Sanyog aani Yogayog - 3 books and stories free download online pdf in Marathi

संयोग आणी योगायोग - 3

भाग-३
ती जेव्हा तिचा बाबांसोबत बोलत होती, तर त्यावेळेस तिचा आवाज ऐकून माझा मनाला फार वाईट वाटत होते. तिने सगळ सविस्तरपणे तिचा बाबांना सांगितले आणि काळजी करू नका मला उशीर होईल म्हणून त्यांना सांगितले. तिचे बोलने झाल्यावर तिने फोन कट केला आणि फोन माझ्याकडे देत मला मनातून ती "Thank You!" असे म्हणाली. मला "Thank You" बोलतांना तीचा चेहर्‍यावर आई बाबांशी बोलण्याचे समाधान तर होतेच आणि त्याचबरोबर आता घरी जायचे परंतु ते कसे हा प्रश्न सुद्धा होता. ती सगळी तिची चिंता सहजपणे मी तिचा चेहर्‍यावर बघितली. ती परत हताशपणे तिचा गाडीजवळ गेली आणि पुन्हा गाडीची किक मारून गाडीला सुरु करण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र यावेळेस मज स्वतःला माझीच लाज वाटू लागली होती. त्याच क्षणी मी निश्चय केला, कि मी तीची मदत करणार. माझा सगळा राग, माझा तिरस्कार आणि माझा स्वाभिमान बाजूला सारून मी त्या बिचारीची मदत करणार. तोच मी तीचाकडे वळलो आणि तिचा दिशेने जाऊ लागलो. तिचा गाडीजवळ जाऊन मी तिला विचारले, “ काय झाले आहे गाडीला ? ” मात्र यावेळेस माझा सूर फारच नम्र असा होता. तिचा कानामध्ये माझा नम्र आवाज जाताच ती किक मारत असतांना थांबली. तिने मान वर करून माझ्याकडे बघितले, त्यावेळेस मला तिचा डोळ्यांत जागलेली मदतीची आस दिसू लागली. ती नम्र स्वरात बोलली, “ काहीच कळत नाही आहे मला, मी माझ्या कार्यालयातून निघाली तेव्हा गाडी पटकन सुरु झाली आणि अचानक या बस स्टॉप जवळ येऊन आपोआप बंद पडली.” मी म्हणालो, “ पेट्रोल संपलय काय गाडीचं ? ” ती उत्तरली, “ नाही ! मी येतांनाच गाडीत २०० रुपयाचे पेट्रोल भरूनच निघाले होते आणि टंकी फुल झाली होती ”
त्यानंतर मी तिला म्हटल, “ बघतो मी काही जमत असेल तर” म्हणून मी तिला म्हटल, “ तुम्ही इकडे या मला बघू द्या. ” नेमका तोच क्षण या संयोगाचा योगायोगात बदलणारा असावा असे मला वाटत. ती आणि मी एकदम चिकटून इकडचे तिकडे झालेलो होतो. ती गाडीचा हैंडल धरून होती आणि मी हैंडल पकडण्यास गेलो तर तिचा हातावर माझा हात अलगद पडला. माझी पत्नी गेली तेव्हापासून मी आजवर कुठल्याही पर स्त्रीचा स्पर्श सुद्धा अनुभवला नव्हता. तिचा हात संपूर्ण घामाने चिंब भिजलेला होता. त्यानंतर ती मला आणि गाडीला चिकटून उभी होती. तर तिचा घामात भिजलेल्या शरीराचा तो मदमस्त करणारा गंध माझ्या नाकात आणि सर्वांगात दरवळायला लागला होता. तिचा माथ्यावरील घामाचे थेंब टप टप करत कधी खाली तर कधी तिचा भिजलेल्या कापडावर पडून तेथेच सामावत होते आणि तिचा घामाचा गंध हा आणखीनच दरवळत होता. पत्नी गेल्यापासून हा माझा पहिला अनुभव होता. खर सांगावे तर मी माझे भान हरवून बसलो होतो त्या क्षणी. तेव्हा तिने अलगद मला आवाज दिला आणि ती म्हणाली, “ काही कळतय काय तुम्हाला ?” मी खडबडून शुद्धीवर आलो आणि म्हणालो, “ मला तर काहीच कळत नाही.” त्यानंतर ती म्हणाली, “आता घरी जायचे कसे ! ”
