Devayani Development and Key - Part 25 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २५

              देवयानी विकास आणि किल्ली.

                  पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   २५

भाग  २४ वरून  पुढे  वाचा ................

 

“गुरुजी, प्रत्येक वेळेला तिरूपतीला जाऊन यायला किमान तीन दिवस तरी लागतील. जर माझा भाऊ किंवा वडील अधून मधून जाऊन आले तर चालेल का?” -विकास

“हे पहा, अडचणी तुमच्या लग्नात येताहेत, त्यांच्या नव्हे. पेपर कोण सोडवतो? विद्यार्थी की आई वडील?” – गुरुजींच फायनल उत्तर.

गुरुजींनी असं म्हंटल्यांवर, मग पुढे काही न बोलता देवयानी आणि विकास बाहेर पडले.

 

घरी आल्यावर सगळ्यांना विकासने काय गुरुजी म्हणाले ते सांगितलं. सर्वांच्या साठी हा आणखी एक धक्काच होता. यावर बरीच चर्चा झाली. पण निष्पन्न काहीच निघाल नाही.

भगवानरावांच कुलदैवत तिरूपति चा बालाजी होतं. आता दर महिन्यात तिथे जायचं म्हणजे सोपं काम नव्हतं. पण इलाज नव्हता. प्रश्न हा होता की दर महिन्यात सुट्टी मिळेल का? कारण रविवारच्या एका दिवसांत जाऊन येणं शक्य नव्हतं.

भगवानराव म्हणाले की “तू गुरुजींना विचारायला पाहिजे होतं की एकदा तू, एकदा भैय्या आणि एकदा मी गेलो दर्शनाला तर चालेल का म्हणून. हरकत नाही उद्या फोन करून विचार.”

“हे पण विचारलं होतं, पण बाबा, त्यांनी स्पष्टच  सांगितलं की हे मलाच करायचं आहे म्हणून. मी करेन. थोडा बॉस चीड चीड करेल पण अडवणार नाही असं वाटतं आहे. माझं काम चोख  आहे त्यामुळे मी बोलेन त्यांच्याशी. बघू काय होतं ते. बालाजीच्या मनात असेल तर तिरूपतीला जायला अडवण्याची बुद्धी कोणाला होणार नाही.” विकासचं उत्तर. तात्पुरता तो विषय संपला.

दुसऱ्याच दिवशी विकास ने त्यांच्या बॉस शी बोलणं केलं. त्याला सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितली. आणि सांगितलं की त्याला महिन्यातून एकदा शनिवारी पण सुट्टी लागेल. आणि सोमवारी यायला दुपारचा एक तरी  वाजेल.

“विकास या अशा गोष्टींवर तुझा विश्वास आहे?” बॉसनी विचारलं.

“माहीत नाही. पण परिस्थिती अशी आहे की सर्व उपाय करून पहाणे एवढंच आपल्या हातात आहे. पुढे असं वाटायला नको की आपण हे का केलं नाही.”-विकास.

“ठीक आहे. तुझ्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मी काही बोलत नाही. पण कामाची खोटी होणार नाही एवढं बघ म्हणजे झालं. आणि तू ते नक्कीच करशील यांची खात्री आहे.” – बॉस.

त्याच शुक्रवारी रात्री दोन  वाजता विकास पुण्याहून निघाला. सकाळची सात वाजताची फ्लाइट मुंबईहून पकडायची होती.

त्या दिवशी शनिवार होता आणि फारशी गर्दी नव्हती. चार एक तासात त्याचं दर्शन झालं. मग रात्री भक्त निवासात मुक्काम करून रविवारची दुपारची फ्लाइट पकडली.

आल्यावर मग सगळे जण बसले. विकासने सगळ्यांना प्रसाद दिला. एक समाधानाची लहर सगळ्यांना स्पर्श करून गेली.

दिवस आता जरा शांततेत चालले होते. बाबांची प्रकृती पण झपाट्याने सुधारत होती. विकासचे आई, बाबा  सगळं काही ठीक ठाक आहे हे बघून नागपूरला परत गेले. अशातच एक दिवस ऑफिस मधून आल्यावर देवयानीचा चेहरा उतरलेला दिसला. तिच्या आईने तिला विचारले की

“काय ग तुझा चेहरा उतरलेला दिसतो आहे. काय झालं? साहेब  रागावले का?”

“नाही ग आई, वेगळच आहे.” – देवयानी.

