Bhagy Dile tu Mala - 48 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ४८






हमको हमीसे चुरालो
हम इंतजार तुम्हारा करते है
बेह जानो दे ईश्क का समाँ
हम तेरी मोहब्बत मे बरबाद होणा चाहते है

स्वरा त्या रात्री खूप खुश होती. तिच्या नजरेसमोरून पार्टीतले क्षण जाऊ लागले आणि स्वराचा चेहरा अचानक खुलला. अन्वयसोबत डान्स करत असताना त्याच्या नजरेला नजर देताना आज ती घाबरली नव्हती उलट तिला स्वतःला ते सर्व आवडत होत. तीच त्याच्यावर प्रेम होतं का हे तिलाही समजत नव्हतं पण हे खरं की ती त्याच्याकडे मनाची सर्व बंधने तोडून आकर्षिल्या जाऊ लागली म्हणूनच आज कदाचित तिला झोप लागली नव्हती तर दुसरीकडे अन्वय मात्र विचारात पडला होता. आज स्वरासोबत इतक्या सुंदर आठवणी असताना देखील त्याच मन त्यात रमत नव्हतं. तो आज मनोमन दुःखी होता. रात्री बऱ्याच वेळ दोघानाही झोप लागली नाही पण जेव्हा लागली तेव्हा उद्या काय होणार होत ह्याची दोघांनीही कल्पना केली नव्हती.

बदल जायेगा पलभर मे मौसम
आज की रात मुझे जी लेने दो
मै नशे मे हु मोहब्बत के
मुझे और थोडी पी लेने दो


दुसऱ्या दिवशी अन्वय तयार होऊन घरात बसला होता तेव्हाच स्वरा तयार होत त्याच्यासमोर आली. तिला आज समोर बघताना त्याचे डोळे पाणावले होते. त्याने तिला ते कळू दिलं नाही. स्वरा त्याच्या जवळ येत म्हणाली, " गुड मॉर्निंग डिअर अन्वय सर!! काल खूप दिवसाने मला समाधानाची झोप लागली. किती दिवसाने अशी मनमोकळी, बिनधास्त वागले माझं मलाच नाही माहिती. मज्जा आहे हो अशीच लाइफ जगण्यात!! काय तो उदास चेहरा घेऊन कायम बसायचं?? सर अशी पार्टी कायम देत राहणार ना तुम्ही?"

अन्वय किंचित हसला आणि अगदी नम्र आवाजात म्हणाला," स्वरा निघुया लवकर. उशीर होईल ऑफिसला जायला. तुला माहिती आहे ना मला उशीर झालेला आवडत नाही."

त्याने तीच उत्तर तर दिलं नाही पण त्याच्या बोलण्यात आज नेहमीप्रमाणे उत्साह नव्हता. इतके सुंदर क्षण काल गेल्यावरही तो असा का हा प्रश्न तिला पडला होता पण तिने त्याला विचारले नाही. त्याचा आवाजही जड झालेला जाणवत होता. डोळ्यात तेज नव्हतं की चेहऱ्यावर हसू नव्हत. ती काही बोलणार त्याआधीच तो समोर जाऊ लागला आणि इच्छा नसतानाही स्वरा त्याच्या मागे-मागे जाऊ लागली. अन्वय गाडीत बसला आणि स्वराही त्याच्या पाठोपाठ बसली. अन्वयने हळुवार गाडी सुरू केली आणि शांतपणे चालवू लागला. त्याच पूर्ण लक्ष गाडी चालवण्यावर होत. त्याने एकदाही तिच्याकडे बघितलं नव्हतं. स्वरा हे सर्व खूप वेळाच बघत होती पण आता तिला राहवलं नाही आणि स्वराने गाडी चालवताना त्याच्यावर एक नजर टाकत उदास स्वरात उत्तरली," सर काही झालंय का? तुमचा मूड ठीक दिसत नाहीये म्हणून म्हटलं? काल खूप खुश होता!! आज अचानक इतके उदास? मी काही बोलले आणि तुमच्या मनाला लागलं का? नाही तर एका रात्रीत अस काय बदललं की ते कालचे सर अचानक गायबच झाले?"

