Bhagy Dile tu Mala - 14 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग १४


स्वरा-राजचा विषय आज कॉलेजचा हॉट मुद्दा झाला होता. जो तो कुणी फक्त त्यावरच चर्चा करत होता. राज हा थोडा घमंडी असल्याने भरपूर लोक जे घडल त्याने खुश होते. त्यांच्यासाठी आजचा दिवस तर खूप आनंदाचा होता तर दुसरा एक वर्ग होता जो स्वराची काळजी करत होता. राजला राजनैतिक पार्श्वभूमी लाभली असल्याने तो त्याचा कायमच गैरवापर करत आला होता. धमक्या देणे, गुंडकडून मारहाण करणे असेच बरेच किस्से त्याच्याकडून ऐकण्यात आले होते शिवाय प्रॉपर्टीचा बिजनेस असल्याने कित्येक लोकांना धमकावून त्यांने स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी केल्या होत्या. तो कोणत्या वेळी काय काय करेल हे त्याचं त्यालाच माहिती नव्हतं म्हणून आज स्वराची सर्वाना काळजी वाटत होती अर्थात ह्या गोष्टी अजूनतरी स्वरापर्यंत पोहोचल्या नव्हत्या.

स्वरा कॉलेजमधून परत हॉस्टेलवर आली. आज सर्व लोक तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते त्यामुळे रूमवर आल्यावर जरा तिला बर वाटू लागलं होतं. ती होस्टेलवर आली तोपर्यंत ही बातमी पूर्ण हॉस्टेलपर्यंत पोहोचली होती. स्वरा - पूजा निवांत बसलेच होते की दारावर कुणाची तरी थाप पडली. आताच नेमकं कोण आलं म्हणून स्वरा दार उघडायला जाऊ लागली. जरी स्वराने आज किस्से ऐकले नव्हते तरीही पूजाच्या कानावरून ते किस्से नक्कीच गेले होते त्यामुळे पूजाला भीती वाटत होती. स्वरा दार उघडायला जाणारच तेवढ्यात पूजा धावतच दारावर गेली. ती क्षणभर दाराजवळ थांबली. तिला दार खोलताना खूपच भीती वाटत होती. तिचे हातपाय भीतीने थरथर कापू लागले होते. हात दार ओढायला समोर जात नव्हते. तरीही हिम्मत करत तिने दार ओढले. समोर कियारा आणि काही मैत्रिणी होत्या. त्यांना बघून पूजा नॉर्मल झाली. तिच दोनशे चाळीसच्या स्पीडने धडधड करणार हृदय काही वेळासाठी शांत झाल. सर्व मुली आतमध्ये येताच पूजाने पुन्हा एकदा दार लावले आणि त्यांच्यासोबत येऊन बसली.

कियारा आत आलीच होती की घाबरत म्हणाली,"
स्वरा जो पुरे कॉलेजमे बात चल रही है वो सच है? "

स्वरा काही बोलणार तेवढ्यातच पूजा हळुवार आवाजात म्हणाली," हा सच है. उसने स्वराके साथ गलत सुलुक किया और स्वरासे रहा नही गया."

पूजा बोलूनच गेली होती की कियारा हसतच म्हणाली," ऊस साले के साथ ऐसा ही होणा चाहीये था. एक बार मेरा काम था उसके पास./गयी तो उसने बेइज्जती करके वापस भेज दिया. हरामी साला. इंसानियत ही नही है उसके पास."

कियाराच बोलणं ऐकून सर्वच मुली हसू लागल्या होत्या पण गंभीर स्वरात शोभना म्हणाली," स्वरा ये तो ठीक बात है लेकिन मै तुम्हे दुसरी बात बताना चाहती हु. एक दिन मै बाजार गयी थि तब की बात है. ऊस एरियामे बहोत से फेमस दुकाने है. वो आदमी दुकान बेचने से मना कर रहा था तो राज के लडको ने उसे बहोत मारा. मेरे सामनेही उसका कितना खून बेह गया था फिर भी नही छोडा ऊन कमिनो ने. सो मै खुद ये केहना चाहती हु की माना तुमने गुस्से मे उसको मारा लेकिन सॉरी बोलकर मॅटर खतम कर दो. वरणा तुम्हे बहोत प्रॉब्लेम हो जायेगी. वो शांत बैठणे वाला नही है."

जे ते आपले मत मांडत होते तर स्वरा शांत होती. शोभना नंतर सुद्धा एक दोन मुली त्याच्याबद्दल तिला सांगत होत्या. स्वरा फक्त बघायच काम करत होती. आता सर्वांच बोलणं झालं आणि स्वरा मोठ्याने म्हणाली," सब का हो गया हो तो मै कुछ बोल लु?"

