Bhagy Dile tu Mala - 23 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग २३

मेरे आगाज से नही अंजामसे पेहचान लेना
उगते सूरजसे नही घणे अंधीयारे से पुछना
अगर कद गिणना है मेरा तो मेरे शरीर की तरफ क्यू देखते हो
देख लो आस्मान, जवाब खुद-ब-खुद मिल जायेगा

स्वराच्या आयुष्यातील ही सकाळ खूप खास होती कारण तिला पुन्हा एकदा कॉलेजच्या त्याच स्पर्धेत पाऊल टाकायच होत फक्त आता परिस्थिती थोडी बदलली होती. कदाचित तिची ती ओळख कुठेतरी हरवली होती. आता स्वरा मोहिते ह्या नावासोबत ऍसिड अटॅक पीडिता हे नाव जुळलं होत ज्यातुन तिची कधिच मुक्तता होणार नव्हती. लोक तिला ह्याच चष्म्यातून बघणार होते त्यामुळे ही सुरुवात खऱ्या अर्थाने थोडी कठीण होती. सोबतच तिला आजूबाजूला काही असे लोक भेटणार होते जे तिला समाधानाने जगू देणार नव्हते पण स्वराला त्या सर्वांवर मात करत यश मिळवायच होत. तिच्यासाठी आयुष्याची कुठलीच गोष्ट आता सोपी नव्हती पण ती लढायला तयार होती हेही निर्विवाद सत्य होत.

आज स्वरा सकाळीच उठून अभ्यासाला बसली. तिला माहिती होत की अभ्यासाला वेळ कमी पडतोय तेव्हा प्रत्येक सेकंद तिला कमी पडत होता. ती जवळपास २-३ तास अभ्यास करत होती. अभ्यास करताना तिला वेळेच भान उरल नाही. ती वाचतच होती की पूजा अंघोळ करून येत म्हणाली," काय मॅडम किती उशीर चला आवरा लवकर नाही तर कॉलेजला जायला उशीर होईल!! किती वेळ लागतो तुम्हाला तयार व्हायला माहिती आहे ना? "

पूजाच बोलणं ऐकताच स्वराने पुस्तक बाजूला ठेवले आणि कपडे घेत अंघोळ करायला जाऊ लागली. पूजा मधातच उभी होती त्यामुळे स्वराने जाताना तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच हसत म्हणाली, " पूजा काळजी नको करुस आता नाही लागणार मला वेळ. फक्त केस विचारायला कितीसा वेळ लागतो. बाकी तयारी करायला उरलंच काय आहे माझ्यात? "

स्वराच्या तोंडून अलीकडे एखादच वाक्य निघायचं पण ते वाक्य प्रत्येक वेळी विचार करायला लावायच. स्वरा हसून पुढे निघून गेली तर पूजा तिच्याकडे एकटक बघतच राहिली. स्वराच्या प्रत्येक शब्दात दुःख होत. जी ती कुणाला सांगू शकत नव्हती. तिच्या शब्दातून जाणवत होतं की तिला ह्या सर्वांचा खूप त्रास होतोय पण ती काहीही करून ती परिस्थिती, तो चेहरा बदलू शकत नव्हती. किती ही हतबलता? आपल्याला माहीत व्हावं की आपल्याला जो आजार झालाय त्याला काहीच इलाज नाही. आता त्याच आजारासोबत पूर्ण आयुष्य आनंदाने घालवायच आहे. ऐकायला जरी छान वाटत असल तरीही जगणार्याला किती त्रास होतो हे त्याचं त्यालाच माहिती. पूजा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती आणि तिला स्वतःच्याच बोलण्याच वाईट वाटलं. एक वेळ असा होता की स्वराला तयार व्हायला कितीतरी वेळ लागायचा आणि आज स्वता तीच मुलगी म्हणतेय की उरलंच काय तयार व्हायला तर ह्या शब्दमागे तिला किती यातना होत असतील हे कुणीच समजू शकणार नाही. पूजाला स्वतःवरच राग आला आणि ती शांतच बसली.

