time.. books and stories free download online pdf in Marathi

वेळ..

वेळ ही अशी आहे कि कधी कोणावर कशी येईल आणि कोणत्या परिस्थिती मध्ये येईल काहीच सांगता येत नाही. म्हणून वेळेला महत्व दया कारण ही एकदा हातातून निघून गेली तर आपण काहीच करू शकत नाही. कारण वेळेला आपण थांबवू शकत नाही एक किस्सा सांगते दोन जोडपं होत एकमेकांवर खूप प्रेम करायचे लग्नाआधी ते दोघेही वेळेला खूप महत्व द्यायचे त्यांचं लग्न झालं हळू हळू गोष्टी बदलत गेल्या. लग्न नंतर दोघांवर पण जबाबदारी आली. त्या मुलाचं लक्ष फक्त आणि फक्त कामाकडेच, लग्नानंतर तो तिला अजिबात वेळ द्यायचा नाही, नाही कुठे घेऊन जायचा, नाही एकमेकांमध्ये संवाद व्हायचा नाही कधी प्रेमाने जवळ करायचा म्हणून त्या मुलीने त्याला तिच्या पद्धतीने समजवण्याचे तिचे प्रयत्न चालू ठेवले ती त्याला वेळ देत होती ती त्याच्या कडे बोलायचा खूप प्रयत्न करत होती पण तिला प्रतिउत्तर नाही दिल या करणावरून त्यांच्या मध्ये खूप वाद होऊ लागले त्याच एकच बोलण मी करतोय माझ्या घरच्यांसाठी माझ्या घरच्यांना कोणत्या गोष्टी ची मला कमी नाही करून द्यायची या साठी ती मुलगी सुद्धा त्याला सपोर्ट करत असे कारण ती सुद्धा जॉब करत होती. ती फक्त त्या मुलाकडे वेळ मागत होती पण नाही.....ती त्याला एकच सांगत असे वेळ ही प्रेत्येकाची येते वेळ ही प्रेत्येकाची येते शेवटी तेच झालं.... आज त्याची चुकी त्याला समजली पण कधी जेव्हा त्याचाच घरचे त्याला बोलू लागले तू काय केलंस तेव्हा........ बापरे त्या मुलाला धक्का बसला ज्याच्या साठी मी येवढ केल त्याची शून्य किंमत आणि जिच्या साठी मी काहीच नाही केल तिने कधी तक्रार सुद्धा केली नाही. त्या दिवसा पासून त्यांनी ठरवलं कि तिची माफी मागायची आणि एकमेकांसोबत पूर्ण आयुष्यभर सोबत राहच.... आज तीच वेळ त्याचा वर आली.एकेकाळी ती वेळ मागत होती आता तोच मुलगा त्या मुलीकडे वेळ मागतोय ती सुद्धा बिझी झाली तिच्या तिच्या कामात.. सेम जी अवस्था त्या मुलीची होती ज्या गोष्टीची ती अपेक्षा करत होती आज त्याच सर्व गोष्टी ची अपेक्षा तो करतोय आज त्याला खूप दुःख होतय कि मी किती चुकीचा वागलो याचा त्याला पच्याताप होतोय. पुढे गोष्टी खूप बदल्या पण पूर्वी सारखं वागण नव्हतं म्हणून... तिने त्याला माफ करून नव्याने आयुष्याला सुरवात केली. शेवटी काय जर योग्य त्या वेळी काही गोष्टी केल्या कि त्या चांगल्या असतात कारण आपल्याला आयुष्यामध्ये जे करायचे आहे ते आताच करा कारण वेळ आणि वय एकदा का निघून गेले कि पुन्हा नाही परत येत म्हणून वेळेला महत्व दया. पुण्या मध्ये घडलेली सत्य घटना ती म्हणजे पती पत्नी होते तो चांगल्या ठिकाणी जॉब ला होता तो कामातून वेळ काडून त्याच्या पत्नीला वेळ देत नसे ती त्याच्या कडे वेळ मागत होती पण तो कामामध्ये बिझी असल्यामुळे तो तिला वेळ देऊ शकला नाही. पण हीच वेळ त्याला खूप महागात पडली तिने अनोळखी मेल करून त्याला तिने त्रास द्यायला सुरुवात केली. या सर्व गोष्टी हायकोर्ट पर्यन्त पोहोचल्या शेवटी काय वेळ माणसाला कुठे घेऊन जाते याचा काही नेम नाही म्हणून अजून जर कोणी वेळेला महत्व देत नसेल तर आतापासूनच सुरुवात करा कारण चांगले कुटुंब विखुरायला वेळ नाही लागत, नातं जर घट्ट करून ठेवायचं असेल तर समोरच्याच्या भावना समजून घ्या यासाठी लागणार तुमच्या कडे वेळ असला पाहिजे म्हणून जोडप्यानी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना वेळ दया तरच सर्व गोष्टी सुरळीत चालतील अन्यथा नाही.... विशाखा ऋषिकेश मोरे (विलास सावंत ) (दापोली भोपण ) 9137853889