अन्वय मिश्किल हसू ओठांवर आणत म्हणाला," काही घडलं नाही बस काल खूप दिवसाने एन्जॉय केला ना तर थकवा गेला नाही अजून. वय झालय ना स्वरा माझं मग ते तर होणारच! तू काय तरुण आहेस. उत्साह तुझ्या नसा- नसात भिनला आहे. बस थोडं थकलो आहे बाकी काही नाही. जास्त विचार नको करुस तुझ्यामुळे प्रत्येक गोष्ट घडत नाही माझ्या आयुष्यात. सो जस्ट चिल!!"

स्वरा त्याच उत्तर ऐकताच चेहरा प्रफुल्लित करत म्हणाली," हो बरोबर बोलत आहात तुम्ही. मीही खूप थकले पण मला त्या थकण्यापेक्षाही पार्टीची जास्त मज्जा आली. काय तो डान्स? तुमचं सुंदर गाणं आणि हवं तशी जगण्याची मोकळीकता. खरच खूप सुंदर होत ते सर्व! मी कधीच विसरणार नाही हा क्षण आणि तुमचा डान्सही. थॅंक्यु थॅंक्यु थॅंक्यु अन्वय सर फॉर द ग्रेट पार्टी. माझ्या आयुष्यात तुम्ही लकी चार्म म्हणून आला आहात! अस वाटत जादूची कांडी फिरवली की सर्व आनंदी होत जातं."

अन्वयच आज खर तर तिच्या बोलण्यावर लक्ष नव्हतं पण तिला त्याच्या मनातले भाव कळू नये म्हणून तो अधा- मधात हसत होता. अन्वय आज आपल्या मनात काहीतरी ठरवत होता त्यामुळे आज ती सोबत असतानाही तिच्याशी बोलावसं वाटत नव्हतं तर स्वरा आज खूप बोलत होती. त्यातून तिला झालेला आनंद स्पष्ट दिसत होता. स्वरा कितीतरी वेळ बोलत होती आणि अन्वय एखादा शब्द बोलायचा त्यामुळे तिला थोडा राग आला आणि तिने त्याच्याकडे लक्ष न देता गाणे सुरू केले. ती गाणे ऐकत होती तर अन्वय शांतपणे गाडी चालवत होता.

सुमारे एक तासाच्या वर झाला होता जेव्हा ते दोघेही ऑफिसला पोहोचले. अन्वय कुणाशीही न बोलता सरळ केबिनमध्ये गेला आणि कामात बिजी झाला तर स्वरा आनंदाने दीपिकाला मिठी मारत उत्तरली," गुड मॉर्निंग दीपिका दि!!"

दीपिका नम्र स्वरात उत्तरली," गुड मॉर्निंग स्वरा!!"

अन्वयचा जसा चेंहरा आज शांत भासत होता तसाच दीपिकाचा चेहराही शांत जाणवत होता. तिने काही क्षण सर्वांकडे दुर्लक्ष केलं आणि बाप्पाच्या मूर्तीला प्रणाम करून कामाला सुरुवात केली. तिने लॅपटॉपवर काम सुरू करायच्या आधी सर्विकडे एकदा नजर फिरवून घेतली. आज पूर्ण ऑफिस शांत भासत होत. कुणीही वर नजर करून बघत नव्हते. ती बघतच होती की काका तिला कॉफी आणून देऊ लागले. तिने त्यांच्या चेहऱ्यावर लक्ष दिले तर त्यांचा चेहराही पडला होता. तिला क्षणभर वाटलं की त्यांना विचारावं काय झालंय म्हणून पण त्यांना पुन्हा कुणीतरी दुसर्याने बोलावलं आणि स्वरा जाग्यावरच बसली. स्वरा आज नक्की सर्वाना काय झालंय म्हणून विचार करत बसली पण नंतर स्वतःच्या मनाला समजावत तिने कामाला सुरुवात केली .