जवळपास अर्धा तास झाला होता जेव्हा स्वरा रूममध्ये परतली. स्वरा म्हणाली होती तशीच ती आली आणि पकटन केस बांधून तयार झाली. पूजा तर तिच्याकडे क्षणभर बघतच राहिली आणि नकळत बोलून गेली," स्वरा बस आवरल? आरसा वगैरे बघणार नाहीस का? "

स्वरा जरा मोठ्याने हसतच उत्तरली," मॅडम आरशात बघायला चेहरा तर हवा ना? तू पण ना पूजा कधी कधी भारी जोक करतेस!! जिला चेहराच नाही ती आरशात काय बघणार? माझ्या शब्दकोशात आरसा हा शब्द आता उरलाच नाही त्यामुळे तयारी करायला मला आता मुलांसारखाच फार कमी वेळ लागणार आहे. बर आहे ना तयारीत किती वेळ वाया घालवतो आपण मुली. सुटका झाली ना माझी शेवटी ह्यातून. किती लकी आहे ना मी? म्हणतात ना जे होत चांगल्यासाठीच. तेच बरोबर आहे. एक गोष्ट हिरावून घेतली तर काय पण आता जास्त वेळ मिळेल मला माझ्यासोबत. "

स्वरा आज अस काही बोलत होती की पूजाकडे तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यामुळे तिने आज शांत राहनच पसंद केलं होतं. पुजाचा पडलेला चेहरा तिच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही आणि स्वरा हळूच हसत म्हणाली," मॅडम चलायचं ना उशीर होतोय?? "

स्वराचा आवाज येताच दोघीही बाहेर जाऊ लागल्या. पूजा-स्वरा जायला निघालीच होती की स्वरा अचानक थांबली. ती मागे वळून एका वस्तूकडे बघत होती म्हणून पूजाही क्षणभर थांबून त्याकडे पाहू लागली. स्वराने त्या वस्तूकडे बघुन क्षणभर स्माईल दिली. पूजाच्या लक्षात आलं की ती आपल्या स्कार्फकडे पाहते आहे म्हणून ती हळूच म्हणाली," स्वरा स्कार्फकडे बघून काय हसते आहेस!! घे लवकर आणि चल पटकन. स्कार्फ नाही जशी जीवनाची महत्त्वाची गोष्ट आहेस अशी बघत आहेस पागल मुलगी!!"

स्वराने पटकन स्कार्फ घेतला आणि हळुवार आवाजात म्हणाली, " बरोबर बोललात मॅडम!! तो स्कार्फ नाही जीवनच आहे माझं!! जशी आंधळ्याला काठी लागते अगदी तसच ह्या स्कार्फशिवाय माझं बाहेर जाण अगदी अशक्यच!! स्कार्फ रोज चेहऱ्याला बांधला नाही तर कदाचित कितीतरी लोक बेशुद्ध पडतील आणि माझ्यावर उगाच केसेस बसतील. आणखी लोकांचे बोलणं ऐकण्याची माझी हिम्मत नाही बाबा म्हणून असू दे तो स्कार्फ माझ्याकडे. "

स्वराने हसतच स्कार्फकडे हात वळविला तर पूजाला क्षणभर तिचा राग आलेला. स्वरा स्कार्फ घेणार त्याआधीच पूजाने तो स्कार्फ स्वतःकडे घेतला आणि मोठ्याने म्हणाली," ज्यांना बेशुद्द पडायच आहे पडू दे, ज्यांना केस करायची आहे करू दे, ज्यांना ओरडायच आहे ओरडू दे आय डोन्ट केअर पण तू अस श्वास रोखून चेहरा लपवलेला मला अजिबात आवडणार नाही. त्यांना बोलायला काय जातंय! इथे तुला किती त्रास होतो ते दिसत नाही का त्यांना? जर त्यांना दिसत नसेल तर मग आम्हालाही काहीच फरक पडत नाही त्यांच्या विचाराने. आज तू विना स्कार्फच कॉलेजमध्ये येणार आहेस आणि हे फायनल आहे. मला ह्यावर पुन्हा वाद नकोत!!"

पूजा रागातच बोलली होती तर स्वरा पुन्हा हळुवारपणे म्हणाली," अग पण कशाला उगाचच सर्वाना प्रॉब्लेम!! आधीच काय कमी त्रास झालाय की त्यांना माझ्यामुळे आणखी त्रास? माझ्या अशा दिसण्यात त्यांची काय चूक? त्यांनी का त्रास सहन करावा?"