बाबा म्हणाले की “काय ते सांग न, आम्हाला पण कळू दे. काय प्रॉब्लेम आहे तो.”

“आमच्या अमेरिकेतल्या ऑफिस मधली एक मुलगी एक महिन्या साठी भारतात सुट्टीवर येते आहे.” – देवयानी.

“मग?” – बाबा.

“तिच्या कामाची जबाबदारी घेण्यासाठी मला एक महिन्या साठी अमेरिकेत जावं लागणार आहे.” – देवयानी.

“ऑं, हे काय नवीनच?” – आई

बाबा मध्येच बोलले. “अग ठीक आहे असं होतच. Deputation वर जावच लागतं. मी नाही का तीन महिन्यासाठी होसपेट ला गेलो होतो. सुट्टीवर गेलेला माणूस सुट्टी संपून वापस जॉइन झाला की आपण पुन्हा आपल्या जागी. नोकरी म्हंटली की हे सगळं होतच असतं.”

“अहो, ते सर्व मला माहीत आहे पण अमेरिका किती दूर, ही एकटी जाणार म्हंटल्यांवर जरा काळजी वाटते इतकंच.” – देवयांनीची आई म्हणाली.

विकास आल्यावर हीच प्रश्नोत्तरं पुन्हा एकदा झाली. विकास चांगलाच नाराज झाला होता. पण करण्यासारखं  काहीच नव्हतं. नोकरी म्हंटल्यांवर अश्या गोष्टी होणारच याची त्याला कल्पना होती. देवयानी मात्र अजिबात तयार नव्हती. ती विकास ला म्हणाली की

“बघ विकास, हे एक नवीन विघ्न उभं राहीलं. मी जॉब सोडू का? मला नाही जायचं अमेरिकेला.”

“अग एक महिन्यांचा तर प्रश्न आहे. त्या साठी एवढं मोठं पाऊल उचलणं काही बरोबर नाही. हवं तर एकदा बॉस शी बोलून बघ.”- विकास. 

“मी तू म्हणतोस तसंच करते. आधी बॉस शी बोलून बघते.” – देवयानी.

देवयानी बॉस शी बोलली. पण त्याने सांगितलं की त्यांच्या हातात काही नाहीये. वरतून ऑर्डर्स आल्या आहेत आणि तो काहीच करू शकणार नाही.

अखेर अत्यंत नाराजीनेच देवयानी जायला तयार झाली. एक हप्त्याने देवयानी अमेरिकेला गेली. तिच्या राहण्याची व्यवस्था कंपनी ने केलीच होती. अजून दोघी मुली होत्या त्यांच्या बरोबर अपार्टमेंट मधे तिची सोय केली होती. आठवड्यात देवयानी कामात रूळली. नवीन हवामानात, नवीन ठिकाणी नवीन कामाची सुरवात झाली.

रोजच तिचं विकासशी व्हॉटस ॅप  वर बोलणं व्हायचं. पाहता पाहता एक महिना केंव्हा निघून जाईल ते कळणार सुद्धा नाही असं देवयांनीला वाटलं होतं. पण भविष्य काही वेगळच होतं. ज्या मुलीच्या जागेवर देवयानी गेली होती, त्या मुलीने राजीनामा दिला आणि ती दुसऱ्या कंपनीत भारतातच जॉइन झाली. आता काय होणार? देवयानी ने त्याच रात्री विकासला म्हंटलं

“विकास बघ काय होऊन बसलं ते. आता reliever केंव्हा पाठवतील ते कळत नाहीये. अजून किती दिवस लांबणार आहे इथला मुक्काम देव जाणे.”

“अग थोडी वाट पाहू. कंपनी काही तरी व्यवस्था करेलच. जॉब काय केव्हाही, अगदी केव्हाही सोडता येतो. काळजी करू नकोस. तिथे काही त्रास आहे का ?” विकासनी तिला समजावलं.

“नाही. त्रास असा काहीच नाही. दिवस भर ऑफिस आणि रात्री फ्लॅट वर. भारतात तरी  काय हेच होतं. नोकरी आहे, सारखीच, इथे काय आणि तिथे काय?” – देवयानी

“झालं तर मग. कशाला एवढी नर्वस होते आहेस?” – विकास.

“अरे तिथे तू आहेस. हाच मोठा फरक आहे.” – देवयानी.

“ठीक आहे. थोडी कळ काढ. सब कुछ पहिले जैसे हो जाएगा.  चिंता की कोई बात नही हैं.” विकासनी तिला धीर दिला.

