Harishchandragad - 3 books and stories free download online pdf in Marathi

हरिश्चंद्रगडावर - भाग 3

गडावरील मंदिरांचा समूह प्राचीन आणि पाहण्यासारखा आहे. आदिदैवत हरिश्चंद्रेश्वराचे अतिशय देखणे हेमाडपंथी मंदिर असून आजूबाजूला इतर देवीदेवतांची दगडी बांधकाम असलेली मंदिरे आहेत. मंदिर परिसरात भली मोठी पुष्करणी आहे. आवारात एक गणेशमंदिर असून आतील गणेशमूर्ती अतिशय भव्य व देखणी आहे

या मंदिर समूहातील प्रमुख आकर्षण असलेलं केदारेश्वर मंदिर मुख्य मंदिरापासून थोड खाली उतरून गेल्यावर आहे.
आता मी प्रमुख आकर्षण म्हणतेय म्हणजे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल या मंदिराचे काहीतरी खास वैशिष्टय असले पाहिजे.
अगदी बरोबर ओळखलं तुम्ही सर्वांनी. शिवाची अवाढव्य दगडी पिंड ( कमीत कमी दोन पुरुष उंचीची) एका गुहेत चहू बाजूंनी पाण्याने वेढलेली आहे. पिंडीच्या चारही कोपऱ्यात चार दगडी खांब असावेत त्यातील सध्या एकच दगडी खांब आपले अस्तित्व टिकवून आहे.

ऐन पावसाळ्यात गुहेत साधारण छाती एवढं पाणी असते. त्यातूनही मार्ग काढत हौशी मंडळी आत उतरून व्हिडिओ बनवण्यात गुंतली होती. तुम्ही हरिश्चंद्रगडावर गेलाय आणि केदारेश्वरसमोर दोन्हीं हात एकत्र खाली पाण्यातून उचलून डोक्यावर नमस्काराची पोज देत आणि बॅकग्राउंडला भगवान शिवाचे गाणे अशी रिल नाही बनवली तर तुम्ही काय केलं. अशी पक्की समजूत बऱ्याच जणांची आहे. त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवर हरिश्चंद्रगड सर्च केलं की हीच अती फेमस रिल नक्की दिसते.
आम्ही दोघांनी मात्र स्वतःची कॅपासिटी ओळखून गुहेच्या बाहेरूनच देवाला हात जोडले.

आता सर्वजण एकत्र जमले. इथून पुढं कोकणकडा पाहायला जायचं होतं. सतत कोसळणारा पाऊस आणि दाट धुक्यात हरवलेला गड . यामुळे इथे बरेच ट्रेकर्स वाट चुकतात आणि घनदाट जंगलात हरवतात.

"आले का सगळे.. सिद्धू मोज एकदा.. प्रत्येकानं आपापले मित्र मैत्रिणी सोबत आहेत ना याची खातरजमा करून घ्या. इथून पुढं सगळे एकत्र कोकणकड्याच्या दिशेनं जायचं आहे."

ट्रेक लीडर मयुरेश जीव तोडून सगळ्यांना सूचना देत होता.साधारण पाच फूट दोन इंच उंची आणि उंचीला शोभेल अशी शिडशिडीत शरीरयष्टी. मयुरेशला पाहून त्याच्या ट्रेक करण्याच्या कॅपासिटीवर नवख्या ट्रेकरला शंका येऊ शकते. परंतु जसजसे तुम्ही त्याच्या सोबत सह्याद्रीत फिरता तसंतसं"मूर्ती लहान पण कीर्ती महान " याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

काही पोरंपोरी गप्पामध्ये गुंग होती. मग काय आमचे लीडर चिडले ना.
अन् तेवढ्यात सिद्धू दोन ट्रेकर कमी असल्याचे सांगतो.

"अरे .. ऐका सगळ्यांनी . एकडे लक्ष द्या. कोणा एकाच्या चुकीने अख्खा ग्रुप संकटात येऊ शकतो.
मी सांगितलेल्या सूचनांचे उल्लंघन करताना कोणी दिसले तर ठाकूर तो गयो फिर.."

ठाकूर तो गयो फिर.. हा मयुरेशचा पेटंट डायलॉग आहे. त्याच्या शिवाय तो कोणाच्या तोंडी शोभतही नाही.तो जेंव्हा हा डायलॉग बोलतो तेंव्हा मला शोलेचा गब्बर आठवतो.

आणि जेंव्हा मयुरेश चिडतो तेंव्हा तिथला साधा प्रसंग माझ्या खट्याळ मनानं कसा रंगवलेला तो वाचा😂😂

गब्बरच्या हातात बेल्ट असतो इथे मयुरेश हातात छोटी काठी असते.

मयुरेश--" सिद्ध्या, कितने आदमी है गिन तो जरा"

सिद्धू ( दुसरा ट्रेक लीडर) : " सरदार दो आदमी कम है. टोटल साठ लोग आये थे उपर अभी दो लोग इसमे कम है."

मयुरेश: "दो आदमी कम है. कहा गये ढूँढो उनको
कौन लीडर गया था मंदिर मे उनके साथ. सब पर ध्यान रखने के लिये कहा था ना."

सिद्धू : "अमोल गया था सरदार"

मयुरेश : "अमोल, कहा है अमोल"

अमोल: "मै इधर हू सरदार"

मयुरेश : "सबको लिये बगैर ही वापस आ गये ?

क्या समझके आये? के सरदार बहुत खुस होगा?

सबासी देगा ??

जाव उन दो लोगो को ढूँढ के लाव.."

अमोल : "जी... जी... सरदार.."

आणि तेवढ्यात ती दोघं घाई घाईत येऊन ग्रुपला जॉईन होतात. सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. आणि सारा ग्रुप कोकणकड्याच्या दिशेनं कुच करतो.

Share

NEW REALESED