Bhagy Dile tu Mala - 26 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग २६

सोच रही हु कुछ करणा तो बाकी ना राहा ?
अपणे आप को साबीत तो करणा बाकी ना राहा ?
अगर कर लिये है हर इमतेहान पार हमने
तो जमाणे ने किस बात का हमसे बदला लिया ?

स्वराने आज जगाच एक वेगळंच रूप पाहिलं होतं. तिला जेवढा त्रास लोकांना फेस करताना झाला नव्हता त्यापेक्षा जास्त त्रास आज तिला होत होता. तिची मनस्थिती नसतानाही तिने लोकांना तोंड देत आपल्या भविष्याकडे वाटचाल केली होती पण आता त्या मेहनतीला काहीच अर्थ उरला नव्हता जणू तिने अभ्यासासाठी दिलेला प्रत्येक सेकंद आज व्यर्थ गेला अस स्वराला वाटत होतं.

काही दिवस ती ह्या विचारातून बाहेर आलीच नाही पण हळुहळु तिला जाणवू लागल की सर्व लोक सारखे नसतातच त्यामुळे ती पुन्हा एकदा सकारात्मक होऊन मुलाखत देऊ लागली. ह्यावेळी मुलाखत देताना ती मुलाखत घेणाऱ्याकडे लक्ष देऊन असायची. तिला लक्षात आलं की आपण जो विचार करतोय तो फक्त भास नव्हता तर खरच लोक आपल्या चेहऱ्याकडे बघून घाबरतात, त्यांना हा चेहरा क्षणभरसुद्धा नकोसा होतो. ती हा एकदा अनुभव घेत नव्हती तर प्रत्येक वेळी नकार येत होता आणि त्यामागच कारण तिला समजत गेलं. जश्या एखादा काळ्या मुलीला मूल तिचा चेहरा पाहताच लग्नासाठी नकार देतात तशीच अवस्था स्वराची झाली होती. ती प्रत्येक वेळा १०० % पेक्षा जास्त देत होती पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. नकार हा तिच्या आयुष्याचा भाग होत गेला.

२ वर्षात पन्नास ते साठ मुलाखत तिने दिल्या होत्या पण एकाच कारणामुळे तिला नकार दिल्या जात होता. स्वराचा राग अनावर होत होता त्यामुळे शेवटच्या मुलाखतीत तिने मुलाखत घेणार्यांना सरळ शिव्याच दिल्या होत्या त्याचा परिणाम असा झाला की स्वराला धक्के मारून बाहेर काढण्यात आल होत. स्वरा त्यादिवशी फक्त रडत राहिली. तिला नक्की काय करू सुचत नव्हतं. तिने जेवढी मेहनत कॉलेज लाइफमध्ये घेतली होती तेवढी एकाच क्षणात वाया गेली होती अस तिला वाटू लागल. त्या दिवशी ती दिवसभर घरी गेली नाही. बस कुठेतरी भटकत होती. घरून सतत फोन येत होते पण स्वराने एकही फोन उचलला नाही. ती आज आपल्याच धुंदीत होती. भर गर्दीत ती एका डेस्कवर बसून होती. लोक बदलत होते पण परिस्थिती नाही. स्वराला आज रडू अनावर झाल होत आणि भर गर्दीत ती रडू लागली. लोक तिला पाहत होते पण कुणीच काहीच बोलत नव्हतं. ती स्वतःला हरवून बसली होती. तीच्या जवळपास सर्व आशा संपल्या होत्या आणि त्याच अश्रूद्वारे बाहेर निघत होत्या. रात्र बरीच झाली होती म्हणून स्वतःचे अश्रू पुसत ती घरी पोहोचली. घरचे तिला उशिरा येण्याच कारण विचारत राहिले पण तिने बेडरूमच दार लावलं आणि एकटीच बसून राहिली. पुन्हा एकदा ती त्याच वळणावर येऊन थांबली होती जिथून तिने सुरुवात केली होती. पुन्हा एकदा सर्व काही संपलं होत आणि अश्रू होते की थांबत नव्हते. बाजूला अंधार आणि सोबती तिचे अश्रू.

यह हौसला कैसे झुके
यह आरजू कैसे रुके
यह हौसला कैसे झुके
यह आरजू कैसे रुके
मंजिल मुश्किल तो क्या
धुंदला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या हो हो ऊ

राह पे काँटे बिखरे अगर
उसपे तो फिर भी चलना ही है
शाम छुपाले सूरज मगर
रात को एक दिन ढलना ही है
रुत ये टल जायेगी
हिम्मत रंग लाएगी
सुबह फिर आएगी हो ओओओ

होगी हमे तो रहमत अदा,
धूप कटेगी साए तले,
अपनी खुदा से है ये दुआ,
मंजिल लगाले हमको गले

जुर्रत सो बार रहे,
ऊंचा इकरार रहे,
जिंदा हर प्यार रहे

यह होसला कैसे झुके,
यह आरज़ू कैसे रुके..