देवयानीचा अमेरिकेतला मुक्काम वाढला. ऑफिस नि सांगितलं की ते कोणाला तरी पाठवण्याची व्यवस्था करताहेत, पण तो पर्यन्त देवयांनीला तिथेच राहून काम सांभाळावं  लागेल.

देवयानीचं आता कामात लक्ष लागत नव्हतं, एक दिवस तिच्या रूम मेट शी, सेजल  आणि पूर्णिमा शी,  रात्री बोलत असतांना सेजलने  देवयांनीला  धीर देण्या ऐवजी जे नको बोलायला हवं, तेच बोलली. तिच्या चिंतेत अजूनच भर घातली. म्हणाली

“अग हे लोक असच करतात. तू फारशी आशा लावून बसू नकोस. वर्ष भरापूर्वी, प्रकाश कुमार म्हणून होता तो असाच बदली म्हणून एक महिन्या साठी आला होता. तो ज्यांच्या जागेवर आला होता, त्यांनी इथेच दूसरा जॉब घेतला होता. आणि कंपनीनी प्रकाश कुमार ला  रीलीव करण्यासाठी कोणालाच पाठवलं नाही.”

“त्याला इथे राहण्यात काय प्रॉब्लेम होता? तो राहू शकला असता, माझी गोष्ट वेगळी आहे.”- देवयानी.

“त्या बिचाऱ्याची बायको आणि मुलगा, भारतात. हा इकडे. सॉलिड वैतागला होता.” सेजळणी सांगितलं.

“मग त्यांनी बायकोला इकडे का नाही बोलावलं? अमेरिकेत यायला तिला आनंदच झाला असता.” – देवयानी.

“अग त्यांनी बायकोला विचारलं होतं पण त्यांची बायको बँकेत ऑफिसर आहे. ती कशी इतकी चांगली नोकरी सोडून इकडे येईल? तिने नकार दिला.” – सेजल.

“मग?”

“मग काही नाही. याने कंपनी ला सांगितलं की ताबडतोब रिलीवर पाठवा नाहीतर मी राजीनामा देतो. पण हा माणूस कामात इतका चांगला होता, एकदम आउट स्टँडिंग, की कंपनी ला विचार करावाच लागला. व्यवस्था झाल्यावर मग तो परत भारतात गेला.” – सेजल.

“मी काय करू ? माझं कॅरियर काही इतकं आउट स्टँडिंग नाहीये.” – देवयानी.

“प्रयत्न करून पहा. पण इतक्यात नको. इतक्या लवकर कोणी ऐकत नसतं. जरा थोडा काळ जाऊ दे.” – सेजल.

“ठीक आहे. थोडी वाट पहाते. नाही तर जॉब सोडून चालली जाईन.” – देवयानी.

“जसं तुला वाटेल तसं.” असं म्हणून सेजल नी खांदे उडवले आणि गप्प बसली.

महिना संपला. कंपनीत काहीच हाल चाल दिसत नव्हती. देवयानी वैतागली पण करते काय ?

शनिवारी दुपारी, पूर्णिमाला काही खरेदी करायची होती म्हणून तिघी जणी मॉल मधे गेल्या. मॉल मधे फिरता फिरता तीन चार तास कसे निघून गेले हे कळलंच नाही. मग त्या सगळ्यांनाच  भूक लागली म्हणून फूड कोर्ट वर गेल्या. पिझ्झा ऑर्डर करून एका टेबला वर गप्पा मारत बसल्या होत्या. हाय पूर्णिमा अशी कोणी तरी हाक मारलेली ऐकू आली. तिघींनी वळून पाहीलं. आणि देवयानीच्या काळजाचा ठोकाच चुकला. हाक मारणारा दूसरा तिसरा कोणी नसून राजूच होता. देवयानीनी मान वळवली. राजूचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. देवयानी उठून जाण्याच्या विचारात होती पण सेजल म्हणाली की

“कुठे  चालली आहेस ? आत्ता पिझ्झा येईल. मग थंड पिझ्झा चांगला लागत नाही. जाऊ नकोस बस. आणि हा पूर्णिमाचा मित्र आहे ना, फार इंट्रेस्टिंग पर्सनॅलिटी आहे. बघ तुझी ओळख करून देते. तुला पण त्याची कंपनी आवडेल.” देवयानीचा नाईलाज झाला. ती उठली होती ते पुन्हा बसली. विचारात पडली की राजू इथे काय करतोय ? केंव्हा आला ?

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

 

 

 

Share

NEW REALESED