Manarjun: Preet Anok's love blossoming in it...? - 2 in Marathi Love Stories by Kalika Manchekar books and stories PDF | मनर्जून : प्रीत अनोख्या नात्याची त्यात बहरलेल्या प्रेमाची....? - 2

Featured Books
Share

मनर्जून : प्रीत अनोख्या नात्याची त्यात बहरलेल्या प्रेमाची....? - 2

इथे ती आणि वैशू बाहेर आल्या आणि तिनी तिची धन्नो काढली (तुम्ही सगळे तर खूप च हुशार आहात अगदी माझ्या सारखेच😜😁😎😎 तर तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखच असेल की ही धन्नो कोण तर हो तुम्ही बरोबर ओळखलय ही धन्नो म्हणजे आपल्या ती ची ब्लॅक 🖤 & व्हाइट 🤍 कलर च कॉम्बिनेशन असलेली स्कूटर ) आणि त्या निघाला कॉलेजला


आता पुढे


आता कॉलेज म्हंटला की रॅगिंग येणार नाही अस तर होऊ च शकत नाही तर बघूया आता कॉलेजमधे काय चाललंय ते
.
.
.
.
.

@College
.
.
.
.
.

एक 5-6 मुल मुलींचा ग्रुप कॅम्पस मधे बसला होता आणि येणार जाणार्‍या स्टूडेंट्स ची रॅगिंग सुरू होती .

(ग्रुप :- नताशा शनाया ईशा सौरभ संजय आणि कार्तिक )

संजय :- अरे यार आज कोण नवीन पोपट भेटतय का बघूया जो आपला चांगला entertainment करेल

कार्तिक :- हो रे सकाळ पासून सगळे पकाव च सापडले आहेत एक पण ढंग चा भेटला नाही पिडायला 😈😈

शनाया :- अरे ए ते बघ तिथून ती मुलगी येतेय न्यू स्टूडेंट च वाटते आहे बघूया आता ही किती entertain करते ते 😈😈
ती हसत म्हणाली

नताशा :- ये फर्स्ट ईयर का???

तसं तिने पहिलं आजूबाजूला पाहिल आणि परत त्यांच्या कडे पाहिल

शनाया :- अग ये इथे तिथे कुठे बघतेस मूर्ख तुलाच बोलते आहे ती मंद😈😈 .... एकदम attitude मध्ये बोलली

तस तिने त्यांच्या कडे पाहिल आणि हो अशी वर खाली मान हलवली ...

नताशा :- आता इथे यायचे कष्ट घेतेस ना की तुझ्या साठी स्पेशल पायघड्या घालू की आमंत्रण देऊ 😏😏😏... ती एकदम तुसडेपणा ने बोलली

तशी ती त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली मान खाली घालून

शनाया :- ये संजय बघितल काय हिची तर आता पासून च फाटली आहे बघ कशी खाली मान घालून उभी
(Note :- ही टपोरी पोर टाइप आहेत त्यामुळे एखादा अपशब्द असेल तर समजून घ्या)

संजय :- हो ना .... तिला टाळी देत तो बोलला

ह्यांना आपण जरा थोडय़ा वेळ असच ठेऊया बघूया तरी आपली हिरोइन आणि तिची फ्रेंड कुठे पोहोचल्या ते

तर मंडळी जेव्हा इथे रॅगिंग सुरू होती तेव्हा ह्या भांडत होत्या ह्या म्हणजे भांडत ती च होती आणि वैशू वैतागून तिथे उभी आहे 🤦🏻🙆🏻.....

चला तर मग बघूया

.
.
.
.
.

@Parking

.
.
.
.
.