रिशते भरोसे चाहत यकी
ऊन सबका दामन अब चाक है
समझें थे हाथो मे है जमीन
मूटठी जो खोली सब खाक है
दिल मे ये शोर है क्यू ?
ईमाँ कमजोर है क्यू
नाजूक डोर है ये क्यू

यह हौसला कैसे झुके
यह आरजू कैसे रुके
यह हौसला कैसे झुके
यह आरजू कैसे रुके
मंजिल मुश्किल तो क्या
धुंदला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या हो हो ऊ

त्या रात्री स्वरा खूप रडली. जणू तिच जीवन आता संपलच होत. तिने सर्व प्रयत्न केले होते तरीही लोकांनी जणू तिला जिंकू न द्यायची कसमच घेतली होती.

दिवस बदलत गेले पण स्वराची स्थिती काही बदलली नाही. ती घरातल्या एका कोपऱ्यात बसून सतत एकटीच विचार करत बसायची. ती एखाद्या वेळी बाहेर निघाली की तिला लोक जॉब कधी लागणार त्याबद्दल विचारायचे तर आई-वडील सुद्धा त्याबद्दलच विचारायचे त्यामुळे तिने सर्वांशी बोलणंच सोडून दिलं होतं. पुस्तक तर कुठे ठेवले होते तिचं तिला माहिती. एक अंधारी खोली तीच कायमच वास्तव्य बनल होत. ज्यात कदाचितच सूर्यप्रकाश यायचा बाकी वेळ पूर्ण अंधार. कधी कधी त्याच अंधारात ती रडून स्वतःला मोकळं करून घेत असे. स्वराचा प्रवास ह्या दोन वर्षातच अर्ष कडून फर्ष कडे झाला होता. तिची डिग्री, स्टुडन्ट ऑफ द इयर हे अवॉर्ड भूतकाळात जमा झाले आणि स्वरा पुन्हा एकदा नैराश्यात बंदिस्त झाली.

ह्या काळात स्वराची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. स्वराला शिकवण्यासाठी घरच्यांनी कर्ज काढले होते त्यामुळे पैसे परत घेणाऱ्यांच्या रांगाच रांगा घराबाहेर लागू लागल्या. घरच्यांची अशी स्थिती होती की खायला कसेतरी पैसे होते. पैसे परत केले नाही म्हणून कुणीही शिव्या देऊन जायचे. स्वरा हे सर्व आतमधून ऐकत बसायची. तिला आपल्या जगण्याच वाईट वाटायचं. आई - वडिलांनी तिच्यापर्यंत हे सर्व कधी येऊ दिलं नाही पण ती आता मोठी झाली होती त्यामुळे सहज तिच्या ते लक्षात यायचं. घरची परिस्थिती तिच्यासमोरून लपली नव्हती.

ह्या सर्वाचा प्रभाव असा झाला की आय.आय.टी. मध्ये शिकलेली स्वरा क्लर्कची जॉब शोधू लागली. दिवस वाईट आले की फक्त पोटाची भूक दिसते मग हातात कितीही मोठी डिग्री असली की त्याचा काहीच फायदा होत नाही. स्वराची काहीशी अशीच स्थिती झाली होती. स्वराला वाटलं होतं की क्लर्कची जॉब सुद्धा आपल्याला सहज मिळेल पण तिचा तो भ्रमही काहीच दिवसात दूर झाला. चालता-चालता स्वराच्या चपला झिजल्या होत्या पण लोकांची मन मात्र कटू ती कटूच. त्यांच्या मनात तिच्याबद्दल कधीच पाझर फुटला नाही. स्वरा आता हतबल झाली होती. तिचा ह्या जगात काहीच फायदा नव्हता. साधी क्लर्कची जॉब आपल्याला मिळू नये ह्यामुळे तिच फारच खच्चीकरण झालं होतं. आज ती रागारागतच घरी आली आणि तिने सर्व डॉक्युमेंट्स समोर ठेवले. किचनमधून माचीस आणली. काही क्षण तिने आपली कमावलेली सर्व मेहनत डोळ्यांनी बघितली आणि त्याला आग लावू लागली. तिने हात समोर नेलाच होता की तिचा फोन वाजला. तिने माचीसची काडी विझवली आणि फोन घेऊ लागली. तिने मोबाइल बघितला तर तो कियाराचा कॉल होता. तिने भरलेल्या मनाने कॉल घेतला. स्वराने कॉल उचलला होताच की कियारा हसतच म्हणाली," हाय बेब कैसी हो? बहोत दिन होगये कॉल नही, मॅसेज नही. भूल गयी ना मुझे और जॉब लग गयी फिर भी स्वीट्स नही खिलाये कंजूस कही की, अब बोल क्या चुपचाप खडी है? "

स्वराच आधीच मन भरून आलं होतं त्यामुळे ती अश्रू सावरू शकली नाही. कियाराला आवाज जाताच कियारा म्हणाली," क्या हुआ स्वरा तुम रो क्यू रही हो? सब कुछ ठीक तो है ना?"