आज स्वरा खरच खूप खुश होती. कालचा प्रत्येक क्षण काम करत असतानाही तिच्या नजरेसमोर यायचा आणि तिच्या चेहऱ्यावर आपोआप लाली पसरायची त्यामुळे स्वरा आज काम देखील एन्जॉय करू लागली होती. गेले कित्येक वर्षानंतर तिने हे सर्व एन्जॉय केलं होतं म्हणून कदाचित तिच्यासाठी तो आनंद खुप जास्त महत्त्वाचा होता. काम करत असताना तिला कालचा पुन्हा तो अन्वयच्या नजरेला नजर देताना क्षण आठवला आणि ती अन्वयकडे स्वतःला पाहण्यापासून थांबवू शकली नाही. तिने बघावं आणि अन्वय तिला आधीपासूनच बघत होता. स्वरा त्याच्याकडे बघत होती तर अन्वयने किंचितही नजर खाली केली नाही म्हणून स्वराने लाजूनच नजर खाली केली. आजही तिच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव स्पष्ट दिसत होते. ती आज काम तर करत होती पण तिचा अन्वयसोबत हा नजरेचा खेळ तसाच सुरू होता. आज असा एक क्षण नव्हता ज्यावेळी स्वरा लाजली नव्हती . असच त्याला बघत बघत काम करण्यात दुपार झाली.

दुपारचे २ वाजले होते तरीही कुणीही जेवायला उठले नाही म्हणून आज स्वरा हैराण झाली होती. तिने सर्वांकडे नजर टाकली आणि हळूच स्वतःची खुर्ची दीपिकाकडे नेत म्हणाली, " ताई आज काही झालय का? कायम उत्साही राहणारे लोक आज एवढे दुःखी का? जेवण पण करायला कुणी आलं नाही. इतकं काय घडलं की ह्यांना भूक पण लागली नाही? नाही तर वेळ होताच कसे जेवणावर तुटून पडतात की आज पण कुणाकडून पार्टी आहे? असेल तर सांगा मला चालेल पार्टी?"

दीपिका अगदी हळुवार स्वरात उत्तरली," त्यांचं सोड पण तुला नक्की कशाचा आनंद झालाय ते मला कळत नाहीये?"

स्वरा हसतच उत्तरली," का आनंदी असू नये? खूप दिवसाने मी काल पार्टी एन्जॉय केली. खर तर तुलाही आनंदी असायला हवं होतं कारण तुला अन्वय सरांसोबत, तुझ्या क्रशसोबत डान्स करायला मिळाला ना? पण इथे तर सर्व उलट आहे. मला कळत नाहीये मला सोडून इथे एक पण लोक खुश का नाहीत? सर्वाना पार्टी आवडली नाही का? किती सुंदर पार्टी होती न आवडायला काय झालं बर??"

दीपिका उदास स्वरात उत्तरली, " कारण आम्हा सर्वाना हे माहिती नव्हतं की सर ही पार्टी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्याची देत नाही आहेत तर त्यांच्या फेअरवेलची देत आहेत. कुणाला अंदाजा पण नव्हता त्याबद्दल. आज सकाळी-सकाळी सरांनी सर्वाना मेल केले आणि ह्याबद्दल माहिती पडलं. ही बातमी मिळाल्यापासून सर्वांचे एकमेकांना कॉल सुरू आहेत. आम्ही सरांनाही केले होते पण त्यांनी उचलला नाही. सर्व ही बातमी ऐकून शॉक झाले आहेत म्हणून कुणी साधं बोलायला सुद्धा तयार नाही. स्वरा अन्वय सर उद्या सोडून जात आहे तरीही तू इतकी खुश असू शकतेस? तुला काहीच वाटत नाहीये त्यांच्या जाण्याच? ते तर तुझे सपोर्टर आहेत मग तू आजच्या दिवशी इतकी खुश असू शकतेस?"

दीपिका बोलून गेली आणि स्वराला धक्काच लागला. तिच्या बोलण्याने स्वराच्या हाताने पेपरवेट खाली पडला . स्वराचा आनंदी चेहरा अचानक शांत झाला. तिला नक्की काय करू सुचत नव्हतं तरीही ती पेपरवेटला उचलायला खाली वाकली आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. तिने दीपिकाला कळू नये म्हणून स्वतःचे अश्रू पुसले आणि पेपरवेट टेबलवर ठेवत शांत बसली. तिला शांत बघून दीपिका म्हणाली," मला तर जेव्हापासून माहिती पडलं तेव्हापासून कामात मन लागत नाहीये. माझंच काय कुणाचंच लागत नाहीये. अस वाटत आहे की कुणीतरी आपल्यातलाच सोडून जातोय. काहीच दिवसात किती लळा लावला ना सरांनी आपल्यानी? त्यांच्यासारखा बॉस,मित्र पुन्हा ह्या कंपनीला मिळणे शक्य नाही म्हणून आज सर्वांनी जेवण केलं नाही. त्यांना आज फेस करणं कुणालाच शक्य झालं नसत. मला तर अजिबात नाही. "

दीपिका बोलत होती तर स्वराला आता तीच बोलणं ऐकून त्रास होऊ लागला म्हणून तिला मधातच अडवत स्वरा उत्तरली," ताई, मी वॉशरूममध्ये जाऊन येते."

