Bhagy Dile tu Mala - 51 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ५१

सपनो से अगर जिंदगी चलती
तो मेरे हर ख्वाब मे तू होता
हवाये भी मेरे इशारे पे बेहती
हर रोज तू मेरी बाहो मे होता

आयुष्य आणि नाती ह्यांचा फार जवळचा संबंध आहे. स्वभाव रागीट असो की शांत प्रत्येक व्यक्तीला नात्याची गरज पडतेच किंबहुना नात्याविना जीवन जगता येत पण त्यात बहार येत नाही. हेच बघा ना, कधीकधी आपल्या आयुष्यात हजार लोक असतात तरीही आपल्यावर एक वेळ अशी येते की एकट राहावंसं वाटत आणि कधी कधी कुणीच नसत तेव्हा सतत कुणाशी तरी बोलावसं वाटत. कुणी ऑनलाइन नसले की ते ऑनलाइन आहेत की नाही ह्याची शोधाशोध सुरू होते आणि नकळत पुन्हा एकदा जुन्या नात्यांची डोर बांधली जाते. कदाचित हीच नात्यांची किंमत आहे. जुने तेच सोन. ही एकमेव अशी गोष्ट आहे जी जितकी जुनी होत जाईल तेवढी अधिकच घट्ट होत जाते. जो नात्याना जिंकतो तो धनवान होतो, जो जिंकू शकत नाही त्याच्याकडे सर्व काही असूनही काहीच असत नाही.

रिशतो की डोर कभी कमजोर नही होती
जो कमजोर होती है वो फिर कभी जुड नही पाती


कुणी विचार केला का माहिती नाही पण आयुष्याच एक सत्य आहे जे प्रत्येक व्यक्तीला लागू होत. जीवन जगता- जगता कधी कधी एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात नकळत येऊन जातो आणि तो कायमस्वरूपी आयुष्याचा भाग बनतो. तेव्हा आपल्याला माहिती नसत की तो कधीतरी जाणार आहे पण जेव्हा तो जातो तेव्हा सोबत घेऊन जातो तो मनाच समाधान. त्याक्षणी मनाला समजावन खूप कठीण जात त्याहीपेक्षा कठीण जात ते त्याच्या आठवणीतून बाहेर निघन. मग समोर पूर्ण जग असलं तरीही त्याची कमी भरून काढू शकत नाही. तो एकमेव असतो जो आपल्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येतो. हजारो लोक सोबत असताना त्या एका व्यक्तीसाठीच जीव का तळफळतो? उत्तर कदाचित देणे अवघड आहे. काही लोक ह्याला प्रेम म्हणतील तर काही सवयीचा भाग. दोन्हीही उत्तर योग्यच आहे पण तो व्यक्ती सहज जसा आयुष्यातून निघून जातो, तो काळ काढणे खरच कठीण होत जाते. आपण आपल्या मनाला सतत समजवतो पण तो आपलं ऐकत नाही. मन दिवसात एकदा तरी त्याची आठवण काढतच आणि आपण पुन्हा एका क्षणात कावड होतो. असा क्षण तो फक्त त्याचा असतो. हजारो लोक आयुष्यात असतानाही केवळ त्याच्यासाठी राखून ठेवलेल ते खास स्थान. हीच आहे नात्यांची किंमत. नाती आणि आयुष्य एकमेकांविना अपूर्णच हेही शाश्वत सत्य...

