Devayani Development and Key - Part 40 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ४०

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ४०          

भाग  ३९  वरून  पुढे  वाचा ......

“हो वहिनी, आता सर्व ठीक आहे. बरं पण विकासची काय हाल हवाल ? भाऊजी पुन्हा भेटले का त्याला ?” – देवयानी.

“नाही पण डॉक्टर म्हणाले की रिपोर्टस  छान आले आहेत आता काळजीचं काहीच कारण नाहीये. ऑक्सिजन मास्क काढून, लेवल ९८ आली आहे. आता ४८ तास त्याला बिना ऑक्सिजन सपोर्ट ठेवतील. जर सगळं ठीक असेल तर दोन दिवसांनंतर डिस्चार्ज देऊ असं म्हणत होते.” – भैय्या.

देवयानीच्या चेहरा फुलला. छान हसली. अश्विनीला पण बरं वाटलं.

“म्हणजे मी येईन तेंव्हा विकास घरी आला असेल. वा. इंजेक्शन चा कोर्स पूर्ण झाला असेल ना ?” – देवयानी.

“हो. डॉक्टर म्हणालेच होते की कोर्स पूर्ण झाल्यावर त्याचा परिणाम दिसेल म्हणून. तसंच झालं बघ. आता काळजी नाही. अग हो, एक राहिलंच, तुझ्या बाबांशी  बोलणं  केलं का कुठे जायचं त्याबद्दल ?” – भैय्या.

“हो बोलले ना. ठीक आहे म्हणाले. बेळगाव ला राहून उद्देश साध्य  होणार नाही हे माझं म्हणण पटलं त्यांना. थोडा वेळ घेतला त्यांनी पण नागपूर ला जायला परवानगी दिली आहे.” – देवयानीनी सांगितलं.

“चलो, ये तो बढ़िया हो गया. Welcome to Nagpur. आज बाबांना सांगते त्यांना फोन करून थॅंक्स द्यायला. अजून काही ?” – अश्विनी.

“नाही. बाय.” – देवयानी.

आता पहिल्या सारखं रुटीन सुरू झालं होतं. पूर्णिमा ने आता कामात पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं, त्यामुळे बॉस पण खुश होता. देवयानीचे जायचे दिवस जवळ येत चालले होते, त्यामुळे तिची गडबड सुरू होती. तयारीला वेळ मिळावा म्हणून तिने रजेचा अर्ज टाकला होता आणि तो बॉस ने मंजूर पण केला होता. त्यामुळे तिचे आता कामाचे फक्त दोन दिवस उरले होते. तिला पुण्याच्या जागेवर परत जॉइन व्हायचं होतं, पण लॉक डाऊन असल्यामुळे तिला नागपूर वरून काम करता येणार होतं. देवयानी त्यामुळे खुशीत होती.

बॉस ने देवयानीला फेअरवेल म्हणून तिघी जणींना डिनर दिलं. त्या वेळी पूर्णिमा म्हणाली  की

“सर, देवयानी सारखंच माझ्यासाठी पण बघा ना पुण्याच्या ऑफिस मध्ये माझी पण ट्रान्सफर होते आहे का ते.”

“का ग ? गेले चार सहा दिवस पाहतो आहे की तू आता full swing मध्ये कामाला सुरवात केली आहेस. सगळ्या गोंधळातून तू successfully बाहेर पडली आहेस.

I am happy with that. You have improved your performance. मग आता कशाला भारतात जायचं आहे तुला” -  बॉस.

“सर, आता माझं मन नाही लागत इथे. आज देवयानी चालली आहे. राजेश काय एक वर्षा साठीच आला आहे. आणि त्याचं ठरलेलंच  आहे. त्याला इथे राहायचंच नाहीये. सेजल पण वापस जायला तयार आहे. उद्या सेजल त्याच्या बरोबर लग्न करून परत भारतात चालली जाईल. मी एकटी इथे राहून काय करू, बघा ना प्लीज माझ्या साठी सुद्धा. शेवटी homeland is homeland. नाही का ?” – पूर्णिमा.