दीपिकाच्या काही बोलण्याआधीच स्वरा वॉशरूमला गेली. तिचे हातपाय थरथर कापत होते तरीही ती स्वतःला कंट्रोल करून बसली. तिने वॉशरूमला जाताच चेहऱ्यावरून पाणी घेतले आणि अचानक तिने जपून ठेवलेले अश्रू बाहेर पडले. ते नक्की अश्रू कशाचे होते स्वरालाही माहिती नव्हतं कारण स्वराच्या आयुष्यात मागच्या काही वर्षात जसे लोक आले तसे गेलेही पण अन्वय आपल्याला सोडून जातोय हे ऐकून तिला फार त्रास होत होता. ती काही वेळ तशीच उभी होती. तिने स्कार्फने चेंहरा पुसला आणि स्वतःचे अश्रू पुसत खुर्चीवर येऊन बसली. आतापर्यंत अशी वेळ होती की स्वराला किती नि काय बोलू अस झालं होतं तर आता तिला कुणाशीही काहीच बोलायच इच्छा नव्हती त्यामुळे तिने आपलं लक्ष लॅपटॉपमध्ये घातलं. दुपार पर्यंत तीच काम सहज झालं होतं पण आता तिची चिडचिड होऊ लागली. ती पूर्ण रात्र, सकाळ अन्वय सोबत होती तरीही अन्वयने तिला हे सर्व का सांगितलं नाही म्हणून तिची जास्तच चिडचिड होत होती. तिने पुढच्याच क्षणी रागात अन्वयकडे बघितले पण अन्वय कामात लक्ष घालून होता. त्याला उद्या सोडून जायचं असल्याने तो आपलं काम पटापट आवरत होता.

दीपिकाशी बोलल्यानंतर स्वराचा मूड चेंज झाला. तिला वाटत होतं की आताच केबिनमध्ये जाऊन त्याला जाब विचारावा पण सर्वांसमोर बोलणं योग्य नव्हतं त्यामुळे आज ती ऑफिस सुटायची वाट बघू लागली. आज तीच एक सेकंदही लक्ष घडीवरून हटल नव्हतं. खर तर स्वरा हे का फिल करत होती? तिला त्याला जाब विचारायचा नक्की कोणता अधिकार आहे हे त्याक्षणी तिला जाणवल नव्हत पण ती अन्वयवर खूप चिडली होती हे पक्क. आज स्वराच मन एक सेकंद थांबायला तयार नव्हत तर तिला जास्तीत जास्त वेळ वाट पाहावी लागत होती. अन्वय समोरच बसला होता पण ती सरळ त्याला जाऊन काहीच बोलू शकत नव्हती. सेकंदाचे आता मिनिट झाले, मिनिटांचे तास आणि घड्याळात ६ चा ठोका पडला. स्वराच्या सोबतचे सर्व कलीग ऑफिसमधून जात होते पण स्वरा मात्र खुर्चीवर ठाण मांडून बसली होती . सर्व कलीग गेले आणि स्वरा त्याच्याकडे बघू लागली. तिची पूर्ण नजर त्याच्यावरच होती पण तो काम करण्यात इतका व्यस्त होता की त्याच लक्ष तिच्याकडे गेलं नव्हतं. पाहता-पाहता सात देखील वाजून गेले. ती आताही तहान- भूक विसरून त्याची वाट बघत होती आणि फायनली अन्वय बाहेर आला. अन्वयने केबिनच्या बाहेर येताच सर्विकडे नजर फिरवली. सर्व कस शांत शांत वाटत होतं. तो पूढे जाणारच की त्याला स्वरा समोर एकटीच अंधारात बसून दिसली. तिला बघताच त्याने लाईट ऑन केला आणि हसतच विचारले," स्वरा तू एवढ्या वेळ काय करत आहेस? इतका वेळ काम करून तुला काही कंपनी जास्त पैसे देणार नाहीये? सो लवकर घरी जात जा. बघ बाहेर अंधार पडला आहे. आणखी किती वेळ थांबणार आहेस? चल निघू."