तुझसे बेहततर धुंडना किसे है
तू है तो सारे फिके लगते है


अन्वय दिल्लीला जाऊन काही दिवस झाले होते. त्याने म्हटल्याप्रमाणे त्याने एकदाही तिला कॉल केला नाही. जो व्यक्ती कधीतरी आयुष्यात येतो तो कधीतरी जातोच. हे स्वराला मागील काही वर्षात उत्तमरीत्या कळलं होतं म्हणून स्वरानेही आता त्याच्याविना जगण्याचा संकल्प केला होता. ऑफिस सुरू झालं होतं पण एक आठवडा होऊन गेला तरीही नवीन सर आले नव्हते. त्यामुळे काळे सर सर्व काम बघत होते. स्वराही अन्वयच्या आठवणीतून बाहेर पडून स्वतःच मन कामात लावू लागली होती. तिला सोपं नव्हतं त्याला विसरन तरीही तिला ते करणं भाग पडत होत. अन्वय सोडून गेला तेव्हा त्याच सतत ऑफिसमध्ये नाव घेतलं जायचं पण हळूहळू सर्व आपापल्या कामात बिजी झाले आणि अन्वयच नाव हळूहळू सर्वांच्या मनात दाबल्या गेलं. स्वरा दिवसभर कामात बिजी असताना त्याचा विचार येत नसे पण घरी गेली आणि एकटीच बसून असली की त्याचे शब्द, त्याची नजर सतत तिला त्रास देत होती. त्याचा तो निरागस चेहरा तिच्या चेहऱ्यावर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित करत असे आणि स्वराला एक प्रश्न सतत विचारत असे," का?" आता हा कशासाठी होता हे स्वराला योग्यरित्या माहिती होत म्हणून ती रात्रीच्या अंधारातही त्याची नजर चोरून झोपी जात असे. लोक खास असले की भास होतात आणि सोबत नसलेली माणसही समोर दिसतात हे फक्त सुरुवातीचे काही दिवस होत हे स्वरा जाणून होती त्यामुळे त्याक्षणी त्याच्या नजरेला उत्तर देण तिला तर जमलं नव्हतं. ती वाट बघू लागली त्याला पूर्णपणे विसरण्याची कदाचित तिच्यासाठी हेच बेस्ट होत. ती हरवत होती दुसऱ्या कसल्या तरी विचारात आणि अन्वय त्यात मागे पडत चालला होता. कदाचित अन्वय एका स्वप्नसारखा तिच्या आयुष्यातून एक दिवस नाहीसा होणार होता...

तुझ पे अगर एक किताब लिखु तो क्या होगा?
बहोत मुश्किल है फिरभी तुझसे तेरे दर्द को बाहर निकालना


अलीकडे स्वराच्या आयुष्यात आनंद तर होता पण ती शांत झाली होती. ती हळूहळू स्वतासाठी स्वप्न पाहू लागली आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊ लागली. इकडे अन्वयच्या आठवणी तिला त्रास देत होत्या तर दुसरीकडे स्वयम तिला रोज कॉल करत होता आणि काही वेळ का असेना स्वराची शांतता काही वेळ तुटल्या जायची. स्वयमच्या मनात खूप काही साठवलं गेलं असल्याने तो तासंतास बोलत असे तर स्वरा त्याच्या आवाजात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करायची. ही आता रोजची कहाणी झाली होती. तिने क्षणात जरी त्याला माफ केल होत, तिच्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी होत तरीही देखील स्वरा त्याच्यासोबत तेवढी फ्रीली वागू शकत नव्हती. त्याला ते सतत जाणवायच पण त्याने तिला कधी प्रतिप्रश्न केला नाही. कदाचित वेळेनुसार नात्यांनाही पुन्हा वेळ द्यावा लागतो ह्याचा त्याला अंदाज होता. हळुहळु तो तिच्या आयुष्यात अन्वयची जागा घेऊ लागला होता. तिच्या हसण्यामागच कारण बनत होता आणि नकळत अन्वय एका बंदिस्त आठवणीत सुखरूप राहू लागला. अशा आठवणी ज्या वर्षात एकदाच दोन मिनिटांसाठी आठवल्या जातात.

अलीकडे माधुरीशी स्वराच बरच बोलणं व्हायचं. ती स्वराला भरपूर काही विचारात बसायची पण स्वरा सध्या निरुत्तर होती. ती सतत अन्वयबद्दल बोलत असल्याने स्वराकडे बोलायला काहीच उरत नव्हतं. स्वराच्या मनात आधीच हजारो प्रश्न होते, त्या प्रश्नाचं उत्तर ती स्वतःच शोधू पाहत होती तर माधुरीला काय देणार?? खर तर स्वराला, माधुरीला खूप काही सांगायचं होत पण माधुरीला ते कधीच कळलं नसत म्हणून स्वराने ते मनात दाबून ठेवलं. तिला आताही हजारो प्रश्न पडत होते पण लोकांच्या वागण्याचे नाही तर तिच्या स्वतःच्या वागण्याचे आणि ती हळूहळू आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधू लागली. काय होते ते प्रश्न जे अचानक तिच्या आयुष्यात आले आणि तिच्या आयुष्याच प्रारूपच बदललं होत. तिला जाणून घेणार्यांना जर विचार करून इतका त्रास होत असेल तर स्वराला नक्की काय जाणवत असेल हे फक्त तीच तिलाच माहिती..

