Bhagy Dile tu Mala - 53 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ५३

इस देहलीज के पार जाणा
शायद मेरे बसमे नही
कसौटी है ये जिंदगी की
किसीं फिल्म की कहाणी नही...

विवाह...कुणासाठी एक सुंदर स्वप्न तर कुणासाठी एक श्राप... आधी हवाहवासा वाटणारा बंध तर आता कॉन्ट्रॅक्ट स्वरूपी जोडलेल नात...काळ हळूहळू जसजसा समोर जात आहे तसतसे विवाहाचे स्वरूप बदलत चालले आहे. एक वेळ होती जेव्हा एखाद्या मेहनत करणाऱ्या मुलाला सहज मुलगी मिळायची पण अलीकडे मुलगा चांगला आहे की नाही ह्यापेक्षा त्याला जॉब आहे की नाही? शेती आहे की नाही? ह्यांसारख्या गोष्टी बघितल्या जातात. एखाद्याला जॉब असेल तर काळाकुट्ट मुलगा सुद्धा सहज आवडून जातो. जॉब असलेल्या मुलाला व्यसन असलं तरीही चालेल पण एखादा चांगला मुलगा फक्त शेती आहे म्हणून किंवा सरकारी जॉब नाही म्हणून त्याला नकार दिला जातो. हे झालं मुलाच तर मुलीच काही वेगळं नाही. सुंदर मुलींसोबत लग्न करायला मूल एका पायावर तयार असतात पण एखादि मुलगी काळी असली किंवा चेहऱ्यावर डाग वगैरे असले की मग त्या मुलीकडे कुणी बघत नाही. एक वेळ रेप करायला तशी मुलगी चालेल पण लग्न करायला अजिबात नाही. अशा मुली जेव्हा वयात येतात तेव्हा विवाहबद्दलची ती सुंदर स्वप्न केव्हा श्राप बनतात त्यांनाच कळत नाही आणि एक प्रश्न समोर येतो " आता तुम्हीच सांगा पाहून कुठ जातील काळ्या पोरी "

स्वराच्याही आयुष्यात काही वेगळं नव्हतं. जेंव्हा तिचा चेहरा सुंदर होता तेव्हा तिला एकटक बघणारे हजार पुरुष होते पण आता तेच पुरुष तिला बघून दूर पळायचे मग अशा वेळी स्वराच्या आयुष्यात विवाहाला काही स्थान असेल का? आई- वडिलांना लाख वाटेल पण स्वराची लग्नासाठी मानसिक तयारी इतक्या सहज होईल का? कदाचित नाही म्हणूनच स्वरा विवाह हा विषय निघाल्यापासून चिंतीत होती. तिची आई एकमेव नव्हती, जी ह्याबद्दल बोलून गेली होती. तिच्या आयुष्यात आणखी कुणीतरी होत जे तिला ह्याबद्दल बोलून गेलं आणि स्वरा आपल्याच विचारात हरवली गेली. असा विचार जो आनंदी नव्हता. एका वयात आलेल्या मुलीला लग्नाच्या विचाराने त्रास होणे जे जरा विचित्रच पण स्वरा त्याच जिवंत उदाहरण होती.

