Shri Sant Gyaneshwar- 4 books and stories free download online pdf in Marathi

श्री संत ज्ञानेश्वर - ४

संत ज्ञानेश्वर

आई वडिलांनी प्रयश्चित्त म्हणून देहत्याग केला.परंतु एवढ्याने मुलांच्या जीवनातील समस्या सुटलेली नव्हती.उपनयनाची चिंता ज्ञानादेवाला लागून राहिली होती.परंतु निवृत्तीनाथांची भूमिका वेगळी होती. निवृत्तीनाथ म्हणाले अरे ज्ञानदेवा आपल्या सारख्या जन्मजात जीवन मुक्तांना ह्या सोळा संस्काराची अवश्यकताच कांस्य?शाश्रोक्त संस्कार कशासाठी?जीवनाच्या.जीवनाच्या कर्म राहाटीतून मुक्त होण्यासाठीच ना?तर मग आपण जे जीवन जगतो,ते मुक्ताचेच नाही तर कुणाचे?तू वर्णाश्रम,धर्माप्रमाणे,कुळाचार धर्माप्रमाणे करावयाचा आग्रह

सोडून दे.आपण वर्णाश्रम धर्माच्या,कुळधर्माच्या पलिकडे गेलो आहोत.सोपान देवाची भूमिका वेगळी नव्हती.ज्ञान देवांना या दोघांची भूमिका मान्य होती.परंतु त्यांच्यातल्या विचारवंत सदैव जागृत असे.,धर्माच्या खोट्या आणि विपरीत आचारणामुळे सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात एवढे अनर्थ माजले आहेत त्या धर्माचे खरे स्वरूप कोणीतरी समाजाला सांगितलेच पाहिजे.म्हणून आळंदी वरून त्यांनी शुद्धी पत्र आणले. ब्रह्मवृंदानच्या सभेत दाखवले. सांगितले आम्ही साक्षात वेदोनारायण आहोत,वेद आमच्या मुखातून बोलतो आम्हाला पवित्र करून घ्यावे.असे विनऊन त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला.परंतु त्यांचे कोणी ऐकले नाही.ऐका कुटाळाने,ज्ञान देवांना विचारले,हा समोरून रेडा येत आहे त्याचेही नाव ज्ञानोबा आहे मग तू आणि तो एकच का? तुम्हा दोघात आद्वैत आहे का? ज्ञानदेव म्हणाले होय तुम्ही म्हणता ते खरेच आहे.सर्व देहांत एकाच परमात्मतत्वाचा अंश भरून

राहिलेला आहे.पाण्याने भरलेल्या अनेक घटात सूर्याची अनेक प्रातीबिंबे दिसतात.पण सूर्यनारायण एकच असतो.त्या प्रमाणे आम्हा दोघांचे देह निराळे असले तरी त्यातील आत्मतत्व एकच आहे.मग दुसऱ्या कुटाळाने विचारले मग त्याला होणाऱ्या वेदना तुला होत असतील.ज्ञानदेव म्हणाले होय जरूर होतील.असे म्हणतात एका ब्राम्हणाने त्या रेड्याचे पाठीवर आसुडाचे दोन तीन तडाखे ओढले.त्या बरोबर ज्ञान देवाच्या पाठीवर तीन वळ उठलेले समस्त लोकांना दिसले.त्यातील एक जण कुटाळ म्हणाला आपण चांगली हात चलाखी दाखविली,आता हा रेडाही तुमच्या इतकाच वेदांती असला पाहिजे,मग तुम्ही त्याच्या तोंडून वेड म्हणवून दाखविता का? ज्ञानदेव म्हणाले आपण भुदेव आहेत,वेदोनारायण आहेत,आपली इच्छा असेल तर साक्षात वेदही या रेड्याचा तोंडातून व्यक्त होतील. असे म्हणून ज्ञानदेवांनी आपला दिव्य हात त्या रेड्याचा मस्तकावरून फिरविला.त्याला वेदमंत्रोच्चार करण्याची आज्ञा केली.त्या बरोबर रेड्याचा मुखातून वरदातील ऋचा बाहेर पडू लागल्या. हा चमत्कार पाहून सर्व कुटाळ ब्राम्हण,थिजून गेले,वरमून गेले.हा हा म्हणता सर्व गाव गोळा झाला.थोर थोर थोर ब्राह्मणही ज्ञानदेवांच्या पाया पडले.,पैठणचा सर्व गोदा काठ ज्ञानदेवांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला ब्रह्मवृंदानी शुद्धीपत्र नाकारलेली ही ईश्वराचेच अंश असल्याची सर्वांना खात्री पटली. या घटनेमुळे शास्त्रीवर्ग अंतर्मुख झाला.त्याला खरे आत्मपरीक्षण झाले की,आपण फक्त शास्राचा भार वाहणारे पढिक आहोत. शास्राचे खरे गुह्य या मुलांनीच जाणले आहे.ज्ञानदेव तेथून नेवासे येथे आले.त्यांच्या बरोबर रेडा होता अमृतमंथनानंतर निघालेला अमृत कलश दैत्यांच्या हाती पडला होता त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून तो. अमृत कलश देवांच्या हाती दिला.त्या मोहिनी राजाचे मंदिर नेवास्यास आहे.या मोहिनिराजासच महलया तथा म्हाळसा म्हणतात.ज्ञानदेवांच्या भाव वृत्तीला या मोहिनिराजाचे विलक्षण आकर्षण होते. किंबहुना त्यांच्या ती परतत्वस्पर्शी प्रतिभेला या महालयाचे दर्शन स्फुर्तीपद ठरले असावे महालायाचे देवूळ म्हणजे नव सृजनांचे माहेर.या माहेरघरी येऊन विद्रब्ध झाल्यावर त्यांच्या प्रतिभेला नवनवोन्मेशशाली अंकुर न फुटले तर नवल.ज्ञानदेव नेवाश्यात प्रविष्ट झाले तेव्हा एक सती आपल्या मृतपतीच्या शवा जवळ बसून शोक करीत असताना त्यांना दिसली. त्यांनी त्या मृतदेहाचे नाव विचारले ‘सच्चिदानंदअसे सांगण्यात आले.साच्चिनंदाला मृत्यू कधीच नसतो.असे म्हणून त्यांनी त्या मृतदेहावरून हात फिरविला.त्याच क्षणी तो मृतदेह जिवंत होऊन उभा राहिला.त्याने ज्ञानदेवांचे पाय धरले.हाच सच्चिदानंद पुढे ‘ सच्चितानंदबाबा’ म्हणून ज्ञानदेवांनी निरुपलेल्या ‘ भावार्थदीपिकेचा’ तथा ज्ञानेश्वरीचा लेखक झाला.नेवाष्याच्या मुक्कामातील अल्पकाळात त्यांनी तेथील अवघे लोकमानस अंगभूत गुणांनी आकृष्ट करून घेतले.तथापि आळंदीच्या विसोबा सारखा एखादा दिर्घद्वेशी तिथेही त्यांना भेटाला.ही भावंडे अधून मधून आळंदीस येत.तेथे प्रवचने करीत.

Share

NEW REALESED