किससे करे हाल-ए-बया दिलं
सुना है यहा प्यार करणे की सजा पत्थर मिलते है


मागे काही दिवस असेच गेले. ती दिनक्रमानुसार कामाला जायची आणि काम पूर्ण झाली की घरी परतायची. अन्वय असतानाचा उत्साह आता तिच्या चेहऱ्यावर नव्हता. क्षणात आनंदाचे बहर नाहीसे झाले आणि पुन्हा तीच रोजची दगदग सुरू झाली. ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिने शांत डोळे मिटून बाप्पाला प्रणाम केले तेव्हाच काका तिच्याजवळ येत म्हणाले," स्वरा मॅडम, नवीन कार्तिक सर आलेत ना त्यांनी तुम्हाला बोलावल आहे. उशीर करू नका. लगेच बोलावलं आहे."

काका आले तसेच गेलेही. स्वराने काही वेळ मनाला शांत केले आणि केबिनकडे जाऊ लागली. ह्या दोन वर्षात कंपनीत ३ बॉस झाले होते. पहिला प्रवास तिच्यासाठी सर्वात त्रासदायक होता तर अन्वयने तिच्या आयुष्यात येऊन तिचा पूर्ण प्रवास सोपी केला म्हणून आज नवीन सर आले हे ऐकल्यावर सुद्धा स्वरा क्षणभर घाबरली नव्हती उलट उत्साह तिच्या चेहऱ्यावर तसाच जाणवत होता. ती केबिनच्या बाहेर जाताच नम्र आवाजात उत्तरली," मे आय कम इन सर?"

कार्तिक हळुवार आवाजात उत्तरला," येस प्लिज कम स्वरा."

त्याने परवानगी देताच स्वरा त्याच्यासमोर जाऊन उभी झाली. कार्तिकच लक्ष लॅपटॉपमध्ये होत तर स्वरा त्याच्याकडे बघत होती. कार्तिकने तिला हातानेच बसायचा इशारा केला आणि पुन्हा काम करू लागला. स्वरा त्याच्याकडे क्षणभर बघतच राहिली. त्याने काम संपवल आणि तिच्याकडे बघू लागला. तो काहीतरी बोलनार होताच तेव्हा त्याच लक्ष तिच्या जळालेल्या चेहऱ्याकडे गेल आणि तो काही क्षण तिला बघतच राहिला. तर तीही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू लागली. त्याच्या चेहऱ्यावर असणारे भाव स्वराने आधीच खूप लोकांच्या चेहऱ्यावर बघितले होते त्यामुळे तिला त्याच काहीच वाटलं नाही. उलट त्याही वेळी तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू होत. दोघेही एकमेकांकडे बघत होते. ती चेहऱ्यावर हसू आणून तर तो कसल्यातरी विचारात हरवल्यासारखा. काही क्षण सर्व शांत होत. कार्तिकच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते आणि स्वराच म्हणाली," कुछ हुवा है क्या सर?"

कार्तिकने क्षणभर तिच्यावर नजर रोखत म्हटले," कैसे हुवा ये?"

स्वराने हा प्रश्न सर्व लोकांकडून ऐकला होता. कदाचित हा प्रश्न तिची कधीच पाठ सोडणार नव्हता म्हणून ती हसत म्हणाली," सर किसीं दिन आराम से बताउंगी. बहोत वक्त है हमारे पास. अभि क्यू ना काम की बात की जाये?"

कार्तिक तीच बोलणं ऐकून क्षणभर हसतच म्हणाला," गुड स्वरा! मुझे भी तुमसे येही उम्मीद थि. चलो तुम्हारी कहाणी कभी बाद मे सूनते है. आज तुम मेरी कहाणी सुनो. तो मैने इसलीये बुलाया है की तुमने जो कुछ दिनो पेहले काँट्रॅक्ट पे काम किया है ऊसपर काम शूरु करणे का वक्त आ गया है. ये काम अकेले का नही है सो अपनी टीम बनालो. ऊनकी लिस्ट तुम मुझे मेल करदो. बाद मे काम शुरु करते है और हो सकता है की हर महिने या वीक मे तुम्हे और टीमको उनके यहा जाना पडेगा. काम क्या करना है वो तुम्हे पता है. एम आय राइट?"

स्वरा हसतच उत्तरली," हा सर पता है. "

तसाच कार्तिक तिच्यासमोर हात करत म्हणाला," आपके साथ काम करणे मे मजा आयेगा. "

ती क्षणभर हसली आणि हँडशेक करत म्हणाली," मुझे भी. मैभी जलदीसे आपको अपडेट देती हु. वेलकम सर इन न्यु ऑफिस.!! आपकी यहा की जर्नि शुभ हो.!!"

स्वराने त्याला गोडशी स्माईल देत केबिन सोडले आणि पुन्हा एकदा आपल्या व्यस्त झाली..