ती रात्र गेली पण दुसरी सकाळ पुन्हा आनंद घेऊन आली. स्वराने सकाळी- सकाळीच सरांना कॉल करून सुट्टी मागितली होती आणि ती मंजूर देखील झाली त्यामुळे स्वराने आज पूर्ण दिवस बाहेर जायचा प्लॅन बनवला होता. आज सकाळपासूनच स्वरा आई- बाबांच्या मागे तयारी करा म्हणून लागली होती आणि तेही लवकर तयार होऊन बाहेर पडले. आज स्वराने बाहेर मूवीचा प्लॅन बनविला होता आणि ती आईबाबांना घेऊन मूवीसाठी सज्ज झाली. स्वराला स्वतःलाच आठवत नव्हतं की गेल्या कित्येक वर्षे आधी तिने थेटरमध्ये पाऊल टाकलं होतं. आज ती मूवी बघायला आली आणि पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर हसू पसरल. स्वरा लहान होती तेव्हा आई- बाबांच्या मधात बसून मूवी बघायची त्यामुळे ती लहानपणीची गंमतसुद्धा ती आज अनुभवत होती. मूवी बघून झाली आणि नंतर जेवणाला पुन्हा एकदा बाहेर. स्वराचे पाय आज जाग्यावर थांबत नव्हते. ती लहान असताना जसे आईबाबा तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचे तशीच ती आता आईबाबांचा हट्ट पूर्ण करत होती. आईबाबा तिच्याकडे कुतूहलाने बघत होते पण स्वराच मन काही भरत नव्हतं. तिच्या आई- वडिलांनी तिला आयुष्यात कधीच कशाची कमी पडू दिल नाही अगदी अपघात झाल्यावर तर ते तिची आणखीच जास्त काळजी घेत होते त्यामुळे आता ती स्वता त्यांच्यासाठी सर्व करू पाहत होती. आता ती जेव्हा स्वता कमावत होती तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी ती काहीही करु शकत होती. किती सुंदर क्षण असतो ना तो की लहानपणी आपले आईवडील आपले हट्ट पूर्ण करतात. कधी पैशांचा की वेळेचा विचार करत नाही. अगदी आपण त्यांच्यासोबत हे सर्व करू शकलो तर? आपण जेव्हा कमावतो आणि त्यांना स्वता सर्व आनंद देऊ लागतो तेव्हा एक मूल म्हणून तो आनंद व्यक्त करता येत नाही. हे मूल ज्यादिवशी समजेल त्यादिवशी त्याच्यावर योग्य संस्कार झालेत हे ठामपणे सांगता येईल. आई- वडील आपले कर्तव्य पार पाडत असले तरीही आपण कितीही काहीही केलं तरी त्यांना ते कधीच परत देऊ शकत नाही हे स्वराला माहीत होतं. त्यात तिचे आईबाबा सर्वात खास होते म्हणून तिला आईबाबासाठी जेवढं करावस वाटत होतं तेवढं कमिच पडत होत.

ती सायंकाळची वेळ होती. अर्नाळा बिच. स्वराला आज स्वतःला समुद्रावर यायची खूप इच्छा होती म्हणून ती आई- बाबांना घेऊन आली होती. सायंकाळच ते वातावरण फारच सुरेख जाणवत होतं. स्वरा आपल्या आई- बाबांसोबत हातात हात घालून वाळूवर शांत बसली होती तेव्हा स्वरा आपल्या आईला हळूच म्हणाली," आई तुला माहिती आहे. मी ना असच एक स्वप्न पाहिलं होतं. तुमच्यासोबत अस सागर किनारी निवांत बसायचं. मागच्या काही काळात मी स्वप्न पाहणं बंद केलं होतं पण आता मी पुन्हा स्वप्न पाहायला लागले आहे. आज मी कदाचित तुमच्यापासून दूर आहे पण काहीच दिवसात मी स्वतःचा फ्लॅट घेइन मग आपण कायम सोबत राहू. दर वर्षी मी तुम्हाला भारतात कुठेतरी फिरायला नेईन. मस्त एन्जॉय करू आपण तिघेही. आता आपल्यावर कसलच संकट येणार नाही. आई- बाबा तुम्ही राहणार ना माझ्यासोबत कायम?"

आईने स्वराच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले," स्वरा आम्ही तिकडे राहतो ना तर तुझी खूप चिंता लागलेली होती पण आता तुला आनंदी बघून मनाला थोडी शांती मिळत आहे. बघ स्वरा एक नाही हजार स्वप्न बघ आणि त्यांना पूर्णही कर. आम्ही तुझ्यासोबत कायम आहोत. फक्त एकच गोष्ट सांगेन की आमच्यापेक्षा आधी स्वतःचा विचार कर. तो आनंद आमच्यासाठी खूप खास असेल. तू आनंदी असलीस ना की आमच्याही चेहऱ्यावर आपोआप आनंद येईल पण तूच आनंदी नसलीस तर आम्ही आनंदी राहणं शक्यच नाही तेव्हा आधी स्वता आनंदी राहा."

स्वराच्या आईच बोलून झालंच होत की स्वराचे बाबा म्हणाले," स्वरा मी खूप जास्त बोलत नाही पण आज बोलावसं वाटत. मागचे काही वर्षे ना खूप कठीण होते आमच्यासाठी. ज्या मुलीला अंगा- खांद्यावर खेळवल तिला आयुष्यच नकोस झालेलं बघताना फार त्रास व्हायचा. एक वेळ तर असा प्रश्न पडून गेला होता की आमच्यानंतर तुझं काय होईल? पण आता तीही काळजी मिटली. स्वरा कायम आनंदी राहा बाळा. इतकी यशस्वी हो की लोकांनी तुझ्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. तुला तुझ्या चेहऱ्यावरून नाही तर तुझ्या नावावरून ओळखायला हवं. खूप सार्थ अभिमान आहे बाळा तुझा आम्हाला."