अन्वयने बोलावं आणि ती दिवसभराचा राग एकाच क्षणात काढत त्याला म्हणाली," सर कालपासून आपण किती वेळ सोबत होतो? तुम्हाला एकदाही वाटलं नाही मला सांगावं की तुम्ही मला सोडून जाणार आहात? तुम्ही मला मेल केला नाही की काही नाही? मी कुठे चुकले का? की माझ्या प्रश्नामुळे सोडून जात आहात मला? तुम्हालाही माझा त्रास होतोय ना म्हणून सोडून जात आहात ना? बरोबर आहे मला सर्वंच सोडून जातात. तुम्ही का थांबणार? "

अन्वयने पुढच्याच क्षणी बॅग बाजूला ठेवली आणि शांतपणे तिच्याकडे बघू लागला. ती त्याच्यावर खूप चिडली आहे हे जाणवत होतं म्हणून तो शांतच होता. तर स्वरा ओरडतच म्हणाली," सांगा ना सर का सांगितलं नाही मला तुम्ही? "

अन्वय मिश्किल हसत हळूवार शब्दात म्हणाला," तू असच वागशील म्हणून सांगितलं नाही. काल किती आनंदी होतीस तू? तुला तेव्हा सांगितलं असत तर पूर्ण आनंद हिरावून घेतला असता म्हणून सांगितलं नाही."

स्वरा पुन्हा ओरडत म्हणाली," तेव्हा जेवढा त्रास झाला नसता ना त्यापेक्षा आता जास्त होतोय. तुम्ही मला दुखावलं सर. खूप दुखावलं."

अन्वय तिथेच नजर खाली करून उभा होता तर स्वरा रागात आपली बॅग घेऊन जाऊ लागली. तिला जाताना बघून अन्वय हळूच पण गंभीर शब्दात म्हणाला," स्वरा मला तुझ्याशी काहीतरी बोलायच आहे. काहीतरी महत्त्वाचं आहे. प्लिज जाऊ नकोस कारण उद्यानंतर मला तुझ्याशी इच्छा असली तरीही बोलता येणार नाही. अस समज की मी पहिल्यांदा आणि शेवटच तुला काहीतरी मागतोय. एक शेवटची इच्छा!! प्लिज जाऊ नकोस! फक्त काही मिनिटे मग मी तुला मोकळं करेन. मुक्त करेन!!"