त्याक्षणी मलाही तोच प्रश्न पडला होता. आम्ही दोघेही एकदम निशब्द होऊन त्या विराण अशा रस्त्यात उभे होतो. मग एकाएक माझा तोंडून शब्द निघाले, “आता घरी जाणार कशा तुम्ही, गाडीतर बंद पडली आहे आणि आता तर सर्व दुकान हि बंद झाले आहेत. ” हे ऐकून ती सुद्धा उत्तरली, “ हो ना मी सुद्धा तोच विचार करतेय मघा पासून ” एवढे बोलल्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी न संपणारी शांतता पसरली होती. आवाज येत होता, "किर्र" फक्त त्या रात किड्यांचा. मग पुन्हा मी तिला विचारले, “ एक गोष्ट विचारू, काही हरकत तर नाही ना ? ” मग ती उत्तरली, “ हो विचारा .” मी विचारले, “ तुम्ही राहता कुठे ?” तो प्रश्न करतांना त्या क्षणी मला मात्र फारच असहज वाटत होत, तरीही मी तो प्रश्न तिला विचारला. तिने मात्र काहीच न घाबरता सहजपणे उत्तर दिले, “ मी पुढे गांधी चौकात रहाते. तेथे जवळच आमचे घर आहे.” तिचा तोंडून गांधी चौक ऐकून काय जाने मला फारच बर वाटू लागले होते आणि अनायास माझा तोंडून शब्द निघाले, “ वाह ! काय योगायोग आहे, मी सुद्धा गांधी चौकचा पलीकडे रहातो.” हे बोलतांना माझ्या चेहर्‍यावर एक वेगळीच चमक होती आणि स्मित से हास्य सुद्धा आले होते.
माझ्या चेहऱ्यावरची ती चमक तिने अचूक हेरली होती. त्यामुळे तिचा निराशाग्रस्त चेहर्‍यावर एक समाधान आले होते, कि कुणीतरी तिचा घराकडील व्यक्ती तिचा बरोबर आहे. मग अलगद माझा तोंडून शब्द बाहेर पडू लागले, मी म्हटल, “एक विचारू, ” ती सुद्धा बेहीचक आणि बिनधास्तपणे उत्तरली, “ हो तुम्ही बिनधास्त बोला, काहीही संकोच करू नका.” मग मी पुढे बोललो, “ आता या क्षणी मला तर ऑटोरिक्षा भेटण्याची शक्यता नगण्य अशी दिसत आहे. तर मी विचार केला आहे , कि आता पायदळ घराकडे निघावे, काय तुम्ही चालाल माझ्याबरोबर.” तेवढ्यात तिचा मुखातून शब्द बाहेर पडले, “ तुम्ही तर माझ्या मनातील बोलले,” आणि तिचा डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिचे ते अश्रू बघून आता मला आणखीनच तीचासाठी वाईट वाटू लागले होते. तिला सांत्वना देण्यासाठी मी तिला बोललो, “ अहो रडू नका, मी आहे ना सोबतीला तुमचा, मी सोडतो तुम्हाला तुमचा घरी काही काळजी करू नका. पण एक विचारतो, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना ? ” ती उत्तरली, “ तुम्ही तर माझ्यासाठी हल्ली, या क्षणी देवाचे दूत बनूनच येथे उपस्थित आहात, तिकडे आता माझे काहीही होऊ दे, माझ्या तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तर चला आपण निघूया.” त्यानंतर तिने तिची स्कुटी काढली आणि गाडीला ढकलू लागली. तोच मी तिला म्हटले, “ अहो, थांबा गाडी मी घेतो.” असे म्हणून मी गाडी घेण्यास हैंडल वरा हाथ ठेवणार तोच तिचा मुलायम हात माझ्या हातात आला. तिचा त्या कोमल स्पर्शाने माझा सर्वांगात एक वीजच कडाडली होती. आम्ही दोघे हि हसत आमचा पुढचा प्रवासावर निघलो.
शेष पुढील भागात............
Share

NEW REALESED