आयुष्यात जगायला काही हवं असेल तर तो म्हणजे तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमचा कॉन्फिडन्स. तुम्ही जर स्वतःला एखाद्या गोष्टीत कमी समजत असाल तर जग तुम्हाला बेटर तरी कसं समजेल? त्यामुळे आधी स्वतःला लायक समजा तेव्हाच जग तुम्हाला लायक समजेल. तुमचा कॉन्फिडन्स हा कायम तुमच्या शब्दात दिसला पाहिजे. तो एकदा दिसला की लोक फक्त तुमच्याकडे, तुमच्या कामाकडे पाहतात ना की तुमच्या चेंहऱ्याकडे. कार्तिकला स्वराच्या कामाचा आधीच अंदाज आला होता आणि तिच्या शब्दात कॉन्फिडन्स बघून तोही आनंदी झाला तर स्वराने अन्वयच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःला बिचारी म्हणवून घेणं सोडलं होत म्हणून कदाचित तिला आज स्वतःच्या चेहऱ्यावर लक्ष द्यावस वाटत नव्हतं.

कार्तिक ऑफिसला येऊन जवळपास एक महिना झाला होता. स्वराने म्हटल्याप्रमाणे आपल्या कामाला सुरुवात केली होती. स्वरा कामात इतकी हुशार होती की कार्तिक काहीच दिवसात तिच्या कामाचा फॅन झाला होता. स्वराच ऑफिसमध्ये हळूहळू पद वाढत होत आणि कार्तिक सुद्धा तीच काम बघून खुश झाला होता. तो कुठलंही महत्त्वाची काम असलं की स्वराला देऊन मोकळ व्हायचा. अन्वय नंतर कार्तिकने तिच्या टॅलेंटला पूर्णपणे ओळखले आणि तिचा चेंहरा आपोआप दुर्लक्षित होऊ लागला. आता स्वराबद्दलची कुजबुज ऑफिसमध्ये पूर्णता बंद झाली आणि तिलाही मनुष्य म्हणून जगण्याचा पूर्ण हक्क मिळाला. असा हक्क जो प्रत्येक व्यक्तीला मिळतो. जन्माने मिळतो. तो कमवावा लागत नाही पण इथे स्वराने स्वतःच्या मेहनतीने कमविला होता.

हे सर्व होत कामाच्या वेळी. स्वरा काम करताना, जगामध्ये वावरताना खूप सकारात्मक, आनंदी दिसत होती पण घरी आली की तिला एकट एकट वाटत होतं. स्वयम तिच्या रोजच्या जगण्याच्या भाग झाला होता. तो रोज तिला आठवणीने कॉल करत होता तरीही स्वराला मनातून आनंद झाला नव्हता. मनातली शांतता, समाधान हे स्वराच्या आयुष्यात दूर-दूर पर्यंत नव्हतं. काय नव्हतं आज स्वराच्या आयुष्यात? पैसा, प्रसिद्धी, नाती. अगदी सर्वच होत पण तरीही ती खुश नव्हती. अस का होत तिच्यासोबत कदाचित तिलाही ह्याच उत्तर माहिती नव्हतं.

तेरे शहर मे ये सन्नाटा क्यू है गालिब
कही किसीं सडक पे किसीं का विश्वास तो नही तुटा..!!


मागील काही दिवस असेच कामात गेले. महिने - दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला होता. स्वरा कामात व्यस्त होऊ लागली होती पण तरीही ती समाधानी नव्हती. आज असाच एक रविवार. सकाळपासून ती एकटीच रूममध्ये बसून होती त्यामुळे तिला कंटाळा येत होता. तिने माधुरीला कॉल केला होता पण माधुरीच्या काकांकडे आज कार्यक्रम असल्याने ती बाहेर गेली होती तर स्वराला आज ते घर खायला उठल होत. तिला आता एकट राहायला भरपूर कंटाळा यायचा. आज भरपूर लोकांना तिने कॉल करून बघितले पण बहुतेक सर्वच आज कामात होतर म्हणून रूमवर एक-एक क्षण काढणे तिला त्रासदायक वाटू लागले. ती आज बेचैन झाली होती. तिचा श्वास कोंडला जात होता तरीही कसातरी तिने पूर्ण दिवस काढला आणि सायंकाळी बाहेर निघाली .