स्वरा रागात समोर निघालीच होती की त्याच्या शब्दाने ती तिथेच थांबली. तिने त्याच्याकडे वळून बघितले. त्याच्या चेहऱ्यावर उदासी होती. त्याला उदास बघून तिचे पाय समोर गेलेच नाही आणि ती पुन्हा त्याच्या दिशेने येऊन खुर्चीवर बसली. अन्वयने तिच्याकडे बघितले आणि हळूच म्हणाला," स्वरा ही ऑफिसच्या पहिल्या दिवसाची गोष्ट आहे. मी एका मुलीला बघितलं. कोण होती ती? माहिती नाही. सर्व मला शुभेच्छा देत होते तर ती त्या केबिनमध्ये बसून होती माझ्याकडे सतत बघत. ते डोळे मी कधीच विसरू शकणार नाही. त्याच वेळी तिची नि माझी नजरा-नजर झाली. काय क्षण होता तो माहिती नाही पण मला ती विचित्र वाटली. ती मला बघूनही माझ्याकडे आली नाही म्हणून माझा इगो दुखावला गेला आणि मी तिला महाराणी हे नाव दिले. खर सांगु तर ती मला त्याक्षणी गर्विष्ठ वाटली म्हणून कदाचित तिला चिडवत होतो पण हा भ्रम फक्त काही क्षणच होता. त्याच सायंकाळी दीपक आणि माझं बोलणं झालं तेव्हा त्याने मला एक सत्य सांगितलं. एक सत्य तिच्या बंदिस्त होण्याचं. एक सत्य सर्व काही गमावण्याचं. एक सत्य तिला माणुसकीची वागणूक न देण्याच. एक सत्य तिला वाडीत टाकण्याच. ते सत्य ऐकलं आणि माझ्या चेहऱ्यावरच हसू क्षणात गायब झाल. त्या रात्री मला तिचा विचार करून झोपच आली नाही. दीपक मला सांगून गेला पण तिच्या त्या नजरेने माझे चैन हिरावले. त्या रात्री मी झोपलोच नाही, तिच्याबद्दल जाणून घेण्यास इतकी उत्सुकता होती की मी माझ्या मित्राला जो दिल्ली आय.आय.टी. मध्ये प्रोफेसर आहे त्याला रात्री कॉल केला. तो एक-एक शब्द मला तिच्याबद्दल सांगत होता आणि मी त्याच्या प्रवासात हरवत गेलो. मी तिथे नव्हतो तरीही तिच्या प्रवासात मी कुठेतरी बघ्याची भूमिका घेतोय अस मला वाटून गेलं. तो एक एक शब्द असा सांगत होता की तिच्याबद्दल आदर मनात कायमस्वरूपी बसल्या गेला. तिच्याबद्दल सर्व ऐकलं आणि माझा इगो कुठे हरवून गेला मलाच कळलं नाही. तिची कथा ऐकली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर हसू. ती पहिलीच होती जिने मला हे एकाच वेळी फिल करायला लावलं. अश्रू का ते माहिती आहे पण ओठांवर हसू ह्यासाठी कारण तिच्याबद्दल एकूणच तिच्या जिद्दीला सलाम करावासा वाटत होता. त्या रात्री तिच्याबद्दल ऐकून फार मस्त वाटलं पण आता त्या धाडसी मुलीला बघायची ओढ काही संपेना आणि रात्री १२ वाजता मी तिला फेसबुकवर सर्च करू लागलो. ती एकमेव होती जिला मी सर्च केलं नाही तर मुली समोर असतानाही मी कधीच कुणाशी बोलत नाही. तिला बघायला किती आतुर होतो माझं मलाच नाही माहिती. ती सापडत नव्हती आणि मी अधिकच बेचैन होतो. शेवटी अथक प्रयत्नानंतर मला तिचा फोटो मिळाला. तो तिच्या वाढदिवसाचा होता. रेड वन पिस मध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की बस तिला बघतच राहिलो. त्या रात्री मी तिचे पूर्ण फोटो मनात बसवून घेतले आणि तिला न बघताही मी तिचा झालो. मला त्या क्षणी कळलंच नाही की हा टीचआ आत्ताचा चेहरा नाही कारण तो चेहरा पाहण्याची मला तरी गरज वाटली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिला प्रत्यक्षात बघितलं ना तेव्हा जाणवलं की आपण जसे तिला बघितले लोक तिला तसे बघत नाहीत. लोकांच्या नजरा तिला खूप त्रास देतात!! त्याबद्दल मला इतकी चीड वाटली की मला क्षणभर वाटलं की त्यांच्या थोबाडीत लावावी पण हिम्मत झाली नाही. पण खरं सांगू मला तिला बघून त्याक्षणी काहिच वाटल नाही. नॉर्मल वाटली ती मला. ज्या चेहर्याला बघून सर्व घाबरत होते तो चेंहरा मला कधी भीतीदायक दिसलाच नाही तर मी तिला घृणास्पद नजरेने कसा बघनार? मला तर त्याही क्षणी तिचा तो फोटोवालाच चेहरा दिसत होता. तो असा बसला माझ्या मनात की मला तेव्हाही ती तितकीच सुंदर दिसत होती. काय होती ती, कशी होती ती माहिती नाही पण पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीसाठी माझं हृदय धडकू लागलं. मी पहिल्याच क्षणी तिच्याकडे आकर्षिल्या गेलो."