आता सर्वच मुली शांत झाल्या आणि तिच्या उत्तराची वाट पाहू लागल्या," तुम्हे क्या लगता है मुझे शौक है हर किसीं पर हात उठाने का? मैं तो शांतीसेही बात करणे गयी थि पर उसके जवाबने मेरा दिमाग हिला दिया. वो केह रेह था की किसीं भी किंमत पर तुम्हे हासिल कर के रहूंगा. क्या मैं उसकी पर्सनल प्रॉपर्टी हु या उसकी रखेल हु जो उसे जब चाहे मिल जाये. एक औरत की कोई इज्जत नही होती? उसकी कोई मर्जी नही होती? लडका चाहे तो क्या हमे गुलाम बना कर सकता है?"

तिच्या भारदस्त आवाजाने रूमच वातावरण शांत झाल होत. स्वराही तापलीच होती आणि पुन्हा म्हणाली," चाहे जमाणे मे जो हो लेकिन मै चुप नही बैठणे वाली. वो मेरे अस्तित्त्व पे, मेरे फ्रीडमपे उंगली उठा रहा था और मैने उसे जवाब दिया. मैने जो किया उसका मुझे कोई पछतावा नही है. मै उससे सॉरी नही बोलुंगी फिर चाहे जो हो जाये. उसे ये पता चलनाही चाहीये की प्यार एक पूजा है, ईबादत है जो दोनो तरफ से होती है. सिर्फ एक तरफ से नही. हम सिर्फ प्यार कर सकते है दुसरे को मजबूर नही कर सकते प्यार करणे के लिये. वैसे भी क्या करेंगा. मारेगा ना कुछ दिन हॉस्पिटल मे बीताकर लौट आ जाऊंगी वैसे भी मुझे यहा कोणसी पुरी जिंदगी गुजारणी है. "

स्वराच्या चेहऱ्यावर आता थोडं हसू आलं होत तर बाकी सर्व गप्पच बसल्या. काही वेळ त्या तिथेच थांबल्या आणि आपापल्या रूममध्ये निघून गेल्या. स्वरा एकटीच हसत होती म्हणून पूजा तिला म्हणाली," स्वरा तुझं मत समजू शकते पण अटलिस्ट घरच्याना तरी कळव ना?"

स्वरा हसतच म्हणाली," वेड लागलंय का तुला? त्यांना सांगितलं तर ते उद्या इथे धावत येतील. विनाकारण त्यांना टेन्शन द्यायचं नाही मला. मी समर्थ आहे माझे प्रॉब्लेम सोडवायला. "

तिच्या उत्तरासमोर पूजाच काहीच चाललं नाही. स्वरा आज इतकं सर्व घडूनही निवांत झोपी गेली होती तर पूजाच्या डोक्यात अजूनही तेच सुरू होत. मुलींच्या शब्दांनी तीच चैन उडवल होत त्यामुळे भीतीने तिला झोपच लागली नव्हती.

दुसऱ्या दिवशी त्या कॉलेजला पोहोचल्या. स्वरा सर्वाकडे दुर्लक्ष करत चालू लागली होती तर पूजा खूपच घाबरली असल्याने आजूबाजूला बघत चालली होती. तिला भीती होती की राज किंवा त्याचे मूल येऊन स्वराला काही करणार तर नाही? त्यामुळे तीच पूर्ण लक्ष आजूबाजूला होत. चौफेर नजर फिरवतच ती क्लासकडे जाऊ लागली. काहीच क्षणात क्लास आला आणि पूजाच मन जरा शांत झाल. क्लास आला तसेच दोघेही क्लास मध्ये जाऊन बसले. मागचे दोन दिवस खूप विचित्र होते. एक दिवस स्वयमने तिची साथ सोडली होती तर दुसऱ्या दिवशी मनात भीती करून जाणारा किस्सा घडला होता तरीही स्वराच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हतं. तिने क्लासमध्ये स्वयमकडे लक्ष दिलं नव्हतं की तिच्या चेहऱ्यावर राजच टेन्शन नव्हतं. ती क्लास करण्यात गुंग होती. तशी ती रोज स्वयमकडे पाहत असायची पण आज अस काहिच झालं नव्हतं. स्वयमने सुद्धा कालचा किस्सा ऐकला आणि तो घाबरून तिच्याकडे अधून-मधून लक्ष देऊ लागला तीच स्थिती पूजाची होती पण स्वरा आपल्या करिअरवर आपल्या अभ्यासावर ठाम होती. तिने दोन दिवसातले दोन मोठे दुःख आपल्या मनात दाबून टाकले आणि अशी वागत होती जस काहीच झालं नव्हतं. वय जरी कमी असल तरी जबाबदारीने ती मोठी आहे ह्याबाबत पुजाला आता तिचा अभिमान वाटत होता.