सायंकाळची वेळ होती. हलकासा अंधार पडला होता. अलीकडे पाऊस ओसरला होता आणि थंडीची सुरुवात झाली होती. स्वराने मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईच्या हाजी अली दर्ग्याबाबत खूप ऐकलं होतं म्हणून आज ती इथे आली होती. ती पोहोचली तेव्हा समुद्र शांतपणे वाहत होता. वाऱ्याचे थंडया लाटा समुद्र स्वतःसोबत वाहून आणत होता त्यामुळे थंडी वाढू लागली. इतकी थंडी असतानाही तिने अंगावर गरम कपडे परिधान केले नव्हते आणि ती तो सर्व नजारा बघत आतमध्ये जाऊ लागली. दर्गा हा किनाऱ्यापासून काही अंतरावर मध्ये बनविला होता आणि तिथपर्यंत जायला सिमेंटचा रस्ता होता. ती एक एक पाऊल टाकत समोर जाऊ लागली. तिची ती भिरभिरती नजर अचानक समुद्र त्याच्याकडे वेधून घेत होता त्यामुळे तो शांत वाहणारा समुद्र तिला स्वतःकडे आकर्षित करत होता. ती त्याचा नजारा घेत घेत दर्ग्यात पोहोचली. तिने डोक्यावर ओढणी घेतली आणि शांत मनाने देवाच्या पाया पडली. काही क्षण ती तशीच उभी राहिली आणि पुन्हा बाहेर पडली. काही क्षण का असेना देवाला नमस्कार केल्याने तीच मन शांत झाल होत आणि ती पुन्हा एकदा समुद्राला पाहण्यात व्यस्त झाली. ती कितीतरी वेळ त्या समुद्राकडे पाहत होती आणि तिच्या मनात विचार आले," किती साम्य आहे ना स्वरा तुझ्या आणि ह्या सागरामध्ये. दोघांमध्ये खूप काही भरलं आहे पण कुणाला सांगता येत नाही. फक्त खळखळून लाटांसोबत वाहन हे आपलं काम. लोक आपल्याला बघून खूप खुश होतात तरीही आपण अपूर्णच!! मनाच्या कोपऱ्यात अस काही लपल असत ज्याच उत्तर आपल्यालाही माहिती नसत.जे कुणाला सांगता येत नाही आणि सांगितलं तर कदाचित वादळ पक्क. नक्की काय करावं अशा स्थितीत??"

ती स्वतःवरच गोड हसत पुन्हा म्हणाली," स्वरा एकेकाळी तू स्वप्न बघितलं होतंस त्यातलं सर्वच आज तुझ्याकडे आहे. तू इतकी यशस्वी होत आहेस की लोकांनी तुझ्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. तुझं काम बघून तुझे सर्व फॅन झालेत आहे पण तरीही का तुझ्या आयुष्यात समाधान नाही. देवा तूच सांग ना रे? का समाधान नाही माझ्या आयुष्यात. अन्वय सर म्हणाले होते की तू तुझी स्वप्न कर, तुझ्यापासून तुझा आनंद कुणी हिरावून घेऊ शकणार नाही. मी आज ते सर्व करत आहे पण तरीही मी आनंदी का नाही? कुठे चुकते आहे का मी? नाती निभावण्यात तर नाही चुकत आहे?? देवा, एक व्यक्ती गेल्याने माझं आयुष्य इतकं का बदलू शकत? आणि का? एके काळी एकटीच राहणारी मी का आज एकटी असनुही आनंदी नाही. देवा खूप आशेने तुझ्याकडे आले आहे. आज तूच माझ्या मनाला शांत करू शकतोस. मला उत्तर दे आणि मुक्त कर माझ्याच भावनातून. कदाचित ह्यावेळी स्वतःला मुक्त करणं माझ्या हातात नाही. देवा देशील ना रे ह्याच उत्तर??"

ती व्याकुळ होऊन त्याला उत्तर मागत होती. तिच्या डोळ्यात अश्रूंच्या लाटा होत्या पण आज तो देवही समुद्रासारखाच शांत होता. काय होत नक्की त्याच्या मनात? स्वराबद्दल नक्की त्याने काय विचार केला होता??

एक तेरे दर पे झुकने से सुकून मिलता है
तो झुक जाऊंगी मै किसींभी दर्गा पे
धर्म तो लोगो ने बाटा है
क्या अब लोगो को भी धर्म से बाटोगे??

ती वाहनांऱ्या समुद्राच्या शांत लाटांकडे बघत तशीच कितीतरी वेळ उभी होती पण तीच तिला काही उत्तर मिळाल नाही. हळूहळू सर्व काही शांत झाला होत. तो वाहणारा समुद्रही आणि दर्ग्यावरची गर्दीही पण स्वरा शांत झाली नव्हती. काय होत तीच उत्तर??

क्रमशा....