“पूर्णिमा, खरं आहे तुझं म्हणणं. अमेरिका ही मोह नगरी आहे. आपल्या देशात नाही म्हंटलं तरी संस्कारांचे पाश असतात. इतक्या सहजा सहजी कोणी अडकत नाही. आजूबाजूला तुमच्या विचारांना योग्य दिशा देणारे बरेच हित संबंधी लोक असतात. खरं आहे. बघतो प्रयत्न करून, पण पूर्णिमा  लॉक डाऊन चालू आहे आणि सगळंच अवघड होऊन बसलं आहे. आहे ती नोकरी टिकवली तरी पुष्कळ आहे. तरी  पण बघतो मी. But I don’t promise.” बॉस म्हणाला.

 

त्या दिवशी रात्री फोन वर देवयानी बोलत होती.

“देवयानी,” अश्विनी, अपडेट देत होती. “ऑक्सिजन मास्क काढून, २४ तास उलटून गेले आहेत आणि विकासची तब्येत उत्तम आहे. कदाचित परवा सकाळी सुट्टी देतील. तू काय म्हणतेस ?”

देवयानीला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. म्हणाली-

“तयारी चालू आहे आता फक्त आठच दिवस राहिले आहेत. परवा पासून मी सुट्टीवर आहे. तुमच्या साठी काय आणू इथून ?”

“काही नको. तू सही सलामत ये म्हणजे झालं.” – अश्विनी.

“अहो, असं कसं ?” – देवयानी.

“देवयानी, लहानपणी आम्ही एक सिनेमा पाहीला होता, त्या मध्ये गावाला जाणारा माणूस आपल्या छोट्या मुलीला विचारतो की काय आणू तुझ्या साठी, गुडिया म्हणजे बाहुली आणू का ? त्यावर ती मुलगी म्हणते “ गुड़िया चाहे ना लाना, पर पप्पा जल्दी आ जाना.” आमचं ही असच आहे. आमच्या साठी तूच गुडिया आहेस. अजून काही नको. उगाच सामान वाढवू नकोस.” – अश्विनी म्हणाली. 

“मला माहीत होतं की तुम्ही सांगणार नाही, मी माझ्या मना प्रमाणे घेऊन येईन.” देवयानी म्हणाली. नंतरचे दिवस खूप घाई, गडबडीचे गेले. सगळे सोपस्कार करून झाल्यावर, security check  होऊन देवयानी, बोर्डिंग च्या announcement ची वाट पहात बसली होती.

 

इकडे नागपूरला विकासला हॉस्पिटल मध्ये अपेक्षेपेक्षा चार दिवस जास्त राहावं लागलं होतं. आणखीन कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्या होत्या त्या साठी. त्या सर्व होऊन समाधान कारक रीपोर्ट आल्यावर विकासला डिस्चार्ज मिळाला होता. आणि तो घरी आला होता. त्याला चौदा दिवस घरीच isolation मध्ये राहावं लागणार होतं. त्याची सगळी सोय घरी केली होती. थकवा प्रचंड आला होता. एवढ्याशा प्रवासाचा सुद्धा विकासला त्रास झाला होता. आल्या आल्या तो पलंगावर आडवा झाला. विकास नी विचारलं की “देवयानी केंव्हा येणार आहे ?”

“अरे अश्विनी सांगत होती की तिचा मेसेज आला आहे, ती एयर पोर्ट वर आहे. सगळे सोपस्कार पार पाडून निघेल आणि उद्या सकाळी मुंबई ला पोचेल. पोचल्यावर काय परिस्थिती आहे ते बघून फोन करणार आहे.” विकासच्या आईनी सांगितलं. 

ठीक आहे. आणि मग त्यानी डोळे मिटले. थकवा इतका होता की त्याला लगेच झोप लागली.

त्याच्या देखभाली ची संपूर्ण जबाबदारी आईने घेतली होती. खालच्याच एका रूम मध्ये त्याची व्यवस्था केली होती. दुसरी गेस्ट रूम  देवयानी साठी राखून ठेवली होती. आणि यमुना बाई, त्यांच्याच बेड रूम मध्ये असणार होत्या. भगवान राव वरच्या गेस्ट रूम मध्ये शिफ्ट झाले होते. पुढचे चौदा दिवस विकास आणि देवयानीची देखभाल यमुना बाईंनाच करायची होती. त्यामुळे त्या सुद्धा घरात वावरणार नव्हत्या. विकास आणि देवयानी ला  कोणाच्याही संपर्कात येऊ द्यायचं  नव्हतं. अवघड होतं पण यमुना बाई ती रिस्क घेणार होत्या. त्याच्या संपर्कात त्या असणार होत्या. म्हणून त्यांच्या साठी भगवानरावांनी त्यांची बेड रूम मोकळी केली होती. त्या घरात वावरणार नव्हत्या.