स्वरा बाबांकडे हसून बघत होती की बाबा पुन्हा म्हणाले," स्वरा मी देवाचे आभार मानेन की त्यांनी मला तुझ्यासारखी मुलगी दिली. जेव्हा तुझ्यासोबत तो अपघात झाला होता ना तेव्हा लोकांनी तुला ना- ना प्रकारे त्रास दिला पण तू ते सर्व सहन केलंस. सहनच केलं नाहीस तर त्यातून यशस्वी वाट शोधलीस. तेव्हा लोक तुला बघायला घाबरत होते पण आज स्वता घरी येऊन तुझ्याबद्दल विचारपूस करतात. आमचं नाव खूप रोशन केलंस स्वरा तू. मला आनंद आहे की आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली. गावात आजही म्हटल्या जात की मुलगाच वंशाचा दिवा आहे, मलाही कायम म्हटल्या गेलं. तोच म्हातारपणी साथ देईल. मुलगी काय सोडून जाईल पण तुला बघून मला म्हणावसं वाटत की मुलगी अशी असेल तर मला नको तो वंशाचा दिवा. तुझ्यासारखी मुलगी असेल ना तर असे हजारो दिवे कुर्बान. माझी ही एक मुलगी हजारो दिव्यांना मागे टाकते मग कशाला हवा तो दिवा. उलट ही पणती हवी मला जी अंधारात पण कधीच हार मानत नाही."

स्वरा पुढच्याच क्षणी बाबांचा हात पकडत म्हणाली," बाबा तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण हीच तुमची धाडसी मुलगी एकदा आत्महत्या करायला निघाली होती. विचार करतेय तेव्हा जर खरच मरण पावले असते तर?? तर कदाचित आज इतकं सुंदर जग पाहायला मिळालं नसत. आता मला पटलं बाबा की आयुष्यात कुठलीच गोष्ट कधीच कायमस्वरूपी राहत नाही. आपण फक्त जगत राहायच. ती वेळ निघून गेली ना तर सर्व काही ठीक होणार असत. आज कदाचित मी जिवंत आहे तर नव्याने पुन्हा लोक, जग बघत आहे आणि बघा ना माझ्याच बाबांकडून मला स्तुतीसुमने ऐकायला मिळत आहे. लव्ह यु बाबा! मी कधी म्हणाले नाही पण मी ह्या जगातली सर्वात नशीबवान मुलगी आहे की मला तुमच्यासारखे आई- वडील मिळाले. कदाचित मी मागच्या जन्मात काही पुण्य केलं असेल म्हणून तुम्ही माझ्या नशिबात आहात!! विचार करते तुम्ही नसता तर काय झालं असत? म्हणून आता हे संपूर्ण जीवन आपण सोबतच राहू. ज्यांनी मला जगायला शिकविल, ज्यांनी लहानाच मोठं केलं त्यांच्यासोबतच मी माझं पूर्ण आयुष्य जगणार आहे. मी आवडीने बनेन तुमच्या वंशाचा दिवा!"

स्वरा बोलतच होती की आई म्हणाली," पण स्वरा पूर्ण आयुष्य..."

आई बोलतच होत्या की स्वरा उत्तरली," आई मला माहित आहे तुला काय म्हणायचं आहे पण तो विषय नको आता. आता हा सर्व फॅमिली ड्रामा बंद करा आणि चला तिथे पाण्यात. इथे मस्ती करायला आलोय आपण दुःख व्यक्त करायला नाही. त्यासाठी पूर्ण आयुष्य पडलंय. मग एक दिवस कधी असा ड्रामा करायला पण आता नको. बघा तो समुद्र आणि घ्या उडी."

स्वरा सरळ त्यांचा हात पकडतच पाण्यात घेऊन गेली आणि त्यांच्यावर पाणी उडवू लागली. काहीच क्षणात आईसुद्धा तिच्यात एकरूप झाली आणि दोघीही मैत्रिणी बनून मस्ती करू लागल्या. आजचा दिवस स्वराच्या आयुष्यात खूप खास होता. कित्येक दिवसाने तिच्या आयुष्यात असा आनंद आला होता त्यामुळे ती तो प्रत्येक क्षण मोबाइलच्या कॅमेरामध्ये कैद करून ठेवू लागली. एन्जॉय तर सर्वांसोबत करता येतो पण आई वडिलांसोबत वेळ घालवण्याची मज्जाच वेगळी त्याला कुठेच तोड नाही. माणस हळूहळू मोठे होत जातात. काही दिवसात ते स्वतःही आई- वडील होतात. मुलांचे स्वप्न पूर्ण करता- करता ते स्वतः आईवडिलाची कुशी केव्हा हरवून बसतात ते त्यांनाही कळत नाही त्यामुळे स्वरा आयुष्याचा हा सुंदर क्षण स्वतःच कैद करून ठेवत होती.