अन्वय बोलत होता तर स्वराचा चेहरा शांत झाला होता. तिचा चिडचिडा स्वभाव कुठे गायब झाला तिला कळलंच नाही तर अन्वय पुन्हा उत्तरला," हळूहळू जसजसा तिला ओळखू लागलो तेव्हा तिच्या शब्दात,तिच्या प्रश्नात जाणवलं की आपण तर तिच्यावर प्रेम करून बसलोय पण तिच्या आयुष्यात प्रेमाला स्थानच नाही. मी एका मुलीवर प्रेम करतो आणि तिलाच नेमका प्रेमाचा राग आह हे ऐकून काही क्षण दुखावलो. वाईट वाटलं होतं नक्की पण जेव्हा तिच्या आयुष्यात असणारा त्रास अनुभवला तेव्हा ते दुःखही विसरून गेलो. मी तिच्यावर प्रेम करू लागलो तिला न मिळवण्याचा विचार करताना. तेव्हा समजलं मला प्रेम काय असत? तिचा प्रत्येक प्रश्न माझी रात्रीची झोप उडवत होता आणि मी पहिल्यांदा हतबल झालो. कारण प्रेम होतं माझं तिच्यावर. ती मला।मिळाली नाही तर काय पण तिच्या चेहऱ्यावर आनंद असू नये? माझं मलाच वाईट वाटलं. तेव्हा पहिल्यांदा ठरवलं की इथून जाण्याआधी तिला तिचे सर्व अधिकार देऊन जायचे. जेव्हा तिने मला म्हटलं होतं ना की माझ्यासोबत कुणिच काही करू शंकत नाही तेव्हा हा विचार करून डोळ्यात अश्रू आले होते की का कुणी स्वरावर जीवापाड प्रेम करू शकत नाही? का फक्त तिच्या चेहऱ्यामुळे लोक तीच्यापासून दूर पळतात? त्या रात्री मी खूप खचलो पण तिच्यासाठी स्वतःला सांभाळून घेतलं कारण तिच्या समोर माझं दुःख काहीच नव्हतं आणि तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो. तिने माझं सर्व ऐकलं आणि आयुष्यात खुश राहू लागली. प्रत्येक क्षण मज्जा करू लागली. तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता अस म्हणेन. मी हे सर्व प्रेमात केलं का?? मी म्हणेन प्रेम आपल्या जागीच होत पण तिला आनंदी बघावं ह्यात माझी माणुसकी होती. ह्या पूर्ण प्रवासात मला एक गोष्ट लक्षात आली होती की तिला प्रेमाचा राग आहे आणि तिला माझं प्रेम सांगून तिचा तो आनंद हिरावून घ्यायचा नाही. मी मनाशी ठरवलं होत की तिला न सांगताच निघून जाईल पण जेव्हा समजलं की तीही आतुरतेने वाट बघत आहे त्या मुलीच नाव ऐकण्याची तेव्हा काल रात्रभर विचार करून ठरवलं की बस तिला सांगायच आणि फायनली मी तिला सांगतोय. हो स्वरा तू आवडतेस मला. ह्या पूर्ण प्रवासात कधीच तुझ्या चेहऱ्याचा विचार केला नाही. तुला जस जसे ओळखत गेलो तस तस समजलं की तुझं मन किती साफ आहे आणि मी तुझ्या प्रेमात पडत गेलो. तुझा फोटो पाहून मला आकर्षण झालं होतं का? तर नाही. तुझा प्रवास ऐकून मला तुझ्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. फोटो नक्की बघितला होता पण तो मला खऱ्या अर्थाने सांगून गेला की तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला सुंदर समजता तेव्हा ती खरच सुंदर दिसते. स्वरा मी प्रामाणिकपणे सांगेन मी तुला कधी भुतासारख बघितलं नाही उलट जेव्हाही तुला बघतो तेव्हा मला नकळत तुझा तो सुंदर चेहरा दिसतो. तू ८ वर्ष समोर आली आहेस स्वरा पण मी तुझ्यावर प्रेम करायला ८ वर्ष मागे गेलो हे हक्काने सांगेन. ह्यात कुठला स्वार्थ नव्हता की कुठला मोह फक्त एक इच्छा होती की ज्या मुलीने इतका संघर्ष केला त्यात थोडीफार आपण मदत करावी. ती मदत तुझ्या संघर्षासमोर काहीच नाही पण मला तेवढंच मनाच समाधान."