ती :- ये तुला सांगितलेल कळत नाही का इथे आम्ही आधी आलोय म्हणुन इथे मी माझी धन्नो लावणारती :- ये तुला सांगितलेल कळत नाही का इथे आम्ही आधी आलोय म्हणुन इथे मी माझी धन्नो लावणार

तो :- अग ए मी तुला मगास पासून सांगतो आहे ना की इथे मी पहिला आलोय आणि म्हणून मी बाइक लावणार आणि आता ही काय ते हा धन्नो कोण आहे तिला मध्ये का आणते आहेस

ती :- अरे मूर्ख माणसा धन्नो माझ्या स्कूटर च नाव आहे धन्नो म्हणजे ही ..... स्कूटर कडे बोट दाखवत ती बोलली

तसा तो हसायला लागला

तो :- (हसतच) काय ही धन्नो आहे म्हणजे तुझ्या स्कूटी च नाव धन्नो आहे 😂😂😂😂😂😂😂...... खरच तुम्ही मुली ना काही पण करू शकता 🙏🏻🙏🏻

ती :- ए पहिल तर तू हसन बंद कर आणि स्वतः ची बाइक पहिली रस्त्यातून काढ मध्येच लावली आहेस ते मला माझ्या धन्नो ला पार्क करूदे😤😤 ...

तो :- वाह ग वाह तू सांगितल आणि मी ऐकलं घंटा 🔔 वाट बघ तू स्वतः ची स्कूटर काढ आधी इथून मी इथेच बाइक लावणार आली मोठी मला सांगणारी huhhhh 😒😒😒😒

ती :- ए तुझ्या तर तू काढतोस की नाही बाइक 😡😤

तो :- नाही काढत जा

तिथे ह्या दोघां सोबत असलेले साहिल (हा आपल्या तो सोबत आहे) आणि वैशू दोघांनी एक मेकांन कडे त्रासिक चेहर्‍याने पाहिल .....

ह्या दोघांनी परत त्यांच्या कडे पाहिल तर ते दोघं आजून ही भांडत च होते त्यांनी परत एक दुसर्‍या कडे पाहिल आणि दोघ जोरात त्यांना उद्देशून ओरडले

साहिल /वैशू :- बासssssssssss🖐🏻🖐🏻

तसं त्या दोघांनी जरा दचकून ह्यांच्या कडे पाहिल

वैशू :- अरे ए बास काय चाललंय तुम्हा दोघांनच तुम्हा दोघांना ही इथे च गाड्या पार्क करायचा आहेत का

तस त्या दोघांनी एक साथ होकारार्थी मान हलवली

तिने डोक्याला च हात लावला नाही नाही डोक्याला हात मारला 🤦🏻‍♀️🤦🏻‍♂️

साहिल :- अरे जर तुम्हा दोघांना इथे च आप आपल्या गाड्या लावायच्या आहेत तर मग एकत्र लावाना अस ही स्पेस तिथे मोठी आहे दोन टू -व्हीलर तर आरामात राहतील कशाला उगाच भांडताय कॉलेजच्या पहिल्या च दिवशी 😫😫... तो वैतागत बोलला

तसं त्या दोघांनी जरा निरीक्षण केल त्या जागेच तर खरच तिथे दोन टू -व्हीलर राहतील येवढी स्पेस नक्कीच होती तसं त्यांनी एक दुसर्‍या कडे पाहिल आणि मग त्यांच्या कडे पाहिल तर साहिल आणि वैशू दोघ ही ह्यांना एकदम रागात बघत होते😡😤 .

(आता तुम्ही च सांगा हे दोघ बिचारे काय करणार गेला अर्धा पाउण तास ते दोघ भांडत होते ते ही येवढुश्या कारना वरुण 🤦🏻‍♀️🤦🏻‍♂️)

तिनी आणि त्याने दोघांनी ही आप आपल्या गाड्या नीट व्यवस्थित लावल्या आणि आप आपल्याला रस्त्याला गेले . ह्या दोघी तिथून निघाल्या आणि थेट कॅम्पस मध्ये आल्या तर त्यांना तिथे गर्दी दिसली म्हणून त्या दोघी पण तिथे गेल्या तर तिथे एक ग्रुप एका मुलीची रॅगिंग करत होते