पूर्ण दिवसभर अशीच स्थिती होती. पूजा घाबरत होती तर स्वरा बिनधास्त हसत होती. कॅन्टीनमध्ये हसन काय, लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करण काय तिच्या चेहऱ्यावर कुठेच दुःख दिसत नव्हतं. आज दिवसभर सुद्धा सर्वांच्या नजरा तिच्यावरच होत्या पण तिने सहजच त्याकडे दुर्लक्ष करून घेतलं. आयुष्यात सर्व काही सोपं असत फक्त ती इच्छा मनात असली पाहिजे हे स्वराच्या वागण्यावरून समजत होत. तिचा विश्वास बघून पूजाचीही भीती आता नाहीशी होऊ लागली होती. आजचा पूर्ण दिवस गेला तरीही काहीच विचित्र घडलं नाही त्यामुळे पूजाची भीती नाहीशी झाली होती उलट आज हॉस्टेलला सुद्धा त्या निवांत गप्पा मारत बसल्या होत्या. अभ्यास तसाच सुरू झाला आणि पुन्हा एकदा तिने स्वतःला सावरून अभ्यासात समोर जाण्याचा निर्णय घेतला.

ही फक्त एका दिवसाची कहाणी नव्हती. तर पुढचे काही दिवस सर्व असच घडत होत. लोक तिला बघत असायचे तर ती त्यांना दुर्लक्ष करून पुढे जायची. पूजाने तिला त्याबद्दल सांगितलं होत तर स्वरा म्हणाली की उद्याचा भावी यशस्वी व्यक्तीकडे जग बघणारच त्यात नवीन काय? तिचा कॉन्फिडन्स बघून कधी कधी पूजाही दंग राहायची. काहीतरी होत तिच्यात जे सर्वांपेक्षा तिला खास बनवत होत. स्वरा म्हणजे एक निर्धार!! जो कुणालाच तोडता येणार नव्हता. स्वरा म्हणजे झरा जो सर्वांची मन शांत करून जात होता. स्वरा म्हणजे यश, ज्यांच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही कारणे समोर न करता सतत जिद्दीच्या चिकाटीवर आपला रस्ता सर करत होती.

तीन-चार दिवस निघून गेले होते. सर्व लोकांनी जस स्वराला घाबरवल होत तस काहीच झालं नव्हत त्यामुळे पूजाचीही भीती पूर्णता नाहीशी झाली होती. राजला कदाचित आपली चूक लक्षात आली असेल म्हणून तो शांत झाला आहे अस सर्वानाच वाटलं होत आणि सर्व लोक हा किस्सा विसरून आपापल्या आयुष्यात समोर जाऊ लागले होते. स्वरा तर सेकंड सेमची तयारी करू लागली होती. आज पुन्हा एक रविवार. स्वराने जोमाने अभ्यास सुरू केला होता. तिला काही वस्तू आज घ्यायच्या असल्याने ती समोर स्टेशनरीकडे निघाली. सोबत होती तिची जिवलग पूजा. सकाळचे नऊ वाजले असल्याने फार काही गर्दी नव्हती. वातावरण थोडं शांत होत. दुपारला तशी गर्मी असे पण आता वातावरणात थोडा गारवा होता. त्यामुळे त्या गारव्याचा आनंद घेत त्या दोघी मस्ती करतच चालू लागल्या. त्यांनी काही क्षणातच गेट क्रॉस केलं आणि समोरच्या दुकानावर पोहोचल्या. स्वराने दुकानातून तिला हव्या त्या वस्तू घेतल्या होत्या तर पूजा अजूनही वस्तू घेतच होती. स्वरा आज खूप खुश दिसत होती. त्यात तिच्या बाबांचा फोन आल्याने ती पुन्हा खुश झाली. तिने कॉल रिसिव्ह केला आणि त्यांच्याशी बोलू लागली. पूजा आणि दुकानदार दोघे बोलत असल्याने तिला नीट आवाज येत नव्हता म्हणून पूजाला सांगून ती थोड्या दूर वर जाऊ लागली. ती थोड्या दूर गेली आणि आता छान आवाज येऊ लागला. बाबांचा आवाज ऐकून तिचा दिवस छान सुरू झाला होता. आज ती हसत होती, बाबांशी गप्पा मारत होती तेवढ्यात समोरून तिला कुणीतरी आवाज दिला, " ए स्वरा!!"

तिने फोन कडून लक्ष समोर दिलं आणि त्याचे वेळी कुणीतरी समोरून तिच्या चेहऱ्यावर काहीतरी फेकल. तो इतक्या जवळ होता की तिला दुसरीकडे बघायचा चान्सच मिळाला नाही. ते मूल गाडीवरून पळाले. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी पडताच ती मोठ्याने ओरडली , " आई …….!!!!"

तिचा आवाज इतका मोठा होता की आसपासचे सर्व लोक क्षणभर थांबले. तिच्या हातातून मोबाइल बाजूला पडला आणि मोबाइलचे पार्टस वेगळे झाले. तिला त्रास सहन होत नव्हता आणि ती पुन्हा मोठ्याने ओरडली," आई .....!!!! "

क्रमशा ...