अन्वय बोलत होता आणि स्वराच्या डोळ्यातून अचानक अश्रू बाहेर येऊ लागले. अन्वयच्या ते लक्षात येताच त्याने आपला रुमाल तिला देत म्हटले," स्वरा पुन्हा कधीच कुणासाठी रडू नकोस. मी मनातलं सांगतोय तुला पण मला तुझ्याकडून उत्तर नको आहे. मी खुश आहे तुझ्यावर प्रेम करून, तुझ्या आठवणी सोबत आहेत तेच खूप आहे मला आयुष्य जगण्यासाठी. घाबरू नको हे अश्रू पुन्हा येणार नाहीत, तुला उत्तर द्यावं लागू नये म्हणून मी तुला कधी कॉल देखील करणार नाही. मला नको आहे बंधन तुझ्यावर. शेवटी स्वरा मी अस म्हणणंं की मी राजसारखा नाही हे चुकीच ठरेल त्यामुळे मी अस म्हणणार नाही. स्वरा मी तुला दुखवायला मनातलं सांगितलं नाही. तू कायम खुश राहावी हीच इच्छा आहे माझी. तू उत्तर नको देऊस पण मैत्रीही तोडू नकोस. मला तुझ्यासारखी धाडसी मैत्रीण गमवायची नाही. हे मान्य की मी उद्या जाणार आहे पण तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी जन्मभर तयार आहे. मग नात्याला नाव नसलं तरीही चालेल. मी तुझ्या आयुष्यात मित्र म्हणून कायम राहीन. तेव्हा उद्या जर कधी गरज पडली तर नक्की हक्काने सांग. अन्वय कायम आहे तुझ्यासाठी! बस एवढंच बोलायच होत. जर तुला कधी वाटलं असेल की मी जास्त बोललो तर सॉरी. माझ्या व्यक्त होण्याने तुला त्रास झाला असेल तर विसरून जा मी अस काही बोललो होतो."

अन्वय शांत उभा राहून तिच्याकडे बघत होता आणि डोळे पुसत पहिले ती वाक्य म्हणाली" सर जाण गरजेचं आहे का?"

अन्वय हसत उत्तरला, " हो स्वरा! मला फक्त ह्या प्रोजेक्टसाठी इथे बोलावलं होतं. प्रोजेक्ट संपला आता मला जावं लागेल. माझं सर्वच तिथे आहे आणि अचानक मी सोडून इथे राहू शकत नाही सॉरी स्वरा जावं लागेल."

स्वरा पुन्हा थोडी रडवेल्या स्वरात उत्तरली," सर मी म्हटलं तरीही थांबनार नाही. "

अन्वयकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यामुळे तो शांतच बसला तर तो उत्तर देत नाहीये म्हणून ती रागात समोर जात होती. अन्वय आता आपली बॅग घेत बाहेर जाऊ लागला. ती समोर जात होती तर अन्वय म्हणाला, " मिस स्वरा सॉरी पण नाही थांबू शकणार."

त्याचे शब्द ऐकून ती आणखीच जास्त जोराने समोर चालू लागली. स्वरा समोर जात होती तर अन्वय मोठ्याने म्हणाला, " मिस स्वरा उद्या लास्ट दिवस आहे माझा प्लिज रागावुन तर जाऊ नका ना! अटलिस्ट आज तर बोला. काय माहिती उद्या भेट होईल की नाही? काय माहिती पुन्हा एकमेकांना पाहन होईल की नाही? काय माहिती तुमचा गोड आवाज, सुंदर चेहरा पुन्हा पाहायला मिळेल की नाही!!"

स्वराने त्याच बोलणं ऐकलं तरीही ती रागात समोर समोर जाऊ लागली. बाहेर बराच अंधार पडला होता. ती रागात समोर जात होती. काही वेळ त्याचा आवाज येत होता पण काहीच क्षणात त्याचा आवाज नाहीसा झाला. त्याचा आवाज येत नाहीये म्हणून ती चालता चालता थांबली. तिला कशाची तरी भीती वाटू लागली आणि ती मागे वळून पाहू लागली. ती पलटली पण मागे कुणीच नव्हतं. अन्वयचा येणारा आवाज नव्हता की अन्वयचा तो सुंदर चेहरा नव्हता. स्वरा मागे वळून कितीतरी वेळ त्याला शोधत होती पण तिला कुणीच दिसलं नाही. अन्वय अचानक कुठेतरी हरवला होता. तिच्या नजरेसमोरूनही आणि कदाचित तिच्या आयुष्यातूनही ??

तुझे कैसे बताये क्या मेहसुस कर रहे है हम
अल्फाज कम पड जायेंगे तेरी कमी को पुरा करणे के वासते

क्रमशा...