***********

वेळ दुपारी 2.45. वर्धा सेवाग्राम एक्सप्रेस निघायला तयार होती. गेले दोन दिवस स्वराचे आईबाबांसोबत कसे गेले त्यांनाच कळलं नाही. स्वराच्या चेहऱ्यावर नकळत आनंद पसरला होता. आईच्या हातच तिला छान- छान खायला मिळालं होतं त्यामुळे तिला वेळेचा अंदाजच नव्हता पण जेव्हा आता आई-बाबा पुन्हा घरी जाणार होते तेव्हा तीच मनभरून आलं होतं आणि स्वरा तिथेच रडू लागली. तिला रडताना बघून बाबा तिला शांत करत म्हणाले," वेडोबा! आम्ही कुठे दूर जातोय. आता तर अशी पटकन विमानाने उडून माझ्याकडे येऊ शकतेस. रडू नकोस, शांत हो. तशी पण तूच म्हणाली आहेस ना की काहीच दिवसात आपण सोबत राहणार आहोत मग रडायचं कशाला? आम्ही तुझ्यापासून कधी दूर गेलो आहोत का की आज जाणार आहोत? आम्ही तुझ्याजवळ आहोत आणि कायम राहू."

बाबांनी तिच्या कपाळावर किस्सी केली आणि स्वरा शांत झाली. तेव्हाच आई म्हणाली," बाळा, तुला कधीही कसलीही अडचण पडली तर सरळ घरी ये किंवा मग आम्हाला फोन कर. आम्ही उडून तुझ्या जवळ येऊ आणि बर का माझ्या हिम्मतवान मुलीला असे अश्रू शोभा देत नाहीत. चल हस आणि आम्हाला निवांत जाऊदे. नाही तर आम्हाला जाता येणार नाही."

आई बोलतच होती की ट्रेनचा हॉर्न वाजला आणि आई तिच्या कपाळावर पप्पी देत म्हणाली," बाळा, बोलणं होत राहील पण एक गोष्ट नक्की सांगेन. आता आमचं वय झालंय. आम्ही कधी ना कधी जाणारच. तेव्हा आमचा जास्त विचार करू नकोस. आता वेळ आहे स्वतःच्या आयुष्याकडे बघायची. तू जर स्वता आयुष्यात स्वतःला आनंदी ठेवलस ना तर आम्हाला जास्त आनंद होईल. विचार कर स्वतःचा. आता काही निर्णय स्वता घे. एक निर्णय चुकला म्हणून सर्व चुकणार नाहीत. विचार कर माझ्या बोलण्याचा. आता भविष्याचा विचार कर. पक्का कर. तू आनंदी राहशील तेव्हा मी सर्वांत आनंदी असेल तेव्हा जग पुन्हा नव्याने. चल आम्ही येतो."

अचानक ट्रेन सुरू झाली आणि स्वराचा हात आईच्या हातातून सुटला. आई- बाबा तिला दारातून बघत होते तर स्वरा त्यांना भरलेल्या डोळ्याने हात हलवून बाय बाय करत होती. स्वरा अगदी काही क्षण हात हलवत राहिली आणि काहीच क्षणात ट्रेनही दिसेनाशी झाली.

आई-बाबांना सोडून स्वरा सायंकाळच्या वेळेला घरी परतली. आज घरात येताच स्वराला पुन्हा एकाकी जाणवू लागल. गेले दोन दिवस ह्याच घरात लोकांनी धुमाकूळ घातला होता तर आता तेच घर पूर्णपणे शांत जाणवत होतं त्यामुळे स्वराच मन काही थार्यावर नव्हतं. स्वरा रूममध्ये पोहोचली. काही क्षण तिथे थांबलिही पण हा एकांतपणा तिला अजिबात सहन होत नव्हता त्यामुळे काहीच क्षणात ती पुन्हा बाहेर पोहोचली. बाहेर थोडी थंड हव मिळताच तिला बर वाटू लागलं. पोटात कावळेही ओरडू लागल्याने तिने आज बाहेरच जेवण केलं. आज बराच वेळ ती रात्री एकटीच शहरात फिरत होती. घरात तिला करमत नव्हतं म्हणून तिला आज घराकडे यायची इच्छाच नव्हती. फिरता- फिरता जवळपास १० वाजले होते. आता थंडीही बऱ्यापैकी वाढली होती त्यामुळे ती नाईलाजाने परत आली. तिने पटकन कपडे चेंज केले आणि बालकनीमधून बाहेरच दृश्य बघू लागली.

