने तिला आजूबाजूला शोधू लागला...

पण पुन्हा त्याच्या वाट्याला निराशाच आली ...चेहरा बारीक करून तो पून्हा चालू लागला...

"काय रे, काय झालं...कोणाला शोधत आहेस..."

"अ.. छे... छे.. सहजच "अस म्हणून त्याने वेळ मारून नेली.

मस्त मंदिर होत, पाच नद्यांचा उगमस्थान तिथे आहे, अस नंदीच्या तोंडातून पडणार पाणी, अन प्रत्येक खिडकी वर नदीची नाव लिहिली होती, कृष्णा, कोयना, वेण्णा ,सावित्री अन गायत्री या पाच नद्यांचा तिथे उगम झाला होता... खिडकीला कान लावून पाहिलं की आतून फक्त पाण्याचा आवाज येत होता...

रविवार असल्याने गर्दी होती म्हणा,ते थोडा वेळ तिथे बसून निघाले...साहिलचा फोन वाजला तस तो मागे बोलत येऊ लागला.

आदि पुढे तसाच चालत जात होता...जाताना पुन्हा त्याला आवाज आला,'तिचा'...अन पुन्हा तो मागे फिरून तिला शोधू लागला...

अन काय आश्चर्य... एका दुकानात ती दिसली ते ही चक्क दुकानात समान विकताना...

नेव्ही ब्लु कलरचा लॉंग टॉप,केस वर बांधलेले, एक बट मात्र चेहऱ्यावर येऊन सारखी त्रास देत होती..बट सावरत ती कस्टमर हान्डेल करत होती...अन कस्टमर ला सांगत असताना होणारी तिच्या ओठांची अन डोळ्यांची हालचाल...मन ओढून घेत होती...

अन नकळत त्याची ही पावले त्या दुकानाकडे खेचली गेली...तो दुकानात गेला तेव्हा दुकानातील गर्दी कमी झाली होती...

"काय देऊ बोला..."ती त्याच्याकडे न बघताच बोलली

"काय special आहे तुमच्या कडे..."तो गालात हसत बोलला

"ओह, तुम्ही आहात होय..."तस ती आवाजाच्या दिशेने बघत बोलली..

"हो ...हे तुमचं दुकान आहे?..."तो तिच्याकडे हसत बघत बोलला

"Actully हे माझ्या आजोबांचं दुकान आहे, मी इथेच एक school मध्ये teacher आहे, आज sunday so आले आजोबांना मदत करायला...पण CA साहेब तुम्ही इकडे...."

अन ते तिथेच गप्पा मारत राहिले.
गप्पा मारत असतानाच, साहिल तिथे आला...
अन आदित्य कडे पाहू लागला....तिच्याशी बोलत असताना त्यांच्या डोळ्यातील चमक पाहून साहिल ला थोडी फार कल्पना आली...

आदी इतका बोलण्यात गुंतला होता की साहिल साईडला आलेला ही त्याला जाणवलं नाही...
तेव्हाच तिचा फोन वाजला.अन ती कॉलवर बोलू लागली.

"हुहूं... हुहू... CA साहेब जायचं का, अजून एकदा दर्शन घ्यायचं आहे..." आदिच लक्ष वेधून घेण्यासाठी साहिल बोलला

"अ... झाला तुझा कॉल..."

"हो...केंव्हाच झाला, पण तू इथे काय करतोय..."

"मी ते आपलं सहजच..."आदि केसातून हात फिरवत खाली मान झुकवत बोलला..

"हीच का ती सायकल वाली..." साहिल त्याच्या कानात खुसफूसला

"श्श....अरे ऐकेलं ना ती..."
तिचा कॉल झाला तस ती फोन ठेवून त्यांच्याकडे बघू लागली.

"काय झालं...काय देऊ तुम्हला.."ती आता बोलली

"काही नाही मिस मी म्हणत होतो की माझ्या होणाऱ्या बायकोला काही special अस दाखवू शकता का..." साहिल विषय बदलत बोलला

"हो का नाही... ही बघा ....आवडेल त्यांना..."अस म्हणत तिने एक छानशी पर्स त्याला दाखवली.

" तुम्ही म्हणता तर द्या हीच ...."असे म्हणत त्याने ती पर्स पॅक करून देण्यास सांगितली.

" bye the way ...मी साहिल, आदि चा मित्र,
अन कलीग ही...." तो स्वतःच स्वतःची ओळख करून देत बोलला.

" आदि कोण..." ती म्हणालीया

तसा साहिल गोंधळाला अन आदित्य कडे पाहू लागला अन पुन्हा बोलला

" हा कोण आहे मग...." तो आदि कडे हात करत बोलला

" अच्छा म्हणजे यांचं नाव आदि आहे...मला नव्हतं माहीत सॉरी ....मी तर त्यांना CA साहेब म्हणूनच बोलवले..."ती थोडी हसत बोलली.

"मग हा काय म्हणून बोलावतो तुम्हाला, दुकानदार...." अस म्हणून तो स्वतःच हसू लागला

ते मात्र दोघे शांतच होते...तसा तो ही शांत झाला. तो शांत झाला तसे ते दोघे हसू लागले...त्यांना अस हसताना पाहून साहिल ही हसू लागला.

" मी एक school मध्ये teacher आहे..." ती हसत बोलली

" and your good name...." साहिल हसत बोलला.

आदी मात्र शांतच उभा होता.

" मी अन्वी.... अन्वी दीक्षित...तुम्ही..."

"मी तुमच्या CA साहेबांचा मित्र साहिल देशपांडे..."

त्याच बोलणं ऐकून आदि त्याला डोळ्यांनीच खुणावतो की काय बोलत आहेस...अन अन्वी ही गोंधळली...

"हा म्हणजे आदि म्हणायचं होत मला...."तो चूक सुधारत बोलली

"चला पुन्हा भेटू..."अस म्हणून आदि साहिल ला तिथून थोडं ओढतच नेऊ लागला. हे पाहून अन्वी गालातच हसू लागली....

असेच दिवस जात होते...बँक ते रूम फेऱ्या सुरू होत्या...
आदि ला ती पुन्हा भेटेल अस रोजच वाटायचं...रोज मॉर्निंग ला सायकलिंग करताना त्याला अस वाटायचं की ती पुन्हा भेटेल अन त्या आशेनेच त्याची दिवसाची सुरुवात होऊ लागली.

अन्वी आदित्यला भेटेल का??, आदित्यचा भूतकाळ काय होता? जाणून घेऊ पुढच्या भागात.हा भाग कसा वाटला नक्की सांगा..☺️


Rate & Review

shrinivas n patil

nice

Jyoti

Jyoti 2 months ago

Pramod Sonawane

Pramod Sonawane 2 months ago

Yash

Yash 3 months ago

Namita Phanse

Namita Phanse 4 months ago