स्वरा रडतच म्हणाली," कियारा मेरी इतनी भी औकाद नही है की मुझे जॉब मिल संके. किसीं काम की नही हु मै. कभी कभी जी करता है की पापा ममी के साथ ये दुनिया छोड दु शायद तभी मुझे सुकून मिलेंगा. "

कियारा शांतपणे म्हणाली," पेहले ये बता क्या हुआ बाद मे ये डायलॉग मारणा. "

स्वराने दोन वर्षात घडलेला प्रत्येक किस्सा सांगितला होता शिवाय घरची परिस्थितीही तिने सांगितली आणि कियारा हळूच हसत म्हणाली, " बस इतनी सी बात. इसके लिये मरणा चाहती हो. पागल!! एक काम कर मैं शाम को तुझे कॉल करती हु. तू जॉब का टेन्शन ना ले. जब मै हु तो क्या डरणा!"

स्वरा हसतच उत्तरली," सच मे कियारा?"

कियाराही हसतच उत्तरली, " मेरे बॉयफ्रेंड की कसम खुश. शाम को करती हु याद से कॉल सो ये मरणे के खयाल फिरसे नही लाना. समझी? जा पेहले मूड अच्छा कर ले शाम को बात करते है."

स्वराच्या चेहऱ्यावर आज खूप दिवसाने आनंद होता पण जोपर्यंत कियारा पक्क काही सांगणार नव्हती तेंव्हापर्यंत तिला चैन पडणार नव्हतं.

आज ती दिवसभर फोन वर नजर ठेवून होती. तीच मन फारच बेचैन झालं होतं. कियाराचा फोन आला तर मिस करू नये म्हणून तिने क्षणासाठीही फोन दूर होऊ दिला नव्हता. ती सायंकाळची वेळ होती. स्वरा वाटच बघत होती की कियाराच फोन आला. स्वराने फोन उचलत पकटन विचारले, " क्या हुआ कियारा?"

कियारा हसतच उत्तरली, " स्वरा मुंबईमे जॉब चलेगी ना. मैने पापा से दोपहर मे बात की. उनके कोई दोस्त है, उनकी कंपनी है मुंबई मे. वहा पर जॉब मिल जायेगी. बस इंटरव्ह्यू देना पडेगा. अब तो खुश हो ना?"

स्वरा हसतच उत्तरली, " कियारा थॅंक्यु आज सच मे बहोत अच्छा फिल कर रही हु. तुझे पता है आज मै डॉक्युमेंट्स जलाने वाली थी. जॉब नही मिल रही इसलीये."

कियारा हळूच म्हणाली," समझ सकती हु! मुझे पेहलेही कॉल करणा चाहीये था तुझे. नो प्रॉब्लेम देर आये दुरुस्त आये. अच्छेसे इंटरव्ह्यू देना. मै तुम्हे डिटेल सेंड करती हु. "

स्वरा आणि कियारामध्ये खूप वेळ बोलणं झालं आणि तिने फोन ठेवला.

जरी कियाराने तिला जॉब सुचवली होती तरीही मागचे अनुभव बघता स्वरा मुलाखत द्यायला घाबरली होती. एवढंच काय ती एक एक रूपयासाठी तरसंत होती त्यात मुंबई जायला कोण मदत करेल ह्या विचारानेच ती घाबरली होती. आज जॉबची संधी चालून आली होती पण तिथपर्यंत जायला हजारो अडचणी मध्ये आल्या होत्या. स्वरा सर्व विचार करत बेडवरच बसली होती. घरच्यांशी बोलायची तिची हिम्मत नव्हती आणि कुणी पैसे देईल अस वाटत नव्हतं. विचार करून करून तीच डोकं सुन्न झालं होतं.

