Punha Navyane - 6 in Marathi Women Focused by Shalaka Bhojane books and stories PDF | पुन्हा नव्याने - 6

Featured Books
  • જૂનું અમદાવાદ

    *અમદાવાદનો અમારો ગાંધી રોડલેખક: *અશોક દવે**મને એટલું યાદ છે...

  • એક ષડયંત્ર.... - ભાગ 50

    (માનવ સિયાને સોના જેવું બનાવે છે, ઉદાહરણ આપી સમજાવે છે. સિયા...

  • ભાગવત રહસ્ય - 4

    ભાગવત રહસ્ય-૪   સચ્ચિદાનંદરૂપાય વિશ્વોત્પત્યાદિહેતવે I તાપત્...

  • સચિન તેંડુલકર

    મૂછનો દોરો ફુટ્યો ન હતો ને મૂછે તાવ દેવો પડે એવા સોલીડ સપાટા...

  • જોશ - ભાગ 1

    Kanu Bhagdev ૧ : ભય, ખોફ, ડર... ! રાત્રિના શાંત, સૂમસામ વાતા...

Categories
Share

पुन्हा नव्याने - 6

भाग ६

दुसऱ्या दिवशी अनया राजीव च्या ऑफिस मध्ये आली. राजीव खर तर तिची वाटचं पाहत होता. पण त्याने तसं न दाखवता तिला थोडा वेळ वाट पाहायला लावायचं ठरवलं . प्युन ने दरवाजा वाजवला. राजीव सीसीटीव्ही च्या स्क्रीन मध्ये बघत होता. प्यून ने दरवाजावर टकटक केली.

प्यून, "आत येऊ का सर? "

राजीव, "या. काय काम आहे? पटापट बोला.?

प्यून, "सर ते अनया पवार नावाच्या कोणी मॅडम आल्या आहेत. तुम्ही त्यांना बोलावलं आहे. असं त्या म्हणतं आहेत. "

राजीव जरा आठवल्या चे नाटक करून म्हणाला, " ओ हा हा आल्यात का त्या? त्यांना १५ मिनिटांनी आत पाठवा. "

पंधरा मिनिटानंतर राजीव च्या केबीनचा दरवाजा वाजला.

अनया, "मे आय कम इन सर. "

राजीव, " येस येस कम इन. "

अनया आत येते आणि उभी राहते. राजीव तिला बसायला सांगतो. राजीव तिला तिच्या कामाचे स्वरूप समजावून सांगतो. तिची सॅलरी किती आहे ते सांगतो. उद्यापासून जॉईन करायला सांगतो. अनया त्याचे खूप खूप आभार मानते पण आभार मानताना ती मुद्दाम त्याच्या हाताला स्पर्श करते.
राजीव पण लगेच समजून जातो. अनया घरी निघून जाते. पण राजीव च्या मनात मात्र तिचाच विचार येत राहतो. राजीव उद्याची वाट पाहतो. अनया ऑफिस जॉईन करते पण तिला माहिती असते राजीव ने हे पद तिला कशासाठी दिलं हे ती जाणून असते. तिला फक्त पैसा हवा असतो आणि तो मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.
हळूहळू ती राजीव शी सलगी करण्याचा प्रयत्न करत असते. पण हे सगळं त्याला ऑफिस मध्ये कोणाला कळून द्यायचं नव्हतं. म्हणून मग तो बिझनेस टूर साठी जाताना अनया ला पण घेऊन जातो. ती पर्सनल असिस्टंट असल्याने तिचे त्याच्या बरोबर जाणे कोणालाही खटकत नाही.
मीराला तर काही च माहिती नसते. तीला वाटत असतं की, राजीव ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर जात आहे. बिझनेस टूर ला गेल्यावर मिटींग झाल्यावर. राजीव अनया ला घेऊन बाहेर फिरायला गेला. तिच्या साठी खूप सारी शॉपिंग केली. हॉटेल मध्ये तो रुम बुक करत होता. दोघांसाठी तो वेग वेगळी रूम घेत होता. पण अनया च त्याला नको म्हणाली. अनया च्या मनात पण तेथे आहे हे त्याला कळलं होतं.
दोघे एकाच रूम मध्ये राहिले. बिझनेस टूर च निमित्त काढून दोघे फिरत होते. पण बिझनेस टूर दोन महिन्यातून एकदा च असायची. त्यामुळे राजीव ने आता अनया ला कल्याण मध्ये एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला.
त्या फ्लॅटमध्ये सर्व सुख सोयी राजीव ने च करून दिल्या होत्या.
मीराला बिझनेस टूरचा. बहाणा सांगून राजीव अनया कडे जावून राहत असे. मीरा आपल्या संसारात इतकी दंग होती कि, तिच्या या गोष्टी लक्षात च राहिल्या नाही. पण मीराला आता सगळे कळले होते. चुकीची गोष्ट कधी ना कधी उघडकीस येते च. राजीव कडे भरपूर पैसा येत होता. त्याचा प्रॉफिट वाढला होता. त्यामुळे अनयावर तो पैसा उडवत होता.
आपल्या बायको ला कळले तरी तिला काय वाटेल ? ती आपली रिस्पेक्ट करेल‌ का ? स्वतः च्या मनाला तरी लाज वाटली पाहिजे होती. आपण आपल्या बायकोला फसवत असल्याची. एकदा विश्वास उडाला की उडाला. मग परत विश्वास ठेवणं खूप कठीण असतं.
मीरा इतर बायकां प्रमाणे संशयी नव्हती . ते चुकलं का तिचं ? नवऱ्याला सारखे प्रश्न विचारून हैराण करणारी नव्हती हे चुकलं का तिचं? की, आपल्या संसारात दंग राहणं चुकलं?
कांहींही झाले तरी बायकांनाच का दोष दिला जातो. ? मुलं नापास झाली बाईचा दोष, नवऱ्याने बाहेर लफडं केलं बाईचा दोष, मुलगी पळून गेली बाईचा दोष, बलात्कार झाला बाईचा दोष.‌सगळ्या बाबतीत बाईला दोष दिला जातो.
या सगळ्यांचं मोठं कारण म्हणजे एक स्री दुसऱ्या स्त्रीचा दुस्वास करते. एक स्त्री च दुसऱ्या स्त्री ला समजून घेत नाही.‌मीराने ही गोष्ट फक्त स्वतः ‌पुरतचं मर्यादित ठेवली होती. तिचा गावगजारा झाला असता तर सगळ्यांना मीराचं दोषी वाटली असती.सगळ्यांनी तिला खोटी सहानुभूती दाखवली असती आणि बोलता बोलता पुन्हा तोच विषय काढून तिला डिवचत राहीले असते.‌वरवर सगळे खोटी सहानुभूती दाखवतात आणि मनातून मात्र खरं झालं. असं म्हणतात .