पूजाने पुन्हा एकदा रागावतच म्हटले, " मग त्यांची चूक नाही तर तुझी चूक आहे का? स्वरा मी तुला आजपर्यंत काही म्हटलं नाही पण आज सांगते. तुला जर ह्या जगात आता वावरायच असेल तर लोक काय म्हणतात ते सोडून द्याव लागेल. त्यात हा स्कार्फ पण येतो. लोकांना होईल सवय. नाही झाली तरीही हरकत नाही पण तुला अस बघण मला अजिबात आवडणार नाही. आजपासून तू मला शब्द दे की तू लोकांना आवडत नाही म्हणून हा स्कार्फ घालणार. उलट तू तो कधीच नाईलाजाने घालणार नाहीस. "

स्वरा क्षणभर तिच्याकडे पाहत होती. पूजामध्ये एक सच्ची मैत्रीण होती. हजारो बाहेरच्या लोकांपेक्षा एक असा व्यक्ती जो तुमची सतत काळजी घेतो ती पूजा होती. त्यामुळे तिच्या काळजीची अवहेलना करणे स्वराला जमले नाही. पूजाने रागातच तिच्या हातात स्कार्फ दिला होता आणि गंमत अशी की स्वराने परिधान करण्या ऐवजी तो बॅग मध्ये ठेवला. पूजा रागातच समोर जात होती की स्वरा म्हणाली," पूजा एक ना!! "

पूजा तोंड फुगवत म्हणाली," काय आहे बोल पटकन माझ्याकडे वेळ नाही. "

स्वरा हसतच उत्तरली," पूजा लव्ह यु सो मच!! माझा बॉयफ्रेंड बनशील?"

पूजा हसतच उत्तरली," हे काय नवीन आता?"

स्वराही चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली," माझ्यावर खर प्रेम करनारा कुणी असता ना तर तुझ्या एवढीच काळजी घेतली असती त्याने माझी. आता तो नाहीये पण तू तर आहेस ना मग बनशील माझा बॉयफ्रेंड?"

स्वराच उत्तर ऐकून पूजाचा चेहरा खुलला आणि म्हणाली," चालेल पण हा बॉयफ्रेंड तुला खूप त्रास देईल बर मग म्हणू नको की उगाचच रिलेशनशिप मध्ये पडले ह्याच्या? ह्या रिलेशनशिपमध्ये घटस्फोट मिळत नाही. "

स्वरा हसतच उत्तरली," असा बॉयफ्रेंड असेल तर दोन खायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही."

पूजाने पटकन स्वराचा हात पकडत म्हटले," लव्ह यु डिअर स्वरा!! कायम अशीच आनंदात राहा बाकी काहीच नकोय."

त्या दोघींचा मूड आता मस्त झाला होता . त्यामुळे इकडे-तिकडे बघत त्या चालू लागल्या. तिला जाणवलं की आजूबाजूचे सर्व आपल्याकडेच बघत आहेत आणि स्वरा हसतच उत्तरली," पूजा मॅडम माझी प्रसिद्धी अजून काही कमी झाली नाही वाटत. आधीही रस्त्यावरून जायचे तर मूल सतत बघायचे आणि आताही बघ ना मूल मला बघायच काही सोडत नाहीये. उफ ये फॅन फॉलोविंग!! कही मर ना जाऊ मै!!"

पूजा हसतच उत्तरली," फिलिंग जिलस यार!! माझ्या गर्लफ्रेंडकडे अस कुणी का बघावं बर ? मी तर फोडून काढणार आहे त्यांना."

स्वरा आणि पूजा दोघी खऱ्या मैत्रिणी. बरोबरच म्हणतात जगात सर्व नाती एकदाची नाकारतील पण आपल्या आयुष्यात असा एक मित्र असतो जो आपल्याला कायम स्पेशल फिल करत राहतो. तो आपल्यातली कमतरता बघत नाही उलट त्या कमतरतेरून काहीतरी सकारात्मक शोधत असतो. पुजा सोबत असल्याने स्वराला खरच बर वाटत होतं. ती घरातल्या वातावरणातुन बाहेर पडली तसाच तिचा चेहरा खुलला होता.

काही क्षण गेले ते क्लासमध्ये पोहोचले. नेमका त्याच वेळी स्वयम देखील दारावर आला. त्याची नजर तिच्याकडे जाताच तो शांत झाला आणि मान खाली करून जाऊ लागला. स्वराला त्याला बघून खूप आनंद झाला होता म्हणून तो मान खाली टाकून जात असतानाही तीच म्हणाली," स्वयम पापा कैसे है?"