ती विचार करत बसलीच होती की पुन्हा एकदा तिचा फोन रिंग करू लागला. तिने फोनवर लक्ष दिलं तर त्यावर आता पूजाचा कॉल होता. पूजाचा फोन पाहताच तिने पटकन रिसिव्ह केला तर पूजा समोरून ओरडतच म्हणाली," स्वरा कशी आहेस ना तू? मान्य की आता सोबत नाही आहोत म्हणून मैत्री थोडी तुटली. तुझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम सुरू आहेत तरीही एकदाही सांगितलं नाहीस. खर तर माझीच चूक आहे. मीच जॉब मध्ये बिजी झाले आणि बोलायला वेळ मिळाला नाही पण तू हे बर केलं नाहीस?"

स्वरा हसतच उत्तरली, " काय सांगणार होते तुला की लोक मला क्लर्कची पण जॉब द्यायला तयार नाहीत आणि तू काय समजावल असत मला की काळजी नको करू मिळेल क्लर्कची तरी जॉब. "

स्वरा बोलताच पूजा गप्प झाली. काही वेळ पूजा काहीच बोलली नाही आणि हळूच म्हणाली," नाही पण मी जिथे जॉबला जाते तिथे विचारलं असत तुझ्यासाठी. "

स्वरा गप्पच झाली होती कारण तिला माहीत होतं की तिला जॉब न मिळण्याच कारण तिचा चेहरा होता मग तिथे काय किंवा कुठे काय प्रश्न तोच निर्माण झाला असता. त्यानंतर स्वरा फारच कमी बोलली तर पूजाने खूप दिवसाने कॉल केल्याने पूजा भरपूर बोलत होती. स्वराला क्षणभर वाटलं की पूजाला पैसे मागावे पण तिची हिम्मत काही होत नव्हतं. कितीतरी वेळ तिच्या डोक्यात हाच विचार सुरू होता. पूजा आता फोन ठेवणारच तेव्हाच स्वरा नम्र स्वरात म्हणाली," पूजा कियाराने जॉबच तर सांगितलं पण मुंबई जायला पैसे नाहीत ग. ५ हजार देशील तर बरं होईल. मी तुला देते लवकरच परत. "

स्वरा शांत झाली आणि पूजा हसतच म्हणाली, " वेडाबाई बस एवढंच! एक काम कर अकाउंट डिटेल सेंड कर मी करते पैसे सेंड. "

तिच्या उत्तराने स्वराचा चेहरा जरा खुलला होता. पूजाने फोन ठेवताच स्वराने तिला डिटेल शेअर केल्या आणि अर्ध्या तासात ५ हजारच्याऐवजी १९ हजार सेंड केले. स्वराला १० हजारचा मॅसेज आला तशीच ती पूजाला कॉल करणार होती. तेवढ्यात पूजाचाच समोरून मॅसेज आला.

" स्वरा १० हजार सेंड केले कारण तुला मुंबईला राहायची गरज पडली तर प्रॉब्लेम होईल आणि पैशाच अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी माझ्या बेस्टीला पार्टी देतेय अस समजत आहे मला पैसे परत नकोत. आता मला ह्यावर वाद नकोय. बाय लव्ह यु!! "

स्वराने मॅसेज वाचला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. काय असत ना जग? एकीकडे असे लोक असतात जे पैशाच नाव घेतलं की नात तोडायला मागे पुढे बघत नाहीत आणि एकीकडे असे लोक असतात जे मागतो त्यापेक्षा जास्त देतात. त्यांची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. त्यांना फक्त नाती निभवायची असतात. असे लोक नसले तर कदाचित नाती ह्या शब्दाला न्याय मिळणार नाही.

जवळपास स्वराचे अर्धे प्रॉब्लेम दोघीनी क्लिअर केले पण पुन्हा एक मुलाखत आणि पुन्हा संशयी चेहरे. जॉबला शिफारश जरी असली तरीही स्वराचा चेंहरा बघितल्यावर बरेच लोक आपले विचार बदलायचे त्यामुळे ती पुन्हा एकदा घाबरली होती. तिचा चेहरा पुन्हा तिचा दुष्मन तर बनणार नव्हता ना? आणि तसच झालं असत तर स्वराने काय केलं असत? ती रात्रभर विचार करत होती पण माणसांच्या स्वभावाच, त्यांच्या विचारांचा तोड तिच्याकडे आज नव्हता. तिच्या आयुष्यात पुन्हा काय लिहून आहे हे स्वरालाही माहिती नव्हत पण हे खर की ही जॉब मिळाली नसती तर स्वराने काय केलं असत हा विचारच करायला नको.

खुद को संभाल कर
जी रहे हे कुछ पल
कही दुनिया की सोचमे ना
गुम हो जाये ये महल
अब तो डर से भी
डर लगणे लगा है मुझे
खुदा बता दे मुझे
मेरे जिने की वजह क्या है ?

क्रमशा ....



Share

NEW REALESED