लॉक डाऊन असल्या मुळे घरात कोणीही कामाला नव्हतं. यमुना बाई विकास साठी अडकल्या होत्या. सगळा भार केवळ अश्विनीवर पडला होता. एक बरं होतं की भैय्या सुद्धा लॉक डाऊन मुळे दुकान बंद असल्याने घरीच होता. तो आता अश्विनीला मदत करत होता. वरची सगळी कामं तो करत होता.

दुसऱ्या दिवशी देवयानीचा फोन आला की

“हॅलो, वहिनी, मी मुंबईला पोचली आहे. आता इथे पण टेस्ट करावी लागणार आहे. सगळं आटोपल्यावर मग पुन्हा फोन करेन. किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, पण आता मी आपल्या देशात आहे याचाच खूप आनंद होतो आहे. त्या मुळे किती वेळ लागेल याची चिंता नाहीये.”

विकासला सांगितल्यावर त्याचा चेहरा फुलला. तो आईला म्हणाला

“अग तिला पण quarantine मध्ये राहावं लागेल ना ? मग कसं करणार ?”

“हो होम quarantine मध्ये राहावं लागणार आहे तिला. पण अरे तिच्या साठी पण एक खोली तयार करून ठेवली आहे. आणि मी तुम्हा दोघांची सेवा करायला आहेच इथे.” यमुनाबाईंनी माहिती पुरवली. 

“तिला असं काय झालं आहे की तिची सेवा करावी लागणार आहे ?” – विकास.

“अरे, तिला काही झालं नाहीये पण जर तिला  खोलीत बंद अवस्थेत राहावं लागणार असेल तर तिला काय हवं काय नको पहावं लागणार नाही का ? माझ्या शिवाय कोणीच तुम्हा दोघांच्या संपर्कात येणार नाहीये.” – यमुनाबाई.

“हं. आहे खरं. पण आई, लग्न व्हायच्या आधीच तिला इथे येण्याची परवानगी कशी दिली तिच्या आई वडीलांनी ?” – विकासनी विचारलं.

“अरे फार नशीबवान आहेस तू. अशी, नवऱ्या साठी तीळ तीळ जीव तुटणारी बायको मिळायला भाग्य लागतं बरं. आयुष्य भर फुला सारखं जप तिला. आम्ही खूप सांगून पाहीलं, पण ती हट्टच धरून बसली की तू पूर्ण बरा होई पर्यन्त तीच, तुझं सगळं काही बघणार म्हणून. तिला खूप काळजी आहे तुझी. आम्हाला तर किती कौतुक वाटतं तीचं. मग आम्हीही जास्त ताणून धरलं नाही, पण तिला म्हंटलं की एकदा तुझ्या घरी विचार आणि मग काय ते ठरव.” – यमुनाबाई. 

“मग ?” – विकास.

“अरे तिच्या घरचे, काका, मावशी सगळेच आपल्या घरी हप्ता भर राहून गेले आहेत.” यमुनाबाई सांगत होत्या “आणि आनंदात वापस बेळगाव ला गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात कसलाच किंतु, परंतु येणार नाही याची खात्री होती.  आणि सगळं ठरल्या प्रमाणे झालं असतं तर तुमचं लग्न होऊन आता वर्ष झालं असतं. म्हणून कदाचित त्या लोकांनी देखील तिच्या हट्टा पुढे मान तुकावली असेल. असो पण झालं ते चांगलच झालं. ती डोळ्या समोर, असल्यामुळे तुझी पण तब्येत लवकरच सुधारेल, काय ?”

“ह्या, आई तू पण ना ! असं काही नाहीये. तुम्ही सर्व लोकं आहातच की, माझी काळजी घ्यायला.” – विकास. 

 

क्रमश: ...........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

Share

NEW REALESED