तिचा प्रश्न ऐकून तो तिथेच थांबला. त्याच्या डोळ्यात क्षणभर पाणी होत. त्याने ते पुसल आणि हळूच म्हणाला, " पापा ठीक है. सॉरी स्वरा तुम्हे मिलने नही आ पाया. तुम कैसी हो ? "

स्वरा हसतच उत्तरली," देख लो कैसी दिख रही हु. अरे ठीक है वैसे भी आकर क्या देखते. पापा का ध्यान रखना और ममी को केहना की स्वरा याद कर रही थि."

स्वयम मान हलवून आपल्या बेंचवर बसला तर स्वराही आपल्या बेंचवर बसली. हे सर्व पाहून पूजाला मात्र राग आला होता आणि ती रागावतच पण हळुवारपणे म्हणाली," काय गरज होती त्याच्याशी बोलण्याची?"

स्वरा हळूच हसत म्हणाली," चालत ग! तस पण त्याच माझ्यावर प्रेम नाही म्हणून मी त्याच्याशी न बोलणं कितपत योग्य?? तस पण त्याने योग्य केलं. तो आपल्या आईवडिलांचच बघणार मग मी का रागावू त्याच्यावर?"

पूजा आता पुन्हा रागावत म्हणाली," मग काय पुन्हा प्रेम करणार आहेस त्याच्यावर?"

स्वरा पुन्हा एकदा हसतच उत्तरली," मी माझ्या परीने प्रेम केलं होतं. त्याने माझ्यावर कराव अस माझं म्हणणं कधीच नव्हतं. आता तुझं उत्तर देते प्रेम खूप छान भावना आहे म्हणून ती कायम लक्षात राहील पण आता प्रेम करायची हिम्मत माझ्यात नाही. आता आयुष्यभर आईवडिलांवर प्रेम करत एकटच राहायची माझी इच्छा आहे. हेच ते प्रेम आणि ह्याच प्रेमाच्या मर्यादा!! त्याच्याशी बोलले कारण तो ऑकवर्ड फिल करत होता आणि मैत्रीमध्ये माफ करून टाकाव पटकन. म्हणून त्यालाही केलं. इतकं सर्व गमावल्यावरच तर खऱ्या नात्यांची किंमत कळत आहे ना पूजा!! मग त्यात स्वयम पण येतो. नाही मला कुणावरच राग."

पूजाला ते उत्तर ऐकून छान वाटलं होतं. ती पुढे काही बोलणार त्याआधीच सर क्लासमध्ये आले. सरांच क्लासमध्ये येताच लक्ष तिच्यावर गेलं आणि सरांनी तीच वेलकम केलं. सर हेही सांगायला विसरले नव्हते की काहीही मदत लागली तर नक्की सांग त्यामुळे तिची सुरुवात छान झालं होती.

आज पूर्ण दिवस स्वरा सर्वांचे चेहरे न्याहाळत होती. काही लोक तिला बघून दूर पडायचे तर काही तिला येऊन भेटायचे. काहींच्या नजरेत तिरस्कार होता तर काहींच्या नजरेत दया. स्वराला या दोन्ही गोष्टी नकोशा होत्या . तिला फक्त एक गोष्ट हवी होती तो म्हणजे आदर. जो फक्त तिला सरांच्या शब्दात दिसला होता. तिला पीडिता बनून जगायच नव्हतं. तिला दयेच्या भावनेने कुणी बघितलेल नक्कीच आवडणार नव्हतं उलट तिला आता स्वतःच्या हिमतीवर सर्व करायचं होत. तिला ते लक्षात आलं आणि क्षणभर वाईट वाटून गेलं होतं पण त्याला पर्याय नव्हता. शेवटी चूक कुणाचीही असली तरीही पीडिता तर स्त्रीच असते ना? मग स्वरा ह्यातून कशी वाचणार होती बर? कटू आहे पण सत्य आहे. प्रेम पुरुषही करतो पण मर्यादा फक्त स्त्रिया ओलांडतात!! अपघात पुरुष करून आणत असले तरीही त्यांनी मुलांना तोंड देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच चुकीच्या असतात!! कधी बदलणार ही रीत की स्वरा सारख्या मुली कायमच समाजात असच जीवन जगत राहणार? उत्तरे कदाचित ह्यावर हजारो असतील पण समाधान अजून पर्यंत त्या एकाही स्त्रीला मिळालं नाही आणि वाईट ह्याच वाटत की स्वरा ह्याच समाजाचा एक भाग आहे. कस असणार होत आता तिचं आयुष्य?

क्रमशा....