बाहेर मस्त थंडी हवा सुरू होती. ती हवा स्वराच्या शरीराला स्पर्श करून जात होती तरीही स्वराने अंगावर गरम कपडे परिधान केले नव्हते. तिला कदाचित त्या वाऱ्याच्या स्पर्शाचा मोह झाला होता म्हणून स्वरा वाऱ्याला अनुभवतच बाल्कनीमध्ये उभी राहिली. काही क्षण गेले आणि स्वराचा मोबाइल वाजला. त्यावेळी घड्याळात साडे दहाच्या आसपास वाजले होते. स्वरा हळुवार बाल्कनीमधून रूममध्ये पोहोचली. तिने हातात मोबाइल घेतला. त्यावर स्वयमच नाव झळकत होत. त्याच नाव बघताच तिने कॉल रिसिव्ह करत म्हटले," हा बोलो स्वयम."

समोरून स्वयमच्या आई हसत म्हणाल्या," स्वयम नही उसकी मम्मी बोल रही हु."

स्वराने चेहऱ्यावर हलकेच स्मित आणत म्हटले," सॉरी आंटी मुझे लगा स्वयम है. छोडिये उसे. आप बताये कैसी है?"

स्वयमची आई हसतच म्हणाल्या," एकदम मस्त. तुम बताओ बेटा कैसी हो?"

स्वरा हळुवार आवाजात उत्तरली," मै ठीक हु. सॉरी आंटी मुझे पता नही था की अंकल नही रहे वरणा मै जरूर आती आपसे मिलने. अब अकेले अकेले लगता होगा ना आपको."

स्वयमच्या आईचा आवाज आता एकदम सॉफ्ट झाला होता आणि त्या म्हणाल्या," हा वो थे तो वक्त कैसेभी निकल जाता था. अभि वो नही और स्वयमभी ऑफिसमेही रेहता है इसलीये वक्त निकालना मुश्किल हो जाता है. पर अब क्या कर सकते है? ऐसें ही जिना है जिंदगीभर. आदत तो करणी पडेगी. "

स्वराही हळुवार आवाजात उत्तरली," सॉरी आंटी फिरसे बात निकालकर तकलीफ पहूचाने के लिये."

स्वयमच्या आई हसतच म्हणाल्या," पागल लडकी! कुछ भी बोलती है. अपनी औलाद सेभी कोई दुःखी होता है क्या? वैसे भी सच बोलू तो तुम्हारी बहोत याद आ रही थि इसलीये कॉल किया. स्वरा सच मे अकेला मेहसुस कर रही हु. तुम आ जावो ना दो-तीन दिन के लिये. तुमसे बात करके मन हलका हो जायेगा. वैसे भी बहोत दिनोसे कुछ बात करणी थि तुमसे वो बात भी कर लुंगी. तुम आओगी ना स्वरा मुझसे मिलणे ?"

स्वराला माहिती होत की त्यांना नक्की काय बोलायचं आहे म्हणून स्वरा शांतच होती तर त्याच्या आईच म्हणाल्या," ठीक है कोई काम है तो रेहने दो. जरूरत नही है आने की."

स्वरा आता गडबडीतच उत्तरली," आ जाऊंगी आंटी. मुझे भी आपसे बात करणी ही थि. मैं भी मिस कर रही हु आपको. इसलीये जलदी ही आ जाऊंगी."

स्वराच बोलणं होताच आई आनंदात म्हणाल्या," मैं इंतजार करूंगी स्वरा. जलदी आना. चलो तुम्हे कल ऑफिस होगा ना तो सो जाओ बाद मे बात करते है.बाय"

स्वरानेही बाय म्हणत फोन ठेवून दिला.

स्वराने पुन्हा एकदा मोबाइल गादीवर फेकला आणि पुन्हा बाल्कनीमध्ये आली. स्वराला आधीच माहिती होत की काकूंना नक्की काय बोलायचं आहे म्हणून ती जरा मनातून घाबरली होती. ती आजपर्यंत ज्या गोष्टीपासून पळ काढत होती आता त्याच गोष्टीला तिला फेस कराव लागणार होतं आणि ती प्रयत्न करूनही तो विषय टाळू शकत नव्हती. दिल्ली आणि काकूंचे शब्द आता तिच्या मनात बसले होते. स्वराच आयुष्य आणखी कोणतं वळण घेणार होत. पुन्हा तेच दिल्ली शहर आणि एक वेगळं वळण??

भागती रही जीस किनारे से
वही किनारा आज मुझे बुला रहा है
ये दस्तक है किसीं अंजाने सैलाब की
या कोई तुफान मेरी याद मे उमड रहा है

क्रमशा....